Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नाटक्या on Fri, 07/17/2009 - 05:19
  • Log in or register to post comments
  • 17626 views

प्रतिक्रिया

Submitted by नंदन on Fri, 07/17/2009 - 05:30

Permalink

शुभेच्छा

आगामी पुस्तकाबद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन! वैज्ञानिक तत्त्वे समजावून सांगणार्‍या अनेक व्हिडिओंत डॉ. मिचिओ काकूंना पाहिले होते, त्यांचे पुस्तक मराठीत येते आहे हे फारच छान. या मुखपृष्ठांपैकी दुसरे, थिंकरचे मुखपृष्ठ सर्वात अधिक प्रभावी/सूचक वाटले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 07/17/2009 - 05:40

In reply to शुभेच्छा by नंदन

Permalink

हेच

हेच म्हणते. दुसरे चित्र. आपल्याला शुभेच्छा! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 07/17/2009 - 05:47

In reply to हेच by रेवती

Permalink

असेच म्हणतो

दुसरे चित्रच उत्तम. शिवाय आपल्या पुस्तकासाठी हार्दिक शुभेच्छा!! - भटोबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 07/17/2009 - 09:42

In reply to असेच म्हणतो by घाटावरचे भट

Permalink

+१

>>दुसरे चित्रच उत्तम. शिवाय आपल्या पुस्तकासाठी हार्दिक शुभेच्छा!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on गुरुवार, 09/09/2010 - 18:09

In reply to शुभेच्छा by नंदन

Permalink

लिहायला गेलो आनि बल्ल्या

लिहायला गेलो आनि बल्ल्या झाला... एक पान टंकुन झाल्यावर.. मिपावर "page can not b displayed" चायला... जाऊ द्या........ अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Fri, 07/17/2009 - 05:33

Permalink

२ रे, ३ रे आणि ४ थे

२ रे, ३ रे आणि ४ थे डिझईन्स बेष्ट. ....बबलु
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 07/17/2009 - 05:34

Permalink

अभिनंदन...

पुण्यातील खातनाम मराठी प्रकाशक, मेहता पब्लिशिंग हाऊस याचे प्रकाशन करणार आहेत. बहूदा नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान याचे प्रकाशन होईल असा अंदाज आहे. वॉव. :) मला ३रे चित्र जास्त आवडले. (वाचक) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 07/17/2009 - 06:01

Permalink

वा आगामी पुस्तकाबद्दल अभिनंदन!

अशा नवीनतम विषयावरचं पुस्तक तुम्ही अनुवादित करीत आहात ही अतिशय कौतुकाची आणि आनंदाची बाब आहे! :) उत्तम पुस्तक लवकरात लवकर बाजारत येवो अशा शुभेच्छा! तुम्ही केलेल्या चित्रांपैकी दुसरे चित्र मला सर्वात जास्त सूचक वाटले. परंतु अधिक विचाराअंती चौथेसुद्धा चालेल. (रोबॉट)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Fri, 07/17/2009 - 06:09

Permalink

अभिनंदन

अभिनंदन आणि पुस्तकासाठी शुभेच्छा! मला दुसरे चित्र आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 07/17/2009 - 06:28

Permalink

माझे मत

३र्‍या व ४थ्या चित्राला. या पुस्तकाच्या भरघोस यशासाठी हार्दिक शुभेच्छा! (वाचनोत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Fri, 07/17/2009 - 06:39

Permalink

अभिनंदन

पुस्तकासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. मला तिसरे आणि चौथे जास्त आवडले, पण +१ चौथ्यासाठी. दिपाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 07/17/2009 - 06:55

Permalink

वॉव!!

कर्‍हाडेसाहेब अभिनंदन. काकूकाकांना डिस्कव्हरी, नॅटजिओ यावर अनेक कार्यक्रमातून पाहीले आहे. एक कॉपी माझ्यासाठी ठेवा नक्की [पैसे कुठे पाठवू?] नाहीतर दुसर्‍या आवृत्तीपर्यंत वाट पहायला लागायची. :-) अभिनंदन! मुखपृष्ठ क्रमांक ४ [अंतराळातील खेळः] पसंती. तरुण वाचकांना आवडेल असे वरील एकमेव चित्र.
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Fri, 07/17/2009 - 07:17

Permalink

पुस्तक

पुस्तक प्रकाशनाबद्दल शुभेच्छा! दुसरे नमुना मुखपृष्ठ आवडले. पण मजकुराचा फाँट विषयाशी अधिक समर्पक निवडला तर आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Fri, 07/17/2009 - 08:06

In reply to पुस्तक by विंजिनेर

Permalink

+१

हेच.. दुसरे आवडले. फाँटवर विचार करावा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Fri, 07/17/2009 - 08:05

Permalink

शुभेच्छा.

पुस्तक प्रकाशनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. मलाही दुसरे चित्र योग्य वाटते. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 07/17/2009 - 08:14

Permalink

अरे वा!! याच

अरे वा!! याच पुस्तकाबद्दल आपण बोललो होतो ना? बरं झालं ..खूप छान! आपल्या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा! २ रे चित्र खूप छान आहे कव्हरसाठी. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Fri, 07/17/2009 - 13:48

In reply to अरे वा!! याच by प्राजु

Permalink

नाटक्या

नाटक्या तुमच्या भावी पुस्तकाला मनःपुर्वक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 07/17/2009 - 08:18

Permalink

शुभेच्छा!

कर्‍हाडे साहेब, मला दुसरे आणि चौथे चित्र योग्य वाटतंय. तुमच्या ह्या प्रकल्पाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

Submitted by अडाणि on Fri, 07/17/2009 - 08:39

Permalink

शुभेच्छा !!!

प्रामाणिक मत... पहिले आवडले... ३ व ४ मधे रंगसंगती अशी आहे कि तुमचे नाव ठिक दिसत नाहीये.... कल्पकते वरून ही पहिले चित्र जास्त आवडले... चित्र क्र. २ ईतक्या ठिकाणी बघीतले आहे कि ते आता 'घिसे-पीटे' झाले आहे.... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 07/17/2009 - 08:56

Permalink

पहिलं

पहिलं चित्र अधिक कल्पक वाटलं.. माधवशेठ, तुमचं कौतुक वाटतं. प्रकल्पाकरता शुभेच्छा... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Fri, 07/17/2009 - 09:25

Permalink

अभिनंदन आणि शुभेच्छा

चौथे आवडले. तुमच्याबरोबर श्रावणरांवाचे आणि अदितीताईंचे अभिनंदन आणि तुमच्या ह्या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Fri, 07/17/2009 - 09:33

Permalink

पहिलं

पहिलं किंवा तिसरं चित्र जास्त सुट होइल. दुसरं पण ठिक आहे, पण ते खुप ठिकाणी वापरले गेलेय. तिसरं मला जास्त आवडलं. असो.. खुप महत्वाचं कार्य करताय, मनापासुन शुभेच्छा ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Tue, 07/21/2009 - 12:49

Permalink

अभिनंदन

मला दुसरे चित्र जास्त आवडले. मागणी कुठे नोंदवु? ता.क.: नवीन टाकलेले पाचवे चित्र नाही आवडले. मानव तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला नाही आवडत. निसर्गात ढवळाढवळ न करता केलेली नवनिर्मीतीच जास्त भावते. ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Fri, 07/17/2009 - 09:51

Permalink

पुस्तका

पुस्तका बद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन, मला दुसरे व चौथे चित्र चांगले वाटते ==निखिल
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 07/17/2009 - 10:40

Permalink

४

क्रमांक ४ चे चित्र. लेखक - मिचिओ काकू असे नको. पुस्तकाचे शीर्षक, तळवा झाल्यानंतर थेट "मिचिओ काकू" एवढेच नाव आत्तापेक्षा थोड्या मोठ्या आकारात घ्या. "अनुवाद..." आणखी खाली आला तरी चालेल. शीर्षकात केलेला खेळ आवडला. फॉण्ट अर्थातच तुम्ही आत्ता युनिकोडचा मंगल घेतलेला दिसतो. मेहतांकडे गेल्यानंतर तो बदलेलच. श्रीलिपीतील येईल किंवा कदाचित सुलेखनातील येईल. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by रवि on Fri, 07/17/2009 - 11:02

Permalink

३ र मस्तच

३ र मस्तच आहे, त्यानंतर चित्र क्र. २ ........ रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ...... एक नजर इकडेही टाका
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 07/17/2009 - 11:11

Permalink

अभिनंदन

अभिनंदन .. दुसरे किंवा तिसरे यापैकीच एक चित्र निवडावेही आग्रहाची मागणी.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 07/17/2009 - 11:39

Permalink

वावा..

अभिनंदन आणि पुस्तकासाठी शुभेच्छा! दुसरे चित्र निवडावेत असे वाटते, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by leo nardo di caprio on Fri, 07/17/2009 - 12:09

Permalink

३रे एकदम बेस्ट

मला ३रे चित्र आवडले. ४थे चित्र प्रभाव पाडू शकत नाहि,माझ्या मते.
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on Fri, 07/17/2009 - 12:24

Permalink

तुमच्या

तुमच्या पुस्तकासाठी मनापासून शुभेच्छा माझ्या मते चौथे चित्र हे पुस्तकाबद्दल बर्‍यापेकी उत्सुकता निर्माण करते.. पुस्तक वाचायला नक्की आवडेल! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 07/17/2009 - 12:29

Permalink

अभिनंदन! आणि शुभेच्छा!

अरे वा! अभिनंदन! आणि शुभेच्छा! मला पहिले चित्र आवडले ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विमुक्त on Fri, 07/17/2009 - 14:27

Permalink

३...

तीसरा भारि आहे.... १, २ आणि ४ फारच साधी वाटत्यायत..... पण अ वर मारलेलि फुल्लि नीट नाहि वाटत....
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Fri, 07/17/2009 - 14:42

Permalink

तुमचे

तुमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!! वरील मुखपृष्ठांमध्ये मला दुसरे चित्र आवडले आहे. सुसंगत कल्पना आणि काळ्या पार्श्वभूमीवर पिवळा पुतळा उठून दिसतो आहे. तुम्ही कोणते मुखपृष्ठ अखेरीस निवडाल ते आम्हाला जरुर सांगा.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 07/17/2009 - 14:49

Permalink

वा!!!

वा!!! शुभेच्छा!!! पुस्तक कधी येतंय नक्की ते सांगा. वाचायला आवडेल नक्की. मुखपृष्ठाबद्दल. माझ्या मते मुखपृष्ठामुळे वाचकाची उत्सुकता चाळवली गेली पाहिजे. त्याला पुस्तकाबद्दल कळावे पण एवढेच की तो ते उचलून उत्सुकतेने हातात घेऊन पानं चाळेल. बास. विकत घेईल की नाही हे ते पुस्तक चाळताना त्याचा दृष्य परिणाम कसा आहे, विषय काय आहे, लेखक कोण आहे वगैरे वर अवलंबून असते. पण मुपृचे काम एवढेच मर्यादित आहे. त्या दृष्टीने विचार करता: पुस्तकाचे नाव आहे असंभव. अ वर काट मारली आहे. म्हणजे आज जे असंभव आहे ते उद्या संभव होईल नक्की असे म्हणायचे असावे पुस्तकाला. पहिल्या चित्रात जी काही बाई आहे किंवा दुसर्‍या चित्रातला 'द थिंकर', त्यामुळे हा संभव / असंभव चा रेफरन्स येत नाही ध्यानात पटकन. म्हणून बाद. तिसर्‍या चित्रात काय म्हणायचे आहे नक्की तेच कळत नाही. फार तर हे पुस्तक काही तरी वैज्ञानिक विषयावर आहे बॉ अशी जाणिव होते पण परत तेच... संभव / असंभव चा रेफ नाही येत. चौथे चित्र पण तसेच. स्पेसवॉक आजकाल रूटिन झाला आहे पब्लिकच्या दृष्टीने. माझी सूचना: चौथे चित्र थोडेसे बदलावे. ते अंतराळवीर नुसते तरंगताना न दाखवता .... त्यांचा पोषाख अगदी लाईट म्हणजे कमी बल्की आणि ते अंतराळात एखादी नॉर्मल अ‍ॅक्टीव्हिटी करत आहेत अथवा काही खेळ खेळत आहेत असे काही दाखवता आले तर? नवीन प्रकारच्या पोषाखामुळे आज अंतराळात वावरताना जो जड पोषाख घालावा लागतो तो लागणार नाही भविष्यात असे सूचित करता येईल आणि एखादा खेळ किंवा अंतराळवीरांच्या हातात हॉकी स्टिक वगैरे दाखवली तर अंताराळात नॉर्मल आयुष्य व्यतीत करता येईल पुढच्या काळात असे सूचित करता येईल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 07/17/2009 - 14:56

Permalink

सर्वा॑त पहिले अभिन॑दन...

सर्वा॑त पहिले अभिन॑दन... ही माझी काही वैयक्तीक मते.. १) ई॑ग्रजी पुस्तकात रोबोट्स विषयी, केवळ एकच, धडा म्हणा कि॑वा चाप्टर म्हणा, आहे..म्हणुन मला पहिली दोन चित्रे घेण तितकस समर्पक वाटत नाही...मुखपृष्ठावर केवळ रोबोट दिसल्यावर, पुस्तक केवळ त्या विषयावरच आहे असा एक गैरसमज होण्याचा धोका आहे असे मला वाटते..त्यामुळे चित्र क्र॑माक एक वा दोन ला माझे मत मी देत नाही २) चित्र क्रमा॑क ४, थोडस "कॅज्युवल" वाटत.पुस्तकाच्या विस्तृत "साय-फाय" वातावरणाला ते सुट होईल असे वाटत नाही... ३) चित्र क्र. ३ मात्र तशी वातावरण निर्मीती करु शकते..त्यात ही एक छोटी गोम आहे.."आय, रोबोट" नावाच्या ईग्र॑जी चित्रपटात, असाच पण वर्तुळाकार क्वांट्म आणि फोटॉनिक्स वर आधारलेला संगणक आहे..पण तुर्तास तरी, परिणाम साधण्याकरिता त्याच्या ऊपयोग नक्की होऊ शकतो. तुमच्या भावी पुस्तकाला मनापासुन शुभेच्छा.. <<<या पुस्तकासाठी आपले मिपाकर "३_१४ आदिती" आणि श्री. श्रावण मोडक यांचे बहुमोल सहकार्य मला मिळाले आहे त्या बद्दल त्यांचे शतशः आभार. >>> अदितीताई आणी मोडका॑चे ही अभिन॑दन.... सुहास
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 07/17/2009 - 15:16

Permalink

सर्वप्रथम

सर्वप्रथम आपल्या उपक्रमास अनेकोत्तम शुभेच्छा !! मला पहिले आणि दुसरे चित्र आवडले. पण पहिल्यामध्ये आपल्याला जे सांगायचे आहे ते आपण चित्रासोबत लिहिलेल्या मजकुरामुळे समजले. दुसरे चित्र मात्र लगेच मनावर ठसले. माझे मत दुसर्‍या चित्राला. एक सुचवणी - पुस्तकाची बांधणी डाव्या बाजूला असते आणि पाने उजव्या बाजूला मोकळी असतात. आपल्या मुखपृष्ठावरचा यंत्रमानवाचा चेहरा जर उजवीकडे येणारा असेल तर मला तो जास्त आकर्षक वाटेल. म्हणजे थिंकरची पाठ डाविकडे (बांधणीकडे). शुभेच्छा ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on Fri, 07/17/2009 - 19:11

In reply to सर्वप्रथम by लिखाळ

Permalink

अभिनंदन!

आणि उपक्रमास मनापासून शुभेच्छा! मुखपृष्ठाच्या बाबतीत लिखाळसाहेबांशी सहमत. पहिले आणि दुसरे मुखपृष्ठ फक्त विज्ञानाशी संबंधित वाचकच नव्हेत तर माझ्यासारख्या सामान्य वाचकांपर्यंत पोचणारे वाटले. श्रावण मोडक व अदितीचेही अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/17/2009 - 15:34

Permalink

शुभेच्छा!

नाटक्याबुवा, बरीच वेगवेगळी नाटकं करता की! :) हार्दिक शुभेच्छा! मुखपृष्ट संरचनेबाबतः १. माझं मत [भविष्यातील क्वांट्म आणि फोटॉनिक्स वर आधारलेला संगणक] ह्याला. २. असंभव शब्दामधल्या 'अ'वर जी फुली आहे त्याऐवजी 'नो एंट्री'ची पाटी असते किंवा 'नो स्मोकिंग'ची त्यापध्दतीने एकच तिरपी रेष जरा जाड आकारातली आणि त्याभोवतीचे वर्तुळाची जाडीही त्या रेषेच्या मापाची आले तर जास्त परिणामकारक दिसेल असा माझा अंदाज आहे. ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Fri, 07/17/2009 - 15:36

Permalink

शुभेच्छा

माधवराव आपले अभिनंदन आणि शुभेच्छा. क्र. ३ चे मुखप्रुष्ठ आवडले. मिपाकरांकरता प्रकाशनपूर्व सवलत मिळणार काय? :) मोहन
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 07/17/2009 - 16:02

Permalink

नाटक्या

नाटक्या तुमच्या भावी पुस्तकाला मनःपुर्वक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 07/17/2009 - 16:43

Permalink

महाराज

महाराज अभिनंदन हो :) दुसरे चित्र उत्तम आहे. नाटक्याबुवांचा शिष्य ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 07/17/2009 - 20:03

Permalink

आमचे मत

दुसरे चित्र अधिक भावले. शीर्षक सुंदर आहे. बाकी पुस्तकामुळे आपल्याविषयी आदरयुक्त दडपण वाढले प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by एक on Fri, 07/17/2009 - 23:35

Permalink

हार्दिक शुभेच्छा!

आयडिया बरेच दिवस घोळत होती अखेर पूर्णत्त्वास नेलीस तर! जबरी.. मला ३ नंबर चं चित्र जास्त आवडलं. चौथं चित्र लहान मुलांसाठी लिहिलेल्या विज्ञान पुस्तकांसारख (बाळ फोंडके, इ.) वाटतं. १ ल्या नंबरच्या चित्रात तुला जो मेसेज द्यायचा आहे तो मला पहिल्यांदा चित्र बघितलं तेव्हा कळला नाही. आशय वाचला आणि मग ते चित्र पटलं (अर्थात हे माझ्या आकलनशक्तीच्या मर्यादेमुळे झालं असण्याची दाट शक्यता आहे.) ३ रं चित्र १ ल्या किंवा २ र्‍या सारखा मेसेज देत नाही पण त्यात दिसणार्‍या समीकरणांमुळे, रंगसंगती, ग्राफिक्स मुळे (जश्या डिस्कव्हरीच्या एपिसोडस मधे वापरले असतात) हे काहीतरी हाय-फाय वैज्ञानिक पुस्तक आहे हा मेसेज पटकन मिळतो. त्यामुळे आमचं मत ३ र्‍या ला.!! -(प्रकाशना नंतर ऑथर-साईन्ड कॉपी मिळेलच याची खात्री असलेला) एक.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Sat, 07/18/2009 - 00:37

Permalink

दुसरे आणि

दुसरे आणि चौथे छान वाटत आहे. पुस्तक प्रकाशनासाठी हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by अश्विनीका on Sat, 07/18/2009 - 02:13

Permalink

मला पण

मला पण दुसरे आवडले. पण चित्रावरून पटकन मेसेज मिळत नाहिये. त्यापेक्षा चौथे योग्य वाटेल. भावी पुस्तकासाठी शुभेच्छा ! - अश्विनी
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 07/18/2009 - 02:59

Permalink

#२

मला #२ अधिक भावलं. विज्ञानाची जी काही प्रगती आहे ती मानवाने त्याच्या थिंकींगमधून केली आहे या अर्थी... फक्त धमाल्याने म्हटल्याप्रमाणे त्या अ वरची फुली काढून तिथे नो एन्ट्रीसारखे चिन्ह लावता आहे तर जास्त चांगलं दिसेल... पुस्तकाबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!! एक अनाहूत सल्ला: पुस्तकाच्या गॅलीज स्वतः बारकाईने वाचून पहा. अगदी काना-मात्रा-वेलांटीसकट!!! दुसर्‍या कुणावरही विसंबून राहू नका. नाहीतर तुमच्या सोन्यासारख्या पुस्तकाची मुद्रक/प्रकाशक वाट लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.... अनुभवी, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sun, 07/19/2009 - 11:44

In reply to #२ by पिवळा डांबिस

Permalink

सहमत

सहमत. लय मोलाचा सल्ला.
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on Sat, 07/18/2009 - 04:49

Permalink

अभिनंदन

प्रथम याबद्दल अभिनंदन. पुस्तक उपलब्ध झाल्यावर वाचण्याची उत्सुकता नक्कीच आहे. मला दुसरे किंवा चौथे चित्र जास्त आवडले. त्यातही चौथे. ते खूप कुतूहल निर्माण करते.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 07/18/2009 - 10:42

Permalink

नाटक्या शेठचे अभिनंदन......

खुपच सुंदर कल्पना आहे तुमची.अशीच सर्वोत्तम पुस्तके मराठी आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. परत एकदा मनपुर्वक अभिनंदन.तुमच्या पुस्तकाची वाट पहात आहे. सर्व मुखपृष्ठे एकदम झक्कास आहेत. चीनचा झेंडा काढुन आपल्या भारताचा लावता आला तर खुपच उत्तम. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by आबा on Sat, 07/18/2009 - 15:22

Permalink

खुपच मोठ

खुपच मोठ काम करता आहात तूम्ही,, विज्ञानवरचि पुस्तके मराठीत फारच कमी आहेत तुमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!! ...मुखपृष्ठाबाबत विचाराल तर मला शेवटची दोन आवडली.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com