पैशाने पैसा वाढतो.

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in जनातलं, मनातलं
5 Jul 2009 - 11:33 pm

पैशाने पैसा वाढतो.

जर पैसे मिळवणे हा जन्मसिध्द हक्क प्रत्येकालाच प्राप्त आहे हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला हेहि मान्य करण्यास हरकत नसावी कि एका सर्टन स्टेज नंतर पैसा सुध्दा पैसे मिळविण्याचे काम करु शकतो. आता हेच पहाना प्रथमतः आपण पैसे ममळवण्यासाठी काय काय करतो ते वेगळ सांगावयाची जरुरि नाही तुम्ही ते केलेलेच आहे व अनुभवले सुध्दा आहे. आता तुम्हि थोडे स्टेबल झाला आहात. थोडी बचतहि करु लागला आहात. आता तुम्हाला व मला वाटतं आहे रिलॅक्स जीवन जगावे अर्थात त्यासाठि थोडा कॅलक्युलेटेड धोका हा स्विकारावाच लागेल.
कॅलक्युलेटेड धोका म्हणजे जुगार नव्हे.
मटका हा जुगार आहे त्यात सिंगल आकडा खेळला तर पैसे मिळण्याची शक्यता १० टक्केच असते जोडि खेळली तर १ टक्काच असते. थोडक्यात जेवढा फायदा जास्त तेवढा धोका अधिक.
म्हणून मटका खेळावा काय?
एक सांगा किति लोकं मटका खेळून श्रीमंत झाल्याचे तुम्हि पाहिले आहे?
जुगार चालविणारा नेहमिच फायद्यात असतो व जुगार खेळणारा नेहमिच तोट्यात असतो हि वस्तुस्थिती आहे.
आपण श्रीमंत व्हावे असे प्रत्येकालाच मनातून तरि वाटत असतं.
पण श्रीमंति एका दिवसात फक्त लॉटरिचे तिकीट लागणा-यालाच येवू शकते.
पण येथे शक्यता पाहिली तर कोटित एकाला बक्षिस लागणार.
पैसा हा निश्चितच नशिबाने मिळत नसतो. कदाचित कोटीत एखाद्याला मिळतहि असेल म्हणून तो नियम नाही होवू शकतं.
पण खात्रीने सांगतो तुम्हि सर्वजण निश्चित श्रीमंत होवू शकता आवश्यकता आहे ती तुम्हाला श्रीमंत व्हावस वाटण्याची म्हणजेच इच्छा शक्तिची.
मग आपण चर्चा करुया मार्ग निश्चितच आहे.
खुले आम बोलो साब बोलनेसे सीवा कुछ नहि होता है.

अर्थव्यवहारगुंतवणूकजीवनमानलेखअनुभववाद

प्रतिक्रिया

सदानंद ठाकूर's picture

5 Jul 2009 - 11:37 pm | सदानंद ठाकूर

दोन दिवस मी तुमचे सोबत असणार नाही कारण इंटरनेट नसलेल्या ठिकाणी जात आहे॥

सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करुया.
मला अन्यत्र भेटण्याची जागा

विसोबा खेचर's picture

6 Jul 2009 - 1:01 am | विसोबा खेचर

दोन दिवस मी तुमचे सोबत असणार नाही कारण इंटरनेट नसलेल्या ठिकाणी जात आहे॥

अहो मग तोवर आमच्या श्रीमंत होण्याचं बारगळलंच की! :)

एनीवेज, लौक्कर परत या आणि पैशेवाला बनायचे उपाय सांगा. मलाही साला 'मालदार पार्टी' बनायचं आहे. :)

तात्या.

पिवळा डांबिस's picture

6 Jul 2009 - 9:48 pm | पिवळा डांबिस

अहो मग तोवर आमच्या श्रीमंत होण्याचं बारगळलंच की!
एनीवेज, लौक्कर परत या आणि पैशेवाला बनायचे उपाय सांगा. मलाही साला 'मालदार पार्टी' बनायचं आहे.
हा, हा, हा!!! ज ब ह रा प्रतिसाद!!!!!:)
आमीपण केंव्हापासून वाट बघतोय की आत्ता उपाय सांगतील, मग सांगतील!!! आता दोन दिवस खोळंबून रहाणं आलं नशिबी!!!:)

अवांतरः आमी तिच्यायला उगाच आपले मनीप्ल्यांट लावून वाट बघतोय!!!:)

अनंत छंदी's picture

6 Jul 2009 - 1:44 pm | अनंत छंदी

गॅरेंटेड येणारा आकडा सांगणार की काय? नाही, लेखाच्या सुरुवातीसच मटकापुराण आहे म्हणून म्हटले. ;)

JAGOMOHANPYARE's picture

23 Jul 2009 - 9:13 am | JAGOMOHANPYARE

ठाकूर चुप क्यु हो गये ? गब्बर आ गया क्या ? :)