Skip to main content

तू येशील का रे आज?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 10/06/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
पेंगुळल्या आता गर्द सावल्या, फांदीसवे रे झुकली सांज! धुंदावल्या डोळ्यांत माझ्या, चढली आहे कसली झांज? अन कंटाळले रे इंद्रधनूही, प्रिया तू येशील का रे आज? बघ धुंद करी तो मृदगंधही, ल्याली धरणी अवघा साज! मिलनास तुझीया सिद्ध धरा, तूज कसला रे चढला माज! चल वरूणा झडकरी ये रे, मी वाट पाहते सोडूनी लाज! विशाल
लेखनविषय:

वाचने 1511
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

धनुभौ तुमच्याबरोबर त्या पावसाला पण आणा :-) धन्स. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120