पुर्वीचे खेळ म्हणजे पकडा-पकडी, लपाछूपी, डबाइसपैस, विठी दाडू, गोट्या, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात मळ्यात, संत्र लिंबू, आम्ही तुमच्या पाण्यात, रंग रंग कोणता रंग, म्हातारी म्हातारी, पायता पायता, आट्यापट्या, रुमाल उडवी, पतंग उडविणे, चाक फिरविणे (गाडा) आबादबी, खांबापकडी, आणि असे बरेचसे खेळ होते. ह्या खेळांमधून मुलांचे मनोरंजन तर होतच होते शिवाय त्यांचा व्यायामही होत होता.
तसेच काही खेळ होते जसे कवड्या उडविणे, अटक्-मटक, भोवरा फिरवीणे, चिठ्ठी चिठ्ठी, भातुकली ह्या खेळातुन मुलांचे निखळ, निरागस मनोरंजन होत होते.
काही बैठे खेळ होते जसे बुद्धीबळ, सापशिडी, व्यापार, लुडो, कोडी घालणे, गोष्टी सांगणे ह्यातून मुलांचा बौधिक विकास होत होता.
आता काळ बदलला आई बाबा दोन्ही नोकरी करु लागले आहेत. मुलांना द्यायला खुप कमी वेळ आहे. नोकरी मुळे म्हणा की न पटल्यामुळे कुटुंबे विभक्त झाली आहेत. घरात जुने खेळ खेळण्यासाठी आजी आजोबा नाहीत, मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदाने नाहीत जागा अपुरी आहे मग मुलांना. ह्या धकाधकीच्या जीवनाचा फायदा उठवून जुने खेळ कालबाह्य ठरवून व्हीडीओ गेम, कॉम्प्युटर गेम, कार्टून फिल्मस ही ह्या परकीय खेळ, मनोरंजनांनी धुमाकूळ घातला आहे.
हल्ली जे कार्टून फिल्म दाखवतात ते लहान मुलांचे आहेत अस वाटतच नाहीत. त्यातील बरीचशी पात्र हिंसक असतात. काही फिल्मस मधे तर हिंदी-इंग्लिश चित्रपटांप्रमाणे प्रेमकहाण्याही असतात. काही पौराणीक फिल्मही चालू आहेत. हा चांगला उपक्रम आहे, पण ह्यातील बरीचशी माहीती बनावट असते. त्यामुळे मुलांना योग्य माहीती मिळत नाही.
हे खेळ, मनोरंजन कॉम्पुटर, टी.व्हीच्या स्क्रिनवर असल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर परीणाम होतच आहे शिवाय मुलांच्या मनावर आई वडीलांपेक्शा जास्त वेळ कार्टून, गेम मध्ये घालवल्यामुळे अशा कार्टून चे संस्कार मुलांच्या मनावर रुजत चालले आहेत. तासन तास ते खेळ आणि टीव्ही पाहील्यामुळे शरीराचा व्यायाम तर खुंटलाच आहे. मुल सुस्त, हट्टी बनत चालली आहेत.अर्थात ही समस्या प्रत्येक घरात असेल असे नाही. अजुनही बरीच एकत्र कुटूंब आहेत, विभक्त असले तरी आई वडीलांचा मुलांना पुरेसा सहवास आहे.
पुर्वी मुलांना वाचनाचे, मातीची भांडि बनविण्याचे, चित्रकलेचे, तिकीट जमा करणे, नाणी जमा करणे, कागदांच्या वस्तू बनवणे व इतर अनेक असे छंद होते ज्यातून त्यांची कल्पना शक्ती वाढत होती.
पण आता बाजारात रेडीमेड क्ले सकट साचे मिळू लागले आहेत. रंगित टॅटु मिळू लागले आहेत. रेडीमेड चित्र रंगवायला मिळत आहेत. त्यामुळे मुलांच्या कल्पना साचेबंद झाल्या आहेत. वाचनाची गोडी मुलांमध्ये कमी झाली आहे त्यामुळे मुलांना बोधपर गोष्टी, जनरल नॉलेज, इतिहासाची माहीती ह्याला मुकावे लागत आहे.
ह्या सगळ्यामध्ये दोष मुलांचा वा पालकांचाच आहे अस नाही म्हणता येणार. दोष परिस्थीतीचा आहे. पण ह्यातून ही समस्या पालकांमार्फत दूर होऊ शकते. जेवढा वेळ मिळेल त्यातून पालकांनी स्वतः मुलांबरोबर लहान होऊन जुन्या खेळांची माहीती द्यायला हवी. बोधपर गोष्टी सांगायला हव्यात. कुठले कार्टून चांगले आहेत ते निवडून द्यायला हवेत. स्वतःवाचून मुलांमध्ये वाचनाची गोडी मुलांना लावायला हवी. कुठल्या कलेत आपल्या मुलाला रस आहे हे ओळखून त्या कलेत त्याला प्रोत्साहन द्यायला हवे.
चु.भु.द्या.घ्या.
वाचने
7145
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
खेळ
खेळ
उत्तम
In reply to खेळ by मराठमोळा
बोला
In reply to खेळ by मराठमोळा
हाण
In reply to बोला by अवलिया
वा ! उत्तम
चांगला लेख
ह्या खेळा
मी हि
In reply to ह्या खेळा by अमोल केळकर
अमोल
अनुभवी दिसताहात मास्तर.
In reply to अमोल by विनायक प्रभू
(विषय दिलेला नाही)
In reply to अमोल by विनायक प्रभू
मस्त लेख!
अगदी मनातलं बोललात..
वाह वाह
मुलांसाठी मैदाने नाहीत,
फार चांगला विषय / धागा.