भारत भेट

दवबिन्दु's picture
दवबिन्दु in काथ्याकूट
13 May 2009 - 12:57 pm
गाभा: 

माजी एक मावसबहिन आहे तिचा बाबा आजारी होता म्हनुन ती मागल्या म्हईन्यात युएस वरुन भारतात आली एक फोर्टनायिटसाठी. ४ ला आलि आनी लगेच २३ ला गेली. तसच माजी एक फ्रेंड आहे ती तीच्या भावाच्या लग्नासाठी फिजिहुन इंडियाला २६ मार्चला आली आनी २९ मार्चला रिटर्न गेलि. आता पन माजा एक काका फुडल्या म्हैन्यात पुतनीच्या बारशाला म्हनुन २-३ दिवसासाटी दुबयहुन इथ येनार आहे.

माज्या मनात येत कि ह्ये एनआरआय लोक वोटींग करन्यासाटी एक-२ दिवस इंड्याला का नाय येत. ते पन इम्पोरटन्ट नाय का.

तेच्यासाटी वन्स इन फाइव इयर एक बारकी सुटी का नाय काडु शकत. नुस्त सेलिब्रशनसाटी नायतर आजारी मानसाला भेटन्यासाटी इंडियात यायच का.

प्रतिक्रिया

दवबिन्दु,

एन आर आय भारतीयांना मतदानाचा हक्क नसतो...
मतदान करण्यासाठी ज्या मुख्य अटी आहेत त्यात प्रमुख अट ही आहे की
"मतदार भारताचा नागरीक असावा"

ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे त्यांनी मात्र नक्की आले पाहिजे. भारत भेट आणि मतदान यांचा समन्वय साधून विदेशात राहणार्‍या भारतीयांनी भारतयात्रा केली तर एका दगडात दोन पक्षी मारता येतील.

सागर

दवबिन्दु's picture

13 May 2009 - 1:09 pm | दवबिन्दु

एन आर आय भारतीयांना मतदानाचा हक्क नसतो...
मतदान करण्यासाठी ज्या मुख्य अटी आहेत त्यात प्रमुख अट ही आहे की
"मतदार भारताचा नागरीक असावा"

त्याना परदेशामधे मतदानाचा अदिकार नस्तो, तिथ ते second citizen असतात.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

सागर's picture

13 May 2009 - 2:44 pm | सागर

मला नक्की माहीती नाही
पण आमच्या ऑफिसात एक एन आर आय मॅडम आहेत.
त्या कोणत्या कॅटेगरीत येतात माहित नाही. पण त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये.
कोणाकडे खात्रीशीर माहीती असेन तर बरे होईन
(अ)ज्ञानात भर पडेन :)

सागर

यन्ना _रास्कला's picture

13 May 2009 - 5:05 pm | यन्ना _रास्कला

नॉन रेसिडेंशल इंडियन म्हंजे भारतीयच पन अनिवासी. तुमच्या मधल्या बाई आरेनाय रेसिडेंशल नॉन इंडियन आसतील. म्हंजे परदेशात जन्मलेल्या, तिथल नागरीकत्व आसलेल्या पन भारतात राहनार्‍या.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

सागर's picture

13 May 2009 - 5:24 pm | सागर

नाय बा यन्ना रास्कला...
आम्च्या मॅडमचा जन्म भारतातलाच हाय
पण त्या अनिवासी भारतीय असल्यामुळे मतदानास पात्र नाहियेत.
बहुतेक त्यांच्याकडे दुसर्‍या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे असेन

सागर
अवांतरः तुम्ही धोनी फॅन वाटते ;)

अरुण मनोहर's picture

13 May 2009 - 5:28 pm | अरुण मनोहर

एन आर आय च्या व्याख्येविषयी खूप गैरसमज आहेत.
एन आर आय हा भारतीय नागरीक असेल किंवा नसेलही.
जर त्याच्या कडे परदेशी पासपोर्ट असेल तरी देखील जर भारतीय मुळ असल्यास तो एन आर आय असतो. मग अर्थातच त्याला मतदानाचा अधीकार नाही.
भारतीय मूळ म्हणजे तो स्वतः किंवा त्याचे आई वडील यापैकी एक, किंवा आजी आजोबा यंपैकी एक पुर्वी भारतीय होते.

पण जर त्याच्या कडे फक्त भारतीय पासपोर्टच आहे, आणि जर तो परदेशात रहात असेल, तर माझ्या माहीती प्रमाणे त्याला मतदानाचा अधीकार असतो. अर्थात भारतात येणे न जमल्यामुळे त्याला त्या अधीकाराचा उपयोग करता येत नाही.

अशा भारतीय नागरीकांना भारत सरकारने इन्टरनेट मतदानाची सोय उपलब्ध करून द्यायला हवी.

सागर's picture

13 May 2009 - 5:35 pm | सागर

पोस्टल बॅलट जर सरकार ने सुरु केले
तर त्यांनाही माहित आहे की निवडणुकीत कोणाची वाट लागेल ते.
त्यामुळेच ऑनलाईन वोटींग अथवा पोस्टल बॅलट ची सोय आपले सरकार करत नाही

दुर्दैव आपल्या देशाचे... दुसरे काय?

आणि अनिवासी भारतीयांचे किती प्रकार आहेत ते आपल्या इतर अनिवासी भारतीय मित्रांपैकीच कोणीतरी सांगू शकेन :)

सँडी's picture

13 May 2009 - 6:24 pm | सँडी

महत्वाचे दोन प्रकार आहेत.
१. Non-resident Indian (NRI) : भारतात जन्मलेले, पण देशाबाहेर रहाणारे भारतीय नागरीक.
२. Person of Indian Origin (PIO) : भारतीय वंशाचे लोक. (यांच्याकडे नागरिकत्व नसते, पण त्यांना भारतात येण्यासाठी विसा, वर्क परमिट यांची गरज पडत नाही) या प्रकारात पाकिस्तानी, बांग्लादेशी, श्रीलंकन नागरिक यांचा अपवाद आहेत.

मतदार यादीत नाव असेल तर NRIसुद्धा त्याच्या मतदारसंघात जाऊन मतदान करु शकतात.

अवांतर : सागर,तुझ्या ऑफिसातल्या मॅडम PIO असाव्यात किंवा त्यांनी मतदारयादित नावनोंदणी केलेली नसावी. :)

-संदीप.
काय'द्याच बोला.

सागर's picture

15 May 2009 - 9:04 am | सागर

सँडी

आमच्या ऑफिसातल्या मॅडम बहुतेक PIO असाव्यात.
जन्म भारतातलाच आहे त्यांचा. पण त्यांनी विदेशी नागरिकत्त्व घेतलेले असावे.

- सागर

यन्ना _रास्कला's picture

13 May 2009 - 5:36 pm | यन्ना _रास्कला

अशा भारतीय नागरीकांना भारत सरकारने इन्टरनेट मतदानाची सोय उपलब्ध करून द्यायला हवी.

नेटावर मतदान करनारा तोच मानुस आसल आशी ग्यारंटी काय? इथ फोटो पाहातात, नाव पाहातात मगच बोटाला शायी लावतात.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

चंबा मुतनाळ's picture

13 May 2009 - 1:10 pm | चंबा मुतनाळ

पन तुम्चा फ्रेंड्/अनकल/मावसबहिन अजून ईन्डियन पास्पोर्ट होल्ड करतात का? फायनान्शियली वेलऑफ आहेत ना?
मग पाच वर्सानी वोट करायला कायच प्रोब्लेम दिसत नाही जर त्याना वोटींग ईम्पॉर्टंट वाटत असलं तर

- चंबा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 May 2009 - 8:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वन्स इन फाइव्ह इयरच कुठे असतात इलेक्शन्स? इलेक्शन्सतर त्याहिपेक्षा मोअर फ्रिक्वेण्टली होल्ड करतात ना!

आय मीन, पार्लियामेंटची वन्स इन फाईव्ह इयर होतात, शिवाय असेंब्लिची वन्स इन फाइव्ह इयर होतात, शिवाय तुमच्या स्टेटमधे विधानपरिषद (अरेरे, याला इंग्लीश शब्द आहे का, असला तर आठवला नाही) असेल तर वन्स इन सिक्स इयर्स डिग्री होल्डर्ससाठी व्होटींग होतं; मोअरओव्हर, लोकल गर्व्हनिंग बॉडीची इलेक्शन्सपण होतात ना वन्स इन फाईव्ह इयर्स! म्हणजे डिग्री होल्डर एनारायसाठी अबाऊट थर्टी इयर्समधे ट्वेंटी थ्री इलेक्शन्स होतात, जर स्टेबल गव्हर्नमेंट मिळालं तर!
टू ऍड टू धिस, कृषि उत्पन्न बाजार समिती आहे, ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, शेतसारा भरला जातो, त्यांना मोस्ट प्रॉबेबली तिथेही व्होटींग करता येईल, जिल्हा परिषद (झेड. पी. हो) आहे, स्वतःचं हाऊस हाऊसिंग सोसायटीत असेल तर तिथेसुद्धा जनरली सेक्रेटरी, चेअरमन या पोस्ट्ससाठी इलेक्शन्स होतातच की!!

असो. इथे निवासी लोकांना नाव मुंबैत असेल आणि नोकरी बंगळूरूत असेल तर मतदानासाठी मुंबैत जावं लागतं, ते सुद्धा सुट्ट्या काढून, जे शक्य होतंच/असतंच असं नाही. आपल्या बिरूटे सरांना निवडणूकीच्या कामामुळेच मतदान करता आलं नाही तर उगाच लंडन का फलटणवरून काय फरक पडणार आहे चिमटीभर लोकांनी मत न दिल्यामुळे??

अवांतर शंका: सीमेवरील जवान आणि सैनिकी अधिकारी यांच्या मतदानासाठी काही सोय आहे का?

प्राजु's picture

14 May 2009 - 9:08 pm | प्राजु

आदिती ताईंशी पूर्णपणे सहमत आहे.
तसंही भारतात होते तेव्हा ३ वेळा निवडणुकीच्या कार्ड साठी अर्ज केला पण मिळालं नाहीच.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

14 May 2009 - 9:11 pm | विकास

>>>अवांतर शंका: सीमेवरील जवान आणि सैनिकी अधिकारी यांच्या मतदानासाठी काही सोय आहे का?

विचार करा निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार्‍या आपल्या बिरुटेसरांना मतदान करता आले नाही तर सैनिकांचे काय घेऊन बसलात? माझ्या माहीतीप्रमाणे त्यांना करता येत नाही. आपल्याकडे "गैरहजेरीत" मतदान करण्याची व्यवस्था नाही. (कोणी "हजर" नसले तर, त्यांच्या नावाने "गैर" मतदान करायची सोय कदाचीत असेलही!).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 9:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>अवांतर शंका: सीमेवरील जवान आणि सैनिकी अधिकारी यांच्या मतदानासाठी काही सोय आहे का?

होय, तशी सोय असते. त्यांचे नातेवाईक (कागदपत्रांची पूर्तता करुन ) त्यांचे मतदान करु शकतात. त्याला प्रोक्सी मतदान असे म्हणतात.

>>निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार्‍या आपल्या बिरुटेसरांना मतदान करता आले नाही तर सैनिकांचे काय घेऊन बसलात?

कागपत्रांची पूर्तता (आळस) न केल्यामुळे मतदान करता आले नाही. ती माझी चूक !

-दिलीप बिरुटे

विकास's picture

14 May 2009 - 9:23 pm | विकास

चूक दुरुस्ती तसेच माहीती दिल्याबद्दल धन्यवाद!

>>>कागपत्रांची पूर्तता (आळस) न केल्यामुळे मतदान करता आले नाही. ती माझी चूक !

आता विचार करा जर एका मताने जर भाजप/सेना/बसपा वगैरेंचा उमेदवार निवडून आला तर? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 May 2009 - 9:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कागपत्रांची पूर्तता (आळस) न केल्यामुळे मतदान करता आले नाही. ती माझी चूक !

सर, तुम्हाला प्रिसायडींग ऑफिसर (मराठी शब्द?) म्हणून काम करण्यासाठी काही कागदपत्रं, अर्ज भरावे लागलेच असतील? त्याचबरोबर, त्याच कागदांच्या भेंडोळ्यात आणखी चार कागद नाही का 'येऊ' शकत?? माणसं सरकारी कामासाठीसुद्धा आपल्या निवासस्थानापासून लांब असणार तर त्यांच्या मतदानाची सोय सरकारनेच, कमीत कमी त्रासात नको का करून द्यायला?

परदेश, परदेशी(?) म्हणून ओरडणं सोपं आहे. युकेमधे आपल्या घरी फॉर्म येतात. त्यात फक्त आपलं नाव टाकायचं, पाकिट बंद करायचं (पोस्टेज द्यायला लागत नाही) की आपल्या घरी निवडणूकीचं कार्ड येतं. मी, दुय्यम नागरीक काय, फक्त व्हीजावर तिकडे असताना, तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत मतदान करण्यास पात्र होते; एकही जादा पुरावा न दाखवता!!
हीच गोष्ट आपल्या लोकांसाठी आपण नाही करू शकत?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 9:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, तुम्हाला प्रिसायडींग ऑफिसर (मराठी शब्द?) म्हणून काम करण्यासाठी काही कागदपत्रं, अर्ज भरावे लागलेच असतील? त्याचबरोबर, त्याच कागदांच्या भेंडोळ्यात आणखी चार कागद नाही का 'येऊ' शकत??

त्याच कागदाच्या भेंडोळ्यात तीन कागदं होती. त्यांनीच जर ती जागेवर भरुन घेतली असती आणि त्यावर कार्यवाही करुन त्यांनी जाग्यावर मतदान करण्याबाबत पत्र दिले असते तर मतदान करता आले असते ! ( पण प्रत्येक कर्मचारी आपले काम हलके करायला पाहतात आणि मग सर्वच लांबत जाते)

>>प्रिसायडींग ऑफिसर (मराठी शब्द?)
केंद्राध्यक्ष

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 May 2009 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांनीच जर ती जागेवर भरुन घेतली असती आणि त्यावर कार्यवाही करुन त्यांनी जाग्यावर मतदान करण्याबाबत पत्र दिले असते तर मतदान करता आले असते ! ( पण प्रत्येक कर्मचारी आपले काम हलके करायला पाहतात आणि मग सर्वच लांबत जाते)

यू सेड इट! मला उत्तर मिळालं!

अवांतरः आपण ज्या ब्रिटीशांकडून ही सगळी सिस्टम उचलली, त्याच ब्रिटीशांच्या देशात पत्राद्वारे मतदान करता येतं. मतदानाच्या काही महिने/आठवडे आधी आपण पत्राद्वारे मतदान करणार असल्याचं कळवायचं; पुढे समग्र पत्रव्यवहार होऊन परदेशी असणार्‍या ब्रिटीश नागरीकांना मतदान करता येतं. घर, गाव/शहर बदललं की पुन्हा घरी येणारं एक पोस्टकार्ड भरून पाठवायचं; आधीच्या मतदारसंघातून आपलं नाव वजा होऊन नवीन पत्त्यावर आपलं नाव लगेच चढतं. दरवर्षी, निवडणूका असो अगर नसोत, हे पोस्टकार्ड घरी येतंच.

अतिअवांतरः शक्य होतं म्हणून पदरची एक सुट्टी घेऊन मी मतदानाला गेले. मतदानाच्या दिवशी सुट्टी होती तरी घरी बसून काम करत होते.

प्रदीप's picture

15 May 2009 - 8:02 pm | प्रदीप

प्रिसायडींग ऑफिसर (मराठी शब्द?)

ह्या ओरिजिनल आर्टिकलकडे पाहिल्यावर ... इट इज अ बिट ऑफ वंडर समवन इज स्टिल, म्हणजे काय म्हणतात ते, ऑन द लूकआऊट फोर मराठी इ॑क्विवॅलंट्स!! वॉट अ शेम...

एक. एन. आर. आय. (यू नो, विथ राईट्स टू व्होट इन इंडिया ऍस वेल ऍस इन हिस कंट्री ऑफ डोमिसाईल)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 May 2009 - 10:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिस्टर प्रदीप, सॉरी हां, खरं तर मी स्क्रॅप टाकूनच सरांना क्वेश्चन करणार होते, बट आयनी असं थिंक केलं की इफ हियर क्वेस्चन आस्क केला तर ऑलनाच हा वर्ड क्नो होईल!

जाऊ दे आता मी फारच आऊट ऑफ कंटेक्स्ट (+आचरट) बोलत्ये इथे!!

संदीप चित्रे's picture

14 May 2009 - 10:42 pm | संदीप चित्रे

खरंतर सकाळीच तुझ्या प्रतिसादाला दाद देणार होतो अदिती पण काहीतरी कामामुळे राहून गेले..
>> इथे निवासी लोकांना नाव मुंबैत असेल आणि नोकरी बंगळूरूत असेल तर मतदानासाठी मुंबैत जावं लागतं, ते सुद्धा सुट्ट्या काढून, जे शक्य होतंच/असतंच असं नाही.
धन्स !

'अभानि बॅशिंग' ही एक आवड होत चाललीय की काय असं वाटतं बरेचदा :)

दवबिन्दु's picture

16 May 2009 - 2:45 pm | दवबिन्दु

'अभानि बॅशिंग' ही एक आवड होत चाललीय की काय असं वाटतं बरेचदा

आनि प्रामानिकपने सान्गतो असा काय करायचा माझ इन्टेंशन नवता. येवडी भांडन होतील म्हाईत आस्त तर मिनी लिवलच नस्त.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

यन्ना _रास्कला's picture

16 May 2009 - 11:29 am | यन्ना _रास्कला

तुला गुसखोरीबदल माफि दिलि पन कायतरी समजल आस लिहि कि जरा. विन्ग्रजीची न आपली जल्मापास्न दुश्मनि हाय. पु.ल. बोल्तात तस नारायनाचा विन्ग्रजापेक्शा विन्ग्रजी वर राग ज्यादा होता.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

नितिन थत्ते's picture

13 May 2009 - 1:24 pm | नितिन थत्ते

छे बुवा!
तुमच्या इंडियात गरमी आणि धूळ किती असते. वोट करायला इंडियात यायचं म्हणजे काहीतरीच. शिवाय इंडियात पाण्याचा किती प्रॉब्लेम? आणि ते वोट करायला उन्हात लाईन लावायची म्हणजे फारच अपेक्षा तुमची बॉ.

खराटा
(देशी भारतीय)

यन्ना _रास्कला's picture

13 May 2009 - 5:12 pm | यन्ना _रास्कला

त्याचा पेक्शा तिकड र्‍हाहुन इंटरनेटावर भारताच्या विशयी बोलन, इथल्या निवडनुकीविशयी उस्सुकता दाखवन, भारताच्या गरीबांन्च्या विशयी खोटा खोटा कळवला दाखवन सोप नाय काय. परत जेवा केवा आपल्या सोयीने भारतात यायाच तेवा भारताला नाव ठ्येवायला आपन मोकले.

हाटिलात र्‍हायच, बिस्लरी प्यायाच, गाडीतन हिंडायच आनी ज्या देशामधे आपल्याला शेकंड शिटीजन म्हनुन दर्जा आहे त्या देशाच गुनगान गायच. भले शाब्बास.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

धमाल मुलगा's picture

13 May 2009 - 5:15 pm | धमाल मुलगा

कऽऽडक!!!!

काय बोल्लात राव :)
यन्ना रास्कला.....टैगरा!! मैंडिट्ट :D

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

कुंदन's picture

13 May 2009 - 2:19 pm | कुंदन

एनआरआय ला ठोकायला चांगली युक्ती शोधलीये....

>>शिवाय इंडियात पाण्याचा किती प्रॉब्लेम?
आणि विजेच्या प्रॉब्लेमचे काय? ;-)

विजुभाऊ's picture

13 May 2009 - 2:22 pm | विजुभाऊ

ते पन इम्पोरटन्ट नाय का.
नाय रे ते इम्पोर्टन्ट नाय . हित॑ल्या लै जणांसाठी ते इम्पोटन्ट हाय

मि माझी's picture

13 May 2009 - 2:28 pm | मि माझी

इकडे कोणीही निवडून आल गेलं तरी एनआरआय लोकांना फारसा फरक पडत असेल असे वाटत नाही.मग ते कशाला आपला वेळ आणि पैसा खर्च करतील?

कुंदन's picture

13 May 2009 - 2:33 pm | कुंदन

निवासी भारतीयांच्या जीवनात तरी असा कितीकसा फरक पडतो.
विज , पाणी , आरोग्य , शिक्षण या मुलभुत सुविधांबाबत बोंब आहे ती आहेच ना , कोणतेही सरकार निवडुन आले तरी?

यन्ना _रास्कला's picture

13 May 2009 - 5:32 pm | यन्ना _रास्कला

एनआरआय लोकांनाच का?

हिकड फारिन रिटन म्हनुन इंम्परेशन मारत हिंडतात ते कशाला मंग. परदेशात गेल कि सोन लागल का? त्याचापेक्शा हाताव पोट आसलेला रोजची मजुरी बुडवुन उनामधे मतदानासाटी रांगेत उभं राहनारा गरीब बिहारी पन बरा.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4527067.cms
अशी मधुनच टोपी फिरवणार्‍यांना का?

यन्ना _रास्कला's picture

16 May 2009 - 11:34 am | यन्ना _रास्कला

आनि मतदान कोनाला करायचे ते पन सांगा... अशी मधुनच टोपी फिरवणार्‍यांना का?

सान्गितल त्याला मतदान कराय तुमी भारतात येनार का तिकिटि काडुन त्ये पहिल शपतेवर बोला. नायतर आस करा. कि मतदान बुथावर जावुन माज कोनालाच मत नाय आस सान्गा म्हंजि टोपि फिरवायायचा प्रस्नच नाय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

यन्ना _रास्कला's picture

13 May 2009 - 5:20 pm | यन्ना _रास्कला

मग ते कशाला आपला वेळ आणि पैसा खर्च करतील?

मग इंटरनेटावर परदेशात र्‍हाहुन भारताविशयी बोलनच सोडा ना. पन ते पन नाही.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

चिरोटा's picture

13 May 2009 - 5:38 pm | चिरोटा

भारत म्हणजे केवळ राजकारणी,लोकसभा,निवडणूक नाही.भारत त्यापेक्षा खूप मोठा आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

यन्ना _रास्कला's picture

13 May 2009 - 5:51 pm | यन्ना _रास्कला

भारत म्हणजे केवळ राजकारणी,लोकसभा,निवडणूक नाही.भारत त्यापेक्षा खूप मोठा आहे.

पोट म्हंजे पुर शरिर नाय पन पोटात जर काय पन टाकलच नाय तर शरिर कस काय चालनार. कश्ट करायचे त पोट भरलेल हवं.

चान्गला भारत हवा त आपल मतदान आपन करायच. आपन आरामात परदेशात बसायच आनि भारतात चान्गल शिश्टीम नाय म्हनुन बोलायच हे पन बरोबर नाय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

यन्ना _रास्कला's picture

16 May 2009 - 11:37 am | यन्ना _रास्कला

चान्गला भारत हवा त आपल मतदान आपन करायच. आपन आरामात परदेशात बसायच आनि भारतात चान्गल शिश्टीम नाय म्हनुन बोलायच हे पन बरोबर नाय.

म्या बोल्लेलो ते नाटकुभावुनी खरा करुन दावला.
शेम शेम.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

मि माझी's picture

13 May 2009 - 2:43 pm | मि माझी

हे सगळ होतय कारण आपण सहन करतोय. आपण स्वताची समजूत घालून घेतलीये की हे असचं होत राहणार्..

संदीप चित्रे's picture

13 May 2009 - 6:11 pm | संदीप चित्रे

माझ्या माहितीप्रमाणे --

  • NRI (Non Resident Indian) : सलग १८० पेक्षा जास्त दिवसांपेक्षा जास्त काळ परदेशात राहणारा भारतीय नागरिक -- भारताचा पासपोर्टधारक -- भारताच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क असतो -- उ.दा. अमेरिकेतील एच १, एच ४, बी १, स्टुडंट विजा, एल १ (किंवा अशा प्रकारचा) विजाधारक किंवा ग्रीन कार्डधारक
  • POI (Person of Indian Origin) : परदेशी नागरिक ज्याचे आई / वडील / आजी / आजोबा यांपैकी एक जण भारतीय आहे -- परदेशाचा पासपोर्टधारक (आणि भारतीय नागरिकत्व नाही) -- भारताच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क नसतो -- उ.दा. अमेरिकेत जन्मलेले भारतीय नागरिकांचे मूल (टीप : प्रत्येक देश अमेरिकेप्रमाणे citizenship by birth देत नाही)
  • OCI (Overseas Citizen of India): परदेशात राहणारा NRI किंवा POI -- परदेशाचा पासपोर्टधारक -- भारताच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसतो -- उ.दा. एखादी व्यक्ती जिने परदेशाचे नागरिकत्व घेतले आहे (आणि भारतीय नागरिकत्व सोडले आहे) किंवा एखादी व्यक्ती जी परदेशात जन्मली आहे

Disclaimer -- ही माहिती त्रोटक आहे आणि या माहितीच्या आधारावर कुठलेही विजा प्रोसेसिंगवगैरे करू नये ! तज्ज्ञ वकीलांशी संपर्क साधावा !!

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

विकास's picture

13 May 2009 - 6:38 pm | विकास

सविस्तर व्याख्या आधीच लिहून माझा वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद! ;)

बाकी चर्चेतील मूळ मुद्यावरः

नक्की किती अनिभा आहेत आणि किती आता भारतीय वंशाचे (पहीली/दुसरी/पुढची पिढी) आहेत हा एक संशोधनाचा मुद्दा आहे. यातील प्रत्येकाने जरी भारतात येऊन मतदान केले तरी भारतात राहून मतदान न करणार्‍या मध्यमवर्गाची जी काही टक्केवारी असेल त्याच्या कितीतरी पटीने कमी संख्या ही संपूर्ण अनिभाची भरेल. मग त्यांची विविध मतदारसंघात विभागणी केल्यास त्याचा एकूण मतदानसंख्येत आणि म्हणून निर्णयात फरक पडणार नाही.

तरी देखील असे मतदान अनिभांनी केले तर त्याचा एक अप्रत्यक्ष फायदा, तिथे राहून आळस करणार्‍यांवर होऊ शकतो. मी अगदी जवळून (आमच्या घरातून) मुद्दाम तिथे जाऊन नाही, पण तिथे असताना निवडणूका असल्यातर मतदान नक्की केले आहे (मग त्यावेळेस त्या गावात राहून मतदान नक्की करायचे).

बाकी मुद्दाम तेथे मतदानास न जाण्याची अनेक कारणे असू शकतातः
बर्‍याचदा अनिभांना त्यांच्या वेळा या कामकाजावरून, मुलांच्या शाळांवरून (येथे जूनच्या शेवटी सुट्टी चालू होते) तसेच आर्थिक गणिते बांधून ठरवाव्या लागतात. त्यात जर काही अजून ग्रीन कार्ड मिळण्याच्या प्रतिक्षेत असले तर अजूनच कायदेशीर प्रश्न असतात (हे अमेरिके संदर्भात, इतरत्र असेच मुद्दे असू शकतात). शिवाय प्रत्येकाकडे ओळखपत्रे असतीलच का हा अजून एक प्रश्न आहे.

बाकी अनिभा मग काय करू शकतात हा एक वेगळा चर्चा विषय आहे. त्यामुळे येथे अवांतर करत नाही...

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 1:26 pm | यन्ना _रास्कला

नक्की किती अनिभा आहेत आणि किती आता भारतीय वंशाचे (पहीली/दुसरी/पुढची पिढी) आहेत हा एक संशोधनाचा मुद्दा आहे.

प्रश्ण अनिभा कीती त्याचा अज्जिबात नाय तर शिकुन सवरुन परदेशात जायच, लोकान्मधे बडेजाव मिरावयचा (कोनी कोनी येनाराय हुन्डा बी टीच्चुन घ्येतात) पन साध नागरीक म्हनुन एक पन डुटी करायची नाय हा आहे. मंग तुमी कसले सुशिक्शित. तुमाला साक्शर म्हनाव का.

आनी तुमी इतक्या अडचनी सांगता पन "इछ्छा तेथ मार्ग" असतोच. इच्छाच नसली तर हजार कारन सुचनार.
नाचता येइना आंगन वाकड. सर्वानाच अडचनी असतात का ? मिनिमम २०-२५ लोक तरी येतात का मतदानासाटी.

आनि तुमी तर येकदम रडगानच लावलय का येता येनार नाही याच. त्या पेक्शा बोला ना की मी सुधारिन आनि माज्याबरोबर निदान ४-५ लोकाना पन मतदानाला यायला प्रवरुत्त करेन.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

विकास's picture

14 May 2009 - 7:50 pm | विकास

प्रश्ण अनिभा कीती त्याचा अज्जिबात नाय तर शिकुन सवरुन परदेशात जायच, लोकान्मधे बडेजाव मिरावयचा (कोनी कोनी येनाराय हुन्डा बी टीच्चुन घ्येतात) पन साध नागरीक म्हनुन एक पन डुटी करायची नाय हा आहे. मंग तुमी कसले सुशिक्शित. तुमाला साक्शर म्हनाव का.

नागरीक म्हणून मतदान इतकेच कर्तव्य नसते, जरी ते एक महत्वाचे कर्तव्य नक्कीच आहे. घटनेने जशी सप्तस्वातंत्र्ये दिली तशाच अनेक जबाबदार्‍यापण दिल्या आहेत. त्यासंदर्भात मी माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणले आहेचः

बाकी अनिभा मग काय करू शकतात हा एक वेगळा चर्चा विषय आहे. त्यामुळे येथे अवांतर करत नाही...

तेंव्हा हवी असल्यास अनिभाच कशाला येथील प्रत्येकजण नक्की देशासाठी/समाजासाठी नक्की काय करतो यावर वेगळी चर्चा सुरू करा. आपण सर्वच त्यात भाग घेऊ.

बाकी शिकून-सवरून कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बडेजाव वगैरे मी तरी मारतो असे माझे विरोधकपण म्हणणार नाहीत. तुम्हाला तसे भेटले असले तर तो तुमचा अनुभव... मला असे अनेक भारतातील भारतीय भेटलेत की जे आम्हीच कसे शहाणे असा बडेजाव मारतात. विशेष करून अमेरिकेने मार खायचा अवकाश - ते गाढव ठरले रे ठरले की लगेच आम्ही घोडं म्हणून स्वतःला अपग्रेड करतो. अशा वेळेस मी आणि माझ्यासारखे इतर दुर्ल़क्ष करून सोडून देतात... अर्थात जे खरे स्वाभिमानी आणि आत्मविश्वास असलेले असतात त्यांना असल्या गोष्टींचे काहीच पडलेले नसते. मग ते कुठे का असेनात :-)

रेवती's picture

14 May 2009 - 8:07 pm | रेवती

अगदी बरोबर!
विकास यांच्याशी सहमत.
विकास यांना भेटण्याचा योग आला तेंव्हा त्यांनी बडेजाव वगैरे मारला असे अजिबात वाटले नाही.
(मी त्यांची विरोधक नाही.)
(कोनी कोनी येनाराय हुन्डा बी टीच्चुन घ्येतात)
जे कोणी हुंडा घेतात त्यांना तुमच्या प्रतिक्रियेशी अजिबात घेणे देणे नसते.
माझ्या बघण्यात आजूबाजूला (दाक्षिणात्य सोडले तर...) एक पै हुंडा न देता मुलींची लग्नं झालेली आहेत. त्यात मीही आलेच.
अनेकांची लग्नं ठरणे आणि होणे यात आठेक दिवसच असल्याने जसं जमेल तसं (घराजवळच्या छोट्या हॉलमध्ये वगैरे..)लग्न झालेले अनेक सापडतील.

रेवती

यन्ना _रास्कला's picture

16 May 2009 - 11:44 am | यन्ना _रास्कला

नागरीक म्हणून मतदान इतकेच कर्तव्य नसते, जरी ते एक महत्वाचे कर्तव्य नक्कीच आहे.

महत्वाचे ह्यो शब्द आपनच या निवडनुकीमधी इसरलात. आला नाही ते भारतामंदी. आसो.

त्ये महत्वाच कर्तव्य हाये तस कश्टाच पन हाय. तेचासाठी कश्ट घ्याव लागतात. खुरचीवरल बुड न हलवता येक्जिट पोलाचा कात्याकुट टाकन तेच्यापेक्सा लईच सोप राव. नाय का.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

यन्ना _रास्कला's picture

13 May 2009 - 6:23 pm | यन्ना _रास्कला

रेसिडंशियल नॉन इंडियन - भारतात र्‍हातात आनी अमेरिकेच गुनगान करतात. भारताच्या सगल्या गोश्टिना नाव ठ्येवतात.

नॉन रेसिडंशियल नॉन इंडियन - भारतात र्‍हात पन न्हाईत आनी मनाने पन ते कंदीच अमेरीकावाशी झालेल अस्तात.

हल्केच घेने. हा इनोद हाए.
:) :)
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

विकास's picture

13 May 2009 - 6:47 pm | विकास

अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांची संख्या ही एकूण अनिभांच्या संख्येच्या सुमारे १२% च आहे.

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 1:29 pm | यन्ना _रास्कला

तुमी त आमेरिकनापेक्शा जास्त आमेरिकन जाले. इनोद हाय सान्गुन बी हलक घेता येत नाय तुमाला. आता कराव कस.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

चिरोटा's picture

13 May 2009 - 6:48 pm | चिरोटा

आपन आरामात परदेशात बसायच आनि भारतात चान्गल शिश्टीम नाय म्हनुन बोलायच हे पन बरोबर नाय

मी तर भारतात रहाणारेच भारताविरुध्ध जास्त बोंबलताना पाहिले. बरेच अनिवासी(जास्त करुन मराठी/दाक्षिणात्य) भारताबद्दल बाहेरपण चांगले बोलतात असा माझा अनुभव आहे.

हाटिलात र्‍हायच, बिस्लरी प्यायाच, गाडीतन हिंडायच आनी ज्या देशामधे आपल्याला शेकंड शिटीजन म्हनुन दर्जा आहे त्या देशाच गुनगान गायच

हे तर ईकडे पण झाले आहेच की.उडप्याच्या हॉटेलात गेलात तरी वेटर पहिल बिसलेरी पिणार की साध पाणी हे विचारतोच.आणि राजकारणी,नोकरशहा,बिल्डर ह्या लोकाना आपण रोज शिव्या घालतोच की !!
भारतात रहा नाहीतर बाहेर रहा,तुम्ही प्रश्न सोडवताय की नाही हे महत्वाचे. बाहेर रहाणार्‍यानी गप्प रहायचे आणि भारतात रहाणार्‍यानी वाटेल ते बोलायचे हे मला योग्य नाही वाटत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 1:41 pm | यन्ना _रास्कला

भारताबद्दल बाहेरपण चांगले बोलतात

बाह्येर चान्गल बोलतात पन पेप्रामधी "माझे इंग्लडातील अनूभव", झालच तर पुस्तकामधे "अमेरिकन सन्स्क्रुति" अस काही बाही लिहुन भारताला नाव ठ्येवतात त्याच काय.

उडप्याच्या हॉटेलात गेलात तरी वेटर पहिल बिसलेरी पिणार की साध पाणी हे विचारतोच.

ह्ये बाटली पान्याच भुत भारतात कोनी आनल ? आमी तर आजुन बी हाटीलातल, ठेस्नावरल पानी पितो. आनी एका बुक्कीत नारल फोडतो. आमाला कोन्त पन पानी चालत. तुमच्या कीरकोल तब्येतीकड पाहुन वेटरबुवा विचारत आसल बाटलीवाल पानी आनु का.

बाहेर रहाणार्‍यानी गप्प रहायचे आणि भारतात रहाणार्‍यानी वाटेल ते बोलायचे हे मला योग्य नाही वाटत.

गप राहा कोन बोलतय पन नुस्ती फुकाची बडबड नको तिकीटी काडुन भारतात या मतदान करा आनि मग हव्व तेवड बोला.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

अभिज्ञ's picture

13 May 2009 - 6:55 pm | अभिज्ञ

हे सर्व अनिवासी भारतीय जर मतदान करत नसतील वा त्या लायकीचे नसतील तर त्यांना कायमचे
परदेशात हाकलून द्यावे काय?
मतदानाचा हक्क असूनहि परदेशात मिटक्या मारत बसलेल्या सर्व भारतीयांना हंटरने फोडून काढावे काय?

;)

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

चिरोटा's picture

13 May 2009 - 7:04 pm | चिरोटा

=))
आपल्याकडे बाहेर जाण्याचे वेड एवढे आहे की हंटर वाले अनिवासी लोकाना फोडायला जातील बाहेर पण परत येतील ह्याचा काय भरवसा? मग त्याना फोडायला परत कोणीतरी.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अभिज्ञ's picture

13 May 2009 - 7:07 pm | अभिज्ञ

मी म्हणून तर आधीच हंटर घेउन इथे कतार मध्ये बसलोय.
दिसला कि हाणायचा.
;)
यन्ना रास्कला तुम्ही कुठे असता?

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 1:46 pm | यन्ना _रास्कला

यन्ना रास्कला तुम्ही कुठे असता?

सद्या कामोट्यात पन मुळ गाव मोरचुंडी ।।बु.।।, ता. मोखाडा,
जि. ठाने,

मी म्हणून तर आधीच हंटर घेउन इथे कतार मध्ये बसलोय.

चाबुक पेलतय ना. नायतर त्याचा वजनान पन पडायचे तुमी. :)

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

दवबिन्दु's picture

13 May 2009 - 6:59 pm | दवबिन्दु
दवबिन्दु's picture

13 May 2009 - 6:59 pm | दवबिन्दु
परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 7:06 pm | परिकथेतील राजकुमार

पण समजा व्यवस्थीत प्लॅनींग करुन (तिकिटाचे) ते अनिभा इकडे आले, उन्हातान्हात उभे राहुन येव्हडा पैसा खर्च करुन मतदानाचा नंबर आला आणी त्यांचे नावच मतदार यादीतुन गहाळ झाले आहे कींवा चुकीचे नोंदवले आहे असे कळाले तर?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दवबिन्दु's picture

13 May 2009 - 7:13 pm | दवबिन्दु

कीती परसेंट होइल? आनि तेंचा घरचे लोक इंटरनेट वर कन्फम करु शकतात आदिच. आम्च्याकड तर सगल्या पक्षाच लोक घरी येवुन सांगुन / चिठी देवुन गेले आम्च वोटिंग कुठ कराय्च ते.

.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 7:16 pm | परिकथेतील राजकुमार

कीती परसेंट होइल? आनि तेंचा घरचे लोक इंटरनेट वर कन्फम करु शकतात आदिच. आम्च्याकड तर सगल्या पक्षाच लोक घरी येवुन सांगुन / चिठी देवुन गेले आम्च वोटिंग कुठ कराय्च ते.
सगळे कुटुंबच परदेशी राहात असेल तर ?
आणी साहेब इंटरनेटचे नका सांगु, पार जीव खाते ती मतदार यादी वाली साईट उघडताना.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दवबिन्दु's picture

13 May 2009 - 7:21 pm | दवबिन्दु

निगेटिव बोलु नए. होतील बद्ल हळु हळु.

आनी बरेच लोकान्चे कुटुंब आइ व्डिल इथ राहातात त्याच काय. आप्ल्या कडे तर काका-मामा-आत्या असे रिलेटीव पन आस्तात मद्तीला.

.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

विंजिनेर's picture

14 May 2009 - 9:29 am | विंजिनेर

निगेटिव बोलु नए. होतील बद्ल हळु हळु.

मंग अनिभासुद्धा येतीलच की हळूहळू ... तोपर्यंत त्येना निगेटीव बोलू नये ...;)

आनी बरेच लोकान्चे कुटुंब आइ व्डिल इथ राहातात त्याच काय. आप्ल्या कडे तर काका-मामा-आत्या असे रिलेटीव पन आस्तात मद्तीला.

च्या मारी, इथे गॅस सिलेंडर/वीज मंडळ/म. पालिका ह्येंच्या हापिसात रांगा लावून उनातान्हात उभं राहायला लागतंय. पुन्हा रिक्षावाल्यांचा संप असला की बोंबलत पायी हिंडा (न्हायीतर शोफर ड्रीवन पीएमपीएल हाये म्हना तशी ...)
असं आस्ताना आई वडिलांना मतदार यादी तपासायला अजून डोक्याला त्रास कशापायी द्यायाचा?

काका-मामाना सांगायचं म्हनाल तर अजून आपल्या म्हराटीत "आपलं झालं थोडं आनी भाच्यानं धाडलं घोडं" अशी म्हन अजून आले न्हायी म्हनून.... न्हायीतर सांगितलं असतं

(हंटरवाला) विंजिनेर
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 1:57 pm | यन्ना _रास्कला

तोपर्यंत त्येना निगेटीव बोलू नये ...

मला त दवबिंडु निगेटिव बोलताना दिस्ला नाय खर बोल्ताना मात्र दिस्ला पन लोकान्ला हली खर बोल्लेल चालत नाय.

पुन्हा रिक्षावाल्यांचा संप असला की बोंबलत पायी हिंडा

पोस्तमन रोज कीती चालतो तेची कल्पना करा, एक दिवस चालाय लागल तर रडायच कशाला.

असं आस्ताना आई वडिलांना मतदार यादी तपासायला अजून डोक्याला त्रास कशापायी द्यायाचा?

भगवन्ता सरावनबाळाच पुन्ना जनमला र. खराच आय-बापाची येवडी काल्जी घ्येता कि नुस्त इथ लिवन्यापुर्त.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

विंजिनेर's picture

15 May 2009 - 8:17 am | विंजिनेर

भगवन्ता सरावनबाळाच पुन्ना जनमला र. खराच आय-बापाची येवडी काल्जी घ्येता कि नुस्त इथ लिवन्यापुर्त.

ये रास्कला .... मुद्दा सोडून बोलु नकोस.

शिवाय माझ्या आई-बापाची "काल्जी " मी किती घेतो तुझ्या सारख्या एका फडतूस "आय डी" ला सांगण लागत नाही.

मी तरी तुला प्रतिसाद देण्यात वेळ का घालवतो आहे म्हणा!
असो, असल्या बिनबुडाच्या चर्चेत रास्कलांशी भांडण्यात माझं डोक खर्च करण्यापेक्षा बरं काहीसं करीन. त्यामुळे माझा हा शेवटचा प्रतिसाद.!!

तुझं चालू दे!

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

यन्ना _रास्कला's picture

16 May 2009 - 11:13 am | यन्ना _रास्कला

तुमी त गरम झाला. कोनताबी प्रस्न इचारला तर असा राग का म्हनुन धरावा. शान्तपन जबाब द्या ना कि भौ.

असल्या बिनबुडाच्या चर्चेत रास्कलांशी भांडण्यात माझं डोक खर्च करण्यापेक्षा बरं काहीसं करीन. त्यामुळे माझा हा शेवटचा प्रतिसाद.!!

येक शन्का. आस सारख डोक खरच होवुन आता शिलकि किति हाए.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

पर्नल नेने मराठे's picture

14 May 2009 - 1:32 pm | पर्नल नेने मराठे

आप्ल्या कडे तर काका-मामा-आत्या असे रिलेटीव पन आस्तात मद्तीला.

नातेवाइकाना कामाला लावुन आम्ही असे उन्टावरुन शेळ्या हाकत नाही

चुचु

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 1:49 pm | यन्ना _रास्कला

तुला जबाब दीला अस्ता पन माग पन माझ जबाब उडवला म्हनुन जास्त काय लिहत नाय. पन नाती निरमान करायची आसतात. टाली कंदी एका हातान वाजत नाय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

पर्नल नेने मराठे's picture

14 May 2009 - 1:53 pm | पर्नल नेने मराठे

लिहि ना :-? काय लिहितोस बघु तरि...
चुचु

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 2:00 pm | यन्ना _रास्कला

कायबी तुला लिहील तर लगीच कातर चालवतात. त्येच काय. कायतरी लग्गा दिस्तोया

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

पर्नल नेने मराठे's picture

14 May 2009 - 2:16 pm | पर्नल नेने मराठे

कायतरी लग्गा दिस्तोया

~X( 8| लग्गा कस्ला येडपट

चुचु

चिरोटा's picture

13 May 2009 - 7:07 pm | चिरोटा

इंटरनेटवरुन मतदान हा सर्वात योग्य उपाय.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

कुंदन's picture

13 May 2009 - 7:07 pm | कुंदन

मग आजारी पडायचे , लग्न करायचे इ इ प्लानिंग पण निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार करायचे का?

दवबिन्दु's picture

13 May 2009 - 7:16 pm | दवबिन्दु

मग आजारी पडायचे , लग्न करायचे इ इ प्लानिंग पण निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार करायचे का?

पन लग्न महत्वाच तस हे पन मह्त्वाच माना ना. ह्येचासा॑ठी पन वेळ द्या ना.

.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

चिरोटा's picture

13 May 2009 - 7:18 pm | चिरोटा

कुठल्यातरी पक्षाने ह्**मु*ल्याचे निमित्त करुन सरकारचा पाठिंबा काढुन घेतला की काढा तिकिटे परत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विकास's picture

13 May 2009 - 7:35 pm | विकास

कुठल्यातरी पक्षाने ह्**मु*ल्याचे निमित्त करुन सरकारचा पाठिंबा काढुन घेतला की काढा तिकिटे परत.

या अर्थाने, जरी मी आत्ता येऊन मतदान केले नसले तरी, आत्ता जे काही चालू आहे ते लक्षात घेता, डिसेंबरात येऊन नक्की करेन, तसे मी आत्ताच तिकीट (विमानाचे, लोकसभेचे नाही!) काढून ठेवतो ;)

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 2:15 pm | यन्ना _रास्कला

कुठल्यातरी पक्षाने ह्**मु*ल्याचे निमित्त करुन सरकारचा पाठिंबा काढुन घेतला की काढा तिकिटे परत.

आतापरतो केवल ३ वेलाच आस झाल. आनि १ डाव इदिरा गान्धी गेल्या म्हनुन लवकर निवडनुक घ्यायाला लागली नायतर सगल्या सरकारने ५ वर्श पुर्न केली. गेल्या १० वर्शात तर स्थीर सर्कार होतच ना. तिकीटीचा खर्च नको म्हनुन केवल कायतरी झंगट काडायच ह्ये बरुबर नाय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

चिरोटा's picture

14 May 2009 - 2:33 pm | चिरोटा

मला तर ह्यात विमान कंपन्यांच्याच फायदा दिसतोय. नाहीतर प्रत्येक देशाच्या भारतिय वकिलाती मध्ये मतपेटी ठेवा.अ ना भि नी ७ दिवस आधीच मतदान करायच.मतदारसंघाचे नाव आणि कोणाला मत द्यायचे आहे ते मतपत्रिकेवर असले पाहिजे.वकिलाती मधल्या बाबू लोकाना मत मोजायचे काम द्यायचे.मत मोजली की त्या त्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्‍यांकडे निकाल भारतात पाठवून द्यायचा. ज्या दिवशी मतमोजणी असेल त्या दिवशी निकाल उघडायचा.

भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 2:42 pm | यन्ना _रास्कला

मला तर ह्यात विमान कंपन्यांच्याच फायदा दिसतोय.

विमानवाल्या कपन्या कंदीपास्न अनिभाच्या जिवाव चालाय लागल्या.

नाहीतर प्रत्येक देशाच्या भारतिय वकिलाती मध्ये मतपेटी ठेवा.अ ना भि नी ७ दिवस आधीच मतदान करायच.मतदारसंघाचे नाव आणि कोणाला मत द्यायचे आहे ते मतपत्रिकेवर असले पाहिजे.वकिलाती मधल्या बाबू लोकाना मत मोजायचे काम द्यायचे.मत मोजली की त्या त्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्‍यांकडे निकाल भारतात पाठवून द्यायचा. ज्या दिवशी मतमोजणी असेल त्या दिवशी निकाल उघडायचा.

कल्पना आडवली. छान हाय. आसच कराय हव.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

नैतिक दृष्ट्या कितीही बरोबर असलं, कितीही इच्छा असली, तरी प्रॅक्टीकली शक्य असेलच असं नाही.

बरं, भारतात रहाणार्या सगळ्यांनी मतदान केलं का हो? भारतात लांब राहिलं.. भारतात असलेल्या मिपाच्या सगळ्या सभासदांनी तरी मतदान केलं का हो?

दुसर्याला (त्यातल्या त्यात एनाराय ला)सल्ला देणं, जाब देणं, झोडपणं, नैतिक जबाबदार्यांची जाणीव करून देणं, ई. एकदम सोप्प असतं हो.
एकदा का आपण भारतात रहायला लागलो ना की आपल्याला असा जाब कोणी विचारूच शकत नाही, नाही का?

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 2:19 pm | यन्ना _रास्कला

नैतिक दृष्ट्या कितीही बरोबर असलं, कितीही इच्छा असली, तरी प्रॅक्टीकली शक्य असेलच असं नाही.

नाय यायच त राह्यल पन सबबी कशापाय. सग्गेवाल्याच लगीन आस्ल कि मंग बरा टायम भेटतो, पैका आस्तो. तित नाय येत त्या आडचनी.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

नाटक्या's picture

15 May 2009 - 7:33 am | नाटक्या

सग्गेवाल्याच लगीन आस्ल कि मंग बरा टायम भेटतो, पैका आस्तो. तित नाय येत त्या आडचनी.

मग काय पैसा राजकारण्यांच्या बोडक्यावर घालायचा की काय? आणि एवढंच जर वाटतं भारतातल्या निवडणूकांबद्दल तर तशी व्यवस्था करा की कुठुनही मतदान करता येईल. पण राजकारण्यांनाच माहीती आहे अशी व्यवस्था केली तर त्यांचे काही खरं नाही म्हणून. आणि भारतात जे मतपेट्या पळवणं/फोडणं, दडपशाहीने मतदान करायला लावणं, दारू पाजून/लाच देउन मतदान करणं हे चांगलं का?

आणि हे मतं देउन होणारहे काय? चोराच्या ऐवजी गुंड बसेल, तो नाही बसला तर दरोडेखोर बसेल! एखाद्या आमदार/खासदाराने जर निवडून आल्यानंतर काम केले नाही तर त्याला परत बोलावण्याचा अधीकार आहे का घटनेत? एकदा तो खुर्चीवर बसला की ५ वर्षाची निश्चिंती. मग त्यात तो भ्रष्टाचार करो नाहीतर आणखी काही. आता पर्यंत किती मंत्र्यांना/राजकारणी लोकांना कोर्टात शिक्षा झाली आहे? आणि झाली असल्यास किती राजकारणी तुरुंगात गेले आहेत. जगदीश टायटलर आणि प्रभुतींनी शिखांचे शिरकाण केले हे सांगणारे साक्षीदार असताना कोर्ट (आणि CBI सुध्दा) त्यांना क्लीन चिट देउ शकले यावरुनच काय ती योग्यता कळते...

सगळे पक्ष आणि सगळे राजकारणी इथुन तिथुन सारखेच. काँग्रेसचे राज्य होते तेव्हा एन्रॉन प्रकल्पाबद्दल शिवसेना म्हणाली होती 'आम्ही सत्तेवर आलो तर एन्रॉन प्रकल्प समुद्रात बुडवू'. सत्तेवर आल्यानंतर म्हणाले 'एन्रॉन बरोबर परत एकदा किंमती बद्दल चर्चा करुन या प्रकल्पाचे भवितव्य ठरवू'. कसली बोडक्याची चर्चा, सरळ सांगा ना आम्हाला आमच्या हिश्याबद्दल बोलायचे आहे.

यात कोणाला मतदान केले तर काय फरक पडणार आहे. "लोकशाहीतल्या प्रत्येक नागरिकाचे ते पवित्र कर्तव्य आहे", हे सगळं जाउ दे, संसदेच्या पवित्र मंदिरात बसून हे मंत्री काय करतात ते पवित्र असते का? एकमेकंच्या उरावर बसणे, राजदंड पळवणे, नोटांची बंडलं दाखवणे, चपला/पेपरवेट्/माईक फेकून मारणे हे पवित्र? जेलमधून पॅरोलवर निवडणूक लढवणे हे पवित्र?

जाउ दे कोळसा कितीही उगाळला तरी काळाच...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

यन्ना _रास्कला's picture

16 May 2009 - 11:18 am | यन्ना _रास्कला

पर्वा कोन र त्यो बोलत व्हता कि आमी येनाराय लोक भारताबदल चान्गलच बोलतो. कुटबी भारताला / तेच्या शिश्टमला नाव ठ्येवत नाय. आजुन जित्ता हाय का त्यो. का हा पर्तिसाद वाचुन खपला.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

हुप्प्या's picture

14 May 2009 - 7:02 am | हुप्प्या

मला ह्या गोष्टीचा राग येतो की देशी दारूची बाटली मिळते म्हणून, एखादी चादर मिळते म्हणून कुणालाही मत देणारा अशिक्षित, दरिद्री माणूस आणि देशाचा, इतिहासाचा, राजकारणाचा अभ्यास असणारा ज्ञानी माणूस ह्यांच्या मताला सारखीच किंमत. जेमतेम पोट भरणारा आणि शेकडो वा हजारोंना नोकरीवर ठेवणारा (आणि भक्कम कर भरणारा) उद्योगपती ह्यांन्च्या मताची किंमत सारखीच.
एखाद्या उमेदवाराला मते मिळवायची असतील तर अल्पसंख्य असणार्‍या सुशिक्षित लोकांकडे जाऊन आपले नाणे किती खणखणीत आहे हे समजावणे सोपे आहे का एक नोटांचे बंडल फेकून शेकडो नालायक लोकांचे मत विकत घेणे सोपे आहे? असे असेल तर उमेदवार सुशिक्षित, सुविद्य लोकांना मताकरता काय किंमत देणार? ते सवंग उपाय वापरून जास्तीत जास्त मते मिळवणार. असे असल्यावर सुशिक्षित, सुसंस्कृत लोक मतदानाविषयी उदासीन असतात ह्यात नवल ते काय?
अशिक्षित, अडाणी, दरिद्री, डझनावारी मुले असणारे असल्या लोकांचे लोंढे मोठ्या शहरात येत असल्याने असल्या लोकांची संख्या वाढतच जाणार आणि सुसंस्कृत लोकांचे औदासिन्य वाढतच जाणार हे कटू सत्य आहे.
परदेशात रहाणारे लोक आवर्जून सुट्टी घेऊन मतदानाकरता भारतात का म्हणून येतील?
अमेरिकेसारख्या देशात जिथे लाखांनी भारतीय रहातात तिथे एक लोकसभेची सीट द्यायला काय हरकत आहे? म्हणजे एक खासदार अमेरिकेतील भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून निवडावा.

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 2:26 pm | यन्ना _रास्कला

मला ह्या गोष्टीचा राग येतो की देशी दारूची बाटली मिळते म्हणून, एखादी चादर मिळते म्हणून कुणालाही मत देणारा अशिक्षित, दरिद्री माणूस आणि देशाचा, इतिहासाचा, राजकारणाचा अभ्यास असणारा ज्ञानी माणूस ह्यांच्या मताला सारखीच किंमत

न्यानी मान्साला तरी सोताच्या मताची किमत म्हाईत हाय काय. नायतर मेनबती लावनारे हुशार लोक मतदानाला करन्यासाठी घरातुन बाहेर आले अस्ते. तिकीटी काडुन भारतात येवुन मतदान केल आस्त.

सोताला न्यानी म्हनवुन इतरापेक्शा वेगल दाकवल कि झाल का. एक तरी येनाराय इथ खुल्या दिलान चुक कबुल करतोय का. सर्वे लोक सबबी सांगन्यात न्यान फुकट घालिवतायत.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

ऋषिकेश's picture

14 May 2009 - 9:17 am | ऋषिकेश

जे अनिभा कमावते आहेत त्यांनी मतदानास यावे या मताशी सहमत.
जे विद्यार्थी आहेत त्यांची जर आर्थिक स्थिती मजबूत असेल तर त्यांना येता येईल

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

यन्ना _रास्कला's picture

14 May 2009 - 2:29 pm | यन्ना _रास्कला

जे अनिभा कमावते आहेत त्यांनी मतदानास यावे या मताशी सहमत. जे विद्यार्थी आहेत त्यांची जर आर्थिक स्थिती मजबूत असेल तर त्यांना येता येईल

रुशिकेशराव भाउ एकच हाय जो कायतरी बरुबर, इचार करुन की काय म्हंतात तस बोलतोय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

अर्चिस's picture

14 May 2009 - 2:30 pm | अर्चिस

इंजिन बरेच पुढे जाईल. लगे रहो....

अर्चिस

Nile's picture

15 May 2009 - 5:21 am | Nile

यन्ना रास्कलांनी लईच माईंड केलेलं दिसतय! ;)
जो तो आपल्या खिशा आणि बुद्धीप्रमाणे निर्णय घेतो, उगाच कशाची तरी तुलना कशाला तरी लावायची आणि धागे लांबवायचे! :P

बाकी भारत-भारतीय सुधारणेच्या अपेक्षा करणार्‍यांनी आधी आपली (किमान) प्रतिसादीय भाषा बदलण्याची तसदी घेतलीत तरे सुरवात चांगली होईल. अशुद्ध भाषा ही अजिबात सर्वसामान्यत्त्वाची सुचक नाही.

यन्ना _रास्कला's picture

16 May 2009 - 11:04 am | यन्ना _रास्कला

प्रतिसादीय भाषा बदलण्याची तसदी घेतलीत तरे सुरवात चांगली होईल. अशुद्ध भाषा ही अजिबात सर्वसामान्यत्त्वाची सुचक नाही.

माज्या मराठीमंदी बी.ये. झालेल्य यारान सान्गितल कि तुमी त माज्यापेक्सा बि आसुद्द लिवता. आजपासुन तुमी माजे आसुध्धलेखनगुरु. जय व्हो. पन तुमीइथ सुद्द लिवाय सान्गताय त्ये बर नाय. उंद्या इथ सांस्क्रुतमदी लिवाय सान्गाल. तुमचा काय खरा दिसत नाय हा. बिरुटभावु पाहता नव्ह.

मिपाला आपल्या लोकान्पास्न तोडन्याच डाव हाय हा सगला.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

मराठी_माणूस's picture

19 May 2009 - 2:07 pm | मराठी_माणूस

यन्ना _रास्कला चे सगळे प्रतिसाद मस्त.