हे सर्व अनिवासी भारतीय जर मतदान करत नसतील वा त्या लायकीचे नसतील तर त्यांना कायमचे
परदेशात हाकलून द्यावे काय?
मतदानाचा हक्क असूनहि परदेशात मिटक्या मारत बसलेल्या सर्व भारतीयांना हंटरने फोडून काढावे काय?
;)
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
=))
आपल्याकडे बाहेर जाण्याचे वेड एवढे आहे की हंटर वाले अनिवासी लोकाना फोडायला जातील बाहेर पण परत येतील ह्याचा काय भरवसा? मग त्याना फोडायला परत कोणीतरी.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मी म्हणून तर आधीच हंटर घेउन इथे कतार मध्ये बसलोय.
दिसला कि हाणायचा.
;)
यन्ना रास्कला तुम्ही कुठे असता?
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
मंग अनिभासुद्धा येतीलच की हळूहळू ... तोपर्यंत त्येना निगेटीव बोलू नये ...;)
आनी बरेच लोकान्चे कुटुंब आइ व्डिल इथ राहातात त्याच काय. आप्ल्या कडे तर काका-मामा-आत्या असे रिलेटीव पन आस्तात मद्तीला.
च्या मारी, इथे गॅस सिलेंडर/वीज मंडळ/म. पालिका ह्येंच्या हापिसात रांगा लावून उनातान्हात उभं राहायला लागतंय. पुन्हा रिक्षावाल्यांचा संप असला की बोंबलत पायी हिंडा (न्हायीतर शोफर ड्रीवन पीएमपीएल हाये म्हना तशी ...)
असं आस्ताना आई वडिलांना मतदार यादी तपासायला अजून डोक्याला त्रास कशापायी द्यायाचा?
काका-मामाना सांगायचं म्हनाल तर अजून आपल्या म्हराटीत "आपलं झालं थोडं आनी भाच्यानं धाडलं घोडं" अशी म्हन अजून आले न्हायी म्हनून.... न्हायीतर सांगितलं असतं
(हंटरवाला) विंजिनेर
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
ये रास्कला .... मुद्दा सोडून बोलु नकोस.
शिवाय माझ्या आई-बापाची "काल्जी " मी किती घेतो तुझ्या सारख्या एका फडतूस "आय डी" ला सांगण लागत नाही.
मी तरी तुला प्रतिसाद देण्यात वेळ का घालवतो आहे म्हणा!
असो, असल्या बिनबुडाच्या चर्चेत रास्कलांशी भांडण्यात माझं डोक खर्च करण्यापेक्षा बरं काहीसं करीन. त्यामुळे माझा हा शेवटचा प्रतिसाद.!!
तुझं चालू दे!
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
कुठल्यातरी पक्षाने ह्**मु*ल्याचे निमित्त करुन सरकारचा पाठिंबा काढुन घेतला की काढा तिकिटे परत.
या अर्थाने, जरी मी आत्ता येऊन मतदान केले नसले तरी, आत्ता जे काही चालू आहे ते लक्षात घेता, डिसेंबरात येऊन नक्की करेन, तसे मी आत्ताच तिकीट (विमानाचे, लोकसभेचे नाही!) काढून ठेवतो ;)
कुठल्यातरी पक्षाने ह्**मु*ल्याचे निमित्त करुन सरकारचा पाठिंबा काढुन घेतला की काढा तिकिटे परत.
आतापरतो केवल ३ वेलाच आस झाल. आनि १ डाव इदिरा गान्धी गेल्या म्हनुन लवकर निवडनुक घ्यायाला लागली नायतर सगल्या सरकारने ५ वर्श पुर्न केली. गेल्या १० वर्शात तर स्थीर सर्कार होतच ना. तिकीटीचा खर्च नको म्हनुन केवल कायतरी झंगट काडायच ह्ये बरुबर नाय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
मला तर ह्यात विमान कंपन्यांच्याच फायदा दिसतोय. नाहीतर प्रत्येक देशाच्या भारतिय वकिलाती मध्ये मतपेटी ठेवा.अ ना भि नी ७ दिवस आधीच मतदान करायच.मतदारसंघाचे नाव आणि कोणाला मत द्यायचे आहे ते मतपत्रिकेवर असले पाहिजे.वकिलाती मधल्या बाबू लोकाना मत मोजायचे काम द्यायचे.मत मोजली की त्या त्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्यांकडे निकाल भारतात पाठवून द्यायचा. ज्या दिवशी मतमोजणी असेल त्या दिवशी निकाल उघडायचा.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
विमानवाल्या कपन्या कंदीपास्न अनिभाच्या जिवाव चालाय लागल्या.नाहीतर प्रत्येक देशाच्या भारतिय वकिलाती मध्ये मतपेटी ठेवा.अ ना भि नी ७ दिवस आधीच मतदान करायच.मतदारसंघाचे नाव आणि कोणाला मत द्यायचे आहे ते मतपत्रिकेवर असले पाहिजे.वकिलाती मधल्या बाबू लोकाना मत मोजायचे काम द्यायचे.मत मोजली की त्या त्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्यांकडे निकाल भारतात पाठवून द्यायचा. ज्या दिवशी मतमोजणी असेल त्या दिवशी निकाल उघडायचा.
कल्पना आडवली. छान हाय. आसच कराय हव.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
नैतिक दृष्ट्या कितीही बरोबर असलं, कितीही इच्छा असली, तरी प्रॅक्टीकली शक्य असेलच असं नाही.
बरं, भारतात रहाणार्या सगळ्यांनी मतदान केलं का हो? भारतात लांब राहिलं.. भारतात असलेल्या मिपाच्या सगळ्या सभासदांनी तरी मतदान केलं का हो?
दुसर्याला (त्यातल्या त्यात एनाराय ला)सल्ला देणं, जाब देणं, झोडपणं, नैतिक जबाबदार्यांची जाणीव करून देणं, ई. एकदम सोप्प असतं हो.
एकदा का आपण भारतात रहायला लागलो ना की आपल्याला असा जाब कोणी विचारूच शकत नाही, नाही का?
सग्गेवाल्याच लगीन आस्ल कि मंग बरा टायम भेटतो, पैका आस्तो. तित नाय येत त्या आडचनी.
मग काय पैसा राजकारण्यांच्या बोडक्यावर घालायचा की काय? आणि एवढंच जर वाटतं भारतातल्या निवडणूकांबद्दल तर तशी व्यवस्था करा की कुठुनही मतदान करता येईल. पण राजकारण्यांनाच माहीती आहे अशी व्यवस्था केली तर त्यांचे काही खरं नाही म्हणून. आणि भारतात जे मतपेट्या पळवणं/फोडणं, दडपशाहीने मतदान करायला लावणं, दारू पाजून/लाच देउन मतदान करणं हे चांगलं का?
आणि हे मतं देउन होणारहे काय? चोराच्या ऐवजी गुंड बसेल, तो नाही बसला तर दरोडेखोर बसेल! एखाद्या आमदार/खासदाराने जर निवडून आल्यानंतर काम केले नाही तर त्याला परत बोलावण्याचा अधीकार आहे का घटनेत? एकदा तो खुर्चीवर बसला की ५ वर्षाची निश्चिंती. मग त्यात तो भ्रष्टाचार करो नाहीतर आणखी काही. आता पर्यंत किती मंत्र्यांना/राजकारणी लोकांना कोर्टात शिक्षा झाली आहे? आणि झाली असल्यास किती राजकारणी तुरुंगात गेले आहेत. जगदीश टायटलर आणि प्रभुतींनी शिखांचे शिरकाण केले हे सांगणारे साक्षीदार असताना कोर्ट (आणि CBI सुध्दा) त्यांना क्लीन चिट देउ शकले यावरुनच काय ती योग्यता कळते...
सगळे पक्ष आणि सगळे राजकारणी इथुन तिथुन सारखेच. काँग्रेसचे राज्य होते तेव्हा एन्रॉन प्रकल्पाबद्दल शिवसेना म्हणाली होती 'आम्ही सत्तेवर आलो तर एन्रॉन प्रकल्प समुद्रात बुडवू'. सत्तेवर आल्यानंतर म्हणाले 'एन्रॉन बरोबर परत एकदा किंमती बद्दल चर्चा करुन या प्रकल्पाचे भवितव्य ठरवू'. कसली बोडक्याची चर्चा, सरळ सांगा ना आम्हाला आमच्या हिश्याबद्दल बोलायचे आहे.
यात कोणाला मतदान केले तर काय फरक पडणार आहे. "लोकशाहीतल्या प्रत्येक नागरिकाचे ते पवित्र कर्तव्य आहे", हे सगळं जाउ दे, संसदेच्या पवित्र मंदिरात बसून हे मंत्री काय करतात ते पवित्र असते का? एकमेकंच्या उरावर बसणे, राजदंड पळवणे, नोटांची बंडलं दाखवणे, चपला/पेपरवेट्/माईक फेकून मारणे हे पवित्र? जेलमधून पॅरोलवर निवडणूक लढवणे हे पवित्र?
जाउ दे कोळसा कितीही उगाळला तरी काळाच...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
पर्वा कोन र त्यो बोलत व्हता कि आमी येनाराय लोक भारताबदल चान्गलच बोलतो. कुटबी भारताला / तेच्या शिश्टमला नाव ठ्येवत नाय. आजुन जित्ता हाय का त्यो. का हा पर्तिसाद वाचुन खपला.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
मला ह्या गोष्टीचा राग येतो की देशी दारूची बाटली मिळते म्हणून, एखादी चादर मिळते म्हणून कुणालाही मत देणारा अशिक्षित, दरिद्री माणूस आणि देशाचा, इतिहासाचा, राजकारणाचा अभ्यास असणारा ज्ञानी माणूस ह्यांच्या मताला सारखीच किंमत. जेमतेम पोट भरणारा आणि शेकडो वा हजारोंना नोकरीवर ठेवणारा (आणि भक्कम कर भरणारा) उद्योगपती ह्यांन्च्या मताची किंमत सारखीच.
एखाद्या उमेदवाराला मते मिळवायची असतील तर अल्पसंख्य असणार्या सुशिक्षित लोकांकडे जाऊन आपले नाणे किती खणखणीत आहे हे समजावणे सोपे आहे का एक नोटांचे बंडल फेकून शेकडो नालायक लोकांचे मत विकत घेणे सोपे आहे? असे असेल तर उमेदवार सुशिक्षित, सुविद्य लोकांना मताकरता काय किंमत देणार? ते सवंग उपाय वापरून जास्तीत जास्त मते मिळवणार. असे असल्यावर सुशिक्षित, सुसंस्कृत लोक मतदानाविषयी उदासीन असतात ह्यात नवल ते काय?
अशिक्षित, अडाणी, दरिद्री, डझनावारी मुले असणारे असल्या लोकांचे लोंढे मोठ्या शहरात येत असल्याने असल्या लोकांची संख्या वाढतच जाणार आणि सुसंस्कृत लोकांचे औदासिन्य वाढतच जाणार हे कटू सत्य आहे.
परदेशात रहाणारे लोक आवर्जून सुट्टी घेऊन मतदानाकरता भारतात का म्हणून येतील?
अमेरिकेसारख्या देशात जिथे लाखांनी भारतीय रहातात तिथे एक लोकसभेची सीट द्यायला काय हरकत आहे? म्हणजे एक खासदार अमेरिकेतील भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून निवडावा.
मला ह्या गोष्टीचा राग येतो की देशी दारूची बाटली मिळते म्हणून, एखादी चादर मिळते म्हणून कुणालाही मत देणारा अशिक्षित, दरिद्री माणूस आणि देशाचा, इतिहासाचा, राजकारणाचा अभ्यास असणारा ज्ञानी माणूस ह्यांच्या मताला सारखीच किंमत
न्यानी मान्साला तरी सोताच्या मताची किमत म्हाईत हाय काय. नायतर मेनबती लावनारे हुशार लोक मतदानाला करन्यासाठी घरातुन बाहेर आले अस्ते. तिकीटी काडुन भारतात येवुन मतदान केल आस्त.
सोताला न्यानी म्हनवुन इतरापेक्शा वेगल दाकवल कि झाल का. एक तरी येनाराय इथ खुल्या दिलान चुक कबुल करतोय का. सर्वे लोक सबबी सांगन्यात न्यान फुकट घालिवतायत.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
जे अनिभा कमावते आहेत त्यांनी मतदानास यावे या मताशी सहमत.
जे विद्यार्थी आहेत त्यांची जर आर्थिक स्थिती मजबूत असेल तर त्यांना येता येईल
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
जे अनिभा कमावते आहेत त्यांनी मतदानास यावे या मताशी सहमत. जे विद्यार्थी आहेत त्यांची जर आर्थिक स्थिती मजबूत असेल तर त्यांना येता येईल
रुशिकेशराव भाउ एकच हाय जो कायतरी बरुबर, इचार करुन की काय म्हंतात तस बोलतोय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
यन्ना रास्कलांनी लईच माईंड केलेलं दिसतय! ;)
जो तो आपल्या खिशा आणि बुद्धीप्रमाणे निर्णय घेतो, उगाच कशाची तरी तुलना कशाला तरी लावायची आणि धागे लांबवायचे! :P
बाकी भारत-भारतीय सुधारणेच्या अपेक्षा करणार्यांनी आधी आपली (किमान) प्रतिसादीय भाषा बदलण्याची तसदी घेतलीत तरे सुरवात चांगली होईल. अशुद्ध भाषा ही अजिबात सर्वसामान्यत्त्वाची सुचक नाही.
प्रतिक्रिया
हे सर्व
हा हा
मी म्हणून
यन्ना
आरे आरे
आरे आरे
पण समजा
आस
कीती
सारख
निगेटिव
विंजेनर
भगवन्ता
विंजेनरभाव
आप्ल्या
चुचुताय
लिहि ना
इथ
कायतरी
इंटरनेट
बोगस वोटिग
प्लानिंग
आस कस म्हन्ता
आणि
त्या अर्थाने
भेन्डुबा
मला तर
दाजी
भारतात येऊन मतदान करण..
भाउ
सग्गेवाल्
आर तिच्या मायला
दरडोई एक मत का?
अवो
कमावते अनिभा
हा
वाफ बरीच जमली आहे
यन्ना
निलुभावु,
यन्ना