Skip to main content

आम्हा गरीबांचे बघा

लेखक अंकुश चव्हाण यांनी गुरुवार, 12/03/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा गरीबांचे बघा सारे पत्त्यांचे बंगले. वेदनेच्या पायावर आमच्या सुखांचे ईमले. शीळ्या भाकरीचा घास, तेही तुकडे जळके. चार कुडाच्या या भिंती, वर छप्पर गळके. काजळल्या कन्दिलाचा प्रकाशही काजळला. सुख - सौख्याचा आस्वाद आम्हा कधी ना कळला. आमचे जग हे स्वप्नांचे सारा स्वप्नांचाच खेळ. आसु आणि हासूमध्ये कधी नसतोय मेळ. आम्हासाठी जीवन हे असे अळवावरचे पाणी. न भावे जगजेठी मना सखी वाटते विराणी...
लेखनविषय:

वाचने 1520
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आवडली. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

गरीबीचे खुप छान चित्रण केले आहे.

व्वा.सुरेख कविता... काजळल्या कन्दिलाचा प्रकाशही काजळला. सुख - सौख्याचा आस्वाद आम्हा कधी ना कळला. व्वा... अवांतर :-- कंदिल कुमार श्री श्री श्री आंबोळी महाराज प्रथम यांचे स्मरण जाहले. :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

खुप छान , अप्रतिम कविता...!!

काय अंकुशराव काहितरी नविन वाचायला द्या की राव ;) http://www.misalpav.com/node/3104 ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य