आम्हा गरीबांचे बघा
सारे पत्त्यांचे बंगले.
वेदनेच्या पायावर
आमच्या सुखांचे ईमले.
शीळ्या भाकरीचा घास,
तेही तुकडे जळके.
चार कुडाच्या या भिंती,
वर छप्पर गळके.
काजळल्या कन्दिलाचा
प्रकाशही काजळला.
सुख - सौख्याचा आस्वाद
आम्हा कधी ना कळला.
आमचे जग हे स्वप्नांचे
सारा स्वप्नांचाच खेळ.
आसु आणि हासूमध्ये
कधी नसतोय मेळ.
आम्हासाठी जीवन हे
असे अळवावरचे पाणी.
न भावे जगजेठी मना
सखी वाटते विराणी...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1520
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता छान आहे.
आवडली.
व्वा.सुरेख
अप्रतिम
काय