आमच्या कणकवलेक राणे नांवाचे डॉक्टर आसत.सगळे राणे आता रावराणे नाव लावतत.ह्यो रावराणे दाक्तर ,त्याका लहानपनापासून बगीतलेलो.त्याचो बापूस कणकवलेच्या सोमवारच्या बाजारात नारळ विकत होतो.ह्यो पोरगो चांगलो शिकलो.मुंबईक इलो. एमबीबीएस झालो. गांवात इलो.एक दवाखानो थाटल्यान.दोन वर्षात तीन मजली दवाखानो घातल्यान.
झाला काय? मी आता सत्तर वर्षाचो..मे महिन्यातसगळ्या कुटुंबाक घेवन कणकवल्येक गेलय.आंबे खाल्लय.गरे खाल्लय,काजूगर,काजू खाल्लय.पोटात चावरी वाटाक लागली.सगळी म्हणाली.तुमी रावराणे डॉक्टराकडे जावा.मी गेलंय. डॉक्टरान पाच दिवसांचा औषध दिल्यानी.सगळा औषध घेतलंय पण चावरी कमी नाय.तीन इंजीक्शना झाली. तरी फरक नय. मी पण औषध घेत होतंय ,आंबे गरे खात होतंय.त्यासाठीच तर मे महिन्यात कोकणात जातंव.मग खावक नको काय आंबे गरे.?
डॉक्टर म्हणाक लागले ब्लड टेस्ट करू या.साडेतीनशें रुपये घेतल्यान.ब्लडटेस्ट नॉर्मल इली.मग म्हणाक लागले ,तुमची युरीन टेस्ट करू या.मी म्हटलंय, युरीन टेस्ट...त्याका खर्च किती येतलो?
तर नर्स म्हणाली ऐंशी रुपये लागतले.
युरीन माझी.त्याची टेस्ट करूक ऐंशी? मनात म्हटलं, डॉक्टरानो,मी काय मूर्ख नाय आसय. खूप वर्षा मुंबैक काढून चांगलो हुषार झालंय.
एकदा तर डाक्टरांक विचारलय, "मी परत मुंबैक जाव काय? थयसर के.इ.एम.हॉस्पीटलमध्ये आमच्या ओळखीचो एक माणूस लॅबमधी शिपाई म्हणून कामाक असा.मी जायनं थयसर".
तर म्हणूक लागले,"तू हयसर थांब. मुंबैक के.इ.एम.मध्यें भरती झालेलो पेशंट आजपर्यंत कधी बरो होउन परत इलो हा काय ? तुमी युरीन टेस्ट करून घ्या."
दुसर्या दिवसाक मी फाटफटी उठलंय.घरात सगळ्यांक उठवलंय.मोठी बाटली भरून लघवी गोळा केलंय.आठ वाजता दवाखान्यात गेलंय.नर्स म्हणाली आता तुमी संध्याकाळी ६ वाजता या.रिपोर्ट मिळतलो.युरीन टेस्टचो रिपोर्ट मिळूसाठी सकाळी आठ पासून संश्याकाळी ६ पर्यंतचो वेळ.
"बाबा रे बाबा!" नर्स म्हणाली "तुमी काय एकटे पेशंट नाय.आणि खूप पेशंट आसत." संध्याकाळी या.
संध्याकाळी सात वाजता दवाखान्यात गेलंय. डॉक्टर रावराणे आरामात पेपर वाचत बसलेले.
"डॉक्टर सकाळी वाचायचो पेपर आत्ता तिन्हीसांजा वाचताहत.?"
ते म्हणाले "कणकवल्येक पेपर येयपर्यंत दोन वाजतत म्हणून आम्ही संध्याकाळीच वाचतंव."
"तां जाऊ देत .माझ्या युरीन टेस्टचो रिपोर्ट काय?"
डॉक्टर-"अगदी नॉर्मल.काय जावक नाय.तुम्ही आता औषध बंद करा.रोज फिरा,चाला.बरा वाटतंला.
थोडे आंबे गरे कमी खावा."
माझी टेस्ट नॉर्मल तर बाकीच्यांचा काय. टेस्ट नॉर्मल.
"डॉक्टर मी घरी माघारणीक फोन करू काय ?"
डॉक्टरांच्या टेबलवर फोन बघीतलंय,नी एकदम हिची आठवण झाली.मी फोन फिरवलंय.फोन माघारणीन घेतल्यान.
"हॅलो टेस्टचो रिपोर्ट मिळालो."?
"होय गो बाय.रिपोर्ट मिळालो.नॉर्मल असा."
तुमची युरीन टेस्टचो रिपोर्ट नॉर्मल ,पण आमचा काय? डॉक्टर काय म्हणाले"
"सगळे रिपोर्ट नॉर्मल बायो ,माका काय एक जावक नाय.तुका नाय ,बाबल्या ,बंती ,पिंकी, रेखा म्हाधा एव्हढाच नायतर मोत्याक देकू काय एक जावक नाय."
--------------------------------------------------------------------------------------------
वाचने
4325
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी फाटफटी
क्लास
ब्रँड
गजाली मस्त
जबरदस्त!
कहानी मे ट्विस्ट...
धन्य!
छान
प्रतिभाबा
गजाल
मजेशीर आहे
+१
In reply to मजेशीर आहे by रेवती
प्रतिभा
शपथ्थ..
जुस्त, जुस्त!!!
माका मालवणीतून लिवूंक आवडात
In reply to जुस्त, जुस्त!!! by पिवळा डांबिस
मजा