✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रोमिओगिरी..

श
शितल यांनी
Wed, 02/11/2009 - 18:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13463 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

असेच म्हणतो

संदीप चित्रे
गुरुवार, 02/12/2009 - 18:48 नवीन
मस्त सिग्नेचर आहे रे ऍडी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हा हा हा..

वजीर
गुरुवार, 02/12/2009 - 02:30 नवीन
हा हा हा.. हो चे दोन अर्थ होतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

मायला,

घाटावरचे भट
गुरुवार, 02/12/2009 - 00:09 नवीन
मायला, आमचे मित्र/भाऊ पब्लिक डायरेक्ट फ्रंटफूट डिफेन्सवर. बाकी या बाबतीत आम्ही ऍडीजोश्यांच्या लायनीतले...
  • Log in or register to post comments

खूप मजा आली.

मुक्तसुनीत
गुरुवार, 02/12/2009 - 04:52 नवीन
शीतल यांनी सुरू केलेला धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून खूप मजा आली. अस्मादिकांबद्दल यासंदर्भात बोलायचे तर : लग्नाची गेली काही वर्षे आणि लग्नाआधीची "धागा जुळण्यापासूनची" वर्षे म्हणजे , फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात "बजेट" कडे विशेष लक्ष द्यावे लागण्याचा काळ :-) बाकी बहुतांशी प्रेमभाव व्यक्त करणारी मुले आणि आणि बहुतांशी या "प्रपोझल" च्या लक्ष्य बनलेल्या मुली (आणि या मुलींपैकी बहुतांशी मुलींनी दिलेला नकार ) या संदर्भात या दोन्ही पक्षांचे म्हणणे पटण्यासारखे आहे. मला वाटते यात "सटल्टी" (मराठी शब्द ??) चा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. रस्त्यावरच्या कुणीही कुणालाही प्रेमाबद्दल विचारणे हे सगळ्यात त्रासदायक. मात्र काहीसा परिचय असताना , एरवीची भीडभाड बाजूला ठेवून जर का कुणी मुलगा मुलीला विचारत असेल तर त्याचा अपमान न होऊ देता नकार देणे मुलीला शक्य आहे. अर्थात , यात वर्तमानपत्रात वाचलेल्या रिन्कू पाटील सारख्या बातम्यांमुळे , मुली घाबरल्या असतील तर तेही नैसर्गिक आहेच. शेवटी काय , की "बात की नजाकत को समझना चाहिये" हेच उभयपक्षीयांच्या बाबत खरे.
  • Log in or register to post comments

+1

सहज
गुरुवार, 02/12/2009 - 06:35 नवीन
शीतल यांनी सुरू केलेला धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून खूप मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सोयीस्कर

मैत्र
गुरुवार, 02/12/2009 - 08:47 नवीन
किस्से मजेशीर आहेत. फक्त एकच खरं... जो आवडत नाही तो सो कॉल्ड रोमिओगिरी करतो. जो आवडतो त्याने कसं सही प्रपोज केलं याच्या कहाण्या पुढच्या पिढीपर्यंत वाचल्या जातात. ज्याची लगट आवडत नाही तो व्हिलन आणि अनेक प्रकारे मागे लागणारा, अडवणारा, गाणी गाणारा तो हिरो... सिनेमाबाहेर रोजच्या जगण्यात एवढी सुष्ट दुष्टता नसते. साधारण मुलं एका प्रकारची असतात (अपवाद नाहीत असं नाही) मग जो आवडतो तो चांगला. तो रोमिओगिरी करत नाही. त्याने नाक्यावर/कोपर्‍यावर उभं राहिलं तर ती आपल्याला एकमेकांना पाहण्याची संधी. रोझ डे ला अनेक रोझेस जिला मिळतात ती ज्या ऐटीत येऊन रोझ क्वीन वगैरे बक्षीस घेते तो विलक्षण मजेशीर प्रकार आहे. म्हणजे एखादीला शंभर गुलाब मिळाले तर ते लै भारी आणि ती त्यासाठी ते सगळे घेतेही!! अवांतरः हे डेज अनेक वर्ष चालू आहेत. त्यात बरे वाईटही प्रकार चालतात. घेतलंच पाहिजे यासाठी / पैजेसाठी त्रास दिला जातो. त्याला रोमिओगिरी म्हणता येईल. अनोळखी मुलगा सुंदर मुलगी पाहून दुसर्‍याच कॉलेजला जाउन तिला त्रास देतो याला रोमिओगिरी म्हणता येइल. कट्ट्यावर बसून "काय माल आहे" स्वरुपाच्या कॉमेंट्स उघडपणे किंवा प्रत्यक्ष जाऊन दिल्या जातात त्याला रोमिओगिरी म्हणता येइल. वरचे सगळे किस्से हे बिचार्‍या काय करावं / कसं प्रेम व्यक्त करावं/आणि तिला आवडेल की नाही हे न समजता ओळख वाढवून अंदाज न घेता सिनेमाप्रमाणे मी फूल दिलं की ती हो म्हणेल अशा बालिश पणे वागलेल्या बुद्दू मुलांचे आहेत...
  • Log in or register to post comments

मस्त ग

ऋचा
गुरुवार, 02/12/2009 - 11:15 नवीन
मस्त ग शीतल छान लिहिल आहेस्..एकदम वेळेत.... खुप मजा वाटली प्रतिसाद वाचुन :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

सॉल्लीड धागा !!

अनिल हटेला
गुरुवार, 02/12/2009 - 15:35 नवीन
धागा आणी प्रतीसाद वाचुन भरपूर हसलो !! (ज्युलीयट की तलाश मे) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

गमतीशीर

नीधप
गुरुवार, 02/12/2009 - 16:25 नवीन
गमतीशीर आहेत किस्से!! ओळख ना पाळख आणि एकदम समोर येऊन 'मला लव्हशिप देती का?' असं जर कुणी विचारलं तर त्यावर समंजसपणे इत्यादी काही उत्तर द्यायची गरज नाही. मैत्री असेल, ग्रुपमधलीच व्यक्ती असेल तर ते प्रपोज वेगळे असते. माझ्यामते वरचे किस्से अश्या प्रपोजचे नसून पहिल्या प्रकारचे आहेत.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

शितल
गुरुवार, 02/12/2009 - 18:40 नवीन
रोमिओगिरी आवडल्याचे कळविल्या बद्दल मिपाकरांचे आभार :)
  • Log in or register to post comments

बरोबर नाहि

आपलाभाउ
गुरुवार, 02/12/2009 - 21:19 नवीन
  • Log in or register to post comments

म्हणणं पटतंय...

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/12/2009 - 22:06 नवीन
>> ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपलाभाउ

रोमियोगिरीचे लेखन छानच शीतल.

चतुरंग
गुरुवार, 02/12/2009 - 22:21 नवीन
तू लिहिलेले किस्से आवडले. कालेजात असताना आजूबाजूला एकेक प्रेमवीर काय काय उचापती करायचे ते आठवते. आवडत्या मुलीचे सगळे तास नीट बघून ती कुठल्या लेक्चरला बसते ते बघून लक्ष ठेवणे, ती वर्गातून बाहेर निघाली रे निघाली की तिच्याबरोबर निघणे. तिला बसस्टॉपपर्यंत सोबत करणे. लॅबमधे शक्यतो तिच्याच बेंचवर, नाहीच जमलं तर निदान शेजारच्या बेंचवर, काम करायला मिळेल हे बघणे. एक्सपेरिमेंट्पेक्षा तिच्या हालचालींकडे आणि तिच्या मैत्रिणींना ती काय चिठ्या चपाट्यांची देवाणघेवाण करते आहे हे पहाणे. असे असंख्य उद्योग सुरु असत. आमच्याकडे मुली येणार म्हणजे "ए, तेवढा ८०८५ प्रोसेसरचा प्रोग्रॅम चेक करुन दे ना! शीऽऽचालतच नाहीये!" (अगं बये, कोडिंग नीट केलंस तर चालेल ना? पण मग मुलांना कोण फिरवणार? असं मनात म्हणत) मग आम्ही उदारपणे तो रिपेर करुन चालवून देणार. की आमची गरज संपली!! :( पण अगदी परिचयातली मुलं असली तर त्यांचा भीषण अपमान वगैरे करुनच त्यांना तुमच्या मनातल्या भावना कळवायला हव्यात असे नाही. तुला जसे माझ्याबद्दल वाटते आहे तसे मला वाटत नाही असे सांगूनही प्रश्न सुटायला हवा. हां आता जर एखादा मुलगा लोचटपणे पुन्हा पुन्हा येत राहिला तर मात्र बाब अवघड होते हे खरेच आहे! तेव्हा मुळात हे सगळे संवेदनक्षम मनाचे प्रश्न आहेत आणि ते तसेच सोडवावे लागतात. चतुरंग
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा