"जरा बरी पोरगी दिसली रे दिसली की खिश्यातुन दोन रुपयाचा कंगवा काढुन केसाला भांग पाडुन, साजरं तोंड करून मोकळे " हे वाक्य आमच्या ऒरगॊनिक केमेस्ट्रीच्या सरांनी कॊलेजमध्ये असताना कित्येकदा तरी वर्गातील मुलांना ऐकवले आहे, प्रत्येक वेळी त्या वाक्यावर आम्ही मुली हसु ओठात दाबत मनातील आनंद एकमेकींना डोळ्यातुन दाखवुन देत असु.
एक वेळ कॊलेज मधील लेक्चर बंक केले तर चालेल पण संध्याकाळी महाव्दार रोड चुकता कामा नये असा अधिलिखित नियम काही रोमिओंचा असायचा. कार्टी वर्गात दिसायची नाहीत पण त्या रोड वर मात्र नक्की दिसतील. ;) असे आमचे सर वरचे वर म्हणायचे.
तर अशा ह्या रोमिंओची व्हॆलेन्टाईन डे च्या निमित्त्ताने होणारी धांदल आमच्या ग्रुप मधल्या, वर्गातील, ओळखीच्या मुलींनी सांगितलेली, काही प्रत्यक्ष पाहिलेली गमंती आज मी तुम्हाला सांगणार आहे.
आमच्या गुप मध्ये दोघी तिघी खुप सुंदर मुली होत्या आणि त्याच्यावर आमच्या वर्गातील काही रोमिओ फिदा होते पण त्या काही त्यांना घास घालत नव्हत्या त्यामुळे आम्ही त्या रोमोऒंना "सटरफटर" म्हणायचो, तर व्हॆलेन्टाईन डे आला ही ह्यांच्यात कोठुन एनर्जी यायची काय माहित कसा शोध काढुन त्या मुलींना एकटे गाठायचे आणि पचका करून घ्यायचे ते काही कळले नाही. तर असेच व्हॆलेन्टाईन डे ला आम्ही ९ मैत्रीणी एका ठिकाणी पेस्ट्री खायला थांबलो होतो,वर्गातील एक रोमिओ आला एका मैत्रीणीला तुझ्याशी बोलायचे आहे पण तुझ्या मैत्रीणी पासुन जरा दुर जाऊ, रस्त्याच्या पलिकडे असलेल्या बसस्टॊपपाशी मी तुझी वाट पहात आहे नाही आलीस तर घरा पर्यत येईन असे धमकी वजा विनंती करून तो बसस्टॊप पाशी जाऊन उभा राहिला मैत्रीण दोन मिनीटात समाचार घेऊन आलेच करून डोळा मारून गेली. त्या रोमिओने मैत्रीणीला कॆडबरीचा बॊक्स दिला, आम्ही एका बाजुला पेस्ट्रीखात बसलो होतो तिच्याकडे लक्ष नाही असे दाखवत होतो पण सगळे लक्ष तिच्याकडेच होते, तीने तो बॊक्स घेतला, ओपन केला त्या रोमिओच्या चेह-यावर आनंद दिसु लागला.. पण पुढच्या क्षणीच तीने त्यातील सगळ्या कॆडबरीज आजुबाजुला फेकुन तो बॊक्स त्याच्या डोक्यावरून मागे फेकुन देऊन आमच्यात येऊन पेस्ट्री खायला बसली, तिला आम्ही इतके झापले की अग कॆडबरी फेकण्या पेक्षा तसाच बॊक्स फेकला असतास तर तो रोमिओ गेल्यावर तर आपण सगळ्यांनी त्या कॆडबरीज खाल्या नसत्या काय ? पुन्हा अशी चुक करू नको असा दम ही दिला. ;)
असेच एका व्हॆलेन्टाईन डे ला कॊलेज जवळच्या आर्चिस गॆलरी गिफ्ट शॊपी मध्ये आम्ही ५/६ जणी मस्त पैकी फिरत होतो, तेथे एक कॊलेज मधील रोमिओ प्रकटला त्याच्या हातात रेड रोजचा बुके होता, त्याने कोणाला समजायच्या आत तो बुके एका मैत्रीणीच्या पायापुढे ठेवला, तेवढ्यात आमच्यातील एक जण म्हणाली "अग हा काय तुला जिवंतपणीच श्रध्दांजली वाहत आहे वाटत" तिच्या बोलण्याला लाजुन तो जो पसार झाला तो ४ दिवस कोठेच दिसला नाही. :)
एका मित्राची मजा ( त्याची सर्व लक्षण मुलीं कडुन मार खायची होती, पण नशिब चांगले असावे त्याचे ) त्याला कोणतीही मुलगी आवडायची त्याला चॊईसच नाही असे आम्ही म्हणायचो, आणी हा मुलींशी बोलण्यातही पटाईत, तर पुन्हा त्याला एक मुलगी आवडली, त्याने जाऊन त्या मुलीला मस्का मारायला चालु केले, सर्व ऐकुन घेतल्यावर ती मुलगी म्हणाली पण "माझे ना लग्न ठरले आहे", त्यावर हा हुशार म्हणतो, हो का, मग ठीक आहे, तुझ्या बरोबर असलेल्या मैत्रीणीचे अजुन लग्न वैगरे ठरले नाही ना. ;)
तुम्हाला काही गंमती जमती माहित असतील तर आम्हाला ही सांगा. :)
वाचने
13548
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
=)) =)) =))
मस्त
हेच
In reply to मस्त by आनंदयात्री
हहपुवा
मस्त...
ज्युलियटगिरी...
शॉल्लेट ...!
मुली देखील अपेक्षा करतात की त्याने त्याच दिवशी विचाराव....
एफ़ सी ला
In reply to मुली देखील अपेक्षा करतात की त्याने त्याच दिवशी विचाराव.... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
मस्त !
+१
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुली फार
धमाल लेख..
खल्लास ...!
In reply to धमाल लेख.. by प्राजु
हसुन वेडे व्हायची वेळ आली..
In reply to खल्लास ...! by छोटा डॉन
बापरे! ही
In reply to धमाल लेख.. by प्राजु
प्राजु....थो
In reply to धमाल लेख.. by प्राजु
टाय घातलेला बेडूक ....
In reply to धमाल लेख.. by प्राजु
काय काय
In reply to टाय घातलेला बेडूक .... by वाहीदा
तू तर
मैत्रिणीं
>>अग हा काय
खुप
हा हा हा!
ही कविता
मजेदार आहे कविता.
In reply to ही कविता by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
असेच
In reply to मजेदार आहे कविता. by प्राजु
आता
In reply to मजेदार आहे कविता. by प्राजु
आयला
In reply to आता by विनायक पाचलग
आयला
In reply to आयला by ब्रिटिश टिंग्या
ह्म्म्म्म्!
In reply to आयला by विनायक पाचलग
क्या बात
In reply to ही कविता by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
मस्त
असेच
भारी किस्से
लै भारी........
माय टू सेन्ट्स
त्यामुळे
In reply to माय टू सेन्ट्स by बेसनलाडू
सहमत
In reply to त्यामुळे by भडकमकर मास्तर
ऑगस्ट
In reply to सहमत by बेसनलाडू
आली लाळ
In reply to ऑगस्ट by नाटक्या
हे तो..
In reply to आली लाळ by मराठी_माणूस
डोंबलाचे स्पृहणीय
In reply to सहमत by बेसनलाडू
प्रेम आणि आयुष्य
In reply to डोंबलाचे स्पृहणीय by गोगोल
असेच
In reply to त्यामुळे by भडकमकर मास्तर
+१ (माय टू सेन्ट्स)
In reply to माय टू सेन्ट्स by बेसनलाडू
किस्से
असेच
In reply to किस्से by भडकमकर मास्तर
.
बेष्ट
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
असेच म्हणतो
In reply to बेष्ट by बिपिन कार्यकर्ते
हा हा हा..
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
मायला,
खूप मजा आली.
+1
In reply to खूप मजा आली. by मुक्तसुनीत
सोयीस्कर
मस्त ग
सॉल्लीड धागा !!
गमतीशीर
धन्यवाद !
बरोबर नाहि
म्हणणं पटतंय...
In reply to बरोबर नाहि by आपलाभाउ
रोमियोगिरीचे लेखन छानच शीतल.