✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अतिंद्रिय शक्ती

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 01/09/2009 - 16:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25846 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

प
प्रभाकर पेठकर Mon, 01/12/2009 - 23:18 नवीन

समज...

शनिशिंगणापूर मधे दारे उघडी ठेवली तरी चोर्‍या होत नाहीत असा समज आहे. असा 'समज'च आहे. शनिशिंगणापूरला माझ्या भावाच्या मित्राच्या सामानातून तीन की साडेतीन हजार रुपये चोरीस गेले. त्याने बराच आरडा-ओरडा केला तेंव्हा तिथल्या दुकानदारांनी वर्गणी काढून त्याला पैसे दिले आणि हात जोडून विनंती केली की ,'कृपा करून आरडा-ओरडा करू नका. इथे येणार्‍या भक्तांवरती आमची दुकानदारी अवलंबून आहे. भक्त यायचे बंद झाले तर आम्ही उपाशी मरु.' असो. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
ब
बॅटमॅन Fri, 06/29/2012 - 18:14 नवीन

खत्रा!!

खत्रा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
भ
भिंगरी Mon, 07/21/2014 - 16:47 नवीन

शिंगणापुरचे चोरटे

आमच्याही नातलगाचे बूट तेथे चोरीला गेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
आ
आनन्दा Mon, 07/21/2014 - 12:10 नवीन

किंबहुना चमत्कार (किंवा तत्सम

किंबहुना चमत्कार (किंवा तत्सम) लेबल लावून हरेक माणसामधलीच संपूर्ण चिकीत्सक वृत्तीच मारून टाकणं घातक आहे असं मला वाटतं;
बरोबर आहे, आणि नियमात बसत नाही म्हणून अशा घटनांचे अस्तित्वच नाकारणे हे देखील तेव्हढेच चूक, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पिवळा डांबिस Sun, 01/11/2009 - 00:59 नवीन

विज्ञान आणि निष्ठा...

समोर दिसणारे फक्त नियमात बसत नाही म्हणून मान्य न करणार्‍यांना 'विज्ञाननिष्ठ' म्हणतात का? नाही! त्यांना विज्ञाननिष्ठ म्हणत नाहीत! समोर दिसणारे, जर सर्वांनाच "दिसत" असेल तर फक्त ते नियमात बसत नाही म्हणून विज्ञाननिष्ठ नाकारीत नाहीत. अशा गोष्टींसाठी नवीन नियम बनवले जातात. उदा. प्रकाशाचं लहरींतलं स्वरूप आणि प्रकाशाचाचंच फोटॉन्समधील स्वरूप!! प्रश्न तेंव्हा येतो जेंव्हा कुणी एक जण स्वतःला काही "दिसत" असल्याचा दावा करत असेल आणि इतरांना ते त्याचवेळेला दाखवण्यात असमर्थ असेल जेंव्हा! बाकी अदितीशी सहमत! पण उगाचच माझ्या "जातीतल्या" लोकांवर आरोप झाल्यामुळे टंकाळा सोडून प्रतिसाद प्रपंच केला. :) कुछ रीत जगतकी ऐसी है, हर एक रात का दिन हुवा... तू कौन है, तेरा नाम है क्या, गॅलिलीओभी यहां बदनाम हुवा.... (अदिती, ह. घे! हा तुझ्या पूर्वसूरींचा एक सल्ला!!!) :))
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 01/11/2009 - 08:25 नवीन

वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक

पाश्चात्यशास्त्र किंवा विज्ञान सिद्धांतामधे जग हे यंत्रवत आणि अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेले आहे आणि गणिती सुत्रांनी त्यांतील सर्व रहस्ये उलगडता येतील असा विश्वास आहे. या पद्धतीत ज्या कल्पना आणि शंकांचे निरसन बाह्येंद्रियांच्या सहाय्याने करता येते त्याच कल्पना आणि सिद्धांतांना शास्त्रसंमत मानले जाते. यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या ग्राह्य धरावयाच्या निकषांमधे वस्तुनिष्ठ (objective), गणिती (mathematical), यांत्रिकी (mechanical, deterministic), तर्कनिष्ठ (rational), पृथ्थकरणात्मक (analytical) , क्रमवार वा श्रेणीयुक्त मांडणी (linear, step-by-step, sequential, empirical), प्रायोगिक (experimental), प्रत्यक्षानुभावात्मक (experienced by senses directly) इत्यादी येतात. या कसोट्यांवर उतरेल तेच खरे ज्ञान आणि बाकीचे सर्व अज्ञान असे विज्ञानाच्या भाषेत म्हटले जात असे. (वाक्यातील भुतकाळ लक्षात घ्या) या कसोट्या ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असल्या तरी व्यापक ज्ञान मिळवण्यासाठी, अनुभव व्यक्त करण्यासाठी अपु-या आहेत. अंतःप्रज्ञा (intution), व्यक्तिनिष्ठता (subjectivity) , ध्यानी वृत्ती (meditative tendency) , परस्परसंबंध पहाण्याची दृ्ष्टी (interrelational perspective), संश्लेषणात्मक दृष्टी (sythesis), समष्टीभाव (holistic), आणि तर्क निरपेक्षता(a-rationality) या प्राबल्याने भारतीय पद्धतींना सरळ सरळ अवैज्ञानिक ठरवुन त्यांचा संकोच केला गेला. मुलभुत वैज्ञानिक कारणमिमांसेपासुन दुर ठेवण्यात आले. भौतिकशास्त्रे पदार्थांचा अभ्यास करतात, त्यामुळे वस्तुनिष्ठता बाळगणे शक्य असते. परंतु समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींच्या अभ्यासाचे विषय पदार्थमय वस्तु नसतात. राग, लोभ, इच्छा, भावना, कृती, मनोव्यापार या गोष्टी प्रत्येक मनुष्य कमी अधिक प्रमाणात अनुभवत असतो. पण या वस्तु नसुन परिणाम आहेत. परिणाम म्हणजे मुळ प्रवृत्ती किंवा प्रेरणा नव्हे. यांचा अभ्यास पाश्चात्य गणिती पद्धतीने करता येणे शक्य नाही. त्याचाच फटका बसुन 'चेतना' आणि 'मन' विज्ञान मान्य करत नाही. त्यामुळे अशा विषयांची खिल्ली हे विज्ञान नाही, अवैज्ञानिक आहे असे भासवुन उडवली जात असे. (वाक्यातील भुतकाळ लक्षात घ्या) भौतिक विज्ञानात महत्वाचा प्रश्न हा आहे की, विश्वाचे मुळ जड आहे की चेतन? सेमेटीक पंथांतील धर्मात यावर काहीही नाही. परंतु ह्या विश्वाचे मुळ तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या विश्वाला चालवणारे असे चेतन आहे हे मान्य करणे म्हणजे आपले पुरोगामी प्रतिमेला तडा जाणारे असेल असे वाटुन या विषयावर व्यक्त करण्यास, ते चेतन असेल तर ते मान्य करण्यास, सहमती दर्शविण्यास अनेकांना जड जात असे. (वाक्यातील भुतकाळ लक्षात घ्या) परंतु हळुहळु वैज्ञानिकाचा आणि अवैज्ञानिकांचा एकमेकांविषयीचा दृष्टीकोन बदलत आहे असे मानण्यास हरकत नाही. आणि वर उल्लेखलेल्या सर्व पद्धतींचा एकत्र मिलाफ होवुन (म्हणजेच अध्यात्म आणि विज्ञान हातात हात घालुन), या सृष्टीतील ज्यांना अजुनही चमत्कार असे म्हटले जाते अशी रहस्ये उलडगतीलच असा मला विश्वास आहे. बाकी परमेश्वरी लीला अगाध आहे. मी पामर काय बोलु? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 01/12/2009 - 20:46 नवीन

वैज्ञानिक अवैज्ञानिक

आपणे विचार वाचले. आपण आधी यांचे वाचन केले नसल्यास सुचवतो. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे विज्ञान आणि चमत्कार या ग्रंथातील आशय आपल्या विचारांशी जवळ जाणारा वाटला. तो ग्रंथ आपणांस हवा असेल तर माझ्याशी संपर्क करून ते मिळवता येईल. आपण पुण्यात असाल तर रोहिणी बुक डेपोतून -अबचौक - ही तो व त्यांची अन्य विज्ञान आणि बुद्धिवाद, विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन आदि पुस्तकेही उपलब्ध होऊ शकतात.शशिकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ध
धनंजय Tue, 01/13/2009 - 02:25 नवीन

असे नसावे

पाश्चात्यशास्त्र किंवा विज्ञान सिद्धांतामधे जग हे यंत्रवत आणि अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेले आहे आणि गणिती सुत्रांनी त्यांतील सर्व रहस्ये उलगडता येतील असा विश्वास आहे.
असे नसावे. पाश्चात्त्यशास्त्रात "जग हे यंत्रवत आणि अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेले आहे" असे (पूर्वीचे तरी) गृहीतक तुम्हाला कुठे सापडले? जगातील प्रत्येक देशात असा विचार असलेली माणसे सापडतील म्हणा - काही लोकांच्या कर्मसिद्धांताच्या मागे सुद्धा "प्राक्तनाची अपरिवर्तनीय बद्धता" असे काही गृहीतक असते. पाश्चात्त्यांमध्ये देकार्तच्या शिष्यांचे असेच काही मत होते की ईश्वराने सुरुवातीला विश्वात गती भरली आणि नियम बनवलेत, पण त्यानंतर सर्व घटना त्या अपरिवर्तनीय/नियमबद्ध आहेत. (खुद्द देकार्तच्या मते चेतन मनुष्य-आत्मासुद्धा जड वस्तूंच्या गतीला देऊ शकतो.) हल्लीच्या "पाश्चिमात्त्य" वैज्ञानिक संशोधनात मात्र असे कुठलेही गृहीतक वापरलेले दिसत नाही. पूर्वी तरी कधी वापरले जात होते? पैकी "वस्तुनिष्ठता" ही परस्परसंवादासाठी महत्त्वाची असते - हे मात्र खरे. "प्रत्यक्षानुभव" याच्या महत्त्वाचे मूळ व्यक्तिनिष्ठता आहे. (अशा प्रकारे तुमच्या पहिल्या यादीतील, आणि दुसर्‍या यादीतील तत्त्वांचा मिलाफ होतो आहे.) थोडक्यात, मला तुमचे विश्लेषण अयोग्य वाटते - संश्लेषण आवश्यक आहे. पण तसे संश्लेषण करता पाश्चिमात्त्य-पौर्वात्य असा मुद्दा राहाणार नाही.
भौतिक विज्ञानात महत्वाचा प्रश्न हा आहे की, विश्वाचे मुळ जड आहे की चेतन? सेमेटीक पंथांतील धर्मात यावर काहीही नाही.
हे मात्र कैच्या कैच. सेमिटिक पंथांमध्ये विश्वाचे कारण चेतन आहे - त्यांच्या प्रमुख धर्मशास्त्र्यांपैकी यावेगळे सांगणारा कोणीही नसावा. भौतिक विज्ञानासाठी हा प्रश्न आहे खरा - "चेतन" म्हणजे नेमके काय? अर्थात, एखादी संकल्पना चेतन आहे की नाही, याविषयी समाधानकारक उत्तर काय असू शकते? पूर्वीच्या काळी हा प्रश्न जितका सोपा (स्पष्टार्थ) मानला जाई, तितका तो नसावा. ज्या संकल्पनांबाबत अर्थनिर्णय झालेला नाही, त्याबद्दल संशोधनात्मक कार्य करण्याबाबत कोणाचाच उत्साह होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वजीर गुरुवार, 02/19/2009 - 21:29 नवीन

तुमचा

तुमचा प्रतिसाद फार आवडला. अवलियांनी लिहिलेल्या मुद्यांचे खंडन केले आहेत. अवलियांचा प्रतिसाद वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/11/2009 - 13:06 नवीन

काही अवांतर ...

... 'बेन्झिन'च्या रेणूबद्दल माहिती असणार्‍यांसाठी: असं म्हणतात की फ्रेंडरीक ऑगस्ट केकुले नावाचा माणूस बेन्झिनच्या रेणूत इलेक्ट्रॉन्सच्या कशा प्रकारच्या विभागणीमधून हा रेणू स्थिर झाला असेल याचा विचार करत झोपी गेला. त्याला स्वप्नात स्वतःची शेपटी खाणारा साप दिसला आणि कोडं उलगडलं. Image removed. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
र
रेझर रेमॉन Sun, 01/11/2009 - 13:43 नवीन

प्रतिसाद नको.

अदिती ताई... ( मोठया आहात म्हणून) नमस्कार.. अनुभव आला नसेल असा एक ही माणूस नसेल... आहे, मी आहे (आणि माणूसही आहेच). ( मी नाही... [परग्रहवासी] तरी मला चमत्कार वगैरे विषयांत रस नाही. कसला अनुभव? मनात कोणताही विचार कधी ही येऊ शकतो. त्याला धरून पुढे काही घडले तर चमत्कार कसला? म्हणून जे आहे ते असू दे ना! आपलं काय जातं? चमत्कारावर आक्षेप) (आपण अपवादाने नियम सिद्ध करूया का?) आपला प्रतिसाद ऐंद्रीय शक्ती वापरून मला कळला नाही आणि (हा माझ्या मंदबुद्धीचा परिणाम) विशेषतः हे वाक्यः काळ आणि अवकाश यांचा परीघ आणि छेद अज्ञात आहेत... माझ्या माहितीत काळ आणि अवकाश यांचा छेद शून्य आहे, कारण काळ (१ मिती/dimension) आणि अवकाश (३ मिती) या चार मितींमधे आपण रहातो. कोणतीही घटना, वस्तू यांची स्थिती(? positions) देण्यासाठी हे चारही coordinates देण्याची गरज असते. (चांगलं आहे. एन्टी मॅटर ही त्यात बसेल का? माझ्या मेंदूच्या कोऑर्डिनेट्समध्ये साठवायचा प्रयत्न करतो. युनिटी ऑफ स्पेस एण्ड टाइम माहीत आहे. एटर्नल प्रेझेंण्ट माहीत आहे. आपल्या अल्पमतिला तेवढे झेपते.) अवांतरः माझ्या अल्पमाहिती आणि स्मरणशक्तीनुसार chico या शब्दाचा अर्थ छोटा मुलगा असा आहे. मी छोटा मुलगा नाही, तरीही आपला प्रतिसाद वाचला आणि प्रतिप्रश्न(?) विचारला, तेव्हा राग मानू नये. (चिकाज् आणि चिकोज् आपण नाही सारे नाही का? नसलो तर तसं व्हायला हवं, रहायला हवं. बालपण का हरवायचं? मोठं व्हायची ही किंमत द्यायला आपण तयार नाही.) *बेन्झिनचा रेणू कसा ही असो. ऑगस्ट केकुले ला स्वप्नात जे दिसलं त्याची सांगड घालणार्‍या कथेचे विज्ञानातच दाखले दिले जातात. हे ही गोड आहेच! -रेझर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आपला अभिजित Sun, 01/11/2009 - 17:50 नवीन

ऐंद्रीय शक्ती ?

अरे बाबा, तू वारंवार हा कुठला शब्द वापरतोयंस? `अतींद्रिय शक्ती' असा शब्द आहे तो! अति + इंद्रिय म्हणजे, इंद्रियांपलीकडचे...इंद्रियांनाही जे कळत नाही, ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेझर रेमॉन
र
रेझर रेमॉन Mon, 01/12/2009 - 21:05 नवीन

अरेरे!

हे कसं सेंद्रिय खता सारखं झालं! मागे वाचा आणि योग्य ठिकाणी प्रतिक्रिया पाठ्वा. - रेझर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
व
विनायक प्रभू Sun, 01/11/2009 - 17:59 नवीन

अरेरे

खोखला(हिंदी) का खोकला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेझर रेमॉन
व
विजुभाऊ Sun, 01/11/2009 - 17:30 नवीन

डॉ जोस सिल्व्हा

डॉ जोस सिल्व्हा चे सिल्व्हा मेथड ऑफ माइन्ड कन्ट्रोल हे पुस्तक वाचुन पहा. यात अशा मानवी मेन्दुच्या अतीन्द्रीय क्षमतेबद्दल बरेच काही सप्रयोग लिहिले आहे. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/12/2009 - 21:28 नवीन

होसे

डॉ जोस सिल्व्हा चे सिल्व्हा मेथड ऑफ माइन्ड कन्ट्रोल हे पुस्तक वाचुन पहा. यात अशा मानवी मेन्दुच्या अतीन्द्रीय क्षमतेबद्दल बरेच काही सप्रयोग लिहिले आहे.
होसे. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
घ
घाटावरचे भट Tue, 01/13/2009 - 00:54 नवीन

की होजेऽय?

उच्चाराच्या दृष्टीने हा जास्त जवळचा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमाक्ष
प
प्रमोद देव Sun, 01/11/2009 - 19:47 नवीन

आमचेही काही चमत्कार वाचा.

आमचेही काही चमत्कार इथे वाचा. ;)
  • Log in or register to post comments
म
मृण्मयी Sun, 01/11/2009 - 22:16 नवीन

दिव्यदृष्टी !

अतिंद्रीय शक्तीचं माहिती नाही, पण आई झाल्यापासून आम्हास दिव्यदृष्टी प्राप्त झालीय हे नक्की. रविवारी मटणरश्श्याचा हंडा रटरटायला लागला की आम्ही आधी एक पोछा तयार ठेवतो, त्यानंतर पुदिनहर्‍याची बाटली शोधून गळक्या नळाखाली बादली लावतो. कारण दिव्यदृष्टीमुळे आम्हास खालील गोष्टी आधीच कळलेल्या असतात : नको तितकी हाडकं खाऊन कुत्रं घाण करणार! नको तितक्या पोळ्या आणि रस्सा खाऊन कार्टं "आई मळमळतं" म्हणून बोंबलणार. आणि वाडगंभर मटण आणि ताटभर भात रिचवून आमचं सोंग अख्खी दुपार कुंभकर्णासारखी ताणून देणार... गळका नळ गळतच रहाणार!!!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 01/14/2009 - 02:43 नवीन

काय प्रतिसाद आहे मृ

जियो.... एकदम सह्ही रविवार :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृण्मयी
प
प्रमेय Tue, 01/13/2009 - 04:42 नवीन

आमचेही काही अनुभव

अस्मादिकांनाही काही विशिष्ट अनुभव आले आहेत. १. वेळ :अंतिम वर्षाला असतांना. स्थळः कॉलेज कटटा. मी, आमची एक वर्ग मैत्रीण आणी इतर मित्र-मैत्रीणी बोलत होतो. भरपुर विषय चालले होते. अचानक मी तिला तिरीमिरीने म्हणालो "एकतर तू पदव्युत्तर शिक्षण घेशील आणि छान २-३ वर्षे लग्न न करता मजेत राहशील किंवा तुझे ६ महिन्यात लग्न होईल." आर्श्चय म्हणजे ती खूप हुशार मुलगी होती आणि तिचे (कॉलेजात तरी) कोणतेही प्रकरण नव्हते. अगदी साधी सरळमार्गी मुलगी होती ती! बाकी सगळे मित्र म्हणाले "काय भावा? सकाळ पासून कोणी मिळाले नाही का? ती कशाला लग्न करेल लवकर? शिकणारच ती!" मी म्हणालो "ठीक आहे, दिल्ली कही दूर नाही!" आणि ४थ्या महिन्याला तिची पत्रिका हजर! अरेंज मॅरेज! तिनेच सांगितले "माझा कोणताच विचार नव्हता. घरचे म्हणाले ,जरा भेट तरी; म्हणुन फोनवर १-२ तासा गप्पा मारल्या आणि मला तो आवडून गेला. दुसरया दिवशी जरा जास्त गप्पा मारल्या आणि टेक्नीकल बोललो." "मग?" "मी जरा पर्सनल विचारले. मला शिकायचे झाले तर काय वगैरे?" तो म्हणाला "तर काय, शिकायच. माझी ना नाही." "मग मी घरच्यांशी बोलले; म्हणाले मला तो आवडला आहे आणि मी लग्न करायला तैयार आहे." दुसरया दिवशी मित्र घरी हजर..."काय बुवा, काय झालं? आज सकाळी सकाळी?" "तू म्हणालास तसं झाल बघ!" २. वेळ: १२ची (रात्री नव्हे दिवसा), परिक्षेची स्थल: तोच कॉलेज कट्टा. मित्र तयारीवर अन्तिम हात फिरवत होता आणि आम्ही सूत्रे घोकित होतो... अचानक मी " मित्रा तो ऑपशनला टाकलेला धडा कोणता? तो येणार आज!" तो, दोन वेळा परत परीक्षा दिल्याने माहितिगार "डर मत यार!" "ओके, हा formula पाठ करच. हे येणार!" "ओके" आणि काय आश्चर्यम ५वा प्रश्न हाच! परत बाहेर आल्यावर "थैंक्स यार... आज पास हो जाऊंगा..." मी "कुछ बात नाही यार..." आणि अचानक मी "आज गाड़ी पे म़त जा. बससे चला जा. गाड़ी बादमे लेके जा." तो "क्यूँ? गाड़ी तेरेको चाहिए क्या? चाहिए तो बोल ना यार. शर्माता क्यूँ है?" मी "तस नाही. I have bad feeling about you driving today." हो नाही, हो नाही करता करता तो मित्राबरोबर गाड़ी घेउन जायला तयार झाला. मी नको नको म्हणत होतो, पण नाही... मला काळजी आणि संध्याकाळी मित्राचा फोन... " यार, तेरी बात सुनानी चाहिए थी. रस्त्यात जाम ट्राफिक होता म्हणुन लॉन्ग कटने गेलो आणि रस्त्यात म्हशी! त्यांना चुकवायचे म्हणुन जरा बाजुला गाड़ी घातली तर गाड़ी चिखलात! शेजारीच तारेच कम्पौंड होतं आणि म्हशी पण जरा जास्तच जवळ आल्या. जरा वाचलो बघ. नाही तर आज डोळे किंवा हाथ पाय धारातीर्थी पडलेच होते." इति अलम... आमची कोठेही शाखा नाही, एवढा खराब धंदा?
  • Log in or register to post comments
म
मोहन Tue, 01/13/2009 - 17:17 नवीन

नर्मदा परिक्रमा

अनेक लोक नर्मदा परिक्रमा करतात. त्यांना बरेच अतिंद्रीय अनुभव आलेले वाचले आहेत. जगन्नाथ कुंट्यांचे "नर्मदे हर" पुस्तक वाचण्या सारख आहे. ( वेगळे अनुभव हा त्यातला फारच छोटा भाग आहे.) मला एका बैठकीत संपवावेसे वाटले. मोहन
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 01/13/2009 - 20:08 नवीन

अ॑त:प्रेरणा

नर्मदे हर हर व त्याच लेखका॑ची इतर पुस्तकेही अतिशय वाचनीय आहेत. नर्मदा परिक्रमा पायी एकदा करणेही दुष्कर आहे पर॑तु श्री. कु॑टे या॑नी तब्बल चार वेळा केली आहे. त्या॑चे अनुभव खरोखर॑च वाचनीय आहेत. ह्यावरील पूर्वी झालेली चर्चा इथे पाहा. http://www.misalpav.com/node/682 मी एक विज्ञानाचा विद्यार्थी होतो व राहीन. वैद्यकीय अभ्यास करताना व गेले नऊ वर्षे विविध प्रकारचे रूग्ण, उपचार, शस्त्रक्रिया, त्या॑चे नातलग व रूग्णालयातले अनुभव खूप शिकवून गेले. (अजुनही शिकायला मिळत॑च) तसेच मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये काम करता॑नाही ईश्वरी शक्तीबद्दलचा विश्वास दुणावतच गेला. काही अति॑द्रिय शक्ती॑चे अनुभवही आले. अश्या काही शक्ती निश्चीत आहेत. काही शास्त्रे अचूक असू शकत नाहीत. ठळक उदाहरण म्हणजे वैद्यकीय शास्त्र. निदान करता॑ना वा शस्त्रक्रिया करता॑ना नेहमीच कागदावरचे गणित वा पुस्तकातल्या गोष्टी कामी येत नाही. अनेकदा अ॑तःप्रेरणा मदत करते. मला तर असे अनुभव प्रत्यही येतात. पण माझे जाऊ दे, जे॑व्हा डॉ. बी.एन्.पुर॑दरे॑सारख्या जगविख्यात सर्जनला असे अनुभव येतात ते॑व्हा इतरा॑ची काय कथा? (पाहा: आत्मचरित्र-शल्यकौशल्य) अश्या अनेक प्रतिथयश व कर्तबगार फिजिशियन, सर्जन्सचे असे अनुभव 'डॉक्टर्स ऍन्ड पेशन्ट्स' ह्या पुस्तकात वाचावयास मिळतील. (माझ्याकडे त्याची एक दुर्मिळ प्रत आहे.) बाकी विज्ञाननिष्ठ म्हणवून घेणार्‍या॑च्या अह॑काराबद्दल मला काहीच बोलायचे नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 01/14/2009 - 00:00 नवीन

उत्तम प्रतिसाद..

उत्तम आणि प्रामाणिक प्रतिसाद. फक्त शेवटचे वाक्य नको होते. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
अ
अरुण जाधव गुरुवार, 02/19/2009 - 21:21 नवीन

होय !अस

होय !अस घड्त हे मात्र खर आहे. समजा अशी शक्ति असेल तर ति वाढविण्या साठि कोणि मार्ग् दर्शन करेल काय?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 06/29/2012 - 20:50 नवीन

मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषण

रोचक धागा. सावकाशीने वाचतो आहे. एक जुना धागा: (यात विविध मिपाकरांनी सांगितलेले अनुभव 'अतिंद्रीय' या सदरात गणता येतील). मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव http://www.misalpav.com/node/19073
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 06/30/2012 - 00:35 नवीन

आय लव्ह मिपा ...

विथ ऑल माय इंद्रीय-नॉन इंद्रीय-अ‍ॅण्ड अतिंद्रीय शक्तीज :D अर्धवटराव
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 07/14/2012 - 00:51 नवीन

धागा वर आलाच आहे तर पुनः

धागा वर आलाच आहे तर पुनः प्रतिसाद लिहिण्याचा मोह आवरत नाही. धागा विषयाशी संबधीत असलेले म्हणून वानगीदाखल खालील उदाहरण पुरेसे ठरावे: एडगर केसी नामक व्यक्तीबद्दलचे असे अनुभव लिहून ठेवलेले आहेत. पुस्तकाचे नाव - Many Mansions: The Edgar Cayce Story on Reincarnation (Signet) [Gina Cerminara, Hugh Lynn Cayce] एडगर केसीबद्दलची माहिती http://en.wikipedia.org/wiki/Edgar_Cayce राघव
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Fri, 07/18/2014 - 17:00 नवीन

रोचक धागा आणि प्रतिसाद, अजून

रोचक धागा आणि प्रतिसाद, अजून कोणाचे काही अनुभव असतील तर वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 07/19/2014 - 00:16 नवीन

शिर्डीच्या साई बाबांनाही अतिंद्रिय शक्ती होती.

विनायक प्रभूंना मनापासून धन्यवाद, हा महत्त्वाचा लेख लिहिल्याबद्दल. शिर्डीच्या साई बाबांनाही अतिंद्रिय शक्ती होती. शिर्डित येण्यापुर्वी त्यांनी शिर्डिच्या पाटलाची हरवलेली घोडी कूठे सापडेल हे अचुक सांगितले होते,ज्याला आपण चमत्कार मानतो. युगंधर या पुस्तकात देखिल लेखकाने कॄष्ण देखिल साधा मानवच असुन त्याने अतिंद्रिय शक्ती वापरून बर्‍याच गोष्टी साध्य केल्याचे लिहिले आहे. श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या एका भक्ताला त्याच्या कोठारातील साठविलेले धान्य सुगीच्या आधिच विकायला सांगुन खुप मोठ्या नुकसानापासुन वाचवल्याचे स्मरते, कारण त्या वर्षी ते पीम अमाप येवुन भाव गडगडले होते. कूंडलीवरुन असे योग शोधुन कादून त्या लोकांना सरकारच्या "नियोजन आयोग/आपात्कालीन सुरक्षा योजना/हवामान खात्यात" किंवा समभागात गुंतवणुक करणार्‍या मोठ्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट /फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कंपन्यामध्ये भरती केले पाहिजे, असे वाटते.
  • Log in or register to post comments
भ
भृशुंडी Sat, 07/19/2014 - 01:00 नवीन

अतिंद्रीय?

कूंडलीवरुन असे योग शोधुन कादून त्या लोकांना सरकारच्या "नियोजन आयोग/आपात्कालीन सुरक्षा योजना/हवामान खात्यात" किंवा समभागात गुंतवणुक करणार्‍या मोठ्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट /फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कंपन्यामध्ये भरती केले पाहिजे, असे वाटते.
उत्तम सल्ला. खरंच असं करायला हवं. किती वित्त्/मनुष्य हानी टळेल नाही? अवांतर - एवढा मोठा फायदा असूनही अजून असं काही कुठल्याही देशात झालेलं ऐकलं नाही (conspiracy theories मध्ये सुद्धा). ह्याचं कारण समजणं अवघड नाही!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 07/21/2014 - 13:08 नवीन

UPA सरकारनं जुना खजीना

UPA सरकारनं जुना खजीना शोधण्यासाठी कुणा साधूच्या स्वप्नावर विश्वास ठेवून खोदकाम चालू केले होते की. (की राम्देव आणि इतर बाबा भाजपकडे असताना आपणही हिंदू मतांसाठी काहीतरी स्टंट करावा म्हणुन केले कुणास ठावूक) पुढे त्याचे काय झाले माहीत नाही. खजिना सापडला नाही इतकं मात्र नक्की. खोदकाम किती दिवस चालले, किती रुपयांचा चुराडा झाला आणि त्यामुळे हिंदू मते मिळालीत का *lol* ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
ब
बबन ताम्बे Mon, 07/21/2014 - 11:51 नवीन

मी दहावीत असतानाचा माझा अनुभव.

ही १९८० ची गोष्ट आहे. दहावीचा जीवशास्त्राचा पेपर सुरू व्हायच्या आधी एक तास मी २१ अपेक्षित उघडले आणि माझ्या लक्षात आले की एक आक्रुती (बहुतके बेडकाच्या कुठल्यातरी सिस्टीम बाबत होती) गेली पाच वर्षात विचारली नाही. बाकी सगळ्या आक्रुत्या विचारून झाल्यात. एका आक्रुतीला त्यावेळी ५ मार्क होते. मी आपले सहज मित्रांना बोलुन गेलो की बहुतेक ही आक्रुती आज पेपर मधे येईल. मित्रांनी विश्वास ठेवून ती आक्रुती पेपरच्या आधी घोटली. आणि काय आश्चर्य ! प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर बघितले तर नेमकी तीच आक्रुती विचारली होती. आम्हा सगळ्यांचे ५ मार्क फिक्स झाले :-) पण ही काही माझी अतिंद्रिय शक्ती नव्ह्ती. मी पाच वर्षांचे पेपर बघितले, विचार केला आणि अंदाज बांधला.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 07/21/2014 - 12:54 नवीन

एक स्नेहपूर्ण योगायोग

मला अतिंद्रिय शक्तींचा अनुभव नाही. पण अलिकडेच एका खास योगायोगाची कल्पना मी केली आणि तो तसाच घडला. माझी एक अतिशय खास/जिवलग मैत्रीण आहे. तिच्या लग्नानंतर सुमारे एक वर्षानी ,२०१३ मध्ये ती गरोदर असल्याचे तिने मला सांगितले. महिना वगैरे पण सांगितला. आणि माझ्या मनात एक विचार चमकून गेला... तो म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिला मुलगी होणार. पुढे काही महिन्यानी फोनवर बोलताना तिने मला डॉक्टरांनी भाकित केलेली तारीख सांगितली. माझ्या वाढदिवसाच्या तीन दिवसानंतरची होती. जून मध्ये माझ्या वाढदिवशी मी शुभेच्छांचे calls /sms घेण्यात व्यस्त असतानाच तिचा sms आला. तिला मुलगी झाली होती. (माझा वाढदिवस मात्र ती विसरली होती )
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा