Skip to main content

अतिंद्रिय शक्ती

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 09/01/2009 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का? माझा आहे. माझ्या आईला अतिंद्रिय शक्ती होती. मी सहावीत होतो. मोठ्या बहिणीला मुलगा झाल्याची बातमी सकाळी घरी आली. फोन नव्हाता घरी. वहिनीने उत्साहाने तयार करुन ठेवलेली दुपट्याची पिशवी काढली. आईच्या हातात सुपुर्द केली. घरातुन बाहेर पडताना ती पिशवी आईने बरोबर न घेतल्याचे बघुन वहिनीने ती पिशवी माझ्या हातात दिली. " त्या पिशवी चा आता काही एक उपयोग नाही" असे म्हणुन आईने पिशवी मला परत ठेवायला लावली. हाताने इशारा करुन वहिनीला गप्प बसायला सांगितले. मला तेंव्हा हा प्रकार नेमका काय ते कळाले नाही. पण दादरला हॉस्पिटल मधे गेल्यावर उलगडा झाला. जन्माला आल्यावर सुमारे एक तासातच मुल वारलेले होते. ह्याला प्रिमॉनिशन (भविष्याची चाहुल) म्हणावे तर एकदा मामाची चोरीला गेलेली गाडी नेमकी कुठे मिळेल हे पण आईने नेमके सांगितलेले होते. तसेच बहिणीला एकदा साधा ताप आला होता. पण नेहेमीच्या शिरस्याप्रमाणे फॅमिली डॉक्टर कडे न नेता एकदम के.ई.एम. मधे नेण्याचा आईचा आग्रह त्यावेळी सगळ्याना बुच़ळ्यात टाकणारा होता. पण हॉस्पिटलला पोचल्यानंतर प्रकरण जीवावरचे होते हे लक्षात आले. असे अनेक आठवणी. ह्या सर्व गोष्टीना वैज्ञानिक खुलासा माझ्याकडे नाही. आणि त्याचा विचार कधी केला नाही. फक्त अशा गोष्टी सांगताना आई ट्रांस मधे असायची हे पक्के आठवते. ह्याला अतिंद्रिय शक्ती म्हणावे काय.? भविष्यात येणा-या संकटाची चाहुल लागते? मग लिहुन ठेवलेले प्राक्तन म्हणजे काय.? मी ह्या न उलगडणा-या प्रष्नापासुन सहसा लांब रहातो. असतात हे त्या न दिसणा-या वर बसलेल्या 'जोकर' चे खेळ असे म्हणतो आणि पळुन जातो. जाता जाता: आई जायच्या आधी चार दिवस मी तिच्या जवळ बसलेलो होतो. तेंव्हा तीचे एक वाक्य आजही आठवते. " गुरुदक्षिणा विसरु नकोस. आता कळणार नाही. योग्य वेळ येईल तेंव्हा माझे वाक्य लक्षात ठेव.." मी साहेबांबरोबरचे काम सोडलेलेल्या जवळ जवळ २० वर्षे झाली होती. एकदा दुपारी अचानक साहेब घरी आले. आणि मला म्हणाले, "तुझी खुर्ची तुला परत बोलवते आहे." मी माझे इतर काम संभाळुन सुमारे दिवसाला ६ तास नविन स्टाफ ला ट्रेनींग द्यायचे काम वर्षभर केले. मी कुठलेही भाकीत करायचे टाळतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25941
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

अस्मादिकांनाही काही विशिष्ट अनुभव आले आहेत. १. वेळ :अंतिम वर्षाला असतांना. स्थळः कॉलेज कटटा. मी, आमची एक वर्ग मैत्रीण आणी इतर मित्र-मैत्रीणी बोलत होतो. भरपुर विषय चालले होते. अचानक मी तिला तिरीमिरीने म्हणालो "एकतर तू पदव्युत्तर शिक्षण घेशील आणि छान २-३ वर्षे लग्न न करता मजेत राहशील किंवा तुझे ६ महिन्यात लग्न होईल." आर्श्चय म्हणजे ती खूप हुशार मुलगी होती आणि तिचे (कॉलेजात तरी) कोणतेही प्रकरण नव्हते. अगदी साधी सरळमार्गी मुलगी होती ती! बाकी सगळे मित्र म्हणाले "काय भावा? सकाळ पासून कोणी मिळाले नाही का? ती कशाला लग्न करेल लवकर? शिकणारच ती!" मी म्हणालो "ठीक आहे, दिल्ली कही दूर नाही!" आणि ४थ्या महिन्याला तिची पत्रिका हजर! अरेंज मॅरेज! तिनेच सांगितले "माझा कोणताच विचार नव्हता. घरचे म्हणाले ,जरा भेट तरी; म्हणुन फोनवर १-२ तासा गप्पा मारल्या आणि मला तो आवडून गेला. दुसरया दिवशी जरा जास्त गप्पा मारल्या आणि टेक्नीकल बोललो." "मग?" "मी जरा पर्सनल विचारले. मला शिकायचे झाले तर काय वगैरे?" तो म्हणाला "तर काय, शिकायच. माझी ना नाही." "मग मी घरच्यांशी बोलले; म्हणाले मला तो आवडला आहे आणि मी लग्न करायला तैयार आहे." दुसरया दिवशी मित्र घरी हजर..."काय बुवा, काय झालं? आज सकाळी सकाळी?" "तू म्हणालास तसं झाल बघ!" २. वेळ: १२ची (रात्री नव्हे दिवसा), परिक्षेची स्थल: तोच कॉलेज कट्टा. मित्र तयारीवर अन्तिम हात फिरवत होता आणि आम्ही सूत्रे घोकित होतो... अचानक मी " मित्रा तो ऑपशनला टाकलेला धडा कोणता? तो येणार आज!" तो, दोन वेळा परत परीक्षा दिल्याने माहितिगार "डर मत यार!" "ओके, हा formula पाठ करच. हे येणार!" "ओके" आणि काय आश्चर्यम ५वा प्रश्न हाच! परत बाहेर आल्यावर "थैंक्स यार... आज पास हो जाऊंगा..." मी "कुछ बात नाही यार..." आणि अचानक मी "आज गाड़ी पे म़त जा. बससे चला जा. गाड़ी बादमे लेके जा." तो "क्यूँ? गाड़ी तेरेको चाहिए क्या? चाहिए तो बोल ना यार. शर्माता क्यूँ है?" मी "तस नाही. I have bad feeling about you driving today." हो नाही, हो नाही करता करता तो मित्राबरोबर गाड़ी घेउन जायला तयार झाला. मी नको नको म्हणत होतो, पण नाही... मला काळजी आणि संध्याकाळी मित्राचा फोन... " यार, तेरी बात सुनानी चाहिए थी. रस्त्यात जाम ट्राफिक होता म्हणुन लॉन्ग कटने गेलो आणि रस्त्यात म्हशी! त्यांना चुकवायचे म्हणुन जरा बाजुला गाड़ी घातली तर गाड़ी चिखलात! शेजारीच तारेच कम्पौंड होतं आणि म्हशी पण जरा जास्तच जवळ आल्या. जरा वाचलो बघ. नाही तर आज डोळे किंवा हाथ पाय धारातीर्थी पडलेच होते." इति अलम... आमची कोठेही शाखा नाही, एवढा खराब धंदा?

अनेक लोक नर्मदा परिक्रमा करतात. त्यांना बरेच अतिंद्रीय अनुभव आलेले वाचले आहेत. जगन्नाथ कुंट्यांचे "नर्मदे हर" पुस्तक वाचण्या सारख आहे. ( वेगळे अनुभव हा त्यातला फारच छोटा भाग आहे.) मला एका बैठकीत संपवावेसे वाटले. मोहन

नर्मदे हर हर व त्याच लेखका॑ची इतर पुस्तकेही अतिशय वाचनीय आहेत. नर्मदा परिक्रमा पायी एकदा करणेही दुष्कर आहे पर॑तु श्री. कु॑टे या॑नी तब्बल चार वेळा केली आहे. त्या॑चे अनुभव खरोखर॑च वाचनीय आहेत. ह्यावरील पूर्वी झालेली चर्चा इथे पाहा. http://www.misalpav.com/node/682 मी एक विज्ञानाचा विद्यार्थी होतो व राहीन. वैद्यकीय अभ्यास करताना व गेले नऊ वर्षे विविध प्रकारचे रूग्ण, उपचार, शस्त्रक्रिया, त्या॑चे नातलग व रूग्णालयातले अनुभव खूप शिकवून गेले. (अजुनही शिकायला मिळत॑च) तसेच मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये काम करता॑नाही ईश्वरी शक्तीबद्दलचा विश्वास दुणावतच गेला. काही अति॑द्रिय शक्ती॑चे अनुभवही आले. अश्या काही शक्ती निश्चीत आहेत. काही शास्त्रे अचूक असू शकत नाहीत. ठळक उदाहरण म्हणजे वैद्यकीय शास्त्र. निदान करता॑ना वा शस्त्रक्रिया करता॑ना नेहमीच कागदावरचे गणित वा पुस्तकातल्या गोष्टी कामी येत नाही. अनेकदा अ॑तःप्रेरणा मदत करते. मला तर असे अनुभव प्रत्यही येतात. पण माझे जाऊ दे, जे॑व्हा डॉ. बी.एन्.पुर॑दरे॑सारख्या जगविख्यात सर्जनला असे अनुभव येतात ते॑व्हा इतरा॑ची काय कथा? (पाहा: आत्मचरित्र-शल्यकौशल्य) अश्या अनेक प्रतिथयश व कर्तबगार फिजिशियन, सर्जन्सचे असे अनुभव 'डॉक्टर्स ऍन्ड पेशन्ट्स' ह्या पुस्तकात वाचावयास मिळतील. (माझ्याकडे त्याची एक दुर्मिळ प्रत आहे.) बाकी विज्ञाननिष्ठ म्हणवून घेणार्‍या॑च्या अह॑काराबद्दल मला काहीच बोलायचे नाही.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

उत्तम आणि प्रामाणिक प्रतिसाद. फक्त शेवटचे वाक्य नको होते. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

होय !अस घड्त हे मात्र खर आहे. समजा अशी शक्ति असेल तर ति वाढविण्या साठि कोणि मार्ग् दर्शन करेल काय?

रोचक धागा. सावकाशीने वाचतो आहे. एक जुना धागा: (यात विविध मिपाकरांनी सांगितलेले अनुभव 'अतिंद्रीय' या सदरात गणता येतील). मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव http://www.misalpav.com/node/19073

विथ ऑल माय इंद्रीय-नॉन इंद्रीय-अ‍ॅण्ड अतिंद्रीय शक्तीज :D अर्धवटराव

धागा वर आलाच आहे तर पुनः प्रतिसाद लिहिण्याचा मोह आवरत नाही. धागा विषयाशी संबधीत असलेले म्हणून वानगीदाखल खालील उदाहरण पुरेसे ठरावे: एडगर केसी नामक व्यक्तीबद्दलचे असे अनुभव लिहून ठेवलेले आहेत. पुस्तकाचे नाव - Many Mansions: The Edgar Cayce Story on Reincarnation (Signet) [Gina Cerminara, Hugh Lynn Cayce] एडगर केसीबद्दलची माहिती http://en.wikipedia.org/wiki/Edgar_Cayce राघव

विनायक प्रभूंना मनापासून धन्यवाद, हा महत्त्वाचा लेख लिहिल्याबद्दल. शिर्डीच्या साई बाबांनाही अतिंद्रिय शक्ती होती. शिर्डित येण्यापुर्वी त्यांनी शिर्डिच्या पाटलाची हरवलेली घोडी कूठे सापडेल हे अचुक सांगितले होते,ज्याला आपण चमत्कार मानतो. युगंधर या पुस्तकात देखिल लेखकाने कॄष्ण देखिल साधा मानवच असुन त्याने अतिंद्रिय शक्ती वापरून बर्‍याच गोष्टी साध्य केल्याचे लिहिले आहे. श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या एका भक्ताला त्याच्या कोठारातील साठविलेले धान्य सुगीच्या आधिच विकायला सांगुन खुप मोठ्या नुकसानापासुन वाचवल्याचे स्मरते, कारण त्या वर्षी ते पीम अमाप येवुन भाव गडगडले होते. कूंडलीवरुन असे योग शोधुन कादून त्या लोकांना सरकारच्या "नियोजन आयोग/आपात्कालीन सुरक्षा योजना/हवामान खात्यात" किंवा समभागात गुंतवणुक करणार्‍या मोठ्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट /फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कंपन्यामध्ये भरती केले पाहिजे, असे वाटते.

कूंडलीवरुन असे योग शोधुन कादून त्या लोकांना सरकारच्या "नियोजन आयोग/आपात्कालीन सुरक्षा योजना/हवामान खात्यात" किंवा समभागात गुंतवणुक करणार्‍या मोठ्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट /फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कंपन्यामध्ये भरती केले पाहिजे, असे वाटते.
उत्तम सल्ला. खरंच असं करायला हवं. किती वित्त्/मनुष्य हानी टळेल नाही? अवांतर - एवढा मोठा फायदा असूनही अजून असं काही कुठल्याही देशात झालेलं ऐकलं नाही (conspiracy theories मध्ये सुद्धा). ह्याचं कारण समजणं अवघड नाही!

In reply to by भृशुंडी

UPA सरकारनं जुना खजीना शोधण्यासाठी कुणा साधूच्या स्वप्नावर विश्वास ठेवून खोदकाम चालू केले होते की. (की राम्देव आणि इतर बाबा भाजपकडे असताना आपणही हिंदू मतांसाठी काहीतरी स्टंट करावा म्हणुन केले कुणास ठावूक) पुढे त्याचे काय झाले माहीत नाही. खजिना सापडला नाही इतकं मात्र नक्की. खोदकाम किती दिवस चालले, किती रुपयांचा चुराडा झाला आणि त्यामुळे हिंदू मते मिळालीत का *lol* ?

ही १९८० ची गोष्ट आहे. दहावीचा जीवशास्त्राचा पेपर सुरू व्हायच्या आधी एक तास मी २१ अपेक्षित उघडले आणि माझ्या लक्षात आले की एक आक्रुती (बहुतके बेडकाच्या कुठल्यातरी सिस्टीम बाबत होती) गेली पाच वर्षात विचारली नाही. बाकी सगळ्या आक्रुत्या विचारून झाल्यात. एका आक्रुतीला त्यावेळी ५ मार्क होते. मी आपले सहज मित्रांना बोलुन गेलो की बहुतेक ही आक्रुती आज पेपर मधे येईल. मित्रांनी विश्वास ठेवून ती आक्रुती पेपरच्या आधी घोटली. आणि काय आश्चर्य ! प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर बघितले तर नेमकी तीच आक्रुती विचारली होती. आम्हा सगळ्यांचे ५ मार्क फिक्स झाले :-) पण ही काही माझी अतिंद्रिय शक्ती नव्ह्ती. मी पाच वर्षांचे पेपर बघितले, विचार केला आणि अंदाज बांधला.

मला अतिंद्रिय शक्तींचा अनुभव नाही. पण अलिकडेच एका खास योगायोगाची कल्पना मी केली आणि तो तसाच घडला. माझी एक अतिशय खास/जिवलग मैत्रीण आहे. तिच्या लग्नानंतर सुमारे एक वर्षानी ,२०१३ मध्ये ती गरोदर असल्याचे तिने मला सांगितले. महिना वगैरे पण सांगितला. आणि माझ्या मनात एक विचार चमकून गेला... तो म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिला मुलगी होणार. पुढे काही महिन्यानी फोनवर बोलताना तिने मला डॉक्टरांनी भाकित केलेली तारीख सांगितली. माझ्या वाढदिवसाच्या तीन दिवसानंतरची होती. जून मध्ये माझ्या वाढदिवशी मी शुभेच्छांचे calls /sms घेण्यात व्यस्त असतानाच तिचा sms आला. तिला मुलगी झाली होती. (माझा वाढदिवस मात्र ती विसरली होती )