संकटांनो घेऊ नका मज हलक्यात आता
हरवले मी दु:खास आहे इतक्यात आता.
चालुनी मी आलो इथे बघ वनव्यातूनी या
तेव्हढी ना आहेच धग या चटक्यात आता.
अंत आता पाहू नका माझ्या संयमाचा
सोडुनी मी, जाईन सारे झटक्यात आता.
सागरा ओलांडून आलो आहे इथे मी
ज्ञान देती ते, जे पोहती, डबक्यात आता.
तू नको रे घालूस फुंकर ठिणगीस आता
जाळुनी ती टाकेल सारे भडक्यात आता.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
93
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>सागरा ओलांडून आलो आहे इथे…
>>सागरा ओलांडून आलो आहे इथे मी
ज्ञान देती ते, जे पोहती, डबक्यात आता.
हे खास!
मन:पूर्वक धन्यवाद
In reply to >>सागरा ओलांडून आलो आहे इथे… by श्वेता व्यास
मन:पूर्वक धन्यवाद
वाह !
छान रचना. आवडली. चांगलं लिहिता.
शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
मन:पूर्वक धन्यवाद.
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मन:पूर्वक धन्यवाद.
संकटांनो घेऊ नका मज हलक्यात…
संकटांनो घेऊ नका मज हलक्यात आता
हरवले मी दु:खास आहे इतक्यात आता.
या शेर मध्ये आव्हान दिलेलं आहे. जिद्द दिसतेय, fighting spirit
मात्र एक शेर सोडून पुन्हा बघितले तर
"सोडुनी मी, जाईन सारे झटक्यात आता."
लगेच कच खाल्लेली दिसतेय ?
मन:पूर्वक धन्यवाद.
In reply to संकटांनो घेऊ नका मज हलक्यात… by मारवा
मन:पूर्वक धन्यवाद.
व्वा! आवडली...
रचना आवडली...