Skip to main content
लेखक Deepak Pawar यांनी बुधवार, 14/10/2026 14:33 या दिवशी प्रकाशित केले.


संकटांनो घेऊ नका मज हलक्यात आता 
हरवले मी दु:खास आहे इतक्यात आता.

चालुनी मी आलो इथे बघ  वनव्यातूनी या
तेव्हढी ना आहेच धग या चटक्यात आता.

अंत आता पाहू नका माझ्या संयमाचा
सोडुनी मी, जाईन सारे झटक्यात आता.

सागरा ओलांडून आलो आहे इथे मी
ज्ञान देती ते, जे पोहती, डबक्यात आता.

तू नको रे घालूस फुंकर ठिणगीस आता
जाळुनी ती टाकेल सारे भडक्यात आता.

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 98
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान रचना. आवडली.  चांगलं लिहिता. 
शुभेच्छा. 

 

-दिलीप बिरुटे

 


संकटांनो घेऊ नका मज हलक्यात आता 

हरवले मी दु:खास आहे इतक्यात आता.

 

या शेर मध्ये आव्हान दिलेलं आहे. जिद्द दिसतेय, fighting spirit

 

मात्र एक शेर सोडून पुन्हा बघितले तर

 

"सोडुनी मी, जाईन सारे झटक्यात आता."

लगेच कच खाल्लेली दिसतेय ?