Skip to main content
लेखक Bhakti यांनी शनिवार, 26/09/2026 15:10 या दिवशी प्रकाशित केले.

खूप खूप उद्बोधक व्याख्यान ऐकले.भारत हा एक 'शरीर' आणि 'मन' आहे, आणि सध्या तो अस्वस्थ वा आजारी आहे. हे एक रूपक आहे. हे ऐतिहासिक वस्तुस्थिती नाही, तर वक्त्यांनी  वर्तमानाचे मूल्यांकन केले आहे.
https://youtu.be/gX7R1NlfCqQ?si=zzKGwCu9hgpkHVWd

व्याख्याते: प्रा. डॉ. शरद बाविस्कर (दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठातील प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विचारवंत).
विषय: अस्वस्थ भारताचे अंतरंग 
ठिकाण व वेळ: व्यापारी असोसिएशन हॉल, डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ, संगमनेर (७ सप्टेंबर २०२६).

१.मन हे खालीलप्रकारे अस्तित्वात असते 
व्यक्ती>> समाज>> महाराष्ट्र>> भारत>> विश्व>>मानवता 
भारत = शरीर + मन भारताला एक शरीर आणि मन म्हणून पाहिले जाते. सध्या ते 'अस्वस्थ' किंवा 'आजारी' आहे का? हे प्रश्न उपस्थित केले.
१९व्या शतकातील दृष्टिकोन 
महात्मा फुले यांनी भारतीय समाज/शरीर तुटलेले, वेगवेगळे म्हटले होते. त्यांना एकसंध, बंधुत्वाचे शरीर कसे निर्माण करायचे याचा विचार होता.
डॉ.आंबेडकर यांना हे नो होम लँड -भारतीय मन -बहिष्कृत भारत वाटते.

२.आधी व्यक्तीचे मन काय ते कसे अस्तित्वात येते ते पाहायला हवे .मन समजण्यासाठी  -त्यासाठी भाषा माध्यम आहे .प्रत्येकाचे आकलन असते. ते विश्लेषण भाषेने पाहतो.एखाद्या गोष्टीवर टीकात्मक पैलूही असतो. तर तिसरा पैलू सृजनात्मक असते.या सृजनातम्क बिंदू पुढे जाणारे वा मागे जाणारे असते.भाषेच्या मर्यातेत विचार आणि विचाराच्या मर्यादा कृतिशीलता ठरवतात .विट्गेन्स्टाईनने सांगितले.
'भाषेच्या मर्यादा म्हणजे जगाच्या मर्यादा'. भाषा विचार, अस्तित्व आणि जग घडवते.

३.“नास्तिक” या शब्दाच्या चुकीच्या भाषांतराची चर्चा अथेइझम vs निहिलिझम दिसते.तर नास्तिक ऐवजी निरीश्वरवादी शब्द महत्वाचे ,काय मानत नाही ते समजायला हवे.

४.भारतीय मनाच्या सुदृढतेसाठी वेगवेगळ्या शाह्या /शासन होते .आता लोकशाही स्वीकारली आहे.पण आधी साम्राज्यशाही ,भिक्षुकशाही ,काही ठिकाणी झुंडशाही,बाबूशाही हि होती.समाज एकसंधता याने येते.

५.विविध ऐतिहासिक संदर्भ आहेत.तेव्हा बंगाल आणि महाराष्ट्र जे दोन प्रबोधनात पुढे होते.पण प्रबोधन चळवळ महाराष्ट्रातच पुढे गेली ,बंगालमध्ये का नाही.
महाराष्ट्रात एक स्पष्ट नागरी समाज व्यवस्था आहे.बंगालमध्ये प्रबोधन कलकत्ता केंद्रित होते,इलाईटने सुरु केली होती.महाराष्ट्रात तळागाळातून सुधारणा,प्रबोधन सुरु झाली.त्यामुळे ती आजही टिकली ,सुरु आहे .

६.आपण नागरिक म्हणून किती अस्तित्वात आहे ??तेव्हाच भारतीय शरीर उभे जिवंत म्हणून दिसते.आपण सामाजिक ,सांस्कृतिक,खासगी,वैचारिक,बौद्धिक  म्हणून अस्तित्वात येत असतो.साधनांच्यापलीकडे ज्या अस्तित्वात येतो ती निर्मिती महत्वाची .
असे भारतीय मन -तुम्ही इतरांच्या संपर्कात कशा पद्दतीने येता ?त्यात आपण अस्तित्वात येतो.ते स्वात्रंत्य् ,समता ,बंधुता हे मूल्ये रुजवल्याने येते .
वर्ग विद्वयार्थी नोकरीने (सत्ता) याने शिक्षक अस्तित्वात येत नाही .सृजन समग्र पद्धतीने विद्यार्थाला एकमय करणे गरजेचे आहे .तार्किक ,वैज्ञानिक ,मानवता पाहिजे .जात धर्म पंथ संड्रम बिंदू भारतीय मनाला खंडित करते.

७.राज्यसंस्था आंधळी असते.समाज मन नागरिक म्हणून एकत्र आल्याने ती डोळस होते .आपण जातीचे मन आहोत कि भारतीय मन म्हणून अस्तित्वात आहोत ??
नास्तिक लोक बहुतेक राजकारणी असतात .ज्या पद्धतीने समाज गळा दाबतात तेही धर्माचे थोतांड मांडून....किमान बुध्यांकहि लोकांना नको अशे व्यवस्था करतात उदा.Dj

८.ट्रान्सटेंडन्स -अज्ञात ती साहित्य ,संगीत विविध पद्धतीत व्यक्त करावे .आपण टोकाचे तार्किक होऊ शकत नाही .उदा.ऍक्ट ऑफ रेप्रोडुकशन नो लॉजिक पण प्रेमाने या अतार्किक गोष्टीने ते घडते.

९.स्व जाणीव - आपल्या सोबत चिंतनाने चांगले संबंध जोडावे .स्व जाणीव/भान  -स्व आकलन -स्व काळजी येणे गरजेचे आहे .त्यानंतर माइंडफुलनेस म्हणजे इतरांची काळजी घेणे जमते आणि मग अज्ञात आकाळतो.स्व+इतर +समाज हा प्रवास होतो .

१०.समाज मन, शरीर याची काळजी घेण्याची पद्धत आणि आजारही ओळखायला हवे.

नंतरचे प्रश्नोत्तरे संवादही अत्यंत बौद्धिक आहे,जरुर ऐका.
 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 158
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

>>आणि सध्या तो अस्वस्थ वा आजारी आहे

इथे चुकलंय जरा, भूत वर्तमान भविष्य भारत कायमच अस्वस्थ आहे/असेल.

व्याख्यान ऐकले, काही मुद्दे चांगले वाटले काही ठिकाणी उगीच राजकीय झाल्यासारखे वाटले.


हायला,  

असलं समाजवादी काही ऐकलं कि गलबलल्यासारखं होतं. 
  
हे ज ने यु मधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विचारवंत वगैरे म्हटल्यावर असलं शब्दांचं अवडंबर माजवलंच  पाहिजे.

या सगळ्याचा गोषवारा काय विचारला तर हाच गोषवारा आहे असं सांगितलं जातं.

या लोकांच्या भाषणाचे कागद भेळ बांधून द्यायला वापरले तरी लोकांचे पोट बिघडेल कि काय अशी शंका येते.

 

नंतरचे प्रश्नोत्तरे संवादही अत्यंत बौद्धिक आहे.

बापरे!  अजून आहे?  


In reply to by सुबोध खरे

मी सोसल तितकी नक्की समाजवादी आहे. आवडतात मला ही अशी व्याख्याने 😇पुढच्या वेळेस द्वादाशिकरांची देते, खुप जहाल आहेत 😄


आधी साम्राज्यशाही ,भिक्षुकशाही ,काही ठिकाणी झुंडशाही,बाबूशाही हि होती.समाज एकसंधता याने येते.

 

'याने' म्हणजे कशाने ? 

- मज निरोपावे.