Skip to main content

नागरीकत्व

देशाच्या पंतप्रधान, खासदार, सार्वजनिक पदांसाठी नागरीकत्वाच्या अटीची गरज असते का?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 15/03/2016 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी सारखे लेख शीर्षक लांब झाले आहे त्याबद्दल क्षमस्व, निमीत्त राहुल गांधींच्या दस्तएवजांमधील तथाकथित गफलत. काँग्रेस भक्त आणि काँग्रेस विरोधक दोघेही हात सरसावून परस्पर विरोधी प्रतिसाद लिहिण्यास घेतील त्या पुर्वीच हे स्प्ष्ट केली बरे की कायद्याच्या दृष्टीकोणातून दुवा कच्चा असावा राहुल गांधींवर शेकावे असे मोठे काही यात नसावे. ज्यांना काहीच माहित नाही त्यांच्यासाठी लोकसभेच्या नैतीकता समिती (एथीक्स कमिटी- लालकृष्ण अडवाणी या समितीचे अध्यक्ष आहेत) ने राहुल गांधींच्या दुहेरी नागरीकत्वाच्या शक्यते विषयी त्यांच्या कडून स्पष्टीकरण मागितले आहे.