Skip to main content

मोबाईल नंबर VI कडे port करणे अनुभव .

लेखक कंजूस यांनी सोमवार, 31/08/2026 11:29 या दिवशी प्रकाशित केले.

 

गाभा :
वोडाफोन आणि नंतर वोडाफोन आइडिया यांच्याकडे भारत सरकारचे AGR नावाचे थकित टॅक्सचे हजारो कोटी रुपये  होते ते देऊ न शकल्याने त्यांनी या बदल्यात ४९%भांडवल सरकारच्या नावे करून टाकले.

नवी बातमी: वोडाफोन आइडिया ( VI)आणि बीएसएनएल कंपन्यांनी एक करार केला की बीएसएनएलचे(BSNL) टॉवरचे नेटवर्क जाळे VI चे ग्राहक वापरू शकणार तर VI चे 4G स्पेक्ट्रम अधिकार BSNLचे ग्राहक वापरू शकणार. [ BSNL ही भारत सरकारचाच व्यवसाय आहे पण BSNLचे भाग भांडवल VI मध्ये नाही.]असो.

मी विचार केला की वोडाफोनचे कार्ड घेतले तर मला बऱ्याच ठिकाणी संपर्काची अडचण येणार नाही bsnl/ vi कोणतेतरी नेटवर्क मिळेल. आणि माझ्याकडे जियोचा अधिकचा नंबर होता तो मी वापरत नव्हतोच तो बदलून घेऊ.

काल मी माझा तो जिओ नंबर वोडाफोन आइडियाकडे ( VI)जोडण्यासाठी (porting)आमच्या इथल्या एका गॅलरी ( VI mini store) मध्ये गेलो. तिथले संभाषण...

१.

" नंबर पोर्ट करायचा आहे. प्रिपेड हवे आहे"
"कोणते सिम कार्ड?"
"जिओचे."
"होणार नाही लवकर . बरेच जिओवाले कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेममुळे इकडे आले आहेत. पहिले सहा महिने  पोस्ट पेड मिळेल. नंतर प्रिपेड करून घ्यावे लागेल. ४७० रुपये महिना."

तिथून बाहेर पडलो आणि दुसऱ्या VI  मिनी स्टोरमध्ये गेलो.

२.
हाच संवाद झाला पण बदल म्हणजे 
" चार महिने पोस्ट पेड बिलिंग घ्यावे लागेल. ४७०रुपये, नंतर प्रिपेड करून घ्या."
" नवीनच नंबर प्रिपेड मिळेल का?"
" हो, पहिला रिचार्ज ४७० रुपयाचा घ्यावा लागेल. रिसायकल्ड नंबर मिळतात. त्यापेक्षा तुमचा जुना नंबरच port करा. "

तिथून बाहेर पडलो आणि तिसऱ्या मिनीस्टोरमध्ये गेलो.
३.
" नंबर पोर्ट करायचा आहे. प्रिपेड हवे आहे"
"कोणते सिम कार्ड?"
"जिओचे."
" होईल. नंबर active हवा.    ३६५ रुपयांचा पहिला रिचार्ज करावा लागेल. नंतर तुम्हाला हवा तो रिचार्ज करा. आधार कार्ड आणि ते सिम असलेला फोन लागेल."
"आहे, हे घ्या."
पाच मिनिटांत काम झाले. "तीन दिवसांनी नंबर चालू होईल."
" तुमची गॅलरी vi कंपनीची आहे का"?
" नाही, आम्ही सगळे franchise आहोत. दुसऱ्या दोन गॅलऱ्या पोस्ट पेडच घ्यायला लावतात. त्यांच्याकडे प्रिपेड प्लान नाहीत. आम्ही देतो.

तुमचा अनुभव काय?

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 51
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

भारी अनुभव... प्रत्येकाची व्युहरचना धोरणे वेगवेगळी असतात त्यामुळं असे प्रकार दिसून येतात.. बजारात मोठी स्पर्धा आहे त्या मुळे असं असू शकेल. 

 

मी व्होडा चा जियो वर पोर्ट केला दोन वर्षांपूर्वी.. प्रिपेड ते प्रिपेड.. उत्तम अनुभव 


सिमकार्डची दुकाने भाजीवाल्यांसारखी झाली आहेत. बरी भाजी (आणि भाजीवाली) दिसेल तिथून घ्यावे.. कनेक्टीवीटीचा प्राब्लेम सगळीकडे आहे... आपला प्रोवायडर सोडून दुसरे सगळे चांगले असतात.