गाभा :
वोडाफोन आणि नंतर वोडाफोन आइडिया यांच्याकडे भारत सरकारचे AGR नावाचे थकित टॅक्सचे हजारो कोटी रुपये होते ते देऊ न शकल्याने त्यांनी या बदल्यात ४९%भांडवल सरकारच्या नावे करून टाकले.
नवी बातमी: वोडाफोन आइडिया ( VI)आणि बीएसएनएल कंपन्यांनी एक करार केला की बीएसएनएलचे(BSNL) टॉवरचे नेटवर्क जाळे VI चे ग्राहक वापरू शकणार तर VI चे 4G स्पेक्ट्रम अधिकार BSNLचे ग्राहक वापरू शकणार. [ BSNL ही भारत सरकारचाच व्यवसाय आहे पण BSNLचे भाग भांडवल VI मध्ये नाही.]असो.
मी विचार केला की वोडाफोनचे कार्ड घेतले तर मला बऱ्याच ठिकाणी संपर्काची अडचण येणार नाही bsnl/ vi कोणतेतरी नेटवर्क मिळेल. आणि माझ्याकडे जियोचा अधिकचा नंबर होता तो मी वापरत नव्हतोच तो बदलून घेऊ.
काल मी माझा तो जिओ नंबर वोडाफोन आइडियाकडे ( VI)जोडण्यासाठी (porting)आमच्या इथल्या एका गॅलरी ( VI mini store) मध्ये गेलो. तिथले संभाषण...
१.
" नंबर पोर्ट करायचा आहे. प्रिपेड हवे आहे"
"कोणते सिम कार्ड?"
"जिओचे."
"होणार नाही लवकर . बरेच जिओवाले कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेममुळे इकडे आले आहेत. पहिले सहा महिने पोस्ट पेड मिळेल. नंतर प्रिपेड करून घ्यावे लागेल. ४७० रुपये महिना."
तिथून बाहेर पडलो आणि दुसऱ्या VI मिनी स्टोरमध्ये गेलो.
२.
हाच संवाद झाला पण बदल म्हणजे
" चार महिने पोस्ट पेड बिलिंग घ्यावे लागेल. ४७०रुपये, नंतर प्रिपेड करून घ्या."
" नवीनच नंबर प्रिपेड मिळेल का?"
" हो, पहिला रिचार्ज ४७० रुपयाचा घ्यावा लागेल. रिसायकल्ड नंबर मिळतात. त्यापेक्षा तुमचा जुना नंबरच port करा. "
तिथून बाहेर पडलो आणि तिसऱ्या मिनीस्टोरमध्ये गेलो.
३.
" नंबर पोर्ट करायचा आहे. प्रिपेड हवे आहे"
"कोणते सिम कार्ड?"
"जिओचे."
" होईल. नंबर active हवा. ३६५ रुपयांचा पहिला रिचार्ज करावा लागेल. नंतर तुम्हाला हवा तो रिचार्ज करा. आधार कार्ड आणि ते सिम असलेला फोन लागेल."
"आहे, हे घ्या."
पाच मिनिटांत काम झाले. "तीन दिवसांनी नंबर चालू होईल."
" तुमची गॅलरी vi कंपनीची आहे का"?
" नाही, आम्ही सगळे franchise आहोत. दुसऱ्या दोन गॅलऱ्या पोस्ट पेडच घ्यायला लावतात. त्यांच्याकडे प्रिपेड प्लान नाहीत. आम्ही देतो.
तुमचा अनुभव काय?
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी अनुभव... प्रत्येकाची…
भारी अनुभव... प्रत्येकाची व्युहरचना धोरणे वेगवेगळी असतात त्यामुळं असे प्रकार दिसून येतात.. बजारात मोठी स्पर्धा आहे त्या मुळे असं असू शकेल.
मी व्होडा चा जियो वर पोर्ट केला दोन वर्षांपूर्वी.. प्रिपेड ते प्रिपेड.. उत्तम अनुभव
सिमकार्डची दुकाने…
सिमकार्डची दुकाने भाजीवाल्यांसारखी झाली आहेत. बरी भाजी (आणि भाजीवाली) दिसेल तिथून घ्यावे.. कनेक्टीवीटीचा प्राब्लेम सगळीकडे आहे... आपला प्रोवायडर सोडून दुसरे सगळे चांगले असतात.
सगळेच सर्विस प्रोव्हायडर…
सगळेच सर्विस प्रोव्हायडर पोस्टपेड साठी मागे लागतात, त्यातून दुसऱ्यांकडून नंबर पोर्ट करायचंय म्हटल्यावर त्यांना वाटते आपल्याला खूप गरज आहे तर आपण आधी पोस्टपेडला होच म्हणू. तेच नवीन कार्डसाठी स्पर्धा असल्याने प्रीपेड देऊन टाकतात. बहिणीला नंबर पोर्ट करायचा होता तेव्हा असाच अनुभव आला.
हो जिओच्या खुप समस्या येत…
हो जिओच्या खुप समस्या येत आहेत. माझा दुसरा नंबर १० वर्षांपासुन आयडियाचाच (Vi )आहे.
जेव्हा एमटिएनएल आणि रिलायन्स बंद झाले तेव्हा ..
In reply to हो जिओच्या खुप समस्या येत… by Bhakti
एरटेलकडे गेलो होतो. त्यांनी पोस्टपेड गळ्यात मारायचा प्रयत्न केला. मग जियोकडे गेलो तर त्यांनी दिले प्रिपेड. घरात चार नंबर जियोचे आहेत आणि काहीही प्रॉब्लेम नाही. त्यावर वर्षाचे रिचार्ज घेतले आहेत( ३६००रुपये २.५ जिबी रोज. ) हेच कार्ड 5g ready handset मध्ये टाकल्यास जियो अमर्यादित 5G इंटरनेट देते. 9MBps speed मिळतो चांगल्या नव्या फोन्सला.
आणखी एक जिओ नंबर मी एका नातेवाइकासाठी घेऊन दिलेला तो माझ्याकडे परत आला तो चालू राहण्यासाठी पाचशे रुपये भरत होतो तीन महिन्याला. त्याला सहा जिबी टोटल डेटा देत होते तो जियोने सहा महिन्यांपूर्वी बंद केला. जियोचे सिम काही जुन्या हँडसेटमध्ये चालत नव्हते( Android 8). तर तो नंबर आता मी पोर्ट केला.
कोकणाच्या डोंगराळ भागांत bsnl ची रेंज चांगली येते म्हणतात. तर हे( vi + bsnl) उपयोगी पडेल असे वाटते. माझ्याकडे bsnl लँडलाइनला एक सिम त्यांनी असे दिले होते की घरच्या फोनला अमर्यादित बोलता येत असे. मग ती सोय त्यांनी काढून घेतल्यावर मी ते बंद केले. शिवाय त्याचा रिचार्ज मारायचा तर फक्त bsnl officeलाच जावे लागायचे. दुसरे कुणी दुकानदार देत नव्हते.
अलिबाग भागात तर bsnl च्या सेवेला लोक कंटाळून त्यांनी ते मोबाईल सिम आणि लँडलाईन फोन्स काढून टाकले.कारण की bsnl सरकारी कंपनी. प्रत्येक गोष्टीचे खाते वेगळे, सगळा कारभार दिल्लीतल्या कार्यालयाच्या आदेशाने होतो. समजा शुक्रवारी पावर गेली पावसाने तर नेटवर्क मंगळवारी संध्याकाळीच चालू होणार. पण रिलायन्स, आइडिया, टाटा इत्यादी सर्विसवाले एकच टॉवरवरून सेवा देत आणि अर्ध्या तासात मोबाईल रेंज सुरू होत असे. कारण ते लगेच डिजिसेटवर पावर घ्यायचे. कितीही तक्रार करा bsnl वाल्यांची नोकरी जात नाही. ती कंपनी फक्त पगार देण्यासाठीच आहे. ग्राहकसेवेची बोंब.
या लेखाच्या निमित्ताने टेलिकॉम सेवा देणारे घेणाऱ्यांचे प्रश्न मांडता येतील.
त्याना ठामपणे सांगावे की नको…
त्याना ठामपणे सांगावे की नको आहे पोस्टपेड! आणी तुम्ही जर मला फोर्स करणार असाल तर तक्रार ठोकेन. (नाही ऐकल्यास खरच तक्रार ठोकावी)
कोरोनात माझ्या काकांचा मोबाईल हातचलाखीने चोरी गेला होता, सिमकारे द्यायला टाळाटाळ करत होते. एकच ट्विट ठोकले नी घरपोच सिमकार्ड पोहोचले.
हच ते वोडाफोन व्हाया BSNL Jio ते VI
2005 ला मी HUTCH हच चा SIM प्रीपेड आणि BSNL चा SIM वापरत असे, खारघर ला BSNL ची सेवा डॉल्फिन कडून मिळे, दोन्ही सेवा उत्कृष्ट होते. 2007 मध्ये हच ला वोडाफोन ने घेतले तेंव्हा पासुन बाहेर गावी प्रवास करताना दोन्ही sim चालत नाहीत म्हणून idea SIM प्रीपेड घेतले, 2015 ला jio सर्व भागात चालते म्हणून jio आणि bank account ला BSNL जोडले असल्याने ही दोन सिम ठेवून vodafon बंद केले. 2018 मध्ये vi एकत्र आले आता जानेवारी पासून Jio नेटवर्क स्लो चालत आहे म्हणून BSNL सेवा Vi कडे ऑनलाइन पोर्ट करावे असे वाटत होते व हा लेख वाचून माझे मत BSNL व jio (Vi ) ला पोर्ट करावे असे मत दृढ झाले. वरील मंडळींचा अनुभव मला नक्की उपयुक्त ठरेल.
पोस्ट पेड/ बिलींग ग्राहक...
हे assets होतात. त्यांच्याकडून receivable रक्कम तयार होते . कंपनीचे goodwill सुद्धा वाढते. तर प्रीपेड ग्राहक हे रीचार्ज करतात ती sales वाढवते आणि त्याचबरोबर liabilities वाढतात. कारण पैसे अगोदर घेतलेले असतात आणि त्या मुल्याची सेवा देण्याची जबाबदारी पडते. म्हणजे कंपनीच्या दृष्टीने पोस्टपेड ग्राहक महत्त्वाचे असतात. एरटेलने पूर्वीच कार्पोरेट लेवलला बरीच सिम घ्यायला लावून पोस्ट पेड ग्राहक वाढवले होते. आफ्रिकी देशांतही बराच धंधा वाढवला होता. शिवाय पेमेंट गेटवे सेवासुद्धा देत होते.
ग्राहकांच्या दृष्टीने विचार केल्यास आणि त्यास कोणती सेवा किती वापरल्यावर किती रकमेचे बिल नंतर येईल याबद्दल धास्ती वाटते त्यांना प्रीपेडच बरे.
ज्यांचे हातावर पोट आहे
ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी जिओ चांगले. रिचार्ज संपला तरीही इनकमिंग आणी मेसेज चालू राहतात.
एअरटेल आणि वोडाफोन चा रिचार्ज संपला की इनकमिंग आणि मेसेज दोन दिवसात बंद होतात. रिचार्ज संपायच्या आठ दिवस अगोदरच सिम मधली बाई तुमचा रिचार्ज लवकरच संपणार आहे म्हणून बोंबलत असते.
बाकी ज्यांच्या मागे पैसे घेणारे लागत असतील त्यांनी बीएसएनएल वापरावे.