Skip to main content

धाव घेई विठ्ठला

लेखक हेमंत मुळे यांनी रविवार, 26/07/2026 23:04 या दिवशी प्रकाशित केले.

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला
 

तुळशी माळ गळा, घेतो नाव ओठी 
पंढरी निघाला, वृद्ध वारकरी

बोचले कंकर, काटेही किती
तापली धरती, उन डोईवरी

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला
 

तुझ्या भक्तीपोटि, करतो ही वारी
आषाढी कार्तिकी, येतो नित्यनेमी

तुझ्या भेटीची, आस लागली
मन अधीर, आले प्राण कंठी

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला
 

सावळी मूर्ती, कर कटीवरी
माझा पंढरी, उभा विटेवरी 

टीळा चंदनी, शोभतो कापाळी
शेला रेशमी, शेजारी रखमाई

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला
 

रूप असे, साठवी लोचनी
तुझ्या दर्शनी, मन समाधानी

मुक्तिचे द्वार, आता उघडावी
भेट पुढची, व्हावी वैकुंठी 

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला


 

क्रुत्रिम बुद्धिमत्ता निर्मित गाणे एकण्यासाठी क्लिक करावे 

लेखनविषय:

वाचने 63
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

क्रुत्रिम बुद्धिमत्ता निर्मित गाणे एकण्यासाठी क्लिक करावे .

.

नाय करणार. 

तुम्हाला पण सांगतो. मनापासून एकदा म्हणा "राम कृष्ण हरी"  आपोआप अभंग येतील ओठी. कृत्रिमतेची सूुटेल मीठी.