"विशेषणे ना वापरता
कविता येईल का लिहिता?"
मी त्याला हे विचारता
"प्रयत्न करतो," तो वदला!
"छंद, वृत्त , लय, गेयता
फाट्यावर मारून; कविता
येईल का तुजला लिहिता?"
मी त्याला हे विचारता
"प्रयत्न करतो", तो वदला!
"हद्दपार कवी कायमचा
करून मग कोणा कविता
येईल का सांगा लिहिता?"
मी त्याला हे विचारता
जरा थांबला, घुटमळला
"कवितेतच उत्तर देतो
मीच विचारून प्रश्न मला"..
..AI AIसे पुटपुटला
...नवे काव्य आऊटपुटला !
| लेखनविषय: |
|---|
वाचने
160
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
नव्या आईयुगातील नवी कविता.
नव्या आईयुगातील नवी कविता. झ-का-स.
पुटपुटला .... आऊटपुटला .... हे तर अगदी खास.
सेम पिंच
मलाही शेवट आवडला....!!😊
शेवट अनपेक्षित आहे.मला वाटले…
शेवट अनपेक्षित आहे.
मला वाटले की, तिच्या मागणीनुसार तो कविता अनेक प्रयत्नांनी लिहू शकत नाही अन तो तिला तसे सांगतो. ती नाराज झाली तरी चालेल असे त्याचे मत असते.