Skip to main content

इदम् न मम

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 02/07/2026 20:14 या दिवशी प्रकाशित केले.

"विशेषणे ना वापरता 
कविता येईल का लिहिता?"
मी त्याला हे विचारता 
"प्रयत्न करतो," तो वदला!

"छंद, वृत्त , लय, गेयता 
फाट्यावर मारून; कविता 
येईल का तुजला लिहिता?"
मी त्याला हे विचारता 
"प्रयत्न करतो", तो वदला!

"हद्दपार  कवी कायमचा
करून मग कोणा कविता  
येईल का सांगा लिहिता?"

मी त्याला हे विचारता 
जरा थांबला, घुटमळला 
"कवितेतच उत्तर देतो
मीच विचारून प्रश्न मला"..
..AI AIसे पुटपुटला 
...नवे काव्य आऊटपुटला !

लेखनविषय:

वाचने 160
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

शेवट अनपेक्षित आहे.

मला वाटले की, तिच्या मागणीनुसार तो कविता अनेक प्रयत्नांनी लिहू शकत नाही अन तो तिला तसे सांगतो. ती नाराज झाली तरी चालेल असे त्याचे मत असते.