मंत्रालयात ढेरंगे,
पकडले हाथ रंगे
अन्न नागरीलिपिक,
लाचखोरीचे पीक,
असे इमान ना विक,
पांडुरंगा ||
३५ हजार रोकड
आता शोधा बोकड,
आरोपांचा हा फड
कसा वाचवू मी गड
एकनाथा ||
लाचखोरी शेवाळ,
वदले ते झिरवाळ,
लोक म्हणे कपाळ,
धूर तिथेच जाळ,
'देवा' धाव ||
लाचखोरी प्रकरण,
नाही चुकीचे करणं,
हो तेच माझे दालन,
राजीनामा हे मरण,
नरहरी ||
प्रतिक्रिया
19 Feb 2026 - 5:54 am | चित्रगुप्त
महाराष्ट्रातले राजकारणी आणि त्यांच्या 'करतुती' याविषयी 'बेखबर' असल्याने मला तपशील समजले नसले, तरी रचना एकदम मस्त. लिहीत रहा बाजीगर ओ बाजीगर.
20 Feb 2026 - 9:27 pm | बाजीगर
आपण दिलेल्या जिंदा दिल प्रतिक्रियेने उत्साह वाढलाय.
खूप धन्यवाद.