Skip to main content

पकडले हाथ रंगे

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 14/02/2026 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रालयात ढेरंगे, पकडले हाथ रंगे अन्न नागरीलिपिक, लाचखोरीचे पीक, असे इमान ना विक, पांडुरंगा || ३५ हजार रोकड आता शोधा बोकड, आरोपांचा हा फड कसा वाचवू मी गड एकनाथा || लाचखोरी शेवाळ, वदले ते झिरवाळ, लोक म्हणे कपाळ, धूर तिथेच जाळ, 'देवा' धाव || लाचखोरी प्रकरण, नाही चुकीचे करणं, हो तेच माझे दालन, राजीनामा हे मरण, नरहरी ||
लेखनविषय:

वाचने 449
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

महाराष्ट्रातले राजकारणी आणि त्यांच्या 'करतुती' याविषयी 'बेखबर' असल्याने मला तपशील समजले नसले, तरी रचना एकदम मस्त. लिहीत रहा बाजीगर ओ बाजीगर.