डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
==============
--राजीव उपाध्ये
चीनच्या अधोगतीची स्वप्ने बघणार्या आणि त्यावरून माझ्याशी कचाकचा भांडणार्या मंदबुद्धी संघोट्या मित्राची मला अधूनमधून आठवण येते. त्याने माझ्याशी भांडण केल्याला आता २-२.५ वर्षे होऊन गेली असतील. मी त्याच्याकडे २-३ वर्षे मागितली होती. प्रत्य्क्षात चीनच्या पिछेहाटीचा कुठेही मागमूस पण दिसत नाहीये. सतत गोलपोस्ट हलवत राहायचं, लोकांची दिशाभूल करत राहायचं हा अशा ’समर्पित’ लोकांचा आवडता उद्योग असतो. आणि मग हे मंदबुद्धी लोक जेव्हा तोंडावर आपटतात तेव्हा "चीन मध्ये जाऊन राहा" असा एकच घोष चालू करतात. [*]
“चीन कोसळतो आहे” हे पालुपद गेली किमान १०–१५ वर्षे वेगवेगळ्या स्वरूपात ऐकू येते. उदा० कधी लोकसंख्या घटतेय तर कधी रिअल इस्टेट बुडबुडा फुटतोय, तर कधी चीनी जनतेचा आता उद्रेक होत आहे अशा स्वरूपाच्या बातम्यामुळे अनेक बालबुद्धीच्या लोकांना सतत आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. या प्रत्येक मुद्द्यात काही अंशतः तथ्य असले, तरी त्यावरून तात्काळ आणि न टाळता येणारी अधोगती असा निष्कर्ष काढला जातो. आजवर असा निष्कर्ष वारंवार चुकीचाच नाही तर हास्यास्पद ठरलेला आहे.
चीनचे मॉडेल हे दीर्घकालीन नियोजनावर आधारित आहे (त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीचा यशदर ८०-८५% मानला जातो), या शिवाय सरकारची हस्तक्षेप क्षमता प्रचंड आहे, संकटांमुळे कोसळून न पडता होता पुनर्रचना करून (“reconfiguration”) उत्तर देण्याची त्यांची पद्धत आहे. ही चिनी मॉडेलची व्यवच्छेदक लक्षणे आहेत.
या लक्षणांबरोबर चीनच्या एका महत्त्वाच्या मूलभूत ताकदीकडे दूर्लक्ष केले जाते. ते म्हणजे जीवनाच्या प्रत्येक कोपर्यात कल्पकतेला असलेले महत्त्व- मानवी जीवनाचा असा एकही कोपरा नाही की जिथे चिनी कल्पकतेने प्रवेश केलेला नाही. मी चीनला गेलेलो नाही, पण चिनी जीवनाच्या प्रत्येक कोपर्याचे तपशीलवार दर्शन समाजमाध्यमावर येणार्या रिल्समुळे, प्रवासी ब्लॉगरसनी केलेल्या चित्रणामुळे आणि माहितीपटांमुळे मला घडते. तसेच चीनला भेट देऊन येणारे लोक पण याचीच पुष्टी करतात.
"मानवी कल्पकता" माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने मानवी जीवनाच्या प्रत्येक वैशिष्ट्याचा कल्पकतेशी काही संबंध आहे का याचा शोध घ्यायचा मी सतत प्रयत्न करत असतो. त्यात यावर्षी आपल्या देशाला डिझाईन इकॉनॉमीकडे न्यायचा मानस अर्थमंत्र्यानी यावर्षीच्या अर्थसंकल्पात व्यक्त केला असल्यामुळे परत एकदा मी या विषयाकडे ओढला गेलो.
डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
डिझाईन इकॉनॉमी म्हणजे कल्पकतेवर आधारलेली अर्थव्यवस्था. हा विषय किती खोल आणि गंभीर आहे हे फार थोड्या लोकांना पटेल. कल्पकतेचा अर्थ म्हणजे समस्येला वेगळ्या नजरेने पाहणे, प्रस्थापित गृहितकांना प्रश्न विचारणे, प्रत्यक्ष संबध नसलेल्या संकल्पना नावीन्यपूर्ण रीतीने एकत्र आणणे इ० अशा पद्धतीच्या विचारसरणीला धर्म, संस्कृती, प्रचलीत उद्योग इ० चा मोठ्ठा अडथळा असतो.
कल्पकता, सर्जनशीलता या मानवी बुद्धीची सर्वात अस्वस्थ करणार्या क्षमता आहेत. त्या स्वीकारलेल्या सत्यांना प्रश्न विचारतात, परंपरांना छेद/आह्वान देण्यास प्रवृत्त करतात, आणि स्थैर्याला धोक्यात टाकतात. म्हणूनच कोणताही समाज—जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे—सर्जनशीलतेला मर्यादा घालणाऱ्या संरचना उभ्या करतो. धर्म, संस्कृती आणि उद्योग या त्यातील तीन सर्वात प्रभावी शक्ती आहेत.
धर्माचा मूलभूत स्वभाव निश्चित उत्तरांकडे असतो कारण श्रद्धा टिकवण्यासाठी अनिश्चितता कमी करावी लागते; प्रश्नांना सीमा घालाव्या लागतात. परिणामी, का? पेक्षा असेच आहे याला प्राधान्य मिळते. नव्या विचाराला धोकादायक किंवा त्याकडे संशयाने बघितले जाते.
कल्पकता मात्र प्रश्नांवर जगते. ती अपरंपरागत, अस्वस्थ आणि कधी कधी अपमानास्पदही असू शकते. म्हणूनच जिथे धर्म सामाजिक नियंत्रणाचे साधन बनतो, तिथे सर्जनशीलता सहन केली जात नाही तर फक्त निर्दयपणे नियंत्रित केली जाते.
मानवी संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजाची स्मृती. पण ही स्मृती जेव्हा पूज्य बनते, तेव्हा ती अडथळा ठरते. मग “आपण नेहमी असेच करत आलो आहोत”, “हे आपल्या संस्कृतीत बसत नाही” ही वाक्ये सर्जनशीलतेची सौम्य पण प्रभावी हत्या करतात. संस्कृती जितकी स्वतःबद्दल असुरक्षित, तितकी ती बदलांबाबत आक्रमक होते. परिणामी, नवे विचार अनैतिक, पाश्चात्त्य, किंवा मूल्यविरोधी ठरवले जातात. डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते. अशा संस्कृतीमध्ये परंपरा प्रेरणा देते, आदेश नाही. व्यक्तीच्या आयुष्यात अतिरेकी ढवळाढवळ करणारी संस्कृती म्हणूनच कल्पकतेबरोबर सोहार्दाचे नाते निर्माण करू शकत नाही. भवभूती पासून The Sky Is Pink या चित्रपटात हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला गेला आहे.
आधुनिक उद्योगांचे यश इतर अनेक घटकांबरोबर कार्यक्षमता/उत्पादकता या संकल्पनांवर अवलंबून असते. मोजता येईल तेच महत्त्वाचे, धोका म्हणजे खर्च, अपयश म्हणजे नुकसान अशा धारणांनी बनलेल्या चौकटीत सर्जनशीलता खर्चिक, अनिश्चित आणि अव्यवहार्य वाटते. म्हणून उद्योग सर्जनशीलतेला ती नफ्यात मोजता येईल तेव्हाच स्वीकारतो. पण डिझाइन इकॉनॉमीमध्ये मात्र अपयशाकडे गुंतवणूक म्हणून पहावे अशी अपेक्षा असते. पण जो उद्योग अपयश सहन करू शकत नाही, तो नावीन्यही निर्माण करू शकत नाही.
कल्पकतेची मानके
एखाद्या मानवसमूहाची कल्पकता मोजायची कशी हा अत्यंत अवघड कळीचा मुद्दा कधीतरी या चर्चेत विचारात घ्यावाच लागतो. त्या समूहाने स्वत:चे अस्तित्व टिकविण्याकरता कोणती लोकोत्तर साधने, विचारसरणी, कला आणि तंत्रज्ञान आणि इतर व्यवस्था निर्माण केल्या हा प्रश्न निर्णायक बनतो. निर्माण झालेली प्रत्येक कल्पना लोकोत्तर असेलच असे नाही. मग नोबेल पुरस्कार, गिनीज बुक आणि पेटंट संख्या अशी कामचलाऊ मानके स्वीकारून एखाद्या देशाच्या कल्पकतेचे मोजमाप केले तर ते चुकीचे ठरू नये.
त्यामुळे मी धर्म आणि आता पर्यंत जाहिर झालेले नोबेल पुरस्कार यांचा संबंध तपासायचा प्रयत्न केला तेव्हा ख्रिश्चन आणि ज्यू धर्मियांनी यात आघाडी मिळवली आहे. हिंदू (आणि आता सनातन), इस्लाम यात लज्जास्पद पिछाडीवर आहेत. चीनने नोबेल पुरस्कार मिळवले नसले तरी पेटंटच्या संख्येतील त्यांची आघाडी लक्षणीय आहे.
"चीन मध्ये जाऊन राहा" असा सल्ला देणार्या प्रत्येकाने हिंदू धर्मियांचे नोबेल पुरस्कार आणि पेटंटमध्ये नगण्य योगदान का? यावर मौलिक चिंतन करावे आणि डिझाईन इ कॉनॉमीचे ध्येय कसे गाठता येईल याचे उत्तर शोधावे, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरू नये.
टीप - * हा अनुभव ए०आय०ला सांगितला तेव्हा ए०आय०चा केवळ मजेशीर नाही तर फारच मानवी होता- "अशा लोकांशी वाद घालायचा की सोडून द्यायचा" हा प्रतिप्रश्न वाचून मी थक्क झालो.
प्रतिक्रिया
10 Feb 2026 - 12:30 am | तिता
मी एकदाच चीनला गेलो होतो ते पण १२ वर्षांपूर्वी. त्यांचे scale बघूनच अवाक झालो. माझ्या मते चीनला कमी लेखणारे एकतर चीनबद्दल अद्न्यानी असतात किंवा खोटे बोलत असतात.
10 Feb 2026 - 1:51 am | गामा पैलवान
युयुत्सु,
तुम्ही तुमच्या आकलनाच्या आधारे हिंदू सनातन धर्म आणि संस्कृतीस बोल लावलेत. यांत एक तथ्य निसटून गेलेलं दिसतंय. ते म्हणजे चीनमध्ये लोकशाही नसून हुकूमशाही आहे. तस्मात भारतीय लोकशाहीस बोल लावायला विसरलांत.
आ.न.,
-गा.पै.
10 Feb 2026 - 11:48 am | सुबोध खरे
मी चीनला गेलेलो नाही,
हांगाश्शी
चीन मध्ये प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सरकारी ऍप डिफॉल्ट म्हणून येते आणि ते इतर मोबाईल शी सतत संपर्कात येते.
यामुळे प्रत्येक माणूस काय करतो हे सरकारला पूर्णपणे माहिती असते नि तुमच्यावर सरकारचे पूर्ण लक्ष असते. .
याशिवाय या देशातून बाहेर येणारी प्रत्येक माहिती सरकारने वेचूनच पाठ्वलेली असते.
चीनने काही क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती केली आहे हि वस्तुस्थिती.
पण आज चीन मध्ये आपल्याला साधी जमीन सुद्धा विकत घेता येत नाही.
तेथे रस्ता रुंद करायचा असेल तर तुम्हाला १५ दिवसांची नोटीस दिली जाते आणि आपले घर खाली करायलाच लागते मग तुम्ही तेथे सात पिढ्या राहत असलात तरी.
मानवी हक्क म्हणजे काय हे तिथीला जनतेला माहिती सुद्धा नाही.
बीजिंग मध्ये जोडप्याने राहायचे असेल तर बायकोला नोकरी करावीच लागते पण बायकांना पुरुषांच्या एक चतुर्थांश पगार असतो यामुळे स्वस्त मनुष्यबळ आपोआप उपलब्ध होते.
इथे तुम्ही पंतप्रधानांना आई बापावरून शिव्या देता आणि कुणी काही बोलले तर लगेच गळा काढून व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच म्हणून टाहो फोडता
तेथे असे बोललात तर आपली उच्च आय आय टी ची डिग्री चुलीत घालून आपल्याला डुक्कर पालन केंद्रावर साधा कामगार म्हणून पाठवले जाईल.
इथे बाबरी मशीद पडल्यावर ३४ वर्षे रडारड आणि गदारोळ चालू आहे. चीनच्या शिंजियांग प्रांतात हजारो मशिदी सरळ बुलडोझर ने पडून टाकल्या आहेत आणि १० लाख उईगुर मुसलमानांना "प्रशिक्षणासाठी" कॅम्प किंवा तुरुंगात पाठवले आहे.
याबद्दल कुणी काही बोलायचे नाही.
बाकी चीनच्या पी एल १५ या सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांना, त्यांच्या एच क्यू ९ रडार आणि एच क्यू १६ क्षेपणास्त्राने भारतीय वायू दलाने कुचकामी कसे ठरवले याबद्दल बोलायचे नाही. (कारण डी आर डी ओ, इसरो मध्ये आय आय टी यन नाहीतच म्हणून असेल कदाचित). आणि या अपयशामुळे चीनने त्यांच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. https://www.orfonline.org/expert-speak/dual-fault-lines-in-china-s-milit...
त्यांचे JF १७ किंवा ज १० विमानांची इंजिने अजून चीन सरकारला बनवता आलेली नाहीत याचे कारण काय असेल?
आपण भारताला, सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे दिल्याशिवाय काही लोकांना रोजचे जेवण पचतच नाही.
सतत चीनशी तुलना करताना तेथील परिस्थीती काय आहे याच्या कडे कानाडोळा करता राहायचे.
असे केल्याशिवाय तुम्ही इंटेलेक्युअल पुरोगामी सिद्ध होणार नाही अशी कायम भीती वाटत राहते
हा खरा तर न्यूनगंड आहे.
10 Feb 2026 - 7:50 pm | स्वधर्म
'मी चीनला गेलेलो नाही,'
हांगाश्शी
दुसर्यांच्या अनेक मुद्द्यातील एकच फट काढून सगळं फोल ठरवण्याची स्टाईल आवडली डॉक्टर! फक्त एक राहिलं: तुंम्ही चीनला गेला होतात का ते सांगायचं राहिलं. त्याने तुमचे सगळे मुद्दे सिध्द होतील बघा.
10 Feb 2026 - 5:59 pm | पंतश्री
मुद्दा भरकतो आहे. इथे सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे वगैरे काही नाही आहे. तुम्ही इतकं छान सांगितलं भारताबद्दल त्या बद्दल धन्यवाद. मोदींच्या कामाबद्दल किंवा भारत करत असलेल्या प्रगती बद्दलहि लेख नाही आहे. भारत करत असलेली प्रगती हि भूषणावह आहेच. इथे लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही. सुबोध सर तुम्ही भावनेच्या ओघात विचारलेले मूलभूत प्रश्न दुर्लक्षले आहेत. मुख्य प्रश्न ना बगल देत भारतापुढील आव्हाने आणि भारताने केली प्रगती तसेच राजकारण्यामुळे भारत किती प्रगत झाला किंवा कुठल्याहि धर्मावर आधारित चर्चा अपेक्षी नाही आहे असं मला वाटते आहे.
मुख्य मुद्दा आणि प्रश्न होता कि
१. आपल्याला नि=ओबेल पुरस्कार का मिळत नाही आहेत?
२. आपले पेटंट रेजिस्ट्रेशन का वाढत नाही आहेत? ह्यात आपण कुठे आणि का कमी पडत आहोत?
३. भारत कल्पकतेच्या मानकात कमी पडतो आहे का?
४. जगातील सर्वात मोठा हिंदू राष्ट्र आणि सगळ्यात मोठी लोकशाही तसेच आशियातील उदयोन्मुख मुख्य सत्ताकेंद्र असूनही आपण आपली छाप कल्पकतेत का पडू शकत नाही आहोत?
हे काही मुख्य मुद्दे इथे चर्चा करण्यासारखे आहेत. कल्पकता आणि संशोधन ह्या दोन्ही अगदी विरुद्ध बाजू आहेत असे मला वाटते. तुम्ही हे तर प्रमाणित केलेच आहे कि भारताने संशोधनात कशी बाजी मारली आहे तर मुख्य मुद्द्याला धरून भारत ने कल्पकतेत अशीच काही बाजी मारली असेल तर तेही प्रमाणित करावे. मी मागच्या १५ वर्षांपासून design क्षेत्रात काम करतो आहे. पण एक मुख्य निरीक्षण आहेत कि सरकारी क्षेत्राला कल्पकतेचे वावडे आहे. संषधां भले ढीग असेल पण कल्पकता शून्य आहे.
बाकी जाता जाता युयुत्सुची टीप ची आठवण करून देतो परत. ai ने प्रतिप्रश्न दिला आहेच कि "अशा लोकांशी वाद घालायचा की सोडून द्यायचा"
10 Feb 2026 - 7:30 pm | सुबोध खरे
लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही.
काय सांगताय?
अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांत असणाऱ्या असंख्य चिनी वंशाच्या नागरिकांना तेथील संशोधन किंवा तंत्रज्ञान चोरून चीनला पाठवण्यासाठी कसे वेठीस धरले जाते याची आपल्याला सुतराम कल्पना नसावी.
चिनी माणसांच्या जवळच्या नातेवाईकाना कुठल्या तरी खोट्या केसेस मध्ये अडकवले जाते काहीच सापडलं नाही तर तैवानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप तर आहेच. मग त्यांच्याशी वाटाघाटी होतात.
तिकडनं तंत्रज्ञान पाठवण्याची तयारी झाली कि नातेवाईक सन्मानाने घरी परत येतात.
याशिवाय साम दाम दंड भेद इ सर्व गोष्टी वापरल्या जातात. इतिहासातील चिनी संपन्नतेचे धडे देऊन इमोशनल ब्लॅक मेलिंग केलं जातं. हनी ट्रेपिंग सुद्धा सर्रास वापरलं जातं Chinese intelligence services, particularly the Ministry of State Security (MSS), have been accused of employing "honey trapping"—using romantic or sexual relationships for espionage—to target individuals in the United States, including members of the overseas Chinese diaspora, tech workers, and researchers. These operations often focus on acquiring sensitive intellectual property, technical data, and defense secrets, with a particular focus on Silicon Valley.
तिथल्या विद्यापीठात काम करणारे प्राध्यपक पासून तेथे गेलेले विद्यार्थी सरकारी किंवा खाजगी नोकरीत असलेले उच्च पदस्थ पासून सर्वाना गळाला लावायचा प्रयत्न चीनचे सरकार करते.
भारताने असं करणं तुमच्या कल्पनेतही येणार नाही.
चीनने जिकडे तिकडे रिव्हर्स इंजिनियरींग करून आपले जहाज धक्क्याला लावण्याचं प्रयत्न केला. इलेकट्रोनिक्स केमिकल उत्पादनात चीनने बऱ्यापैकी यश मिळवलं पण
म्हणूनच चिनी मालाबद्दल चला तो चांद तक नाही तो शाम तक असं का म्हटलं जातं?
Former Google Engineer Found Guilty of Economic Espionage and Theft of Confidential AI Technology
https://www.justice.gov/opa/pr/former-google-engineer-found-guilty-econo...
This updated survey is based on publicly available information and lists 224 reported instances of Chinese espionage directed at the United States since 2000.
https://www.csis.org/programs/strategic-technologies-program/survey-chin...
https://www.fbi.gov/investigate/counterintelligence/the-china-threat अमेरिकी गुप्तचर खात्याचे २१५ अहवाल आहेत ज्यात चिनी नागरिकांनी केलेली हेरगिरी, तंत्रज्ञान चोरी, हॅकिंग इ चे अहवाल आहेत.
As of early 2026, the European Union is moving toward a mandatory, phased-out ban of Huawei and ZTE from 5G networks due to security concerns.
Poland has banned Chinese-made electric vehicles from entering specific military bases.
Concerns regarding data security, espionage, and digital surveillance via sensors are driving these restrictions, with potential for broader,EU-wide regulations.
Reverse engineering in the Chinese chemical industry is part of a broader, state-driven strategy to achieve technological self-sufficiency, often focusing on bypassing intellectual property (IP) restrictions and accelerating innovation in sectors ranging from specialty chemicals to advanced materials. As China's chemical industry is the largest in the world by revenue,, this approach helps rapidly bridge the technology gap with Western firms.
बर्फाचा पहाड जितका वरून दिसतो त्याच्या ९/१० खाली असतो.
बाकी चालू द्या
11 Feb 2026 - 6:35 am | सोत्रि
डॅाक,
डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय.
धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे.
हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे.
- (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी
11 Feb 2026 - 6:48 am | सोत्रि
डॅाक,
डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय.
धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे.
हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे.
बाकी सगळ चालू राहतंच, निसर्गक्रमाने, कोणाच्या परवानगीची गरज न लागता.
- (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी
11 Feb 2026 - 9:54 am | सुबोध खरे
चला तो चांद तक नाही तो शाम तक
PL १५ क्षेपणास्त्रे, HQ ९ , HQ १६ ,JF १७, J १०
हे सर्वच्या सर्व भारतीय शस्त्रास्त्रांविरुद्ध साफ अपयशी का ठरले?
आजही चीनची रिव्हर्स इंजिनियरिंग केलेली J १७ J १० ची इंजिने चालत का नाहीत?
चीनने जबरदस्त प्रगती केलेली आहे यात शंका नाही. यामुळेच भारत चीनला आपला प्रतिस्पर्धी समजतो यात शंका नाही.
परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्या मंदबुद्धी संघोट्या मित्राची
प्रत्येकाने हिंदू धर्मियांचे नोबेल पुरस्कार आणि पेटंटमध्ये नगण्य योगदान का?
डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते.
व्यक्तीच्या आयुष्यात अतिरेकी ढवळाढवळ करणारी संस्कृती म्हणूनच कल्पकतेबरोबर सोहार्दाचे नाते निर्माण करू शकत नाही.
सरळसरळ पूर्वग्रह आणि हिंदू द्वेष दाखवणारी आहेत ज्याचा कल्पकतेशी संबंध नाही.
जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का?
पाश्चात्य लोकांच्या तुलनेत जपानला किती नोबेल पारितोषिके मिळाली आहेत?
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली कि त्यावर उपलब्ध असलेलीच माहिती मिळेल
एक तर ओवी अनुभवावी या उक्तीनुसार मी दिलेल्या दुव्यांपैकी एक तरी दुवा पूर्णपणे वाचला का?
याच कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारा चीनमध्ये मानवी हक्क म्हणजे काय?
आणि चीन शी आपली तुलना करुन आपल्या देशाला आणि आपल्या संस्कृतीला शिव्या घालताना आपण इतिहास विसरतो आहे हे सर्वज्ञ लोक विसरतात.
इस्लामच्या रेट्यामधून भारत आणि चीन हे का वाचले याचा नीट अभ्यास करून पहा दोन्ही ठिकाणी असलेल्या प्राचीन संस्कृती मुळेच. हे लक्षात न घेता पुढचे पाठ मागचे सपाट झाल्यामुळे अशी परिस्थिती येते.
आज भारताने सर्व लोकांची मालमत्ता सरकार जमा करून घेतली कि आपल्याकडे सुद्धा सिंगूर पासून बुलेट ट्रेन मुंबईच्या लोकलचे सहा पदरी करण.सारखे सर्व पायाभूत प्रकल्प चुटकीसरशी पुढे जातील कारण त्यातील सर्वात मोठा जमीन अधिग्रहणाचा मुद्दाच निकाली निघेल.
आणि सर्व अल्पसंख्याकांना मानसिक परिवर्तनासाठी पाठवले तर हेच डावे फुरोगामी सर्वज्ञ लोक खुश होतील का ?
केवळ कल्पनाविलास करून होत नाही. भारताने चांद्रयान, मंगळयान, क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, यु पि आय सारखे अनेक प्रयोग फार मोठ्या प्रमाणावर मार्गी लावले आहेत ते रिव्हर्स इंजिनियरिंग करून नव्हे तर आपल्याच शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने.
तेंव्हा केवळ द्वेषाची द्वेष न करता वस्तुस्थितीची जाणीव व्हावी यासाठी मी लिहिले आहे
यात आपल्याला गोलपोस्ट हलवण्याचे दिसते स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे.हि टिप्पणी यात वस्तुस्थिती कमी आणि स्कोअर सेटलिंगची शक्यता जास्त आहे.
असो
आपले भले होवो.
11 Feb 2026 - 10:44 am | पंतश्री
सुबोध दादा, परत तेच. मुद्दा काय तुम्ही सांगताय काय?
"परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्या मंदबुद्धी संघोट्या मित्राची"
ह्याचे उत्तर असे मी माझा राजकारणही दुरान्वयेहि काही संबंध नाही. संघ काय चीझ आहे आणि त्यांची विचारधारा काय हे हि मुख्यतः मला पूर्णतः समजलेले नाही. पण एक नक्की कि तुम्ही नक्कीच संघ द्वेषी आणि आम्ही म्हणू तेच बरोबर ह्यातले आहेत. मी एक design profeshional म्हणून माझे म्हणणे मांडतो आहे. तुम्ही जसे बोलताय त्यावर पण काही design theory आहेतच ज्या आम्ही वापरतो आमच्या रोजच्या कामात. तुमचे profeshion काही असो जे मंदाटी ते nutral होऊन मांडा , भांडण्यासाठी अमी माझा मुद्दा खोडण्यासाठी नाही. इथे चर्चा आपल्या भारतात कल्पकता कशी वाढवता येईल ह्यावर चर्चा करा करा.
एक उधाहरण मी पण देतो कल्पकतेकला धरून.
मोर हा कल्पकतेचा आणि सौंदर्याचा राजा आहे. मग आपण हे बोलूया का कि हा जगातील सगळ्यात बिनडोक, वाया गेलेला प्राणी आहे कारण ह्याचे ना निसर्गात काही योगदान आहे नि त्याचा काही फायदा. बहुतेक प्राणी हायला खात नाहीत आणि हा नुसता पिसारा फुलवऊन निश्चत बसतो नाच्या. फालतू जनावर आलेत तेव्हा हा नाश्ता झाला तरी चालण्या सारख आहे.
तुम्हीच म्हणालात "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते."
बदल काय निसर्गाप्रमाणे आपोआप घडतात का?? जर तुम्ही आपले म्हणजेच रेटत राहिला मूळ मुद्दा सोडून तर काय बदलणारी संस्कृती तयार करणार?
तुम्ही भरकटत राजकारण, जागतिक अर्थकारण आणि बाकी बरेच गोष्टी ओढत आहात . ह्याचा कल्पकता वाढण्यास काही उपयोग होत नाही. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये हे असे काही शिकवले जात नाही जिथून निघणारे मोठे मोठे कल्पक कलाकार आहेत.
मुख्य प्रश्न हा आहे कि आपण चीनशी बरोबरी न करता आपली कल्पकता कशी वाढवोउ शकतो.
तुमचे म्हणणे असे आहे का कि हुकुमशी आली को कल्पकता वाढते?
दुसऱ्याचे संशोधन चोरले कि कल्पकता वाढीस लागते?
जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का?
हा प्रश्नच चुकीचा आहे. फक्त कल्पकता आणि जपान हा search टाका म्हणजे कल्पकता काय असते समजेल. आता विषय निघालाच आहे तर फक्त जपान आणि अपंग हे शेअरच करून बघा. जगात सगळ्यात जास्त उजव्या हाताचे असतात म्हणून आपली कात्री पण उजव्या हाता नुसार असते. पण डाव्यांचे काय?? हा विचं जपान ने केला आहे. तिकडे डाव्या हितासाठी कात्री मिळते. जपानची टॉय ट्रेन बघा. व्हायची सैर तर एगदी ८० वर्षांचा म्हातारा पण करेल कारण हि आपले बालपण जागवते. ह्यात तुम्ही सांगितलेले जगातील समीकरणे कुठे दिसत नाही आहे किंवा मला समजत नाही आहेत कि ती कशी बसत आहेत ह्यात.
कल्पकतेचा वय, धर्म, सरकार कशाही हि संभांड नसतो. कल्पकता हि आपल्या शिकवणुकीतून आणि आसपास च्या वातावरणातून निर्माण होते. तुम्ही बरेच मोठे वाटत वयाने. तेव्हा मला एक सांगा फक्त. लहानपणापासून आपल्या वाडवडिलांनी काही कल्पकतेला प्रोत्साहन दिले आहे का? प्राधान्य नेहमी पुस्तकी शिक्षणाला राहिले आहे भारतात. हा मुख्य मुद्दा आहे.
जर design चे ज्ञान नसेल तर कृपया फालतू मुद्दे उगाळून ढग वाया घालवू नका. आता तुमच्या मुलांची , नातवंडांची कल्पकता अश्या भारतीय, जागतिक राजकारणाने वाढत असेल तर ती कल्पकता तुम्हालाच लखलाभ होवो. अशी कल्पकता मलातरी माझ्या मुलांना द्यायची इच्छा नक्कीच नाही.
11 Feb 2026 - 10:50 am | युयुत्सु
श्री० पंतश्री
तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे.
11 Feb 2026 - 12:22 pm | सुबोध खरे
त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे.
हायला
दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो असली भंपक विधाने केल्यावर मी तुम्हाला आव्हान दिले
त्याच्यावर तुम्ही पळ काढता आणि कसल्या फालतू पैजा हरायला तयार आहात?
मुळात इंग्रजी स्पेलिंग चा आणि या लेखाचा संबंध नाही. सुदैवाने माझे इंग्रजी उच्च दर्जाचे आहे. पण एखाद्याचे इंग्रजी खरोखरच चांगले नसले तर त आपली हि टिप्पणी अत्यंत खालच्या दर्जाची आहे एवढे मी नमूद करू इच्छितो.
महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत पासून सगळे चित्पावन ज्यू लोकांचे वंशज कि तत्सम काहीतरी भंपक विधाने करून तुम्ही नक्की काय सिद्ध करायला जाताय.
11 Feb 2026 - 9:07 pm | योगी९००
तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे.
तुम्हाला डॉ. खरेंचे मुद्दे पटले नाहीत म्हणून अशी खालच्या दर्जाची टिका करणे हे पटले नाही. भारतीय लष्करात काम केलेल्या व पेशाने डॉ. असलेल्या व्यक्तीचा हा अपमान झाला आहे. तीव्र निषेध. ज्या लोकांना मुद्देसुद उत्तरे देता येत नाहीत ते असे करतात. तुम्ही त्यातले नाही हे आतापर्यंत समजत होतो. पण माझ्या समजुतीला तडे गेले.
11 Feb 2026 - 11:41 am | सुबोध खरे
@ पंतश्री
तो प्रतिसाद तुम्हाला नव्हताच
11 Feb 2026 - 12:01 pm | सुबोध खरे
@ पंतश्री
लेखकाची वाक्ये मी "चुकीची" म्हणून उद्धृत केलेली आहेत.
"परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्या मंदबुद्धी संघोट्या मित्राची"
त "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते."
हि वाक्ये माझी नाहित. ती तुम्ही माझ्या तोंडी घालून अत्यंत चुकीचा वाद घालत आहात.
बाकी डाव्या हाताची कात्री भारतातही सर्रास मिळते.
डावरया दंतवैद्यांना हातातील ड्रिल मशीन पूर्वी (४० वर्षांपूर्वी) भारतात तयार झालेले मिळत नसे तेही मिळायला लागले.
७५ वर्षात तुम्ही एकदम ३०० वर्षांची प्रगती अपेक्सह करता आहेत म्हणून हि तुलना होते.
चीनच्या बहुसंख्य तंत्रज्ञानात कल्पकतेऐवजी रिव्हर्स इंजिनियरिंग वापरले गेलेले आहे हे आपण विसरता आहात.
चीनची जबरदस्त प्रगती त्यांच्या कल्पकतेमुळे झाली आहे असे कुठेही दिसत नाही. तसे दाखवून द्या मग मी माझे विधान मागे घेईन.
बाकी राजकारण किंवा हिंदू द्वेष हा संदर्भ तुमच्यासाठी नव्हताच तो युयुत्सु यांच्याबद्दल आहे. तुम्ही का स्वतःला चिकटवून घेताय>
बाकी केवळ तुम्ही डिझाईन मध्ये आहेत म्हणून इतरांनी त्याबद्दल बोलायचेच नाही असा असेल तर बोलणेच संपले. ]
हे म्हणजे तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच शकत नाही.
किंवा तुम्ही शेती करत नाही तर तुम्ही शेतीबद्दल बोलायचे नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद आहे
11 Feb 2026 - 11:42 am | सोत्रि
ज्या रंगाचा चष्मा आपण लावतो त्याच रंगाचं जग आपल्याला दिसू लागतं. 😎
असो, अजून काहीही अवांतर न करता मी थांबतो!
- (वस्तुनिष्ठ) सोकाजी
11 Feb 2026 - 10:38 am | युयुत्सु
वर केल्या गेलेल्या थयथयाटामध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. चीनमधली हूकूमशाही राजवट अलिकडची काही वर्षातली आहे, चीनमधल्या कल्पकतेच्या संस्कृतीचा इतिहास अनेक शतकांचा आहे.
भारताने चीनची कितीही मिसाईल पाडली, चीनने बाधलेले पूल पडले तरी त्यांनी निर्माण केलेल्या पेंटटच्या एव्हरेस्टला बारीकशी पण चीर पडलेली नाही.
आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली?
11 Feb 2026 - 11:44 am | सुबोध खरे
आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली?
धर्माचार्यांचा नोबेल पारितोषिकही संबंध काय?
पोप ला नोबेल मिळालंय का ?
ख्रिश्चन किंवा ज्यू लोकांना ढिगाने नोबेल मिळाली आहेत
आणि
पैशाला पासरी पेटंट्स आहेत.
artificial intelligence is no match for natural stupidity
11 Feb 2026 - 10:58 am | पंतश्री
सुबोध भाऊ, खास तुमच्या आग्रहास्तव जपानच्या नोबेल पारितोषिकांची लिस्ट तारखे सकट खाली देत आहे. आता तुम्ही सुचवलेच आहेत मम्हणून ai आणि गुगळतो आहे. लिस्ट जरा जास्तच छोटी आहे. जास्त माहिती साठी तुम्ही हे reference टाकून सत्यता नक्कीच पडताळून पाहू शकता.
1949 – Physics: Hideki Yukawa (1907–1981)
Yukawa, a physicist from Kyoto University, predicted the existence of mesons (subatomic particles that mediate nuclear forces) through theoretical models. This laid groundwork for particle physics and was Japan's first Nobel. Rationale: "for his prediction of the existence of mesons on the basis of theoretical work on nuclear forces."
1965 – Physics: Shin'ichirō Tomonaga (1906–1979)
Tomonaga, also from Kyoto, advanced quantum electrodynamics (QED), reconciling quantum mechanics with special relativity for electromagnetic interactions. Shared with Americans Schwinger and Feynman. Rationale: "for their fundamental work in quantum electrodynamics, with deep-ploughing consequences for the physics of elementary particles."
1968 – Literature: Yasunari Kawabata (1899–1972)
Kawabata, a novelist from University of Tokyo, captured Japanese aesthetics and human fragility in works like Snow Country. First Japanese literature winner. Rationale: "for his narrative mastery, which with great sensibility expresses the essence of the Japanese mind."
1973 – Physics: Leo Esaki (1925–)
Esaki, from University of Tokyo, discovered electron tunneling in semiconductors, leading to the Esaki diode—key for modern electronics. Shared with Giaever and Josephson. Rationale: "for their experimental discoveries regarding tunneling phenomena in semiconductors and superconductors, respectively."
1974 – Peace: Eisaku Satō (1901–1975)
Satō, former PM and University of Tokyo alum, pushed nuclear non-proliferation and Pacific stability via Japan's three non-nuclear principles. Shared with MacBride. Rationale: "for his contribution to stabilize conditions in the Pacific rim area and for signing the Nuclear Non-Proliferation Treaty."
1981 – Chemistry: Kenichi Fukui (1918–1998)
Fukui, from Kyoto, developed frontier orbital theory to predict chemical reaction paths. First Asian chemistry winner. Shared with Hoffmann. Rationale: "for their theories, developed independently, concerning the course of chemical reactions."
1987 – Physiology or Medicine: Susumu Tonegawa (1939–)
Tonegawa, Kyoto alum, uncovered how genes rearrange to produce diverse antibodies, revolutionizing immunology. Rationale: "for his discovery of the genetic principle for generation of antibody diversity."
1994 – Literature: Kenzaburō Ōe (1935–2023)
Ōe, from University of Tokyo, wrote poetic, myth-infused novels on human struggles, influenced by his disabled son. Rationale: "who with poetic force creates an imagined world, where life and myth condense to form a disconcerting picture of the human predicament today."
2000 – Chemistry: Hideki Shirakawa (1936–)
Shirakawa, Tokyo Tech alum, co-discovered conductive polymers (plastics that conduct electricity), enabling flexible electronics. Shared with MacDiarmid and Heeger. Rationale: "for their discovery and development of conductive polymers."
2001 – Chemistry: Ryōji Noyori (1938–)
Noyori, from Kyoto, pioneered chiral catalysis for hydrogenation, crucial for drug synthesis. Shared with Knowles and Sharpless. Rationale: "for their work on chirally catalysed hydrogenation reactions."
2002 – Physics: Masatoshi Koshiba (1926–2020)
Koshiba, University of Tokyo, detected cosmic neutrinos with the Kamiokande detector, confirming supernova theories. Shared with Davis and Giacconi. Rationale: "for pioneering contributions to astrophysics, in particular for the detection of cosmic neutrinos."
2002 – Chemistry: Koichi Tanaka (1959–)
Tanaka, Tohoku alum, invented soft laser desorption for mass spectrometry, aiding protein analysis. Shared with Fenn and Wüthrich. Rationale: "for their development of soft desorption ionisation methods for mass spectrometric analyses of biological macromolecules."
2008 – Physics: Yoichiro Nambu (1921–2015)
Nambu, Japanese-born (University of Tokyo), explained spontaneous symmetry breaking in particle physics, foundational for the Standard Model. US citizen at award. Shared half the prize (other half to Kobayashi and Maskawa). Rationale: "for the discovery of the mechanism of spontaneous broken symmetry in subatomic physics."
2008 – Physics: Makoto Kobayashi (1944–)
Kobayashi, Nagoya alum, co-proposed the CKM matrix explaining CP violation and quark families. Shared with Maskawa. Rationale: "for the discovery of the origin of the broken symmetry which predicts the existence of at least three families of quarks in nature."
2008 – Physics: Toshihide Maskawa (1940–2021)
Maskawa, Nagoya alum, same as Kobayashi on quark symmetry breaking. Rationale: same as above.
2008 – Chemistry: Osamu Shimomura (1928–2018)
Shimomura, Nagasaki alum, isolated green fluorescent protein (GFP) from jellyfish, now a biotech staple for imaging. Shared with Chalfie and Tsien. US citizen later, but listed as Japanese. Rationale: "for the discovery and development of the green fluorescent protein, GFP."
2010 – Chemistry: Ei-ichi Negishi (1935–2021)
Negishi, University of Tokyo, developed palladium-catalyzed cross-coupling for carbon bonds, vital for pharma. Shared with Heck and Suzuki. Rationale: "for palladium-catalyzed cross couplings in organic synthesis."
2010 – Chemistry: Akira Suzuki (1930–)
Suzuki, Hokkaido alum, same cross-coupling method (Suzuki reaction). Rationale: same as above.
2012 – Physiology or Medicine: Shinya Yamanaka (1962–)
Yamanaka, Kobe alum, created induced pluripotent stem cells (iPS) from adult cells, bypassing embryos for regenerative medicine. Shared with Gurdon. Rationale: "for the discovery that mature cells can be reprogrammed to become pluripotent."
2014 – Physics: Isamu Akasaki (1929–2021)
Akasaki, Kyoto alum, invented blue LEDs for efficient lighting. Shared with Amano and Nakamura. Rationale: "for the invention of efficient blue light-emitting diodes which has enabled bright and energy-saving white light sources."
2014 – Physics: Hiroshi Amano (1960–)
Amano, Nagoya alum, same blue LED breakthrough. Rationale: same as above.
2014 – Physics: Shuji Nakamura (1954–)
Nakamura, University of Tokushima, co-invented blue LEDs while at Nichia Corp. US citizen at award, Japanese-born. Rationale: same as above.
2015 – Physics: Takaaki Kajita (1959–)
Kajita, Saitama alum, proved neutrino oscillations (they have mass) via Super-Kamiokande. Shared with McDonald. Rationale: "for the discovery of neutrino oscillations, which shows that neutrinos have mass."
2015 – Physiology or Medicine: Satoshi Ōmura (1935–)
Ōmura, University of Yamanashi, discovered avermectin from soil bacteria, leading to ivermectin for parasitic diseases. Shared with Campbell and Tu. Rationale: "for their discoveries concerning a novel therapy against infections caused by roundworm parasites."
2016 – Physiology or Medicine: Yoshinori Ohsumi (1945–)
Ohsumi, University of Tokyo, elucidated autophagy (cell self-eating for recycling), key for disease research. Rationale: "for his discoveries of mechanisms for autophagy."
2018 – Physiology or Medicine: Tasuku Honjo (1942–)
Honjo, Kyoto alum, found PD-1 protein, enabling immune checkpoint inhibitors for cancer therapy. Shared with Allison. Rationale: "for their discovery of cancer therapy by inhibition of negative immune regulation."
2019 – Chemistry: Akira Yoshino (1948–)
Yoshino, Kyoto alum, developed lithium-ion batteries, powering modern devices. Shared with Goodenough and Whittingham. Rationale: "for the development of lithium ion batteries."
2021 – Physics: Syukuro Manabe (1931–)
Manabe, Japanese-born (University of Tokyo), modeled Earth's climate systems, foundational for global warming predictions. US citizen at award. Shared with Hasselmann and Parisi. Rationale: "for the physical modelling of Earth’s climate, quantifying variability and reliably predicting global warming."
2024 – Peace: Nihon Hidankyo
Grassroots group of Hiroshima/Nagasaki survivors advocating nuclear abolition through testimonies. Rationale: "for its efforts to achieve a world free of nuclear weapons and for demonstrating through witness testimony that nuclear weapons must never be used again."
2025 – Chemistry: Susumu Kitagawa (1951–)
Kitagawa, Kyoto alum, pioneered metal-organic frameworks (MOFs) for gas storage, separation, and catalysis. Shared with Robson and Yaghi. Rationale: "for the development of metal-organic frameworks."
2025 – Physiology or Medicine: Shimon Sakaguchi (1951–)
Sakaguchi, Kyoto alum, discovered regulatory T cells for immune tolerance, impacting autoimmunity and transplant medicine. Shared with Brunkow and Ramsdell. Rationale: "for their discoveries concerning peripheral immune tolerance."
12 Feb 2026 - 8:28 pm | हणमंतअण्णा शंकर...
इच्छुकांनी जपानी टॉप इन्वेशन्स हे एन एच के कृत भाग जरूर पाहावेत.
https://www3.nhk.or.jp/nhkworld/en/shows/topinventions/
मी नेहमी अगदी नियमित पणे पाहत असतो. प्रचंड कष्टाळू लोक आणि ध्यासाच्या मागे धावण्यात कुणीही हात धरू शकत नाही.
अगदी साध्या साध्या गोष्टीतही जपानी लोक इन्वेशन्स करत असतात सतत.
11 Feb 2026 - 12:56 pm | युयुत्सु
महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत, या माझ्या सिद्धांतावर मी अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन.
पण तो या धाग्याचा विषय नसल्याने जास्त अटेंशन मिळणार नाही.
11 Feb 2026 - 7:17 pm | सुबोध खरे
दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो.
या माझ्या सिद्धांतावर अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन.
यावर अजूनही ठाम आहात का?
का आता शेपूट घालणार?
11 Feb 2026 - 7:13 pm | अर्धवटराव
संघोटे काय, कम्युनीच काय.. शेवटी टिपर्याच खेळायच्या आहेत ना. चांगलय कि.
बाकी आपल्या मानवी भावनांना ए आय कडुन व्हेरिफाय करायला लागण्याइतपत अधोगती झालेली बघुन भारतात डिसाइन इकॉनॉमीची काय दुर्गती होणार याची चिंता वाटायला लागली आहे.
12 Feb 2026 - 2:31 am | गामा पैलवान
लोकहो,
एक रोचक तथ्य नोंदवायचं आहे. आधुनिक काळातली पहिली अभियांत्रिकी महाजत्रा इ.स. १८५१ साली लंडनमध्ये भरली होती. तिला ग्रेट एक्झिबिशन म्हणतात. विकिवर इथे माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Great_Exhibition
या जत्रेस जगभरातले अभियांत्रिकी व तांत्रज्ञानिक नमुने मागवले होते. तर, मौजेची बाब अशी की भारताचे दालन सर्वांत मोते व आकर्षक होते. साहजिकंच भारत व चीन यांची तुलना लोकं करीत होते.
या तुलनेविषयी गुग्गुळाचार्य बघा काय म्हणताहेत :
ऐन व्हिक्टोरियन कालखंडात जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता दृढमूल झाली होती तेव्हाही जगात भारत हाच तंत्रज्ञानात व कल्पकतेत प्रथम क्रमांकावर होता.
आज ते स्थान कुठे गेलंय? चर्चा व्हावी.
आ.न.,
-गा.पै.
12 Feb 2026 - 6:08 pm | कॉमी
ऑ??? तांत्रिकी प्रदर्शन आणि आपले प्रमुख आकर्षण भुस्सा भरलेला हत्ती आणि हौदा???
12 Feb 2026 - 7:34 pm | अभ्या..
ते सोडा,
गापै ना फारसे कुणी मनावर घेत नसतात. त्यांचे ते त्यांचा प्राचीन भारत आणि त्यांनीच निर्माण केलेले मराठीतले प्रतिशब्द ह्यांच्यात मग्न असतात. ;)
.
हे बघा, इंटरेस्टिंग
ह्याच प्रदर्शनात ससेक्सचे विल्यम चेंबरलिन ज्युनियर यांनी जगातील पहिले मतदान यंत्र (voting machine) प्रदर्शित केले, जे आपोआप मते मोजत असे आणि जास्त मतदान रोखण्यासाठी इंटरलॉकिंग सिस्टम वापरत असे.
12 Feb 2026 - 8:23 pm | हणमंतअण्णा शंकर...
हा हा लोल.
गामा पैलवान म्हणजे दुसरे सावरकर आहेत बहुतेक. मराठीला त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे.
मला तरी त्यांचे प्रतिशब्द आवडतात.
गापै, करत राहा नवे शब्द.
12 Feb 2026 - 8:52 pm | अप्पा जोगळेकर
एकाच व्यक्तीने दोन आयडी घेऊन स्वतःच स्वतःला प्रतिसाद दिले आहेत. गंगाधर ही शक्तिमान है. पूर्वी संक्षी काकांच्या धाग्यावर असले प्रकार चालायचे.