डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
लेखनप्रकार
डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
==============
--राजीव उपाध्ये
चीनच्या अधोगतीची स्वप्ने बघणार्या आणि त्यावरून माझ्याशी कचाकचा भांडणार्या मंदबुद्धी संघोट्या मित्राची मला अधूनमधून आठवण येते. त्याने माझ्याशी भांडण केल्याला आता २-२.५ वर्षे होऊन गेली असतील. मी त्याच्याकडे २-३ वर्षे मागितली होती. प्रत्य्क्षात चीनच्या पिछेहाटीचा कुठेही मागमूस पण दिसत नाहीये. सतत गोलपोस्ट हलवत राहायचं, लोकांची दिशाभूल करत राहायचं हा अशा ’समर्पित’ लोकांचा आवडता उद्योग असतो. आणि मग हे मंदबुद्धी लोक जेव्हा तोंडावर आपटतात तेव्हा "चीन मध्ये जाऊन राहा" असा एकच घोष चालू करतात. [*]
“चीन कोसळतो आहे” हे पालुपद गेली किमान १०–१५ वर्षे वेगवेगळ्या स्वरूपात ऐकू येते. उदा० कधी लोकसंख्या घटतेय तर कधी रिअल इस्टेट बुडबुडा फुटतोय, तर कधी चीनी जनतेचा आता उद्रेक होत आहे अशा स्वरूपाच्या बातम्यामुळे अनेक बालबुद्धीच्या लोकांना सतत आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. या प्रत्येक मुद्द्यात काही अंशतः तथ्य असले, तरी त्यावरून तात्काळ आणि न टाळता येणारी अधोगती असा निष्कर्ष काढला जातो. आजवर असा निष्कर्ष वारंवार चुकीचाच नाही तर हास्यास्पद ठरलेला आहे.
चीनचे मॉडेल हे दीर्घकालीन नियोजनावर आधारित आहे (त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीचा यशदर ८०-८५% मानला जातो), या शिवाय सरकारची हस्तक्षेप क्षमता प्रचंड आहे, संकटांमुळे कोसळून न पडता होता पुनर्रचना करून (“reconfiguration”) उत्तर देण्याची त्यांची पद्धत आहे. ही चिनी मॉडेलची व्यवच्छेदक लक्षणे आहेत.
या लक्षणांबरोबर चीनच्या एका महत्त्वाच्या मूलभूत ताकदीकडे दूर्लक्ष केले जाते. ते म्हणजे जीवनाच्या प्रत्येक कोपर्यात कल्पकतेला असलेले महत्त्व- मानवी जीवनाचा असा एकही कोपरा नाही की जिथे चिनी कल्पकतेने प्रवेश केलेला नाही. मी चीनला गेलेलो नाही, पण चिनी जीवनाच्या प्रत्येक कोपर्याचे तपशीलवार दर्शन समाजमाध्यमावर येणार्या रिल्समुळे, प्रवासी ब्लॉगरसनी केलेल्या चित्रणामुळे आणि माहितीपटांमुळे मला घडते. तसेच चीनला भेट देऊन येणारे लोक पण याचीच पुष्टी करतात.
"मानवी कल्पकता" माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने मानवी जीवनाच्या प्रत्येक वैशिष्ट्याचा कल्पकतेशी काही संबंध आहे का याचा शोध घ्यायचा मी सतत प्रयत्न करत असतो. त्यात यावर्षी आपल्या देशाला डिझाईन इकॉनॉमीकडे न्यायचा मानस अर्थमंत्र्यानी यावर्षीच्या अर्थसंकल्पात व्यक्त केला असल्यामुळे परत एकदा मी या विषयाकडे ओढला गेलो.
डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
डिझाईन इकॉनॉमी म्हणजे कल्पकतेवर आधारलेली अर्थव्यवस्था. हा विषय किती खोल आणि गंभीर आहे हे फार थोड्या लोकांना पटेल. कल्पकतेचा अर्थ म्हणजे समस्येला वेगळ्या नजरेने पाहणे, प्रस्थापित गृहितकांना प्रश्न विचारणे, प्रत्यक्ष संबध नसलेल्या संकल्पना नावीन्यपूर्ण रीतीने एकत्र आणणे इ० अशा पद्धतीच्या विचारसरणीला धर्म, संस्कृती, प्रचलीत उद्योग इ० चा मोठ्ठा अडथळा असतो.
कल्पकता, सर्जनशीलता या मानवी बुद्धीची सर्वात अस्वस्थ करणार्या क्षमता आहेत. त्या स्वीकारलेल्या सत्यांना प्रश्न विचारतात, परंपरांना छेद/आह्वान देण्यास प्रवृत्त करतात, आणि स्थैर्याला धोक्यात टाकतात. म्हणूनच कोणताही समाज—जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे—सर्जनशीलतेला मर्यादा घालणाऱ्या संरचना उभ्या करतो. धर्म, संस्कृती आणि उद्योग या त्यातील तीन सर्वात प्रभावी शक्ती आहेत.
धर्माचा मूलभूत स्वभाव निश्चित उत्तरांकडे असतो कारण श्रद्धा टिकवण्यासाठी अनिश्चितता कमी करावी लागते; प्रश्नांना सीमा घालाव्या लागतात. परिणामी, का? पेक्षा असेच आहे याला प्राधान्य मिळते. नव्या विचाराला धोकादायक किंवा त्याकडे संशयाने बघितले जाते.
कल्पकता मात्र प्रश्नांवर जगते. ती अपरंपरागत, अस्वस्थ आणि कधी कधी अपमानास्पदही असू शकते. म्हणूनच जिथे धर्म सामाजिक नियंत्रणाचे साधन बनतो, तिथे सर्जनशीलता सहन केली जात नाही तर फक्त निर्दयपणे नियंत्रित केली जाते.
मानवी संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजाची स्मृती. पण ही स्मृती जेव्हा पूज्य बनते, तेव्हा ती अडथळा ठरते. मग “आपण नेहमी असेच करत आलो आहोत”, “हे आपल्या संस्कृतीत बसत नाही” ही वाक्ये सर्जनशीलतेची सौम्य पण प्रभावी हत्या करतात. संस्कृती जितकी स्वतःबद्दल असुरक्षित, तितकी ती बदलांबाबत आक्रमक होते. परिणामी, नवे विचार अनैतिक, पाश्चात्त्य, किंवा मूल्यविरोधी ठरवले जातात. डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते. अशा संस्कृतीमध्ये परंपरा प्रेरणा देते, आदेश नाही. व्यक्तीच्या आयुष्यात अतिरेकी ढवळाढवळ करणारी संस्कृती म्हणूनच कल्पकतेबरोबर सोहार्दाचे नाते निर्माण करू शकत नाही. भवभूती पासून The Sky Is Pink या चित्रपटात हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला गेला आहे.
आधुनिक उद्योगांचे यश इतर अनेक घटकांबरोबर कार्यक्षमता/उत्पादकता या संकल्पनांवर अवलंबून असते. मोजता येईल तेच महत्त्वाचे, धोका म्हणजे खर्च, अपयश म्हणजे नुकसान अशा धारणांनी बनलेल्या चौकटीत सर्जनशीलता खर्चिक, अनिश्चित आणि अव्यवहार्य वाटते. म्हणून उद्योग सर्जनशीलतेला ती नफ्यात मोजता येईल तेव्हाच स्वीकारतो. पण डिझाइन इकॉनॉमीमध्ये मात्र अपयशाकडे गुंतवणूक म्हणून पहावे अशी अपेक्षा असते. पण जो उद्योग अपयश सहन करू शकत नाही, तो नावीन्यही निर्माण करू शकत नाही.
कल्पकतेची मानके
एखाद्या मानवसमूहाची कल्पकता मोजायची कशी हा अत्यंत अवघड कळीचा मुद्दा कधीतरी या चर्चेत विचारात घ्यावाच लागतो. त्या समूहाने स्वत:चे अस्तित्व टिकविण्याकरता कोणती लोकोत्तर साधने, विचारसरणी, कला आणि तंत्रज्ञान आणि इतर व्यवस्था निर्माण केल्या हा प्रश्न निर्णायक बनतो. निर्माण झालेली प्रत्येक कल्पना लोकोत्तर असेलच असे नाही. मग नोबेल पुरस्कार, गिनीज बुक आणि पेटंट संख्या अशी कामचलाऊ मानके स्वीकारून एखाद्या देशाच्या कल्पकतेचे मोजमाप केले तर ते चुकीचे ठरू नये.
त्यामुळे मी धर्म आणि आता पर्यंत जाहिर झालेले नोबेल पुरस्कार यांचा संबंध तपासायचा प्रयत्न केला तेव्हा ख्रिश्चन आणि ज्यू धर्मियांनी यात आघाडी मिळवली आहे. हिंदू (आणि आता सनातन), इस्लाम यात लज्जास्पद पिछाडीवर आहेत. चीनने नोबेल पुरस्कार मिळवले नसले तरी पेटंटच्या संख्येतील त्यांची आघाडी लक्षणीय आहे.
"चीन मध्ये जाऊन राहा" असा सल्ला देणार्या प्रत्येकाने हिंदू धर्मियांचे नोबेल पुरस्कार आणि पेटंटमध्ये नगण्य योगदान का? यावर मौलिक चिंतन करावे आणि डिझाईन इ कॉनॉमीचे ध्येय कसे गाठता येईल याचे उत्तर शोधावे, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरू नये.
टीप - * हा अनुभव ए०आय०ला सांगितला तेव्हा ए०आय०चा केवळ मजेशीर नाही तर फारच मानवी होता- "अशा लोकांशी वाद घालायचा की सोडून द्यायचा" हा प्रतिप्रश्न वाचून मी थक्क झालो.
वाचने
2961
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
चीन
चिनी राज्य
मी चीनला गेलेलो नाही,
In reply to मी चीनला गेलेलो नाही, by सुबोध खरे
'मी चीनला गेलेलो नाही,'
मुद्दा भरकतो आहे.
लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती
In reply to लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती by सुबोध खरे
डॅाक,
डॅाक,
चला तो चांद तक नाही तो शाम तक
In reply to चला तो चांद तक नाही तो शाम तक by सुबोध खरे
परत तेच............................
In reply to परत तेच............................ by पंतश्री
श्री० पंतश्री
In reply to श्री० पंतश्री by युयुत्सु
त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन
In reply to श्री० पंतश्री by युयुत्सु
काय चाललंय..?
In reply to परत तेच............................ by पंतश्री
@ पंतश्री
In reply to परत तेच............................ by पंतश्री
@ पंतश्री
In reply to चला तो चांद तक नाही तो शाम तक by सुबोध खरे
=))
😎
असो, अजून काहीही अवांतर न करता मी थांबतो! - (वस्तुनिष्ठ) सोकाजीवर केल्या गेलेल्या
In reply to वर केल्या गेलेल्या by युयुत्सु
आपल्याकडे किती धर्माचार्यांनी
जपानची नोबेल पारितोषिके
In reply to जपानची नोबेल पारितोषिके by पंतश्री
जपानी इन्वेंशन
किडकी प्रजा!
In reply to किडकी प्रजा! by युयुत्सु
दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर
अरे वाह !!
१८५१ ची पहिली अभियांत्रिकी महाजत्रा
In reply to १८५१ ची पहिली अभियांत्रिकी महाजत्रा by गामा पैलवान
ऑ??? तांत्रिकी प्रदर्शन आणि
In reply to ऑ??? तांत्रिकी प्रदर्शन आणि by कॉमी
प्रदर्शनातला हत्ती
In reply to प्रदर्शनातला हत्ती by अभ्या..
हा हा लोल.
एकाच व्यक्तीने दोन आयडी घेऊन
ग्रेट एक्झिबिशन मधील प्रमुख आकर्षण
शांघाय
अवांतर : चीनमधले अल्पसंख्य