चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
पाहता पाहता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला. थर्टीफर्स्टची धुंदी अजून उतरलेली नसतानाच, स्नेहीजणांनी दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा अजून मनात असतानाच, त्यांनी दिलेल्या संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा अजून जिभेवर असतानाच येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाचे वेध लागले आहेत. नवीन वर्षाचा साडेआठ टक्के काळ संपून फेब्रुवारी महिना सुरूही झालाय.
काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
मागच्या महिन्यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
सुरुवातीलाच ट्रम्पने वेनेझुएलाच्या अध्यक्ष दांपत्याला "Operation Absolute Resolve" च्या नावाखाली बळजबरीने उचलून नेले; पण "डोंगर पोखरून उंदीर काढला" अशी काही अवस्था झालीय असे दिसते आहे. इराणमध्ये सरकारने "बंड मोडून काढले" अश्या बातम्या माध्यमे देत आहेत परंतु अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. बांगलादेशातील हिंदू, ख्रिस्ती व इतर अल्पसंख्याक नागरिकांचे - हत्या, बलात्कार, जाळपोळ, लुटालूट इ प्रकारे शिरकाण सुरूच आहे. भारताने युरोपिअन युनिअनशी महत्वाचा व्यापार करार केला आहे.
महाविद्यालये-विद्यापीठे अश्या उच्च शिक्षण संस्थातून हिंदू विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांच्या फूट पाडू पाहणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यादेशाला सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पश्चिम बंगालसाहित पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी युतीने बहुतांश ठिकाणी सत्ता काबीज केली आहे. पण अनेक ठिकाणी महापौर निवडीला अजून मुहूर्त लागला नाहीय. या निवडणुकांत एमआइएमने मिळविलेल्या सव्वाशेहून अधिक जागा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरल्या. याचा भविष्यातील राजकीय समीकरणांवर विशेषतः या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल याची उत्सुकता आहे.
फेब्रुवारी महिना म्हणजे अर्थसंकल्प महीना! यावर्षी पहिल्यांदाच रविवारी (आज) केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे.
मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र हळहळला. त्यांच्यासारखा रोखठोक बोलणारा व वागणारा राजकारणी, अधिकारी-कर्मचारी वर्गात दरारा असलेला कुशल प्रशासक, असंख्य पाठीराखे असलेला लोकनेता आता आपल्यात नाही हे वास्तव नि:शब्द करणारे आहे. त्यांच्या मृत्यूला अजून तेरा दिवसही झालेले नसताना श्रीमती सुनेत्रा पवार यांचा काल उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला.
राजकारण कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
मागच्या महिन्यात "यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की" असे भाकीत केले होते. चांदीही बरीच वर-खाली होत आहे. शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात एकदम अकरा टक्के घट झाली तरीही दिवाळीआधीच नव्हे तर "अधिक महिन्यापर्यंतच सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल असे दिसते आहे"!
व्यवहार कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
- कांदा लिंबू
प्रतिक्रिया
1 Feb 2026 - 9:35 am | कंजूस
>>>ट्रम्पने वेनेझुएलाच्या अध्यक्ष दांपत्याला "Operation Absolute Resolve" च्या नावाखाली बळजबरीने उचलून नेले; पण "डोंगर पोखरून उंदीर काढला" अशी काही अवस्था झालीय असे दिसते आहे.>>>
वेनेझुएला ताब्यातच घेतला आहे. अमेरिकन तेल कंपन्याने विहिरींचा ताबा घेतला आहे. "आता भारत इराणचे तेल घेणार नाही, व्हेनेझुएलाचे घेणार" - ट्रंप. [ पैसे अमेरिकेला मिळणार].
घरातुन तेल कुणी घेऊ नये म्हणून नाकाबंदी केली आहे. इराणचे चलन एक डॉलरला एक लाख रियालपेक्षाही जास्त झाले आहे.
ग्रिनलँडही ताब्यात घेणार. तिथली खनिजे विकणार.
1 Feb 2026 - 9:37 am | कंजूस
दुरुस्ती *घरातुन* ... इराण मधून.
2 Feb 2026 - 12:21 pm | विजुभाऊ
भारताने चाबहार बंदरावरचा हक्क सोडला की कसे याबद्दल संभ्रम आहे.
चाबहार बंदर सोडावे या बदल्यात अमेरीका भारतावरचे टेरीफ शिथील करेल अशी काहीतरी अट होती.
सुनेत्राताईंच्या शपथविधीत अजिबात सहभागी न झाल्यामुळे श प गटाचे इरादे स्पष्ट झाले आहेत. शरद पवार गटाला आता नवसंजीवनीची गरज भासणार आहे असे .
बारामतीचे काका जरांगे पाटलांचे भूत पुन्हा एकदा जागे करतील असा अंदाज वर्तवला जातोय.
मुंब्र्यात जितेंद्र आवाढांना मात्रजूनही धक्का पचवता आलेला नाहिय्ये
2 Feb 2026 - 2:58 pm | अमरेंद्र बाहुबली
विमान अपघातावेळी 'धुकं नव्हतं तर तिथं धोका' होता, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय; आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केली शंका
https://marathi.abplive.com/news/politics/ncp-mla-amol-mitkari-expressed...
3 Feb 2026 - 5:59 am | कंजूस
युरोपियन देशांशी झालेल्या करारानुसार आता...
झाला एकदाचा अमेरिका- भारत व्यापार करार. रशियन तेल घेतले नाहीतर १८%सीमाशुल्क आयात शुल्क.
भाजपा नेते - - कौतुकास्पद, गरजेचा, देशाला उभारी देणारा.
विरोधीपक्ष - - आत्मनिर्भरता नाही तर ही आहे ट्रंप निर्भयता.
______________________
अमेरिका, रशिया किंवा चीनला दुखवून चालणार नाही. काहीतरी करायला हवेच होते. कसं आणि किती हे प्रत्येक सरकार वेगळेच उपाय सांगेल.
3 Feb 2026 - 6:14 am | कांदा लिंबू
ट्रम्प म्हणतोय भारत रशियाचं तेल सुद्धा घेणार नाही; मोदी किंवा जयशंकर त्याबद्दल काही बोलत नाहीयेत; खरं काय ते कळायला अजून थोडा वेळ लागेल.
पण एकूण तो करार झाला हे चांगलं झालं असं वाटतं; जाणकारांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत...
3 Feb 2026 - 8:53 am | अमरेंद्र बाहुबली
घालीन लोटांगण वंदिन चरणे! :)
3 Feb 2026 - 6:00 am | कंजूस
दुरुस्ती *करारानुसार* - करारानंतर.
3 Feb 2026 - 8:18 am | कंजूस
एका पुस्तकावर चर्चा आणि विरोध लोकसभेत. माजी आर्मी मुख्य यांनी लिहिलेले एक पुस्तक सरकारवरच्या टीकेमुळे चार वर्षे झाली तरी प्रकाशित होऊ शकले कमी. त्याबद्द्ल एका मासिकात लेख आला होता त्यातील उतारे राहुल गांधी वाचून दाखवणार होते त्यास विरोध झाला. चीनचा ढोकलाम येथील हल्ला आणि त्यावर काय कृती करायची यावर सरकारकडून लगेच आदेश येत नव्हते. त्यामुळे सैन्यदल विवंचनेत पडले होते, दिरंगाई झाल्याचे आरोप केले आहेत.
3 Feb 2026 - 8:44 am | आग्या१९९०
कशाला जखमेवर मीठ चोळता. ट्रम्पने हात पिरगळून विश्वगुरूचा माज निथळून टाकला, तो अपमान चेहऱ्यावरून उतरून द्या की.
3 Feb 2026 - 8:53 am | अमरेंद्र बाहुबली
+१
3 Feb 2026 - 11:11 am | कंजूस
आपला एक हात दगडाखाली आहे सध्या; युरोपियन देश आणि कॅनडा यांचाही आहे. ते सर्व एक झाले. तेलाच्या राजकारणात प्रगती थंडावू शकते.
आमचा एक सहकर्मचारी म्हणायचा की प्रत्येकाने आयुष्यात पत्त्यांचे डाव ( मिंढीकोट, रमी किंवा ब्रिज ) अवश्य खेळले पाहिजेत. कारण त्यातून शिकता येतं. विरोधी गटाने हुकमाचं पान उतरल्यावर आपल्याला काहितरी आहुती टाकावीच लागते. ती कोणती हा डोक्याचा खेळ आहे. आपल्या भिडूचंही एक पान वाया जातंच.
पन्नास टक्के आकडा ट्रंपनेच ठरवला होता आणि आताचा १८ टक्केही त्याचाच. (दुसरे कोणते सरकार असते तर हेच आकडे किती असते याचा काही अंदाज ?) नवीन लोकांना विजा फी एक लाख डॉलर्स हीसुद्धा त्याचीच करतूत. सध्या MAGA चं भूत डोक्यावर आहे. इथे किंवा इतर देशांच्या मानगुटीवर बसून पैसे वसूल करणे हे उद्योग सुरू आहेत. चीनने बऱ्याच कंझुमर वस्तुंचा व्यापार अमेरिकेकडून हिसकावलेला आहे. आपल्या नागरिकांना ते घेऊ नका सांगण्याऐवजी आयात शुल्क वाढवून ठेवले. वस्तू घ्यायच्या आहेत ना घ्या. देशालाही शुल्क मिळेल.
3 Feb 2026 - 12:13 pm | सुबोध खरे
जाऊ द्या हो
मोदी रुग्णांची गळवे ठसठसत आहेत.
त्यांच्यासाठी कुठेही काहीही चान्गल्या बातम्या येत नाहीयेत.
आता अजित दादा गेल्यावर सुनेत्रा ताईंचा लगेच शपथविधी उरकून फडणवीसांनी काकांच्या अंगावरचं तेल काढून त्यांना कोरडं केलंय.
घड्याळ हे चिन्ह किंवा अजित गटाचे आमदार सत्तेची उब सोडून शक्यता सध्या तरी शून्य दिसते आहे.
फडणवीसांना जातीवरून किंवा त्यांच्या अगोदरच्या देहयष्टीवरून दूषणे देणाऱ्यांची फडणवीसांनी पार गोची करून ठेवली आहे
त्यामुळे "१०५ आमदारांना घरी बसवले" म्हणून पुंगी वाजवणाऱ्यांची पुंगी वाजतही नाहि आणि किडकी निघाल्यामुळे खाता ही येत नाही अशी केविलवाणी परिस्थिती झाली आहे.
त्यामुळे ते बावचळले आहेत आणि बेताल बडबड करत आहेत.
दुर्लक्ष करा त्यांच्याकडे
3 Feb 2026 - 7:13 pm | विजुभाऊ
न प्रकाशित झालेल्या पुस्तकातल्या उतार्यावरून राहुल गांधीनी निवेदन केले.
नेमके पुरावे दिलेच नाहीत त्यानी
4 Feb 2026 - 5:06 am | कंजूस
सरकारात मंत्री आणि अंमलबजावणी खात्यातले कर्मचारी. रिटायर झालेल्या प्रत्येकाकडे काही किस्से असतातच. ते सांगतात. कर्मचाऱ्यांचे काम फक्त आदेश पाळणे एवढंच असतं. निर्णय कुणी का घेतला यात शिरायचं नसतं. भल्यावाइटाची जबाबदारी सरकारवर असते. विरोधी पक्षाचं काम सत्तेतल्या सरकारला जाब विचारणं. जर का पूर्व सैन्य प्रमुखांनी काही लिहिलंच नसतं तर काय झालं असतं?
3 Feb 2026 - 11:37 pm | कांदा लिंबू
मागच्या दहा-बारा वर्षांपासून बहुतांश काळ देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पण त्यांच्या पत्नी बद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी मंडळी वाढत चालली आहेत.
"देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र" अशीच परिस्थिती आहे, नाही का?
https://youtube.com/shorts/E-sSsP3sz0c?si=IiEAQowgLKmo_6VH
https://youtu.be/f9h1QMnr8lE?si=zQbUMUEi9CUAtsv_
4 Feb 2026 - 9:15 am | धर्मराजमुटके
लोकमत मधील बातमी
महाराष्ट्र शिक्षक परी़क्षेत फक्त ११.१८% शिक्षक उत्तीर्ण झाले.
महा टीईटी परीक्षेत ४ लाख ७५ हजार ६६९ शिक्षकांपैकी ३ लाख ९६ हजार शिक्षक अनुत्तीर्ण झाले आहेत.
आणी हेच मुलांचे आणि देशाचे भविष्य घडविणार म्हणे.
गावोगावी ५ -६ लाख रुपये भरुन शिक्षक भरुन शाळांमधे शिक्षकाची नोकरी मिळते. शहरातला भाव तपासायला पाहिजे.
# पढेगा इंडीया तभी तो बढेगा इंडिया
4 Feb 2026 - 10:05 am | कंजूस
आता एआइ सर्व उत्तरे देत आहे. ते जाऊ दे पाठ्यपुस्तकातील धड्यांची ( चित्रं वगळून ) text file( १००- २००kB size) केली की ती कोणत्याही मोबाईलमध्ये उघडते. पुस्तकंही विकत घ्यायला नकोत. अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना काहीच अडचण नाही. अगदी सात वयापर्यंतच्या मुलांना शिक्षक समोर लागतो.
4 Feb 2026 - 10:51 am | गवि
तुम्हाला नाही वाटत की हे फार म्हणजे फारच ओव्हर सिम्प्लीफिकेशन केलं जातंय.. ? चित्रं वगळून, फक्त टेक्स्ट मोबाईलवर, विकत न घेता उपलब्ध झालं की अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना काहीच अडचण नाही?
म्हणजे केवळ पुस्तके उपलब्ध झाली की ज्ञान मेंदूत जायला काहीच अडचण नाही ? ज्याला काही करून शिकायचेच आहे तो साधने मिळवतोच हो. इथे प्रश्न आहे त्यांना ते समजावे, शिकवले जावे. तुम्ही शिक्षक अस्तित्वात असण्याच्या गरजेला, आकृत्या आणि चित्रे यांच्या महत्वाला मोडीतच काढलेत की. इतके सोपे आहे का शिकून पास होणे ?
4 Feb 2026 - 11:03 am | युयुत्सु
श्री० गवि
तुम्ही म्हणता की - आकृत्या आणि चित्रे यांच्या महत्वाला मोडीतच काढलेत की
हा मुद्दा सोडला तर मला तुमची विचारसरणी भविष्याच्यादृष्टीने धोकादायक वाटते. बदलत्या काळानुरुप शिक्षण जुनाट पद्धतीने चालू ठेवायचे की त्यात अनुरुप बदल करायचे?
4 Feb 2026 - 11:46 am | गवि
अहो, पुस्तक मोबाईलवर येणे किंवा सहज मोफत उपलब्ध होणे या भागाबद्दल मी बोलत नाहीये. केवळ पुस्तक हातात उपलब्ध झाल्याने अभ्यासात काहीच अडचण राहणार नाही ? म्हणजे आमच्यासारखे असंख्य लोक ज्यांना पुस्तके उपलब्ध होती त्यांना आपोआप अभ्यास जमला आणि ज्ञान मिळाले ? सामान्य विद्यार्थ्यांचा विचार आहे हे म्हणण्यामागे. शिक्षक हवा. पुस्तक पुरेसे नाही. तो शिक्षक AI च्या रूपात आला तरी स्वागत आहेच. पण सामान्य विद्यार्थी केवळ पुस्तक मोबाईल स्क्रीनवर आलं की आपोआप शिकून AI ला अडचणी प्रॉम्प्टद्वारे विचारून आपले ज्ञान आपले आपण मिळवून पास होईल, यश मिळवेल हे ओव्हर सिम्प्लीफिकेशन आहे.
4 Feb 2026 - 12:43 pm | युयुत्सु
श्री० गवि
खुलाशाबद्दल आभार... पण गैरसोइचे सत्य असे पारंपरिक भारतीय शालेय शिक्षण-पद्धती मला अत्यंत मागास वाटते. प्रत्येक व्यक्ती/मूल वेगवेगळ्या तर्हानी शिकते याचा थोडाफार विचार बालशिक्षणात केला जातो. पण तो बेसिक्स पुरता... एकदा शाळा सुटली की शिक्षण अतिशय रटाळ बनते. मग ते एखादे सामान्य कॉलेज असो की एखादे प्रतिष्ठीत संस्थान असो. शिकायचे काय आणि शिकायचे कसे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दुसर्या गोष्टीवर भर देणारे शिक्षक नंतर दूर्मीळ होत जातात. त्यात आपल्या देशात कल्प्कता, लर्निंग पेस इ० संकल्पनांकडे तुच्छतेनेच बघितले जाते.
4 Feb 2026 - 4:27 pm | सोत्रि
प्रचंड ताकदीने सहमती!
विषय अप्लाईड पद्धतीने शिकवले पाहिजेत ह्या मताचा मी कट्टर पुरस्कर्ता आहे.
- (अप्लाईड) सोकाजी
4 Feb 2026 - 3:53 pm | कंजूस
करोना काळात शाळा बंद. काहींच मुलांकडे चांगले मोबाईल किंवा टॅब किंवा कंपूटर होते. म्हणजे अगदी पूर्ण पुस्तक पीडीएफ मध्ये बालभारतीमध्ये मिळत होतेच. पण मी विचार केला टेक्स्ट फाईल का नसाव्यात? मी केल्या. आणि त्या बटण फोनमध्येही उघडता येत होत्या. प्रश्नोत्तरेही टेक्स्ट फाईल मध्ये पाठवता येतात. त्यासाठी फार वेगवान इंटरनेटची गरज नसते.
आता वरती एक लोकमतची बातमी दिलेली त्यात किती शिक्षक नापास झालेत TET परिक्षेत. म्हणजे आता त्यांच्याकडे चांगली साधनेच नाहीत किंवा TETपरिक्षेचे विषयच भंकस असतील. किंवा निरुपयोगी असतील. पूर्वी मी डीएडच्या/ बीएडच्या अभ्यासक्रमाची पुस्तके वाचली होती तेव्हा लक्षात आले की सगळी भंकसगिरी आहे. काय त्यातील अभ्यासाचा उपयोग की ज्याच्यामुळे शिकवणे सुधारणार? शेवटी विद्यार्थ्यांची आकलनशक्तीच नसेल तर काय होणार? अगदी इंग्रजी विषय असा मराठीतून शिकवतात की त्याची इंग्रजीत प्रगती होऊच नये. आम्हीही असेच शिकलो. ( कोणत्या क्रियापदाला ed लावायचा, as soon as - no sooner than अर्धा तास रेकून नंतर कळले की तो प्रयोग फार क्वचितच वाचायला मिळतो. पण एका गुणासाठी आठवडे घालवलेत.) यूट्यूबवरचे काही विडिओ पाहा. याबद्दल मला कर्नाटकातून आलेल्या सहकर्मचाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्रात इंग्रजी वाढवण्याची पद्धत गचाळ आहे. हे झाले इंग्रजीचे.
मान्य आहे की जिथे आकृत्या पाहिजेत तिथे पीडीएफ लागेल. पण भाषा आणि इतिहास यासाठी नकोच.
आता काय ज्ञान फुकट कुठेही मिळतेय पण क्लासातच जायचे सगळ्यांना मग शाळा आणि मोठी दप्तरे कशाला हवीत?
4 Feb 2026 - 4:12 pm | अभ्या..
पूर्ण योग्य आदरासहित म्हणू इच्छितो की
कंजूस काका हे बेसिकली जुगाडू वृत्तीचे आहेत आणि त्याचा भले त्यांना कितीही फायदा झाल्याचा इतिहास असला तरी ह्या जुगाडू वृत्तीनेच भारताचा प्रचंड घात केलेला आहे.
प्रत्येक गोष्टीत कमी ज्ञान, कमी कष्ट, आणि सुलभीकरणाला स्मार्टनेस च लेबल लावल्यानं मूळ संशोधन करण्याची, पूर्ण अभ्यासाची वृत्ती तर मारली जातेच शिवाय असं काही करणाऱ्याबद्दल सार्वत्रिक तिरस्काराची भावना वाढीस लागते.
येणाऱ्या पिढीबद्दल थोडीही कळकळ असेल तर अशा प्रवृत्तींना वेळीच लगाम घालायला हवा हे माझे वैयक्तिक मत आहे.
धन्यवाद
5 Feb 2026 - 3:05 am | कंजूस
बरोबर.
>>सुलभीकरणाला स्मार्टनेसचं लेबल लावल्यानं ....>
सुलभीकरण हीसुद्धा एक शाखाच आहे. प्रत्येकानेच संशोधन करावे असं नाही. किंवा असं म्हणेन की एखाद्याला काही विषयात गती असते पण इतर बाबतीत गरजेची गोष्ट सुलभ रीतीने अशी करायची हे जाणून घ्यायचे असते. यूट्यूबवर असे असंख्य विडिओ पाहूनच काही लोक कामं निपटतात.
4 Feb 2026 - 12:32 pm | कांदा लिंबू
१९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला पूर्णतः नमविले, लाखभर सैन्याला "कैदेत ठेवले", आपल्या अटींवर तह केला वगैरे इतिहास साधारणतः माहीत आहे.
तथापि, त्यावेळी भारताने -
१. chicken's neck रुंद करून घेण्याचा प्रयत्न केला होता का?
२. मिझोरामच्या दक्षिणेकडचा चित्तगॉंग वगैरे भाग काबीज करून घेण्याचा प्रयत्न केला होता का?
तेव्हाच्या २५ वर्षांपूर्वी हे भाग हिंदुस्तानचेच होते; पाकिस्तान शरण आलेलाही होता. फारसा विरोध झाला नसता. झाला असता तरी तो मोडून काढणे फारसे अवघड नव्हते.
ही खालील बातमी वाचून वरील प्रश्न पडले. जाणकार प्रतिसादाची प्रतीक्षा.
Amid threats to ‘chicken’s neck’, India to take rail corridor
4 Feb 2026 - 1:50 pm | अमरेंद्र बाहुबली
चिकन नेक मोठी करून काय मिळवणार होते? तसेही मुस्लिंबहूल भागच भारतात आला असता. दुसरी गोष्ट भारताने शरणार्थी समस्येमुळ बांगलादेशात सैन्य मोहीम हाती घेतली ह्यामुळे चीनसारखे देश शांत बसले! भारताने जराही जागा मिळवण्याची हालचाल केली असती तर युद्ध दुसरीकडे वळले असते.
ईशान्य भारताला समुद्र किनारा असायला हवा होता! तो चितगाव भागातून इंग्रजांच्या वेळेसच मिळवता आला असता!
4 Feb 2026 - 6:34 pm | सुबोध खरे
बांगलादेश युद्धाच्या वेळेस पश्चिम पाकिस्तानचा १३००० ते १५,००० चौरस किमी भू भाग आपण व्यापला होता.
तो हि ९३,००० युद्धकैद्यांच्या बरोबर इंदिरा गांधी यांनी सिमला करारानुसार पाकिस्तानला परत केला.
म्हणजे सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून युद्धात मिळवलेले यश इंदिरा गांधी यांनी बुळेपणाने वाया घालवले असेच दुर्दैवाने म्हणावे लागते
भारताच्या हातात भोपळा सोडून काय लागलं?
एकंदर नेहरू कुटुंबीय हे पाक धार्जिणेच होते हे भारताचे दुर्दैव.
Following the 1971 Indo-Pak war, India returned approximately 13,000 to 15,000 square kilometers of captured territory in West Pakistan under the Simla Agreement signed on July 2, 1972. While Indian forces held this land, it was returned as a gesture of goodwill to foster long-term peace and secure a lasting resolution to the Kashmir issue.
https://www.news18.com/india/pahalgam-terror-attack-captured-land-return...
आज पाकिस्तान आणि बांगला देश आपल्या बरोबर ज्या तर्हेने वागत आहेत ते पाहिल्यावर श्री आचार्य अत्रे यांनी म्हटलेले सार्थ वाटते.
व्यर्थ मी जन्मले हिंदू कुळी
लागला काँग्रेसचा फास गळी
4 Feb 2026 - 7:46 pm | अमरेंद्र बाहुबली
म्हणजे सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून युद्धात मिळवलेले यश इंदिरा गांधी यांनी बुळेपणाने वाया घालवले असेच दुर्दैवाने म्हणावे लागतेइंदिरा गांधीना बुळे म्हणणे वाघिणीला शेळी म्हणण्यासारखे आहे, पाकिस्तान सुद्धा असे म्हणायला चार वेळा विचार करेल .
आजपर्यंत जी हिंमत कोणत्याच मायच्या लाल ने दाखवली नाही ती हिम्मत त्यांनी दाखवली होती, आणी मुळात पाकिस्तानला त्यांच्या ९३ हजार सैनिकांची गरज नव्हती. भारताला ते पोसावेच लागले असते, पाकिस्तानने कसलीही निगोसिएशन केले नसते. भारताचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर तसेही युद्ध थांबवणे नीतिमत्तेला धरून होते. त्यात रशिया, चिन अमेरिका वगैरेकडून बांगलादेश वेगळा झाल्यानंतर भारतावर दबाव होताच! आजकालचे नेते गुजरातवर ड्रोन हल्ले व्हायला लागल्यावर लगेच ट्रम्प ला पकडून सिझफायर घोषित करून शरण जातात, पण इंदिरागांधिनी अमेरिकेच्या नाकावर टिच्चून पाकिस्तानचा तुकडा पाडला! नी त्या बुळ्या! खो खो!
5 Feb 2026 - 12:49 am | स्वधर्म
इंदिरा गांधीनी युध्द थांबवलं. ते मी थांबवलं असं म्हणण्याची कोणाही दुसर्या देशाच्या नेत्याची हिंमत झाली नव्हती. बरोबर ना?