वोट चोरी वर चर्चा
बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा.
गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.”
मी विचारलं, “कसं शक्य आहे? ईव्हीएमला इंटरनेट कनेक्शन नसतं. शिवाय एकदा मतदान झालं की ती मशीन बंद केली जाते—वीजही नसते.”
तो म्हणाला, “आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. इंटरनेट नसतानाही आकाशीय तरंगांच्या माध्यमातून ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो.”
त्याची गूढ भाषा मला काही समजली नाही. शेवटी मी त्याला म्हटलं, “मला तुझं सगळं पटतंय. ईव्हीएममध्ये वोट चोरी होऊ शकते.”
तो खुश झाला. म्हणाला, “म्हणजे राहुल गांधींचे आरोप बरोबर आहेत!”
तेवढ्यात मला पार्कमधल्या एका बाकावर एक गृहस्थ टाइम्स ऑफ इंडिया वाचताना दिसले. मी त्याला विचारलं, “आकाशीय तरंगांच्या माध्यमातून या वर्तमानपत्राचं नाव बदलून हिंदुस्तान टाइम्स करता येईल का?”
ते माझ्याकडे पाहून म्हणाले, “काका, हे शक्य नाही. कागदावर छापलेले शब्द बदलता येत नाहीत.”
मी म्हणालो, “ईव्हीएमचा डेटा जर बदलला, आणि त्यानुसार छापील कागदी स्लिप्स बदलल्या नाहीत, तर चोरी सहज उघडकीस येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही निवडणूक क्षेत्रांमध्ये ईव्हीएमसोबत छापील स्लिप्सची मोजणी केली जाते. त्यामुळे वोट चोरी शक्य नाही.”
त्याचं तोंड अगदी लहान झालं. म्हणाला, “मला हे माहीत नव्हतं.”
बहुतेक त्याने कधीच मतदान केलेलं नसावं.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
“म्हणजे राहुल गांधींचे आरोप बरोबर आहेत!”
राहुल बाबचे आरोप चुकीचे आहेत.
तरुणांमध्ये वोटचोरीबद्दल
तुमचे म्हणणे सत्य अशिक्षित
कुठलेही इलेक्ट्रॉनिक device
खिक्क !!
आपण यातील तज्ज्ञ दिसत, कृपया
सेट केले असतील तर? कारण
बापरे ! आता खाकरे, ढोकळे, फरसाण वगैरे खाणे बंद केले पाहिजे
खाकरे, ढोकळे, फरसाण नाय वो,
खाकरे, ढोकळे, फरसाणनाय वो, नाक्यावरचा मारवाडी देखील बनवतो,महाराष्ट्रात बरका! :)आबामारवाडी म्हंजे परत गुजरातीच ना.....
माझ्या वरीलएकाही प्रश्नाचे
मला माहित नाही. मी ईव्हीएम
तर तुम्ही मूर्खांच्या
तर तुम्ही मूर्खांच्या स्वर्गात राहत आहात..+१परंतु जर तुमच्याकडे
१००१% सहमत!
असहमत.
आकाशीय तरंग घेण्याची सुविधा
जिथे चिप आहे , म्हणजे machine
एका calculator ला चालवून
तेच म्हणतो मी. कॅलक्युलेटर २
सर्वज्ञ म्हणतात ना
हॅकिंग फक्त तरंग मधूनच होत
तसं कसं
+1 कितीही पुरावे दिले तरीही
दिल्लीच्या मुख्यमंत्री बाईंनी
calculator ला हॅक करून
तुम्ही अजूनही वायरलेस
निपा,
मला वाटतं तुम्ही दुसऱ्या
>>ईव्हीएम मशीन हॅक करता येते
कदाचित! मला अमेरिकन प्रणाली
बिना निवडणूक जिंकता रस्त्यावर
आज राहुल गांधींनी टाकलेली "
आज राहुल गांधींनी टाकलेली "
अडवणूक आयोग भाजपला मदत करायला
भाजपनेही उपकाराची जाणीव ठेऊन
वाचत आहे ....
याच क्लिपमधे
पुरावे कोर्टासमोर कधीच आणत
पप्पू आणि मतचोरी
पद्धतशीर प्रयत्न ?
पप्र मी केलेला नाहीये ....
एकदा मत बनवलं की मग काहीही शक्य किंवा अशक्य
हम्म्म
इव्हीएम बनवताना, त्यात उमेदवारांची नांवे घालताना, ते परत नेऊन ठेवल्यावर गोदामात इ.इ. त्याला अॅक्सेस हा असतोच. त्या अॅक्सेस मध्ये काय करता येईल याच्या शक्यता अनंत आहेत.इतकेच नाही, मतदार नोंदणी पासून ते निकाल जाहीर करुन सर्टीफिकेटं देण्यापर्यंत जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे. त्यातल्या बहुतांश घटक संशयास्पद वाटत आणि तसेच वागतही आहेत. फक्त मतदानयंत्रावर आणि ते हॅक होते की नाही हे सुध्दा स्वतःच्या पध्दतीने ठरवणार्या निवडणूक आयोगावर कितपत विश्वास ठेवायचा हेच ठरत नसताना आणि केवळ तोच मुद्दा उचलून बाकींच्या मुद्द्यांना आणि ते मांडणार्याना खोटे ठरवायचे ही तर पॉलीसी चालू आहे. व्यक्तीद्वेषाची कावीळ असे सतत हिणवत राहून स्वतःही प्रचंड द्वेषपूर्ण विषेशणे वापरणार्यांकडून भले ते कितीही हुशार दाखवत असले तरी तर्कशुध्द सारासार विचार अपेक्षितच नाहिये.हॅकींग करुन दाखवण्याचे आयोगाचे आव्हान
मिपाकरांचा कायप्पावर ग्रुप बनवूया. याची माहीती राहुलजी यांना देऊ
उपहास पोहोचला पण...
तुंम्ही केलेला उपहास पोहोचला पण...मनाचे दार किलकिले-झाले...
तसं असेल तर ठीकच