✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

ग
गवि यांनी
गुरुवार, 06/12/2025 - 16:13  ·  लेख
लेख
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं. इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा. कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते. ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे. अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात. काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार. त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं. हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर. अधिक अपडेट इथे करत राहू.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
43679 वाचन

💬 प्रतिसाद (188)

प्रतिक्रिया

क्रॅश होतानाच्या शेवटच्या

गवि
गुरुवार, 06/12/2025 - 16:32 नवीन
क्रॅश होतानाच्या शेवटच्या क्षणांचा जो व्हिडिओ सर्वत्र दिसतोय (AI वाला नाही किंवा जुना फेक नाही असे गृहीत धरून) त्यात कोणतीही आग किंवा मिसिंग पार्ट दिसत नाही. फ्लॅप्स, जे टेक ऑफच्या वेळी डिप्लॉय केले जातात तेही झालेले दिसत नाहीत. आणखी एक लिहायचं राहून गेलं की ड्रीमलायनरचा हा पहिलाच "हल लॉस" - पूर्ण विमान नष्ट होण्याचा अपघात.
  • Log in or register to post comments

महत्वाचे निरीक्षण. त्याची

गवि
गुरुवार, 06/12/2025 - 16:47 नवीन
महत्वाचे निरीक्षण. त्याची संगती पुढे लागेलच. विमान साधारण सहाशे फूट उंचीवर पोचून मग खाली आलं आहे. व्हिडिओ ओरिजनल असेल तर या स्टेजला लँडिंग गियर (चाके असेम्ब्ली) वर आणि फ्लॅप्स खाली, असे दिसले पाहिजे. इथे उलट दिसते आहे. फ्लॅप्स वर आणि चाके खाली.
  • Log in or register to post comments

विमानाला वर नेण्यासाठी जी

कंजूस
गुरुवार, 06/12/2025 - 19:31 नवीन
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का? म्हणजे विमान उतरण्याच्या वेळी वेग कमी होऊन चाके उघडतात असं काही झालं असेल. या कार्यावळीत इतर काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम घुसेल असं वाटतं नाही. समजा वैमानिकाच्या लक्षात आलं की हवे तेवढे इंधन पुरवले जात नाही तर तो काय करेल? आहे त्या उंचीलाच विमान ठेवून वळवून उतरेल आणि त्यासाठी चाके परत उघडून तयार ठेवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

विमानाला वर नेण्यासाठी जी

गवि
गुरुवार, 06/12/2025 - 22:14 नवीन
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का?
नाही. तसे करता येणे फारच कठीण. जवळपास अशक्य. आणि इंधन बंद झालेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कोणता व्हिडिओ नक्की?

सौंदाळा
गुरुवार, 06/12/2025 - 19:36 नवीन
कोणता व्हिडिओ नक्की? तुम्ही केलेल्या वर्णनावरुन तो नेपाळ मधे झालेल्या अपघाताचा व्हिडिओ असावा असे वाटत आहे. तो व्हिडिओ सध्या फिरत आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पण होते अशी बातमी पाहिली. अत्यंत दु:खद घटना. सर्व मृतांना श्रध्दांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नाही. नेपाळ वाला नाही. हा

गवि
गुरुवार, 06/12/2025 - 22:12 नवीन
नाही. नेपाळ वाला नाही. हा आजचाच आहे. मुख्य वर्तमानपत्रे आणि मिडियात आलाय. इथे टाकता येत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

दुःखद घटना.

कंजूस
गुरुवार, 06/12/2025 - 18:52 नवीन
दुःखद घटना. >>>इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.>> नेमकं. सुखसोयीच्या इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवू नयेत किंवा त्यांचे पॅनेल बोर्ड केबिनमध्ये नसावेत. बोइंगवाले यात शोध घेतीलच. मागच्या काही महिन्यांत बोईंगचे स्पेस स्टेशन शटल अडकले होते याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

फ्लाइट रडार २४ चेक केले असता

आनंद
गुरुवार, 06/12/2025 - 19:30 नवीन
फ्लाइट रडार २४ चेक केले असता टेक ऑफ च्या वेळी वेग कमी होता१२० किलो नॉट्स असावा. शेवटचा डाटा हा १७४ किलो नॉट्स आणि हाइट ६२५ फुट आहे.
  • Log in or register to post comments

६२५ म्हणजे समुद्र सपाटीपासून

गवि
Fri, 06/13/2025 - 11:40 नवीन
६२५ म्हणजे समुद्र सपाटीपासून असते. त्यातून विमानतळाची १७४ वजा करा. जमिनीपासून तितकी. इंजिन बंद नसल्याचा पुरावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

फारच दुःखद घटना !

मारवा
गुरुवार, 06/12/2025 - 19:55 नवीन
मानवी चुकीच्या कारणाने असे झाले तर अधिकच वाईट वाटते. म्हणजे जे टाळणे हातात आहे मानवाच्या ते किमान टाळले पाहिजे.
  • Log in or register to post comments

11 A सीटचा चा प्रवासी वाचला.

Bhakti
गुरुवार, 06/12/2025 - 21:23 नवीन
11 A सीटचा चा प्रवासी वाचला. जो exit door च्या जवळ होता.त्याने तिथून उडी मारली.
  • Log in or register to post comments

*Emergency door!

Bhakti
गुरुवार, 06/12/2025 - 21:23 नवीन
*Emergency door!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

फार फार वाइट

साबु
गुरुवार, 06/12/2025 - 21:53 नवीन
दुःखद घटना. :(
  • Log in or register to post comments

विमानाचे वजन सर्वाधिक अलाउड

गवि
गुरुवार, 06/12/2025 - 22:17 नवीन
विमानाचे वजन सर्वाधिक अलाउड टेक ऑफ वेट पेक्षा जास्त असेल आणि हवा अत्यंत गरम म्हणजे विरळ असेल तर टेक ऑफ घ्यायला बराच अंतर आणि वेळ लागू शकतो. (औरंगाबाद क्रॅश). त्यामुळे वर चढत जाण्याचा दर देखील खूप मंदावू शकतो. पण इथे विमान खाली खाली येताना दिसत आहे. त्यामुळे ही कारणमीमांसा तूर्त रद्द करावी लागेल.
  • Log in or register to post comments

व्हिडिओ

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 06/12/2025 - 22:18 नवीन
विमानाचे उड्डाण झाल्यापासून काही सेकंदात ते कोसळले. उड्डाणापासून कोसळेपर्यंतचा सगळा प्रवास अहमदाबाद विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपला गेला आहे. तो https://youtube.com/shorts/DEjkiah6_JY?si=CJTq6VCB2TwOARFX वर बघता येईल. न्यूज चॅनेलवर अधिक स्पष्ट व्हिडिओ दाखवत होते. तो युट्यूबवर मिळाला नाही. त्या विमानाच्या मागेच दुसरे इंडिगोचे विमान उड्डाण करणार होते. ते रनवेवर जात असतानाच मागे (इंडिगोच्या विमानाच्या वैमानिकासाठी पुढे) काळ्या धुराचे लोट दिसायला लागले. ते बघून त्याला केवढा धक्का बसला असेल. तसेच ध्यानीमनी नसताना अचानक अवाढव्य विमान अंगावर येताना समजा त्या मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमधील कोणी बघितले असेल तर त्या व्यक्तीच्या काळजाचे पाणी पाणी झाले असेल :(
  • Log in or register to post comments

खूपच वाईट घटना

स्वधर्म
गुरुवार, 06/12/2025 - 22:29 नवीन
अपघातातील लोकांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ मिळो. या अपघातामुळे एअर ईंडीयाला मोठा तोटा तर होणारच आहे. जगभरातील लोकांना भारताच्या हवाई क्षेत्राविषयी आत्तापर्यंत विश्वास वाटत आला आहे. तो अबाधित रहावा व या अपघातामागे सुरक्षा व्यवस्था व देखभाल व्यवस्था यातील ढिसाळपणा समोर येऊ नये ही अपेक्षा. बोईंगचे समभाग प्रिमार्केट ८% तर एअर ईंडियाचे ४% कोसळले.
  • Log in or register to post comments

May day call म्हणजे काय ?

मारवा
Fri, 06/13/2025 - 03:01 नवीन
वैमानिकाने may day call दिला होता असे वाचले. याचा काय अर्थ असतो ?
  • Log in or register to post comments

मे डे, पॅन पॅन वगैरे..

गवि
Fri, 06/13/2025 - 08:34 नवीन
मे डे, पॅन पॅन वगैरे.. या धाग्यात आहे. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

Ac बंद होते.

कंजूस
Fri, 06/13/2025 - 06:52 नवीन
Ac बंद होते. याच विमानातून एका प्रवाशाने दिल्ली ते अहमदाबाद प्रवास केला होता. त्यात सर्व एसी बंद होते तसेच टीवीसुद्धा. ती खरड त्याने x वर टाकली आहे. तर यावर झटपट दुरुस्ती करून लंडनला पाठवले. त्या दुरुस्तीचा परिणाम असावा. सगळी वीज खेचली गेली असावी आणि .....
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकर आयुरारोग्य प्राप्त होओ...

कर्नलतपस्वी
Fri, 06/13/2025 - 09:10 नवीन
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.
  • Log in or register to post comments

बाप रे ...... !

चौथा कोनाडा
Fri, 06/13/2025 - 14:08 नवीन
बाप रे ...... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर

आग्या१९९०
Sat, 06/14/2025 - 23:47 नवीन
एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. जुहू बीचवरून? कनिष्क विमान खलिस्तान अतिरेक्यांनी बाँबस्फोट करून १९८५ ला उडवले , आणि ते अटलांटिक महासागरात कोसळले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

भावना पोहचली!!

सुक्या
Sun, 06/15/2025 - 01:03 नवीन
भावना पोहचली!! ते सम्राट अशोक विमान होते. मुंबई - दुबई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकर आयुरारोग्य प्राप्त होओ...

कर्नलतपस्वी
Fri, 06/13/2025 - 09:11 नवीन
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.
  • Log in or register to post comments

दु:खद घटना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/13/2025 - 09:24 नवीन
अतिशय र्‍हदयद्रावक घटना. कालपासून जे जे व्हीडीयो पाहण्यात आले ते पाहुन अधिकच दु;खच केवळ. आयुष्याचा कोणताच प्रवास सुरक्षित नाही. घटना घडणार होती म्हणून घडली म्हणून सोडून देताही येईल पण तांत्रिक गोष्टींनी जी जीवीत हानी झाली ती कधीही भरुन निघणार नाही. आपण घटना यंव घडली आणि त्यंव घडली म्हणून उद्या कदाचित काही निष्कर्ष काढूही, त्यात सुधारणाही होईल पण अपघात थांबतील याची शास्वती अजिबातच वाटत नाही. विमान उडतंय आणि काही क्षणात हळुहळु खाली येत शेपटीच्या बाजूने इमारतीला धडकते. आपण काही यातले जाणकार नाही, पण ज्या बातम्या येताहेत त्यात दोन्हीही इंजीन्स अचानक बंद पडली अशी स्थिती झाली. "मे डे" हा जीवघेणा शब्द बाहेर पडला तितकाच बाकी सर्वत्र शांतता. वस्तीगृहातील शिकाऊ डॉक्टरर्सना आपलाही जीव नाहक गमवावा लागला. दूरचं उडान आहे म्हणून टँक भरलेले असेल आणि कदाचित त्याच्या स्फोटामुले इतकी जिवीत हानी झाली. भविष्यात इंधनविरहित इतक्या ताकदीच्या वीजेच्या ताकदीवर किंवा इंधन टाकी इतकी मजबूत की ती आदळली, स्फोट झाला तरी ती फूटू नये इतका काही बंदोबस्त झाल्याशिवाय अशा अपघातात होणारी जिवीत हानी कमी होणार नाही, हा विचार फारच तकलादू असू शकेल पण अशा अपघातातील हानी कमी करण्याचा विचार भविष्यात होऊ शकेल असे वाटते. विमान अपघातातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बरीच अधिकची माहिती मिळते आहे.

गवि
Fri, 06/13/2025 - 10:24 नवीन
बरीच अधिकची माहिती मिळते आहे. टेकऑफचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. टेक ऑफ व्यवस्थित झाला होता. तोपर्यंत इंजिन्स व्यवस्थित चालू होती. नंतर लगेच इंजिनची पॉवर नाहीशी झाली असे म्हणावे तरी देखील एकदम दोन्ही इंजिने बंद पडणे हे या विमानाच्या बाबतीत केवळ तात्विक दृष्ट्याच शक्य आहे. प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य. आणि एक इंजिन पूर्ण बंद पडले तरी उरलेल्या एका इंजिनावर विमान हवेत वर चढून योग्य उंची प्राप्त करून पुन्हा गोल फिरत लँड करू शकते. पायलटला ते ट्रेनिंग दिलेले असते. आणि एक इंजिनावर पूर्ण प्रवास देखील करता येईल अशीच रचना असते. पक्षी आदळून किंवा अडकून दोन्ही इंजिने पूर्ण बंद होणे हे देखील फार दुर्मिळ. आणि तसे असते तर थोडा तरी धूर, काजळी, कदाचित आगीचा बारीकसा तरी लोळ असे दिसायला हवे. तसे काही दिसत नाही. पक्षीही बऱ्याच संख्येने आणि मोठाले असतील तरच दोन्ही इंजिने एकावेळी भरून जातील. पण पक्षीही दिसत नाहीत टेकऑफच्या वेळी. दोन प्रकार असतात. लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट. पॉवर पूर्णपणे उपलब्ध असूनही लिफ्ट नाहीशी होऊ शकते. यासाठी दोन तीन शक्यता आहेत. त्यातलीच एक बाहेर येईल असे वाटते. थोडे नंतर सवडीने यावर लिहीन.
  • Log in or register to post comments

तर्क गंडतोय...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/13/2025 - 11:02 नवीन
प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य.
आपण या विषयातले जाणकार आहात त्यामुळे आपण जी शक्यता नगण्य म्हणत आहात तीच शक्यता अधिक आहे. आम्ही जाणकार नाही पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही. एकही चालू नाही म्हणजे दोन्हीही बंद पडले उडण्याची क्षमता गमावली आहे. आपल्या यंत्र तंत्राच्या भाषेत लॉस ऑफ पॉवर हतबल ही स्थिती त्यामुळे जे तांत्रिक फेल्युअर झालं ते मशीनचं. एकदा उडून ही स्थिती यावी हे जे जरा तर्कापलिकडे जातंय. उडतंय म्हणजे पॉवर सुरु होतं आणि हळुहळु खाली येतंय म्हणजे अचानक पॉवर लॉस हतबल स्थिती, हा यांत्रिक बिघाड सापडला पाहिजे. दुसरं यात पायलटचा दोष दिसत नाही. विमान वर उडते राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असावे. आता लँडींग झालं तर धोका तितकाच होता म्हणून त्याचं प्राधान्य विमान वर उडवायला असणार पण दुर्दैवाने विमान उंच झेप घेऊ शकले नाही. आज उद्या विमान कंपन्यावर येणारं बालट, कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पायलटवर खापर फोडतात काय इतकंच पाहणे बाकी आहे. एक्सपर्ट लोकांनी तर्क पटणारा केला पाहिजे. इतकी माफक अपेक्षा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पण साधं लॉजीक असं आहे की,

गवि
Fri, 06/13/2025 - 11:35 नवीन
पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही.
बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडलात. मी वर म्हटलंच आहे की लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट असे दोन वेगळे भाग आहेत. फुल पॉवर इंजिन चालू असतानाही लॉस ऑफ लिफ्ट होतो आणि विमान अगदी असेच खाली येते. यासाठी आपल्याला विमान कसे उडते याबद्दल माहिती घ्यायला हवी. तुमची शेवटची काही वाक्ये मला हे सर्व लिहिण्यापासून परावृत्त करत आहेत पण इतर सर्व (खवचट नसलेल्या) मिपाकरांच्या माहितीसाठी कदाचित हे उपयुक्त ठरेल म्हणून लिहीत आहे. विमानाच्या पंखावर जी लिफ्ट (उचल) उत्पन्न होते त्यासाठी पंखाच्या वरून आणि खालून वेगवेगळ्या वेगाने आणि दाबाने वाहणारी हवा कारणीभूत असते. दाबात असा फरक निर्माण व्हावा अशी पंखांची रचना आणि आकार असतो (aerofoil). आता असे पहा, की पंखाचा हवेच्या प्रवाहाशी एक कोन असतो. आणि तो वेगवेगळ्या वेळी बदलतो. टेक ऑफ घेताना आणि वर चढताना तो जास्त असतो. त्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात. तो जसा वाढत जातो तसा एका मर्यादेनंतर हवेचा अवरोध वाढायला लागतो. आणि लिफ्ट निर्माण करणारे प्रवाह बिघडू लागतात. अशा वेळी विमानाला वर वर जाणे अधिक अवघड होऊ लागते. मग पॉवर वाढवून ही स्थिती काहीशी नियंत्रणात आणता येते. पण.. फुल पॉवर असताना देखील अँगल ऑफ अटॅकची मर्यादा ओलांडली जाऊ लागली की विमानाच्या पंखावरची लिफ्ट नाहीशी होते. एक लक्षात घ्या की विमानाचे इंजिन कारच्या इंजिनासारखे चाकांना संचालित करत नसून ते हवेला मागे आणि पर्यायाने विमानाला पुढे ढकलत असते. मात्र "लिफ्ट" उत्पन्न करण्याचे कार्य इंजिन करत नसून विशिष्ट वेगाने आणि विशिष्ट कोनात पुढे सरकणारे पंख करत असतात. त्यांचा अँगल ऑफ अटॅक मर्यादा ओलांडून गेला की इंजिने पूर्ण ताकदीने फुरफुर करत राहतील, हवा मागे फेकतील, पण लिफ्ट उत्पन्न होऊ शकणार नाही. या स्थितीला स्टॉल असे म्हणतात. अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे. इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे. हवेत उचलले गेल्यावर ज्या पद्धतीने विमान खाली येत आहे (pancaking) त्यावरून हेच दिसते की लॉस ऑफ लिफ्ट आहे. लॉस ऑफ पॉवरमुळेही लॉस ऑफ लिफ्ट होऊ शकते, तेही एक वैध कारण आहे. पण या बाबतीत दोन्ही इंजिने एकदम बंद पडावीत आणि तीही टेक ऑफ ठीकठाक झालेला असताना त्यानंतर लगेच, हे अशक्य आहे. आता नेमके झाले काय असावे हे नीट मांडायला वेळ लागेल. प्रयत्न करतो एका ब्रेकनंतर. यात लँडिंग गियर खालीच असणे हा मुख्य क्लू आहे. आणि फ्लॅप्स खाली नसणे हाही. इंजिन बंद पडो, लिफ्ट जावो, आग लागो किंवा अन्य काही कारणाने विमान कोसळू लागो, यातील प्रत्येक केसमध्ये लँडिंग गियर विमानाच्या पोटातच असायला हवेत. पहिल्या सहा ते दहा सेकंदांत ते पोटात घेतले जातात आणि वस्तीत क्रॅश होणार म्हणून चाके पुन्हा बाहेर काढणे असे होत नसते. ती आतच ठेवली जातात. हे लिहायला स्फूर्ती दिल्याबद्दल धन्यवाद. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आपला आदर आहेच. बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. असो. गंभीर धाग्यावर अवांतर टाळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे

गवि
Fri, 06/13/2025 - 11:45 नवीन
क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे डे शब्द वापरला गेला) बिचाऱ्या पायलट्सनी मरताना देखील प्रोसेस फॉलो करून इंजिने आयडल केली असणार. लँडिंग गियर वर का घेतला नाही माहीत नाही. पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत: इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) वेग किमान ठेवणे : हे दिसते आहे. पंख जमिनीला समांतर लेव्हलमधे ठेवणे. हेही केलेले आहे. लँडिंग गियर राहून गेला असावा किंवा तेवढ्या वेळात रिट्रॅक्ट होऊ शकला नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

यावरुन....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/13/2025 - 11:54 नवीन
पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत:
मला स्वतःला ही शक्यता फार कमी वाटते की जमीनीवर लँडींग करावे वगैरे. पहिलं प्राधान्य झेप घेणे इतर प्राधान्याचा विचार फार कमी वेळा येत असावा. यावरुन आठवण झाली. लॉस ऑफ पॉवर आणि जमीनीवर लँडींगचा हा व्हीडीयो आपण पाहिलाच असेल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

इंधन कमी कसे केले जात असते ?

मारवा
Sat, 06/14/2025 - 06:56 नवीन
इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ? कृपया खुलासा करावा ? प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात असताना काही माणसे जे असामान्य धैर्य आणि हानी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ही गोष्टच मला नेहमी भावूक करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

समजा वेळ असता तर अशा

गवि
Sat, 06/14/2025 - 08:04 नवीन
समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ?
मुख्यतः मोकळ्या भूभागावर किंवा पाण्यावर जाऊन गोल फिरत राहून इंधन जाळून संपवणे. लँडिंग वेट अचिव्ह करण्यासाठी. किंवा क्रॅश लँडिंगमध्ये हानी कमी करण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

तेच म्हणतोय....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/13/2025 - 11:47 नवीन
अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे.
इथपर्यंत आपली मतं बरोबर वाटत आहेत.
इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे.
मुद्दा हाच आहे की, विमानाने टेक ऑफ पूर्ण वेगाने व्यवस्थित केलेला आहे, मग असे काय घडले की ते खाली खाली येत गेले. लॉस ऑफ लिफ्ट असो की लॉस ऑफ पॉवर असो, हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे. तपशीलवार निबंधाबद्दल आभारी आहे. लिहिते राहा. वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे जे अचानक कसं घडलंय तेच

गवि
Fri, 06/13/2025 - 12:00 नवीन
हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे.
या स्टेजला सर्वच गोष्टी अंदाज या कॅटेगरीत येतात. पण काही अंदाज सहज नाकारता येतात, इंजिन बिघाड किंवा तांत्रिक बिघाड हा या बाबतीत सकृत्दर्शनी शक्य दिसत नाही. १. फ्लॅप्स वर २. लँडिंग गियर खालती. ३. स्टॉल सदृश अटीट्युड (विमानाचे ओरिएंटेशन म्हणा) ४. यशस्वी टेक ऑफ ५. उड्डाणाच्या आधी फ्लॅप्स खाली करणे विसरावे हे विमान होऊ देणेच अशक्य अशी यंत्रणा (ड्रीमलाइनरची) ६. मोठ्या संख्येने पक्ष्यांचा अभाव (दोन्ही इंजिने तातडीने बंद पडण्याइतके मोठे पक्षी थव्याने असणे आवश्यक) ७. धूर, काजळी, आगीचा लोळ नसणे (पक्षी आत गेले की यातले काहीतरी होणार) ८. सर्वात महत्वाचे. टेक ऑफ घेताना सर्वात जास्त इंजिन पॉवर आणि लिफ्ट मिळण्यास सर्वाधिक अनुकूल स्थिती असते. त्यामुळे पंखाचा आकार काही प्रमाणात बदललेला नजरेला दिसतो. पुरेशी लिफ्ट मिळत असते तेव्हा पंखांची टोके वर वळतात. पंखात लवचिकता ठेवलेली असल्याने हे वाकणे स्पष्ट दिसते (स्नायू तटतटतात तसे). इथे लिफ्ट नसल्याचे दिसते आहे. पंख सरळ आणि पडके आहेत. या सर्व मुद्द्यांमुळे ठळक शक्यता हीच उरते की लिफ्ट कमी पडली. का? - उड्डाणाच्या नंतर लगेच फ्लॅप्स वर घेतले जाणे. - उड्डाणाच्या नंतर लगेच चाके वर घेतली न जाणे. या दोन्हींमुळे विमानाची लिफ्ट पुरती निकामी लेव्हलला येऊ शकते. हे असे होण्यात कुठेतरी मानवी चूक वाटते. अंदाजच असला तरी तो सध्याच्या स्थितीत सर्वाधिक शक्यतावाला अंदाज आहे. पुढे तो चुकीचा ठरला तर करेक्शन करूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मानवी चुक असण्याचीच शक्यता

आनंद
Fri, 06/13/2025 - 14:39 नवीन
मानवी चुक असण्याचीच शक्यता जास्ती आहे. लँडिंग गियर वर घेण्या ऐवजी फ्लॅप्स वर घेतले असावेत का? अस होन्याची शक्यता अनुभवी पायलट कढुन अशक्य आहे पण सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लॉजिक चा मुद्दा

प्रकाश घाटपांडे
Fri, 06/13/2025 - 12:29 नवीन
सहज आठवले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणल्यावर त्याकाळी एक लॉजिकचा मुद्दा असा होता की मग पक्षी आपल्या घरट्यात कसे परत येतात? बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. याच्याशी सहमत आहे काही समविचारी विद्वान सहमती व्यक्त करताना देखील पुरेशी तुच्छता बाळगतात.त्याशिवाय त्यांना विद्वतेचा "फील" येत नाही. हे अनुभवल आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आणखी एक.

गवि
Fri, 06/13/2025 - 10:29 नवीन
आणखी एक. अमेरिकन बनावटीचे विमान असल्याने NTSB या चौकशीत सामील होणार. इतरही देशांच्या एजन्सीज येणार. विशेषतः ब्रिटिश. भारतीय लोकांच्या नंतर तिथले सर्वाधिक नागरिक प्रवाशांत होते
  • Log in or register to post comments

लॉस

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 06/13/2025 - 11:29 नवीन
पॉवर होती पण लॉस ऑफ लिफ्ट.. एका अनुभवी वैमानिकाचा व्हिडियो पाहिला. सहवैमानिकाकडुन चूक झाली असावी असा त्याचा अंदाज आहे. 'गियर अप'च्या ऐवजी सहवैमानिकाने 'फ्लॅप रेझ' हॅंडल वापरले. युट्युबर 'कॅप्टन स्टीव'
  • Log in or register to post comments

धन्यवाद.. ते वरील ज्येष्ठ

गवि
Fri, 06/13/2025 - 11:38 नवीन
धन्यवाद.. ते वरील ज्येष्ठ सदस्यांना दाखवा.. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अनुभवी पायलट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/13/2025 - 12:34 नवीन
पायलट अनुभवी होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे वृत्तपत्र बातम्यानुसार ८२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. तर सहपायलट यांच्याकडे अकराशे तासांचा अनुभव होता. अवघ्या एका मिनिटात मे डे कॉल दिला पण त्या नंतर ते काहीही करु शकले नाहीत. ज्या काही शक्यता येत आहेत त्यात, विमानाचे लॅंडीग गिअर आत घेतले गेले नाही. टेक ऑफ झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटे झाली तरी, दहा पंधरा सेकंदाच्या आत हे गीअर आत घेतल्या जातात पण हे आत घेतले गेले नाही, आता ही मानवी चूक की यंत्रांची चूक आणि ते यामुळेच झाले की अन्य काही अजून काही कळायला मार्ग नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माहितीपूर्ण प्रतिसाद लिहिते रहा !

मारवा
Sat, 06/14/2025 - 08:45 नवीन
पायलट अनुभवी होते खरे आहे. लिहिते रहा मारवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण चर्चा करत आहोत.

कंजूस
Fri, 06/13/2025 - 12:37 नवीन
आपण चर्चा करत आहोत. एखादा मुद्दा पटला नाही तर खोडाला जात आहे. पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही. माझा मुद्दा असा_ दिल्लीवरून येताना एसी बंदच होते. इकडे विमानाने टेकऑफ केल्यावर एसी लगेचच चालू केले गेले असतील तर बरीच पावर खेचली गेली असेल. ती पावर फ्लॅप्स वळवण्यासही लागत असेल. म्हणजे तिथे प्रेफरन्स प्राधान्य देण्याची काही व्यवस्था असेल तर ती बंद पडली असेल. एंजिने फुल पावर/इंधन मिळूनही फ्लॅप्स वळून हवा खाली ढकलली न गेल्याने उंची दाखवणारे दर्शक उंची वाढत जात आहे/ नाही यामध्ये ' जात नाही' हे दाखवू लागल्यावर वैमानिकाने मदतीचा भोंगा वाजवला असणार. विमान जमिनीवर उभे असताना फ्लॅप्स वळवण्यास फारशी शक्ती लागत नाही ( ते तपासले असणारच) पण विमान उचलताना मोठा हवेचा झोत खाली वळताना फ्लॅप्स बरीच वीज खेचतील. तर इकडे एसी बरेच तास बंद असल्याने आतील तापमान वाढलेले असणार व ते एकदम वीस अंशावर आणायला खूप वीज खाणार.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/13/2025 - 12:54 नवीन
पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही.
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे. काळ बदलला आहे आधुनिक आणि अद्ययावत माहितीची नवनवीन साधने आलेली आहेत त्यामुळे विविध विषयांची आणि अद्ययावत माहिती कोणाकडेही असू शकते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+१ सहमत. काही लोकांना वाटतं

गवि
Fri, 06/13/2025 - 13:01 नवीन
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे.
अगदी बरोबर. पण.. मुख्य उद्देश आणि उत्साह माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा आहे की पूर्ण परिश्रम एखाद्याला चूक ठरवण्यासाठी करायचे आहेत हे आधी ठरवून घेतल्यास ध्येय साध्य करणे सोपे होते. अर्थात हे तुम्हाला आम्ही काय सांगावे. जुने जाणते तुम्ही... :-) शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्लॅप्सचे कार्य तुम्ही

गवि
Fri, 06/13/2025 - 12:58 नवीन
फ्लॅप्सचे कार्य तुम्ही म्हणताय तसे चालत नाही. विमान टॅक्सी आऊट होण्यापूर्वीच हे सर्व सेट आणि लॉक झालेले असते. फ्लाईट चालू असताना अर्थातच ऐनवेळी फ्लॅप्स वरखाली करता येतातच. पण टेक ऑफ झाल्यावर अचानक वीज कमी पडली (हे मेकॅनिकल कंट्रोल हायड्रॉलिक पद्धतीने चालतात पण तरीही तात्विक दृष्ट्या वीज कमी पडलीच) तर ती फ्लॅप्स वर घेण्यास अटकाव करेल. इथे फ्लॅप्स खाली न करता टेक ऑफ घडणे हे अशक्य आहे. ७८७ ड्रीमलायनर मध्ये अशा वेळी प्रचंड वॉर्निंग अलार्म वाजणे आणि सर्वात धोक्याची मास्टर वॉर्निंग वाजून कॉकपिटमध्ये ठणाणा आवाज आणि लाईट फ्लॅश येत राहतात. राहता राहिला टेक ऑफ नंतर फ्लॅप्स न चालण्याचा भाग (तुम्ही म्हणता तसे वीज खेचली गेल्याने.. तसे होत नसते, तरी पण..) तर अशा वेळी ऑलरेडी खाली असलेले फ्लॅप्स वर येण्यास अडचण होईल. पण फ्लॅप्स तर वर गेलेले दिसत आहेत. म्हणजे टेक ऑफ नंतर वेळेआधीच ते वर घेतले गेले असणे हीच एक शक्यता. शिवाय पॉझिटिव्ह रेट (वर जाण्याचा) ज्या क्षणी दिसतो त्या क्षणी चाके आत घेतली जातात. ती घेतली गेली नाहीत. कोणाला वाटेल की टेक ऑफ होताच विमान परत खाली (उतरायला) येत आहे म्हणून चाके आत घेतली नसतील. तर तसे नसते. चाके आत घ्यावीच लागतात. अवरोध टाळण्यासाठी. अगदी क्रॅश होत असला तरी चाके बाहेर ठेवायची नसतात. Pancaking हा शब्द मी वर वापरला आहे त्याची माहिती बघा. फरक इतकाच की इथे मूव्हमेंट pancaking ची होती फक्त लँडिंग गियर आत घेतलेला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ठीक आहे.

कंजूस
Fri, 06/13/2025 - 13:04 नवीन
ठीक आहे. कार्यप्रणाली जर अशी असेल तर मग दुसरे काही कारण असेल. फळ्यावरचे दर्शक काही वेगळीच धोकादायक सूचना देऊ लागल्याने मदतीचा भोंगा वाजवला असेल. पण कोणता दर्शक धोकादायक सूचना देतोय हे वाक्य वैमानिक बोलला ते ब्लॅक बॉक्सच सांगेल. आणि हेच बोइंग कंपनीला हवे असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

माझ्या मूळ मुद्द्याचा अर्धा

कंजूस
Fri, 06/13/2025 - 13:09 नवीन
माझ्या मूळ मुद्द्याचा अर्धा भाग म्हणजे एसींनी वीज खेचली असेल तर किती? किती परिणामकारक ठरेल?
  • Log in or register to post comments

विमानाच्या सुरक्षित

गवि
Fri, 06/13/2025 - 13:18 नवीन
विमानाच्या सुरक्षित उड्डाणाच्या मध्ये अडथळा ठरेल अशी कोणतीही गोष्ट घडू न देण्याच्या दृष्टीनेच पूर्ण रचना असते. इतकी बेसिक साधी चूक सिस्टीम मधे राहून गेली तर अकरा वर्षे विना अपघात जात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

खुपच दु:खद घटना ..... सगळे

चौथा कोनाडा
Fri, 06/13/2025 - 14:13 नवीन
खुपच दु:खद घटना ..... सगळे गेले ... किती दुर्दवी !!! लवकरात लवकर दोषांची उकल होऊन डिझाईन / प्रोसेस मध्ये तातडीने सुधारण व्हावी ,,, पुन्हा असले क्लेशदायक वृत्त ऐकण्याची वेळ न येवो !
  • Log in or register to post comments

काल विमान अपघात झाला तेव्हा

स्मिता श्रीपाद
Fri, 06/13/2025 - 14:23 नवीन
काल विमान अपघात झाला तेव्हा इथे वाचलेले पुर्वीचे काही लेख आठवले होते. भयंकर अपघात. कालपासुन काहीच सुचत नाहिये विविध व्हिडिओ . टेक ऑफ पुर्वी काढलेले सेल्फी बघुन जीव तुटतोय.. एक साधा टर्ब्युलन्स जाणवला तरी जीव घशात येतो.. इथे विमान थेट खाली जाताना प्रवाशांचं काय झालं असेल या विचारनं थरकाप उडतोय.. मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेल मधे जेवणाच्या ताटावर बसलेल्या डॉक्टरांचा तर काहीच संबंध नसताना त्यांना मृत्युला सामोरं जावं लागलं.. सुन्न झालंय डोकं कालपासुन. त्या मृताम्यांना शांती मिळो असं तरी कसं म्हणायचं ? सगळी स्वप्नं आणि जवळची मंडळी मागे सोडुन गेलेल्या जीवांना खरच शांती मिळेल ? ( या प्रसंगातही इथे वाद घालणारी लोकं कशाची बनली असतील ? वेळ काय आणि आपण कशावर वाद घालावा ? असो.. मानवीवृत्ती समजणं बुद्धीच्या पलिकडचे आहे )
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा