✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑपरेशन सिंदूर - युद्ध की मर्यादित कारवाई?

श
श्रीगुरुजी यांनी
Wed, 05/07/2025 - 07:59  ·  लेख
लेख
आज पहाटे भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान भूमीवर ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याच्या काही चित्रफिती पाहिल्या. काही इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसल्या त्यात एक मशीद आहे. आपण भारताची ५ लढाऊ विमाने (त्यात एक राफेल) व एक ड्रोन पाडले असा पाकिस्तानने दावा केलाय. सीमेवर दोन्ही बाजूने तोफांचा भडीमार झालाय. ही कारवाई मर्यादित लाहू नये ही अपेक्षा आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26132 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

हे प्रियंका वड्राच्या

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:03 नवीन
  • Log in or register to post comments

कालच वाटले होते की आज देवभर

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:08 नवीन
कालच वाटले होते की आज देवभर मॉक ड्रील आयोजित करणे, देशद्रोह्यांनी त्याची टिंगलटवाळी करीत मोदींना शिव्या देणे या गोष्टी सर्वांना अंधारात ठेवण्यासाठी आहेत, भारत इतक्यात हल्ला करणार नाही अश्या समजुतीत पाकिस्तान आणि भारतातील पाकिस्तानप्रेमी रहावे व आज रात्रीच काहीतरी सुरू होईल.
  • Log in or register to post comments

img src="https://pbs.twimg

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:10 नवीन
  • Log in or register to post comments

हे प्रियंका वड्राच्या

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:11 नवीन
  • Log in or register to post comments

हे प्रियंका वड्राच्या

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:14 नवीन
  • Log in or register to post comments

हे प्रियंका वड्राच्या

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:15 नवीन
  • Log in or register to post comments

(No subject)

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

काहीतरी गडबड आहे. ट्विट

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:25 नवीन
काहीतरी गडबड आहे. ट्विट दाखविता येत नाही. ट्विट वरील चित्रासह खालीलप्रमाणे आहे. ताली थाली बजाओ के बाद पेश है #सायरन बजाओ ! मोदी जगाला अंधारात ठेवण्यासाठी काहीतरी वेगळे करतात आणि जग टिंगल करीत असताना शांतपणे गुपचूप आपल्याला हवे ते करतात. यालाच कात्रजचा घाट दाखविणे म्हणतात. मिपावर व अनेक समाजमाध्यमांवर अशी टिंगल करणारे जन्मजात मूर्ख अतोनात आहेत. मॉक ड्रील घोषणेची यथेच्छ टिंगलटवाळी समाजमाध्यमांवर सुरू असताना हा हल्ला झाला. २६/११/२००८ नंतर भारताने युद्ध करायला हवे होते. परंतु परकीयांच्या हातात सर्व निर्णयाधिकार व अत्यंत दुर्बल नेतृत्व यामुळे भारताने शेपूट घातली होती. परंतु आता परिस्थिती पूर्ण उलट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ताली थाली बजाओ के बाद पेश है

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:17 नवीन
  • Log in or register to post comments

पाकिस्तान प्रतिहल्ला करेल

रात्रीचे चांदणे
Wed, 05/07/2025 - 08:22 नवीन
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल वाटतंय. पण आपली सेनाही नक्कीच तयारीत असणार.
  • Log in or register to post comments

पुराव्याची मागणी आल्यास पाकिस्तानी पुरावेच देणे योग्य.

मारवा
Wed, 05/07/2025 - 08:59 नवीन
पुराव्याची मागणी स्वाभाविकपणे येणार यासाठी माझ्यामते योग्य असे होईल की पाकिस्तानी अधिकृत लष्करी पुरावे दिल्यास हल्ला झाला हे सिद्ध करता येईल. भारतीय पुरावे टाळले पाहिजेत. उदा. हा व्हिडिओ पाकिस्तानिंलासकर अधिकाऱ्याचा बघा. https://www.youtube.com/live/XKi6ORjquNI?si=Me-g_wbAITUTq_Ke यानंतर हल्ला झालाच नाही हा मुद्दा किमान येणार नाही. त्यापुढे जात चर्चा करता येईल
  • Log in or register to post comments

सीएनएन, बीबीसी या

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 09:23 नवीन
सीएनएन, बीबीसी या संकेतस्थळावर हल्ल्याच्या चित्रफिती आहेत. बीबीसीची बातमी सीएनएनची चित्रफीत - https://edition.cnn.com/2025/05/06/world/video/india-military-operation-against-pakistan-breaking-vrtc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

श्रीगुरुजी exactly हेच पुरावे सत्य.सिद्ध करतील

मारवा
Wed, 05/07/2025 - 09:26 नवीन
श्रीगुरुजी मी नेमके हेच पुरावे द्यावेत असे म्हणतोय. भारतीय बाजूने आलेले पुरावे नकोच. म्हणजे हल्ला झाला की नाही हे निर्णायकरित्या ठरविता येईल. मग किमान चर्चा तिथे रेंगाळणार नाही पुढे सरकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हल्ला झाल्याचे पाकिस्तानने

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 09:39 नवीन
हल्ला झाल्याचे पाकिस्तानने मान्य केलंय, परदेशी माध्यमांनी चित्रफिती दिल्यात, चीन व अमेरिका अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिलीये . . . हल्ला केल्याचे अजून कोणते वेगळे पुरावे अपेक्षित आहेत? काही दुर्गंधीयुक्त किळसवाणी गाढवे हल्ला झालाच नाही असे बरळताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

हल्ला झाल्याचे पाकिस्तानने

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 09:43 नवीन
हल्ला झाल्याचे पाकिस्तानने मान्य केलंय, आमचा विश्वास भारतीय सैन्यावर आहे पाकिस्तानवर नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

डबल ढोलकी

चंद्रसूर्यकुमार
Wed, 05/07/2025 - 10:03 नवीन
मागच्या वेळेस भारतीय सैन्याच्या प्रवक्त्याने पत्रकार परीषद घेऊन हल्ले केल्याचे जाहीर केले होते तेव्हा तुमच्यासारखे लोक पाकडे कुठे मान्य करत आहेत- तिकडे नुसती झाडंच पडली असे म्हणत होते. याला डबल ढोलकी म्हणायचे की आणखी काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 09:00 नवीन
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका! खऱ्या बातम्या येऊद्या! गोदी मीडियाच्या बातम्यांवर मला तितकाच विश्वास आहे जितका पॉलिटिकल सायन्सच्या डिग्रीवर! आणी अतिरेकी होते की नव्हते त्या हल्ला केलेल्या ठिकाणांवर? २६ च्या बदल्यात ५२ तरी मारले का? की एस छोटे हल्ले करून दिखावा करायचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे? ( प्रत्यक्ष हल्ला टाळायचा?)
  • Log in or register to post comments

अहो पण मी एकही लिंक भारतीय दिलेली च नाही

मारवा
Wed, 05/07/2025 - 09:23 नवीन
माझा अंदाज तुम्ही अचूक ठरवलात. म्हणून मी एकही लिंक भारतीय नेते ,भारतीय माध्यमे, भारतीय लष्कर सुद्धा दिलेली नाही व तशी देऊं सुद्धा नये हेच तर म्हणतोय. एक शरीफ यांचे अधिकृत ट्विट आहे एक त्यांच्या सूचना मंत्र्याचा व्हिडिओ आहे. एक त्यांच्या लष्करी अधिकाऱ्याचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हल्ला छोटा दिखावा मोठा! असा

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 09:09 नवीन
हल्ला छोटा दिखावा मोठा! असा प्रकार दिसतोय! अरे सैन्य घुसवा पाकिस्तानात!
  • Log in or register to post comments

हायला .. अबा .. तुम्हाला कसे

सुक्या
Wed, 05/07/2025 - 10:22 नवीन
हायला .. अबा .. तुम्हाला कसे कळले हो? माझ्या सुत्रांकडुन पक्की बातमी आहे. ईद चे उरलेले फटाके फोडले पाकीस्थानात. उगा भारताला चिथावणी द्यायला. नाहीतरी मोदी मधे ईतकी हिम्मत कुठे आक्रमण करण्याची. काय म्हणतात ते .. ५६ इंच फुकटचे आहेत. (जाता जाता: खरं तर अनुल्लेखाने मारणार होतो पण काय आहे आज आनंद ईतका झाला आहे ना ... म्हणुन हा प्रतिसाद.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ह्या वेळेस तर ओवेसी सारखे

रात्रीचे चांदणे
Wed, 05/07/2025 - 09:16 नवीन
ह्या वेळेस तर ओवेसी सारखे लोकं ही समर्थन करत आहेत. तरी बरं पाकिस्तान ने accept केलंय.
  • Log in or register to post comments

ओवेसी भाजपचीच बी टीम आहे!

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 09:19 नवीन
ओवेसी भाजपचीच बी टीम आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

तुम्हीपण

चंद्रसूर्यकुमार
Wed, 05/07/2025 - 09:57 नवीन
मला वाटते की तुम्ही पण भाजपचीच बी-टीम आहात. वारंवार इतके मूर्खासारखे बरळत आहात की त्याची किळस येऊन अनेकांच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्या बरोबर उलटा परीणाम होत असेल. ज्याप्रमाणे कन्हैय्या कुमार, मुग्धा कर्णिक, अवधूत परळकर, हेमंत कर्णिक, निखिल वागळे, विश्वंभार चौधरी वगैरे लोक मोठ्या पातळीवर आहेत त्याप्रमाणे मिपाच्या पातळीवर तुम्हीच. अमरेंद्र बाहुबली आगे बढो हम तुम्हारे साथ है :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

चंसुकु,

सुक्या
Wed, 05/07/2025 - 10:17 नवीन
चंसुकु, जाउ द्या हो. काही पिपाण्या वाजतातच .. सोडुन द्या. ह्यांच्याकडे जास्त लक्ष देउन आपला आनंद कमी करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी केलेले.tweet

मारवा
Wed, 05/07/2025 - 09:16 नवीन
https://x.com/CMShehbaz या tweet च्या पुराव्यावरून भारताने लष्कराने खरोखर हल्ला केलेला हे सिद्ध होत आहे. माझ्यामते हा tweet आणि वरील व्हिडिओ सारखे अजून काही "पाकिस्तानी" पुरावे आवश्यक आहेत. त्याच बरोबर CNN , BBC , AL ZAZEERA यांच्या NEWS CHANNEL वरील अधिकृत बातम्या हल्ला खरोखर झाला की नाही हे सिद्ध करू शकतील. कृपया भारतीय मीडिया, भारतीय नेते ,भारतीय लष्कर यांनी दिलेले पुरावे निःसंदिग्धतेच्या दृष्टिकोनातून देण्यात येऊ नयेत. https://youtu.be/FAwfLd-Iqao?si=6nbzWwo-f_PsEUXh हा एक व्हिडिओ पाकिस्तानच्या सूचना मंत्र्याचा आहे. यात ते हल्ला झालेला आहे हे मान्य करताना दिसत आहेत. तरी अजून काही पुरावे आल्याशिवाय हल्ला झालाच.असे.खात्रीलायक मानणे थोडे अवघडच आहे. काही काळ अजून वाट बघावयास हवी. कारण हल्ला खरोखर झाला की नाही हा पहिला मुद्दा सोडवल्याशिवाय यापुढे जाण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

कर्नल साहेब प्रणम स्वीकारावा!

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 09:23 नवीन
कर्नल साहेब प्रणम स्वीकारावा! अगदी मनातले लिहिलेत! या tweet च्या पुराव्यावरून भारताने लष्कराने खरोखर हल्ला केलेला हे सिद्ध होत आहे. सहमत! भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य किंवा प्रेसनोट यावी! तरी अजून काही पुरावे आल्याशिवाय हल्ला झालाच.असे.खात्रीलायक मानणे थोडे अवघडच आहे. बरोबर! गोदी मीडियाच्या बातम्या नी भाजप नेत्यांची वकतव्ये विश्वासरह्या नाहीत! त्याच बरोबर CNN , BBC , AL ZAZEERA यांच्या NEWS CHANNEL वरील अधिकृत बातम्या हल्ला खरोखर झाला की नाही हे सिद्ध करू शकतील +१ आंतरराष्ट्रीय बातम्या खर्या, कारण त्यांच्यावर भाजप वगैरेंचा दबाव नसतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अमरेंद्र मी कर्नल नाही सांभाळा स्वतःला उत्तेजीत होऊ नका.

मारवा
Wed, 05/07/2025 - 09:40 नवीन
तुम्ही चुकत आहात भारतीय पुरावे नकोतच. भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य पण कशाला ग्राह्य धरताय तुम्ही ? भारतीय सैन्याकडून हल्ला झालाच आहे हे मान्य करण्याची इतकी.घाई तुम्ही केली हे योग्य नाही. थोडे शांततेने घ्या अजून पुरावे येऊ द्या संध्याकाळ पर्यंत हल्ला झाला की झालाच नाही हे निर्णायकरित्या सिद्ध होईलच. ही एक CNN या चॅनेल.ची बातमी ज्यात भारतीय हल्ल्याचा उल्लेख आलेला आहे. https://youtu.be/PFsronvNw5I?si=PpejXq8DS_U0oALb
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बरं मग पाकिस्तानच्या dawn चे

रात्रीचे चांदणे
Wed, 05/07/2025 - 09:52 नवीन
बरं मग पाकिस्तानच्या dawn चे संकेतस्थळ तपासा. भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य ग्राह्य धरायचे नसेल तर dawn मध्ये पाकिस्थान च्या मिलिटरी अधिकाऱ्याचे स्टेटमेंस्ट आहेत. पण त्यात ते दहधातवादी मेले म्हणतं नाहीत तर सामान्य लोकं मेली म्हणून ओरडत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

पाकिस्तान च्या DG ISPR ने

रात्रीचे चांदणे
Wed, 05/07/2025 - 09:23 नवीन
पाकिस्तान च्या DG ISPR ने स्वतः ८ ठिकाणी हल्ला झाल्याचं केलंय. १० वाजता सेनेची प्रेस कॉन्फरेन्स आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

"ऑपरेशन सिंदूर"

वामन देशमुख
Wed, 05/07/2025 - 09:16 नवीन
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तराला यशस्वी सुरुवात केल्याबद्धल केल्याबद्धल भारताचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील लढाईसाठी शुभेच्छा. हिंदू स्त्रियांचे कुंकू पुसणाऱ्या ओला-ओ-उबरांना ढगात पाठवणाऱ्या मोहिमेचे "ऑपरेशन सिंदूर" हे नाव अगदी सार्थ आहे! --- अपेक्षेप्रमाणे, पाकी घाणपट्ट्यात वळवळणारी ओला-ओ-उबर-वादी कीड याही धाग्यावर आली आहे. तिच्यावर जंतुनाशक फवारण्यासाठी मिपाखरं समर्थ आहेतच.
  • Log in or register to post comments

याला आणि याच्या चाहत्यांना

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 09:54 नवीन
Image removed. याला आणि याच्या चाहत्यांना बसली थोबाडीत.
  • Log in or register to post comments

फुल ब्लोन युद्ध करण्यासाठी

सोत्रि
Wed, 05/07/2025 - 09:57 नवीन
फुल ब्लोन युद्ध करण्यासाठी पकिस्तान शेपूट घालेल कारण युद्ध चालवण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक कुवत नाहीयेय. - (देशप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments

न्यूयॉर्क टाईम्सने प्रथमच

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 10:07 नवीन
Image removed. न्यूयॉर्क टाईम्सने प्रथमच militants शब्दाऐवजी terrorists हा शब्द वापरला. भारतीय सैन्याचा व खंबीर नेतृत्वाचा अभिमान वाटतो!
  • Log in or register to post comments

अभिमानास्पद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/07/2025 - 10:08 नवीन
भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी, हा भारत देश कटीबद्ध आहे, पक्षीय राजकारण आणि मतभेद सोडून देश एकजुट-मजबूत होतो, हे अतिरेकी तळ उद्ध्वस्त करीत भारताने दाखवून दिले. अभिमानास्पद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अपेक्षा

चंद्रसूर्यकुमार
Wed, 05/07/2025 - 10:08 नवीन
आता जर परिस्थिती अनुकूल असेल तर आणखी मोठा हल्ला करून पाकड्यांना पूर्ण नेस्तनाबूत करायला हवे. पाकिस्तानातील धरणे, विमानतळे, उर्जा प्रकल्प, कारखाने वगैरे सगळे काही पूर्ण उध्वस्त करायला हवे. ती जमातच अशी आहे की कोणत्याही प्रकारचा चांगुलपणा दाखवायची त्यांची लायकी नाही. उठता लाथ बसता बुक्की असे सतत करत राहिले आणि थोडीशीही- अगदी एक मिनिटाचीही सूट दिली नाही तरच ते गप्प बसतील. नाहीतर कधीनाकधी ते इतर सगळ्यांवर उलटणारच. जर तसे केले नाही तर १९७१ मध्ये युध्द जिंकले पण सिमला करारात सगळे गमावले त्याची पुनरावृत्ती होईल.
  • Log in or register to post comments

असेच व्हावे. पाकिस्तान किती

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 10:15 नवीन
असेच व्हावे. पाकिस्तान किती प्रमाणात प्रतिकार करेल त्यावर अधिकची कारवाई होईल असं वाटतंय. पाकिस्तानने विमाने पाठवून किंवा सीमेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

उठा उठा,

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 10:14 नवीन
उठा उठा, हल्याचे पुरावे मागण्याची वेळ आली, मोदींना शिव्या हासडण्याची वेळ आली, पाकिस्तानला मदत करण्याची वेळ आली, मुर्खासारखे बरळण्याची वेळ आली!
  • Log in or register to post comments

होय होय ,

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 05/08/2025 - 10:47 नवीन
होय होय , ते चालतं मिसळ्पाव वर . तुम्ही जरा काही बोललात तर तुमचा आयडी उडवण्यात येईल हो , तुम्ही म्हणजे काही मराठी विषयातील विद्या वाचस्पती प्राध्यापक नव्हे . जरा जपुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आता, साडेदहाला भारतीय सेनेची

वामन देशमुख
Wed, 05/07/2025 - 10:17 नवीन
आता, साडेदहाला भारतीय सेनेची पत्र परिषद आहे.
  • Log in or register to post comments

अंतरराष्ट्रीय बातम्यात दिसत

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 10:46 नवीन
अंतरराष्ट्रीय बातम्यात दिसत आहे की भारतीय सैन्याने हल्ला केला आहे, भारतीय सैन्याचे खूप खूप अभिनंदन! चांगले नेतृत्व देशाला असते तर भारतीय सैन्याने २३ एप्रिल रोजी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानात घुसून पाकड्याना चोपले असते ह्याबाबतीत काहीही शंका नाही! जय हिंद जय भारत! भारत माता की जय!
  • Log in or register to post comments

हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी

सुबोध खरे
Wed, 05/07/2025 - 10:50 नवीन
हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानात घुसून पाकड्याना चोपले असते उंदीर बहुतेक सुट्टीवर गेलेले दिसतात
  • Log in or register to post comments

उंदीर बहुतेक सुट्टीवर गेलेले

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 10:52 नवीन
उंदीर बहुतेक सुट्टीवर गेलेले दिसतात मंत्रालयात खुर्च्या उबवत बसलेत! :) सौगंध मुझे…. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अभिनंदन

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 05/07/2025 - 11:16 नवीन
समयोचित हल्ला. अभिनंदन. General Lt Gen Ahmed Sharif Chaudhry said the number of lives had risen to 26 civilians across six localities that India hit, with 46 injured. पण त्याचवेळी- Pakistan downs 5 Indian jets as retaliation for late-night strikes at 6 sites: officials https://www.dawn.com/news/1908824/pakistan-downs-5-indian-jets-as-retaliation-for-late-night-strikes-at-6-sites-officials बाकी सरकारमध्ये हिंम्मत नाही म्हणाणार्या काही नेत्यांचे काय करायचे कळत नाही. सैन्यातील सर्वोच्च अधिकार्यांबरोबर सल्ला मसलत केल्यावरच हे निर्णय घेण्यात येतात. अन्यथा नाही.
  • Log in or register to post comments

आत्ता ह्या पुढची पायरी म्हणजे

रात्रीचे चांदणे
Wed, 05/07/2025 - 11:34 नवीन
आत्ता ह्या पुढची पायरी म्हणजे, पाकिस्तान म्हणणार निरापराध नागरिक आणि लहान मुले मेली. आणि आपलेच काही लोकं ह्याचा निषेध करणार.
  • Log in or register to post comments

आतापर्यंत काली आणि दुर्गा

Bhakti
Wed, 05/07/2025 - 11:38 नवीन
आतापर्यंत काली आणि दुर्गा पाहिल्या नव्हत्या,आज मी दोन्ही पाहिल्या काली आणि दुर्गा! Image removed. #ColSofiaQureshi #WingCommanderVyomikaSingh #OperationSindoor भारतीय स्त्रीचे सिंदूर उजाड करणाऱ्या भ्याड हल्ल्याचे प्रत्त्युत्तर भारतीय स्त्री शक्ती देतांना...
  • Log in or register to post comments

कुठचे काय

चंद्रसूर्यकुमार
Wed, 05/07/2025 - 11:59 नवीन
आज मी दोन्ही पाहिल्या काली आणि दुर्गा!
छे हो. कुठचे काय. ऑपरेशन सिंदूर म्हणजे हिंदू पॅट्रिआर्कीचे प्रतीक असलेले नाव दिले ही बोंबाबोंब सुरूही झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

अशा टंकनशूर कागदी घोडे

Bhakti
Wed, 05/07/2025 - 12:53 नवीन
अशा टंकनशूर कागदी घोडे नाचवणाऱ्याना लोकांना स्वतः बंदूक घेऊन सीमेवर पाठवावे .मग ती खरी समानता होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

काल मी याबद्दल स्त्रीवादी

Bhakti
Fri, 05/09/2025 - 16:52 नवीन
काल मी याबद्दल स्त्रीवादी काही मराठी लेख वाचले.त्यानुसार असं म्हणणं आहे की,सिंदूर टिकली अशा नावांनी भावनिकदृष्ट्या मुद्दा कॅच करण्याचा हा डाव आहे.अनेकांना भावनिक करून स्वतःचं महत्व वाढवायचं आहे. मला विचाराल तर '"स्त्रीवादाच्या बाबतीत पहाट झाली असल्यास सिंदूर नाव ठेवा नाहीतर बांगड्या...काही फरक पडणार नाही इतकी तटस्थता येते" थोडं विस्कळीत लिहलंय पण भावना समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आणि इतकं व्यवहारी शहाणंपण

Bhakti
Fri, 05/09/2025 - 16:54 नवीन
आणि इतकं व्यवहारी शहाणंपण काहींमध्ये असतं की.."ऑपरेशन सिंदूर"चे कॉपीराइट ही २४ तासांच्या आत मागतात.यांना हुशार म्हणावे की डम्ब???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

मि त्या नावाचे डोमेन नेम

स्वरुपसुमित
Fri, 05/09/2025 - 21:07 नवीन
मि त्या नावाचे डोमेन नेम ,इन्स्टा आयडी, युटुब च्यानेल पण घ्यायचा प्रयत्न केला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा