Skip to main content

"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा !!"

लेखक भम्पक यांनी शुक्रवार, 23/08/2024 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
न करीशी व्यर्थ चिंता तू ठाऊक मज सामर्थ्य माझे ! कुणाशी कसे वदावे कसे वागावे काय केल्याने काय होईल.... हि चिंता तयास ज्याने क्रमिला पथ दुहेरी माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ कण भारही किंतु तयात नाही ! नकोत सला-मशवरा मजला ठाऊक मज मार्गक्रमण माझे ! मान्यता जगात उदंड जाहल्या त्या प्रती जगणारे अमाप ... मी तर अव्यक्ताचा चाहता जी माझी कृती तीच परिणती ! का कशाचीही बाळगावी मी भीती ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1668
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया