मौन!
मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही.
भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो.
मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात.
सकाळ- संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या घंटांचे गुंजराव प्रत्येक नादाला मनाला स्थिर करतात. ही पाखरं ब्रम्ह मुहूर्तावर नवीन दिवसाचं निसर्गाकडून आवतन देतात.
अजूनही कोकिळा कुठेतरी संध्याकाळी सुद्धा गाते तेव्हा उगाच मरगळ झटकून संध्येचा घट प्यायला लावते.
प्राणायाम मधल्या त्या प्रत्येक श्वासातून एक नवीन नवीन क्षण जन्म घेत राहतो.
उन्हाळाची उष्ण हवा ह्रदयावर कंपण तरंग टाकत राहते,थंडीतली हुडहुडी हाडांचा रक्तांचा संवाद घडवते,पावसाच्या सरींनी कर्णमार्गे मेंदूला तृप्ततेत भिजवते.
मौनाचा कृष्णविवरं अनंत शक्यतांचे दालन खुले करतो.
-भक्ती
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिडल इस्ट संदर्भात गिरिश
धन्यवाद प्रचेतस सर
इरावती कर्वे यांचे
धन्यवाद ताई
मक्केतील उठाव हे वाचलंत का?
हो. हुप्प्या ह्यांच. आणखी
अशी पुस्तके वाचनालयात बरीच
मागे निळूदामले ह्यांचे सीरिया
च्यामारी मौनाच्या लेखावर लोक
ह्यालाच म्हणतात 'मौनाची शक्ती
खूप गहन लिहिलंत भक्ति, काही
जिए नियतीकडे सतत वळतात कारण..