दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली.
-- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मार कश
अस्सा घोळ आहे तर...
तेच तर !
डिअर प्रगो, मार्कस वॉटेवर, निराकार गाढव
सदर ३ ही आय डी
छान व्यक्तिगत मारामार्या
Trump
निराकार गाढव
मार्कस ऑरेलियस
भगवत् गीतेला पोपटपंची
मी काही तुम्हाला कोणतीही ओवी
मार्कस ऑरेलियस
चित्रगुप्त
@उन्मेष दिक्षितः क्षमा करा, हळू हळू येतो आहे एकेका प्रतिसादाकडे.
चित्रगुप्त : महाभारत
@ उन्मेष दिक्षितः उत्तरे.
सत्य/वस्तुस्थिती लपवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत.
महाभारताला केवळ एक महाकाव्य
@ राघवः चूक आणि बरोबर, समाजमान्यता वगैरे
माझे चार आणे
@ अहिरावणः रोचक प्रतिसाद.
जालावर उपलब्ध असलेले जैन
@ अहिरावणः जैन महाभारत खूपच रोचक दिसते आहे.
>>>ते खूपच रोचक आणि वेगळे
भांडारकर आवृत्ती संस्कृतात
@प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तीर्थंकरांचे उल्लेख आहेत का ?
प्रचेतसः व्यासकृत महाभारतात
@प्रचेतसः महाभारत काळाविषयी
नाही, घोळ नाही, सांगायचा
आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे
@ धर्मराजमुटके साहेब, शंका अजिबात नाही, जिज्ञासा आहे.
महाभारत का घडलं...
@अर्धवटरावः 'शक्तीचा निचरा' हे स्पष्टीकरण भारीच आहे.
चित्रगुप्त
भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
जाऊ द्या हो.
अरा
अहो चालायचच.
energy म्हणतं आणि मानवी व्यवहारात/राजकारणात आपण ज्याला power
घोळ फक्त माझा नाहि हो...
घोळ तुमचाच आहे आणि तुमचाच आहे !
आलात का मूळपदावर..
चित्रगुप्तजी
@उन्मेष: ग्रंथ अभ्यासून, की तो न वाचताच सांगताय ?
सर फक्त
@उन्मेषः पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
@चित्रगुप्त : वॉट
माझे २ पैसे...
अभिनंदन. नाडीविरहीत* प्रतिसाद
महाभारताचा काळ