✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कर जरा कंट्रोल...! :-)

च — चलत मुसाफिर, Fri, 07/21/2023 - 19:27
किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले ठेवला मी फोन होता मूक सारा वेळ तो एवढीशी चूक झाली, मजवरी का उखडतो नाहि जमला घ्यायला रे फोन तव तेथे मला बिल कुणी भरणार माझे, मित्र जर रागावला? शंका नको घेऊ जरा तू निखळ मैत्री ही असे माझिया डीपीवरी तो फक्त 'लाईक' देतसे एकदा केवळ तयाने टाकला होता बदाम सोड तो तू विषय त्याला अर्थ नसतो एक छदाम बिघडले कोठे जरी मम हस्त त्याने चुंबले? बिघडले कोठे जरी मजला जरा गोंजारले? देऊ नको तू त्यास इतक्या डझनवारी रे शिव्या ऐकल्या नसतील कोणी याअधी इतक्या नव्या . . . . जाउ दे मज, जाहली ही वेळ नवरा यायची कंट्रोल नाही ठेवला तर प्रीत ही विसरायची ******* या कवितेचे काही आशयरूपी पूर्वज: (कपाळ)मोक्ष!! :-) https://www.misalpav.com/node/45823 प्रोफाइलवरती बाई..!! https://www.misalpav.com/node/48416 विनवणी https://www.misalpav.com/node/46289

प्रतिक्रिया द्या
2742 वाचन

💬 प्रतिसाद (6)

'सोमि' रसातली कविता आवडली.

चित्रगुप्त
Fri, 07/21/2023 - 21:18 नवीन
हा आणखी एक नाविनच 'सोमि' (सोशल मिडिया-) रस. भरतमुनि झीट येऊन पडतील आता. यथो हस्त: तथो दृष्टि:, यथो दृष्टि: तथो मन:। यथो मन: तथो भाव:, यथो भाव: तथो रस:।।
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चलत मुसाफिर
Fri, 07/21/2023 - 22:56 नवीन
तुमची प्रतिक्रिया अनमोल आहे. मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कर जरा ....

कर्नलतपस्वी
Sat, 07/22/2023 - 06:49 नवीन
कर जरा कंट्रोल, लाईन मोठी आहे प्रा:तकाळची वेळ, सर्वानाच घाई आहे. छान.
  • Log in or register to post comments

हा हा हा

चलत मुसाफिर
Sat, 07/22/2023 - 14:05 नवीन
धन्यवाद सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

मस्त कविता. या कॉफी

विवेकपटाईत
Sat, 07/22/2023 - 14:13 नवीन
मस्त कविता. या कॉफी प्रकरणावर कार्यालयातील एक जुना किस्सा आठवला..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चलत मुसाफिर
Sat, 07/22/2023 - 14:33 नवीन
लिहा की त्याबद्दल. वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा