ग्रंथ प्रकाशन सोहोळा - अज्ञात पानिपत

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
6 Jun 2023 - 4:07 pm

प्रकाशन समारंभाची तारीख ठरविताना एक मोठा योग्य जुळून आला. ज्येष्ठ इतिहास-संशोधक मा. श्री. गणेश हरी उर्फ तात्या खरे यांच्या स्मृतीनिमित्त भारत इतिहास संशोधक मंडळ दर वर्षी काही ना काही कार्यक्रम आयोजित करत असते. यावेळी त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत माझे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मला मिळते आहे, हा एका अर्थाने तात्यांचा आशीर्वादच आहे असे मी समजतो.

या पुस्तकात तात्यांच्या संशोधनाचा आधार मी अनेक जागी घेतलेला आहे. विशेषत: त्यांनी दिलेले मोगल दरबारचे अखबार मी पुष्कळ वापरलेले आहेत. प्रसंगी अर्धपोटी, उपाशी राहून, कधी गाडीभाड्याला पैसे नसल्याने पायी पुणे ते सासवड, सातारा असे प्रवास पायी करत, स्व:प्रयत्नाने फार्सी, हाळे कन्नड इत्यादी भाषा शिकून मोठ्या कष्टांनी तात्यांनी आपले संशोधन केले. श्री. मेहेंदळे सरांनी तात्यांच्याबद्दल त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत, त्या जरूर वाचण्यासारख्या आहेत. अश्या तपस्वी संशोधकाचा आशीर्वाद मिळणे ही माझ्यासारख्या हौशी संशोधकांसाठी फार मोठी गोष्ट आहे.

कार्यक्रम निमंत्रणपत्रिका खाली देतो आहे, सर्व मि.पा.करांना आग्रहाचे निमंत्रण, जरूर या!

image

https://drive.google.com/file/d/1FhgUZTyA0CQh9RiV9lALdGf7ic_tZ_Qm/

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

6 Jun 2023 - 4:17 pm | कंजूस

प्रकाशनास शुभेच्छा.

जुन्या पिढीतील इतिहासकारांनी जे कष्टपूर्वक आदर्श निर्माण केले, ते मनोज दाणींच्या रूपाने आज पहायला मिळतात.
'अज्ञात पानिपत' या नव्या पुस्तकातील अनुक्रमणिका वाचून पानिपतची लढाई मराठी मनाला आजही कशी मोहवते याचा प्रत्यय येतो.
पानिपतची ८ तासाची लढत कशी हेलकावत होती, मराठा साम्राज्याचे लष्करी अधिकारी कसे वागले, का वागले, भावनिकता कधी, का हावी झाली, या घटनांची नोंद या ग्रंथात वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे. अवास्तव कथने, वाताहतीचे आकडे यावर मनोज दाणींच्या लेखनातून प्रकाश टाकला आहे. त्यामुळे या मराठीतील ग्रंथाला वाचनार्थ अनेक उत्सुक वाचक मिळतील.

मनो's picture

7 Jun 2023 - 7:21 am | मनो

धन्यवाद!

टर्मीनेटर's picture

7 Jun 2023 - 7:42 am | टर्मीनेटर

अभिनंदन!
एका इतिहास संशोधक मिपाकराचे आणखीन एक पुस्तक प्रकाशित होत असल्याचा एक मिपाकर म्हणुन प्रचंड अभिमान वाटतोय.
पुस्तक प्रकशन सोहळ्यासाठी शुभेच्छा 👍

आनन्दा's picture

7 Jun 2023 - 8:20 am | आनन्दा

अभिनंदन आणि शुभेच्छा!
लवकर ebook काढा अशी विनंती.