✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी : वाचन घडते कसे ?

ह
हेमंतकुमार यांनी
Wed, 05/10/2023 - 06:51  ·  लेख
लेख
यंदाच्या महाराष्ट्र दिन (१ मे ) अर्थात मराठी भाषा दिनानिमित्ताने एक कल्पना मनात आली. त्यातून प्रसवलेला हा धागा त्या दिवशीच प्रसिद्ध करण्याचा मानस होता परंतु इथल्या तांत्रिक समस्येमुळे ते जमले नाही. आता ती कल्पना सर्वांसमोर मांडतो. मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा हा एक प्रयत्न. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल: * दैनिके *नियतकालिके * मराठी संस्थळे * पुस्तके या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता. दैनिके १ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ? २. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील? ३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ? ४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ? ५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ? अन्य नियतकालिके ( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. ) १. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ? २. त्यातील आवडणारी सदरे ३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का? मराठी संस्थळे १. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ? २. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ? ३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार ४. नावडणारे विभाग / प्रकार ५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ? पुस्तके १. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित २. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक ३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ? ४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे. ५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार. ६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ? * वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत. वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या वेळेस देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण ! धन्यवाद ! सूचना : फक्त मराठी भाषेतील वाचनाबद्दलच लिहावे. *************************************************************************************************
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21348 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

दोन उदाहरणे देतो.

कंजूस
Sun, 07/23/2023 - 21:19 नवीन
दुर्गा भागवत - लेखन सहजसुंदर चांगले आणि विविध पण ते जड कोण वाचणार?(कर्णायन सोडा). मग प्रकाशन लाभाचा विचार न करता एकमेव प्रकाशक उगवला. ह.अ.भावे. साने गुरुजी संपूर्ण (omnibus)साडेबारा हजार पाने. ---- दुसरं उदाहरण. १८५७चे समर मी आतापर्यंत हातात घेतलं नव्हतं. वीरश्री पूर्ण,भावनेला चेतवणारं लेखन आहे. पण तरीही नाही आवडलं. विल्यम डर्लींपलचं लास्ट मुघल(२००६) बर्याच नवीन गोष्टी उजेडात आणतं. ( संदर्भ कागद आपल्याच पुरातत्व खात्याच्या इमारतीत भिजत (होय) पडले आहेत. पण ते वाचून पुस्तक मराठीत कोणीही लिहिणार नाही. कुणीही छापणार नाही. तर याच घटनेवर 'मुंबईचं वर्णन'(गो.ना.माडगावकर,१८६१) मध्ये काय लिहितात? मुंबईत 'जनतेचं हीत पाहणाऱ्या राजाचं भलं व्हावं म्हणून हिंदू व्यापारी,यहुदी,पारशी लोकांनी आपापल्या देवळांत प्रार्थना केल्या. त्या सर्व दिल्या आहेत. मुसलमानांनी काहीच नाही केलं.
  • Log in or register to post comments

लहानपणापासून कसरीसारखी

सागरसाथी
Sun, 07/30/2023 - 13:45 नवीन
लहानपणापासून कसरीसारखी पुस्तकं खाल्ली. आजोबांनी जमवून ठेवलेले चांदोबा, अमृत चे असंख्य अंक. स्वामी समर्थांचे वि.के.फडके लिखित चरित्र आणि गोंदवलेकर महाराजांचे बेलसरे लिखीत चरित्र घरातूनच मिळाले. कथाकल्पतरु आणि कथासरित्सागर एवढ्या वेळा वाचलं की प्रत्येक पान सुटं होवून गेलं. दैनिक... दैनिक मोबाईलवर वाचण्याची चाळण्याची सवय आहे.रविवारची वृत्तपत्र त्यांच्या पुरवण्यासाठी घेतली जातात. नियतकालिके.. अमृत,लोकप्रभा, चित्रलेखा, सकाळ, चांदोबा, दक्षता आता बहुतेक बंद झाली आहेत त्यांनी आपले रूप बदलले आहे. संस्थळे.. मिसळपाव, मायबोली, मैत्री, मराठी ब्लॉग लिस्टवरुन वेगवेगळे ब्लॉग. वाचतावाचता शब्द, वाक्य समोर येतात ते गुगल सर्च करुन वेगवेगळ्या वेबसाईटवर , ब्लॉगवर जावून ते वाचणे. पुस्तके.. खुप खुप खुप.. पुल.वपु.कणेकर, माडगुळकर छोटी मोठी पाती, देवधर,दुर्गा भागवत, गोनीदां, चित्तमपल्ली, अच्युत गोडबोले, अनुवादीत,अनुभव, साहस कोणताही विषय व्यर्ज नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा