Skip to main content

विसरून जाऊ सारे.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 15/01/2023 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी थंडी हवेत गारवा अंगावर रग शेकोटीची धग संक्रातीचा सण सुगडाचं वाण सवाष्णी सोळा काळी चंद्रकळा तीळाचा हलवा हलव्याचे दागिने तीळाचं दान बाळाचं बोरन्हाण बाजरीची भाकरी तीळाची पेरणी लोण्याचा गोळा खिचडीचा मान गुळाची पोळी तीळाची वडी हलव्याचा काटा वाढवतो गोडी तीळगुळ घ्या गोड बोला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4497
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मस्त. तिळगुळ घ्या गोड बोला. मकर संक्रातीच्या शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

सर्वांचे मनापासून आभार. दोनच शब्द तीन आणी गुळ पण किती मोठा अर्थ. मनापासून मनाचा मनाशी संवाद साधणारा जणू पूलच. मुबंई च्या सी लि॔क किंवा कोलकात्यातील हावडा ब्रिज पेक्षाही सशक्त. कवीता पण दोन शब्द जोडून बनवली आहे.

छान. बाळाचं बोरन्हाण सर्वात मर्मस्पर्शी. दहा वर्षांपूर्वीचा आमच्या नातवाच्या 'बोरन्हाण' चा फोटो हुडकून पाठवेन.

व्वा, मस्तच ... क्या बात कर्नल साहेब ! MKS127 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

काळी चंद्रकळा , अजूनही मनाजोगती ही साडी नाही मिळाली.खुप सुंदर असते ही साडी.आज काळ्या वस्त्रांचा विशेष मान :) तिळगुळ घ्या गोड गोड बोला! A