(झाली किती रात सजणी...)
मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून....
(आली जरी रात सजणी...)
आली जरी रात सजणी
झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे.
अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे.
खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे.
बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.
झोपले चंद्र तारे,निद्रिस्त झाल्या उषा निशा.
मोकळ्या झाल्या आता, कुजबूजण्यास दाही दिशा.
ऐकता मंद किंकीण, पैंजणांची, वाढतात स्पंदने
गुलाबी थंडी अन् संग कोरियन घोंगडे, अपसूक माझी झाकतात लोचने
टार्गेट चे लोढणे,आणी टि. ली. चा आकांत
किती दिसांनी मिळाला, सखये शांत हा विकांत.
मन माझे खोळांबले,आली जरी न तू आता,
तर ओघळतील थेंब दवांचे अन् मावळेल नभीचे चांदणे.
नावडे मला तुझे ते उगाच रेगांळणे, अन् "थांब जरा येते", सांगणे.
-कवी पतंग पाॅवर
बिग बाॅस
=)) कहर आहे
प्रचेतस भौ,धन्यवाद
कविता आवडलीच. 'जवां दिलों की दास्तां' आहे होय .
तिकडे मोबाईलात रमलेल्या आजीची
आजोबा - आजीची वेगळीच समस्या असते.
दोन ध्रुवावर दोघे आपण.
दोन ध्रुवावर दोघे आपण