✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुत्रप्रेमाच्या उमाळ्याचे "बळी'

अ
अन्वय यांनी
Sat, 12/13/2008 - 15:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1951 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

क
कलंत्री Sat, 12/13/2008 - 17:50 नवीन

याही अगोदर...

शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचेही पद मुलीच्या गुणात फेरफार केल्यामुळे गेल्याचे स्मरते. विलासराव यांनी मात्र त्यांना जनतेच्या दुखाचे सोयरसुतक नाही हेच दाखविले.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 12/13/2008 - 18:07 नवीन

१+

सहमत
  • Log in or register to post comments
ट
टायगर Sat, 12/13/2008 - 18:22 नवीन

करणीचे फळे

या तिघांचे "बळी' गेले असे म्हटले आहे. "बळी' हा शब्द इथे योग्य वाटतो का? बळी हा दिला जातो, हे तर आपल्याच कर्माने गेले आहेत. मला असे वाटते की, हे सर्वजण पदावरून बाजूला गेले, ते योग्यच झाले. विलासराव यांच्या रुपाने महाराष्ट्राला प्रथमच एक अत्यंत निष्क्रीय मुख्यमंत्री मिळाला होता. ते गेल्याने महाराष्ट्र मोकळा श्‍वास घेऊ शकेल, असे वाटते. बाकी मार्गारेट अल्वांबद्दल काय बोलणार? नटवरही आपल्याच करणीचे फळे भोगत आहेत.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 12/13/2008 - 19:47 नवीन

व्यक्तीपेक्षा...

...नटवरसिंह, मार्गारेट अल्वा आणि विलासराव देशमुख ही तीन नावे पुरेशी आहेत. खरे आहे. यात अजून एक विरोधाभास वाटणारे (म्हणजे आई-बापाने मुलासाठी करण्या ऐवजी) उदाहरण हे नितेश राणेचे आहे. त्याचा मात्र खरेच वडलांच्या बंडाळीमुळे बळी गेला असे वाटले...बाकी "बळी" हा शब्द इतर तिघांना तितकासा लागू होतो असे वाटत नाही. विलासराव तर काय अजूनही अशोक चव्हाणांचे "कान पिळत" बसले आहे असे म्हणले जाते... इतके महत्व जेंव्हा इतक्या नाकर्त्या माणसाला काँग्रेस नेतृत्व (असेच इतर पक्षातही होऊ शकेल ,आश्चर्य वाटणार नाही) कसे देते हे पाहीले की "डाल मे कुछ काला है" असेच म्हणावे लागते. कलंत्रीसाहेबांनी सांगितलेल्या निलंगेकरांच्या उदाहरणाव्यतिरीक्त इंदीरा गांधींचे पण आसन संजय गांधींमुळे डळमळीत झाले होते असे वाटते. तरी देखील, "व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, याचे भान स्वार्थी राजकारण्यांना राहत नाही. " हे वाक्य जरा बदलावेसे वाटते. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळचे उदाहरण आठवते. संयुक्त महाराष्ट्र लढा हा महाराष्ट्रातील विविध आणि एकमेकांशी वैचारीक विरोध असलेल्या राजकीय नेतृत्वाने एकत्र येऊन लढला होता. अर्थात काँग्रेस त्यात नव्हते कारण नेहरूंचा त्या लढ्याला विरोध होता. त्या संदर्भात यशवंतराव चव्हाण एका वादात लढ्याला उद्देशून या अर्थी म्हणाले होते की , "नेहरू हे राष्ट्रापेक्षा मोठे आहेत". (पुढे याच पद्धतीने कोणीतरी "इंडीया इज इंदीरा" म्हणाले होते. ). त्यावेळेस या एका वाक्यावर आचार्य अत्रे हे संतापले होते आणि वैतागून या अर्थी म्हणाले होते की "राष्ट्रापेक्षा व्यक्तीला मोठे समजाताहात, तुम्ही कायमच लहान रहाल." थोडक्यात मला वाटते राजकारणी असो अथवा सामान्य, त्याने व्यक्ती आणि पक्ष/संघटना यांच्याशी कितीही बांधिलकी ठेवली तरी अंतिम आणि प्रामाणिक बांधिलकी ही देशाशी ठेवणे महत्वाचे वाटते. दुर्दैवाने आज अशा विचाराने वागणारे राजकारणी विरळ दिसतात अथवा दिसतच नाहीत आणि त्याचे महत्व सामान्यांना पण रोजच्या पोटापाण्याच्या लढ्यात समजत नाही. म्हणूनच लोकशाही असून देखील बहुमतवाल्या पक्षाचे निर्वाचीत सदस्य नाकर्त्या निर्वाचीत नेतृत्वाला साधे सुनावण्याच्या आणि काढण्याच्या मागे लागण्या ऐवजी दिल्लीकडे डो़ळे लावून मजा बघत बसतात आणि विलासरावांसारखा माणूस इतके सर्व होऊन देखील "मी आनंदी आणि नशिबवान आहे" वगैरे राजीनामा देताना बोलू शकतो.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 12/13/2008 - 21:17 नवीन

लालबहाद्दुर.

लालबहाद्दुर शास्त्रींचा मुलगा नोकरीसाठी फिरत होता आणि नोकरी मिळत नव्हती. तेंव्हा त्याने आपल्या बाबांना विनंती केली की तुम्ही जर कोठे शिफारस केली तर मला नक्की नोकरी मिळेल. लालबहाद्दुर शांतपणे म्हटले की भारतातल्या सर्व बेरोजगांराना नोकरी मिळू दे मग तुझी शिफारस करतो. काही वर्ष थांब. नंतर आपल्या सचिवाला बोलावुन सांगितले की माझा मुलगा माझ्या नावाचा दूरुपयोग तर करीत नाही ना यावर लक्ष ठेवा. माझ्या पदाला, पक्षाला याच्यामुळे बट्टा लागायला नको. आताच्या राजकारणीवर वेगळे भाष्य करायला नकोच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा