पेरणा
कोण शिकवते कळ्यांना
कसे, केव्हां उमलायचे
कोण शिकवते पानांना
केव्हां कसे गळायचे
ऋतुराज वसंत येता
झाडे बहरून येती
निसर्ग चक्र फिरता
होती फुले कळ्यांची
श्वानास कसे कळते
मास भादव्याचा आला
खरचं गरज आहे का?
हे सर्व शिकवावयाची
बुद्धिमान मानवाला!!!
जानुके आपुली
आदम आणी ह्व्वाची
स्वर्गातूनच शिकून आली
कला फळे चाखायची
धन्वंतरी कशाला
हे सर्व शिकवण्यास
मग मित्र मैत्रिणीं कशाला?
फक्त पार्टी झोडण्यास!!!!!
(दारू ढोसण्यास)
ह्म्म ......
असे हा सहावा वेद
न लगे संथा कुणाची
का भांबावलास तू रे
ही कस्तुरी तुझ्याच पाशी
अदृष्य सापळे हे
का पळे तू उगाच
जे पाहिजे ते
आहे जवळ तुझ्याच
कधी समजेल या खुळ्यांना
जे पाहिजे ते
आहे तुझ्याच पाशी
-कवी चाहूल
३१-९-२०२२
ता. क.- कवीता वाचकांना एक अनुभव (शब्दात ओन्ली) फ्रि...फ्रि...फ्रि
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5032
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा
धन्य झालो....
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कहर आहे कर्नलसाहेब =))
काकानु
पेरणा लिवली नाही
माऊली.....
In reply to पेरणा लिवली नाही by ज्ञानोबाचे पैजार
खरडवही
In reply to पेरणा लिवली नाही by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद
In reply to पेरणा लिवली नाही by ज्ञानोबाचे पैजार
मनापासून आभार...
जानुके आपुली
तसं नव्हे !
In reply to जानुके आपुली by कर्नलतपस्वी