मराठी संगीतकार ॠषिराज : माहिती पाहिजे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
१९७८ - ८० चा सुमार असावा, बन्याबापू या सिनेमाची गाणी खुप गाजत होती.
मी कशाला आरशांत पाहू गं, हे गर्द निळे मेघ, ले लो भाई चिवडा ले लो, प्रीतीचं झुळझुळ पाणी ही गाणी आकाशवाणी आणि गल्लीबोळातही गाजत होती.
उषा मंगेशकर बरोबर हिंदीतील अमीतकुमार, शैलेद्र सिंग यांचा ही प्रेक्षकांना खुप पसंत पडला. ऑर्केस्ट्रा, गणेशोत्सवातील मेळ्यामेळ्यात, कॉलेज मधील स्नेहसंमेलनात ही सादर होणार हे ठरलेले होते.
रुढार्थाने नायक नसलेले मोहन गोखले आणि बाळ कर्वे यांनी बहारदार काम करून केलेली धमाल प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती.
कथा, पटकथा, संवाद हे सिद्धहस्त वसंत सबनीस यांचे होते, बन्या व बापू हे दोघे बेकार तरुण बेकारीला कंटाळून बन्या जीव द्यायला जातात, पण दोघांनाही तरूणी भेटतात आणि वाटेल ते करून जगायचे असे ते ठरवतात. प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोची होत राहते पण जिथे जिथे ते काम धरतात,तिथे काहीतरी घोळ घालतात व परिणामी त्यांची नोकरी जाते. पण शेवटी काही काही होत शेवट गोड होतो असं कथासुत्र गीत, संगीत, विनोद, अभिनय या मुळे सर्वबाजूंनी जमून आला होता ! बॉक्स ऑफिस वर पण बन्याबापूने चांगले यश मिळवले.
हे सर्व माझ्या शालेय मित्राशी गप्पा मारताना आठवले. या सिनेमाचे संगीतकार ॠषिराज होते. या काळात त्यांनी आणखी काही सिनेमांना संगीत दिले होते, सिनेमांची नावं आठवत नाहीत. संगीतकार ॠषिराज यांच्याबद्दल आंजावर कुठेच काही माहिती मिळाली नाही, त्यांचे छायचित्र देखील नाही !
कुणाला संगीतकार ॠषिराज यांच्याबद्दल काही तपशील माहीत आहेत का ? त्यांचे छायचित्र इत्यादि कुठं उपलब्ध होऊ शकेल ?
प्रतिक्रिया
हाच प्रश्न गेल्या वर्षी ही
धन्यवाद खेडूत.
संगीतकार हृषीराज यांचं एक मधाळ गाणं
प्रेमगीत
फोटो आणि इतर माहिती
धन्यवाद, तर्कवादी.
तुम्ही भोजपुरी म्हणाताय ते
जख्मी दिल मधलं आणखी एक गाणं