मिसळ म्हणजे माझा जीव की प्राण !!
प्रवासात चांगली आणि प्रसिद्ध मिसळ कुठे मिळते या शोधात मी असतो. कित्येक वेळा तर मिसळ खाण्यासाठी फार दूरवरचा प्रवास मी केला आहे. मी मुळचा ठाणेकर असल्यामुळे मामलेदार मिसळ ही आमच्यासाठी पंढरी आणि आम्ही मिसळपंढरीचे वारकरी.
सध्या मुंबई पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मिसळीचा सुळसुळाट झालेला आहे. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिकच्या काळया मसाल्याची मिसळ, कुठे चीज मिसळ, सर कुठे तंदुरी मिसळ, कुठे मडक्यातली मिसळ, तर कुठे अजून काही.. काल-परवा सर कुठेतरी चिकन मिसळ आणि मटण मिसळ मिळण्यास सुरुवात झालेली आहे असं वाचण्यात आलं.
कोल्हापूर-सोलापूर नासिक हायवेवर मिसळीचे या प्रकारची जॉइंट्स दिमाखात उभे दिसतात. गर्दी पण भरपूर बघायला मिळते.
आजच्या मुंबई-पुणे प्रवासात अशा एका ठिकाणाला भेट देण्याचा योग आला.
हॉटेल खूपच चांगले प्रशस्त होते हॉटेलच्या सुरुवातीलाच एक फोटो बूथ होता. खाऊन परत जाताना माणसं त्याठिकाणी पुणेरी पगडी घालून फोटो काढत होते.
आम्हीसुद्धा मिसळ ची ऑर्डर दिली थोड्या वेळाने वेटर एका भल्यामोठ्या ट्रॉलीवर दोन भल्यामोठ्या पितळी ताटामध्ये मिसळ आणि त्याबरोबर खूप सारे जिन्नस घेऊन आला. पितळी वाट्यांमध्ये फरसाण,कांदा, मटकी, सुकी बटाट्याची भाजी, कढी वडा असे जिन्नस होते. एका भल्या मोठ्या तांब्यात मिसळीचा रस्सा आणि एका तांब्यात कढी अशी व्यवस्था होती. सोबत पुणेरी पाट्या सुद्धा होत्याच . मिसळीची चव सुद्धा ठीक होती.
मिसळ खाऊन झाल्यानंतर मी जरा फेरफटका मारण्यासाठी उठलो. हॉटेल मधली स्वच्छता टापटीपपणा, सर्वात विशेष म्हणजे पितळी भांड्यांमध्ये मिळणारी मिसळ चांगला अनुभव होता.
या संबंधित माझा फीडबॅक देण्याकरता मी हॉटेल मालकाला भेटलो ते गृहस्थ सगळ्यांना सगळं काही योग्य रीतीने दिले जात आहे याची काळजी घेत होते.
हॉटेल ची आणि मिसळ ची तारीफ केल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला मिसळीच्या बरोबरचे जे पदार्थ फरसाण, कांदा, बटाट्याची भाजी, मटकी ताटात लोक बरेच टाकून जात आहेत हे सगळं उरलेलं काय करता.. ते म्हणाले आम्ही ते परत एकत्र करतो आणि पुढच्या गिऱ्हाईकआला देतो. काय?? माझी सटकली
अहो म्हणजे तुम्ही खरकटे खाऊ घालताय की.. तो थोडा गोंधळाला.. नाही म्हणजे खरकट्या गोष्टी फेकून देतो न खाल्लेल्या गोष्टी परत दुसऱ्यांना देतो..
मी: तुम्हाला काय माहित कोणते पदार्थ खाल्ला आणि कोणता नाही. एखाद्या माणसाने मिसळ खाता खाता त्याच चमच्याने थोडा फरसाण किंवा कांदा आपल्या पानात घेतला असेल. तोच उरलेला फरसाण कांदा तुम्ही परत दुसऱ्या गिऱ्हाईकाना त्याच्या ताटात चिटकवता अगदी त्याच वाटीत??
या थाळी मधून त्या थाळीत....काय घाणेरडं प्रकार..आणि लोक तिकडे मिटक्या मारत खात आहेत. माझ्या थाळीमधला फरसाण किती लोकांचा उरलेलं खरकटे होता कुणास ठाउक.
थोडीतरी लाज वाटते का हो?? हॉटेल मालक घाबरला नाही ते असं नाही ते तसं.. असं नाही आम्ही लक्ष ठेऊन असतो. असं नाही केलं तर अन्न वाया जाते अशी करणे देऊ लागला... माझा पारा चढला. माझी बरीच बडबड ऐकल्या नंतर तो म्हणाला सर दुर्वांकु....आणि अश्या बऱ्याच ठिकाणी सगळी कडेच असेच प्रकार असतात.
बरीच बाचाबाची झाली, पण काही उपयोग नव्हता. खरंच अश्या मोठमोठ्या ठिकाणी एवढे पैसे खर्च करून निदान सात्विक आणि शुध्द अन्न मिळावे ही अपेक्षा सुद्धा चूकीची आहे का? यांच्या पेक्षा हातगाडीवर मिळणारी मिसळ तरी परवडली. पामतेलात बनली असली तरी उष्टी खरकटी तरी नसते.
बाहेर पडताना फोटो बुथवर लहान मुले आणि त्याचे पालक पुणेरी पघडी घालून सेल्फी घेत होतेच.. पार्किंग मध्ये पोहोचतच माझ्या मुलीने मला एक मोठा होल्डिंग दाखवला.. गेल्याच आठवड्यात याच हॉटेल मध्ये हिंदीचा मोठा अभिनेता मिटक्या मारत मिसळ खाऊन गेला होता त्याचं ते पोस्टर होत.
मी कपाळावर हात मारत तिथून निघालो
खरकटी मिसळ खाल्लेला
उमेश कुलकर्णी
वाचने
7002
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाव
तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या
तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या
तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या
तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या
तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या
एकता कपूर
In reply to तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या by कानडाऊ योगेशु
मिसळ थाळी कितीला होती?
अहो म्हणजे तुम्ही खरकटे खाऊ घालताय की
ऑ!
In reply to अहो म्हणजे तुम्ही खरकटे खाऊ घालताय की by धर्मराजमुटके
हॉटेल
हॉटेलचे नाव ' शबरी ' असेल. :)
In reply to हॉटेल by प्रसाद_१९८२
अरे देवा.. असे चालते होय..
https://curlytales.com/akshay
लिंकबद्दल धन्यवाद
In reply to https://curlytales.com/akshay by धनावडे
तेवढ्यात
In reply to लिंकबद्दल धन्यवाद by कंजूस
कांदा लिंबू रस्सा
टेबल वर असलेले कांदा लिंबू रस्सा हे शेयरींग.
In reply to कांदा लिंबू रस्सा by कपिलमुनी
नेमकं काय खरं अन् काय खोटं
अवघड आहे.
होटेल मालक इतक्या सहजपणे हे
*भोळा
In reply to होटेल मालक इतक्या सहजपणे हे by Bhakti
फक्त उष्टी आणि खरकटिच .. ..
२०१४ सालची गोष्ट आहे.
दर्जा !
असाच एक किस्सा.