✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

करोना माफिया: Dollo-650

व
विवेकपटाईत यांनी
गुरुवार, 08/04/2022 - 12:11  ·  लेख
लेख
आपल्या देशात उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, करोंना झालेल्या रुग्णांना ताप उतरविण्यासाठी हेच औषध सर्व डॉक्टर लिहीत होते. सर्व रुग्णांना वाटत होते करोंनाचा ताप फक्त याच औषधाने उतरणार. करोंना काळात मेडिकल माफियाने परिस्थितीचा लाभ घेऊन देशातील जनतेला लुटण्याचे कार्य केले, ह्याच मताचा मी होतो. आता करोंना माफियचे पितळ हळू-हळू उघडू लागले आहे. तशी बातमी सर्वच वर्तमान पत्रांत होती तरी ही वाचकांसाठी एक लिंक. Dollo-650 tablet maker earns Rs 1,000 crore gift to doctors only | Dolo 650 manufacturing company micro labs tax evasion as distributed gift of Rs 1000 crore to medical professionals and doctors https://timesofahmedabad.blogspot.com/2022/07/dollo-650-tablet-maker-earns-rs-1000.html एक प्रश्न मनात येतो, 1000 कोटी गिफ्ट देणार्‍या कंपनीने किती पैसा कमविला असेल. यावरून हे ही कळते देशाच्या मेडिकल क्षेत्रात काम करणार्‍यांचे किती अधपतन झाले आहे. करोंना काळात सर्वात जास्त विकणारी , निरुपयोगी औषधी निर्मात्याने किती खर्च केले असतील?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15005 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

मायक्रो लॅबला क्लीन चिट

आग्या१९९०
Sun, 09/11/2022 - 07:38 नवीन
मायक्रो लॅबला क्लीन चिट मिळाली. https://www.moneycontrol.com/news/business/companies/micro-labs-gets-clean-chit-from-pharma-body-on-allegations-of-spending-rs-1000-crore-on-dolo-650-9159101.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

फ्री बी देण्याची नोंद कागद

विवेकपटाईत
Fri, 09/16/2022 - 10:13 नवीन
फ्री बी देण्याची नोंद कागद पत्री नसते. डॉक्टरांना कमिशन दिल्याची नोंद कधीच नसते. दोष सिद्ध करणे कठीण असते. दिल्लीत सर्वच टेस्ट मध्ये 50 टक्के कमिशन डॉक्टरांना मिळते. जीवन रक्षक औषधीत (30 हजार देतो , डॉक्टरला/ हॉस्पिटलला तीन ते पाच हजाराला मिळते ) 50 ते 80 टक्के कमिशन असते. बाकी एका गोळीच्या जागी दहा गोळ्या करोंना रुग्णाच्या माथी भीती दाखवून मारल्या गेल्या आहे, हे ही सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

दिल्लीत सर्वच टेस्ट मध्ये 50

आग्या१९९०
Fri, 09/16/2022 - 11:00 नवीन
दिल्लीत सर्वच टेस्ट मध्ये 50 टक्के कमिशन डॉक्टरांना मिळते. सर्व तपासणी केंद्रं चाचण्यांना आकरलेल्या दरांच्या पावत्या देत असतात. ५० टक्के कमिशन देण्यासाठी ताळेबंदात इतका मोठा खर्च दाखवणे शक्यच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

बऱ्याच डॉक्टरांना या ना त्या

सुबोध खरे
Fri, 09/16/2022 - 12:32 नवीन
बऱ्याच डॉक्टरांना या ना त्या स्वरूपात कमिशन/ भेटवस्तू दिल्या जातात हि वस्तुस्थिती आहे. त्यापेक्षा जास्त कमिशन केमिस्टना मिळते. एल आय सी पासून बँका विमानाची रेल्वेची तिकिटे या सर्व सेवांमध्येसुद्धा कमिशन दिले जाते पण ५६७ कोटी विक्री( नफा नव्हेच) असलेल्या औषधासाठी १००० कोटी डॉक्टरांना दिले गेले या सारखा या हास्यास्पद दावा दुसरा नसेल. आणि करोना मध्ये पॅरासिटॅमॉल दिल्याने रुग्ण दगावले याच्यासारखा भंपक बिनबुडाचा दावा दुसरा नसेल. याचा निदान एक तरी खात्रीलायक पुरावा तुम्हाला देता येईल का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

Dollo-650 चा प्रभाव आणि प्रसार !

मदनबाण
Sun, 09/11/2022 - 19:09 नवीन

#BoycottBrahamstra #Bollywood #brahmastraboxoffice #BrahmashtraReview #Brahmastra
Honest review
Shame on you Bollywood
pic.twitter.com/77GttAXm6W

— Keep boycotting forever (@PreetamGaming) September 11, 2022

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einstein
  • Log in or register to post comments

धागा काय ?

कपिलमुनी
Sun, 09/11/2022 - 23:34 नवीन
धागा काय ? प्रतिसाद काय ? कुठेही दिसला धागा , आपलीच जागा आणि कसेही *गा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

काय मुनी, इतका सिंपल इनोद

मदनबाण
Mon, 09/12/2022 - 08:24 नवीन
काय मुनी, इतका सिंपल इनोद कळला नाय ? सबको है ना क्रोसिन नही तो Dollo-650 दो, तिकीट के साथ में. असं व्हिडियोतील स्त्री सांगताना दिसते. अपरोक्षपणे त्यांनी Dollo-650 चा प्रभाव काय मिळेल आणि त्या गोळीचा प्रसार देखील केला म्हणुन प्रतिसादाचे Dollo-650 चा प्रभाव आणि प्रसार ! स्वगत :- बाणा, हा तुझा आता सध्य काळातला शेवटचा प्रतिसाद असला पाहिजे. आता काही दिवस मिपावरुन ब्रेक घे ! वाचनमात्र देखील राहु नकोस.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Raat Kali Ek Khwab Mein... :- Buddha Mil Gaya (1971)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ब्रेक नका घेऊ ....

मुक्त विहारि
Mon, 09/12/2022 - 09:29 नवीन
तुमचे प्रतिसाद, माहिती पुर्ण असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

यात नवीन काही नाही, दरवर्षी

सागरसाथी
Mon, 09/19/2022 - 07:06 नवीन
यात नवीन काही नाही, दरवर्षी डॉक्टरांना परदेशी ट्रिप गेली कित्येक वर्ष दिली जात आहेच. पॅथॅलॉजी लॅब पण डॉक्टरांना गिफ्ट देत असतातच आणि डॉक्टरपण त्या लॅबचेच रिपोर्ट ग्राह्य मानतात. ते लॅबवाले तर तुमच्या आमच्यातलेच असतात. ऑफिसमधील स्टेशनरी ठराविक ठिकाणाहूनच खरेदी होते, अगदी कॉलिटी कितीही खराब आणि किंमत कितीही जास्त असली तरी. तळे राखील तो पाणी चाखील या म्हणीने आपले अतोनात नुकसान केले आहे, या भ्रष्ट आचाराला नैतिक आधार देवून ठेवलाय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा