✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Wed, 06/22/2022 - 16:20  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. एकनाथ शिंदे यांनी अपक्ष मिळून आपल्या गटात ४६ आमदार आहेत असा दावा केला आहे. तसेच आपणच शिवसेनेचे गटनेते आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असून भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर त्यांनी नियुक्ती केली आहे. शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीच्या मार्गावर तर काँग्रेसचे आठ आमदारही गोव्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या आहेत. शिवसेनेने सगळ्या आमदारांची संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला अनुपस्थित राहणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे शिवसेनेने म्हटले आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38588 वाचन

💬 प्रतिसाद (186)

प्रतिक्रिया

चांगला नेता असेल तर जनतेच्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/23/2022 - 15:10 नवीन
चांगला नेता असेल तर जनतेच्या डोळ्यात पाणी येतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीयुत कचुरे व श्रीयुत अबा

यश राज
गुरुवार, 06/23/2022 - 15:23 नवीन
तुमचे एकंदरीत इथले प्रतिसाद बघून हसावे की रडावे हेच कळत नाही. किंबहुना हसायलाच पाहिजे, बाकी सध्या रडण्याचा कोटा आता मामु आणि उरलेल्या २/४ मावळ्याकडे(? त्यांनाही कधीही पंख फुटू शकतात ) उरला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

संपादित

sunil kachure
गुरुवार, 06/23/2022 - 15:37 नवीन
संपादित व्यक्तिगत रोख टाळावा. -मिपा व्यवस्थापन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

जरा सांभाळून प्रतिक्रिया द्या

सुखी
गुरुवार, 06/23/2022 - 21:28 नवीन
जरा सांभाळून प्रतिक्रिया द्या हो... बाकी तोंडाचा हाताचा संबंध नव्हताच... कुठल्या आयडी न प्रतिक्रिया देताय ते तर नीट बघून प्रतिक्रिया द्या.... नाही तसही हसू होतंच आहे, त्यात आयडी ची अदलाबदल म्हणाल्यावर अंमळ जास्तच हसू येतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

संपादित

sunil kachure
गुरुवार, 06/23/2022 - 15:37 नवीन
संपादित व्यक्तिगत रोख टाळावा. -मिपा व्यवस्थापन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

मेंदूच्या दोन भागांचा

सुबोध खरे
गुरुवार, 06/23/2022 - 20:06 नवीन
मेंदूच्या दोन भागांचा एकमेकांशी समन्वय नसला कि आईन्स्टाईनला पण सफरचंद पडल्यावर ज्ञान येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

तांत्रिकता

क्लिंटन
गुरुवार, 06/23/2022 - 17:49 नवीन
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण होणार्‍या तांत्रिकतेविषयी थोडे लिहितो. त्यांच्याकडे दोन-तृतीयांश आमदार आहेत की नाही या प्रश्नालाच बायपास करता येईल अशी एक गोष्ट त्यांच्याकडे आहे आणि ती म्हणजे शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांचे गटनेते पद. एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून काढून त्यांच्या जागेवर अजय चौधरींची नियुक्ती करण्याच्या निर्णयावर १७ आमदारांच्याच सह्या होत्या. तर त्याविरोधात शिवसेनेच्या अर्ध्याहून जास्त आमदारांच्या सह्या असलेले पत्र विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठवले गेले असेल तर शिंदेंना गटनेतेपदावरून काढायच्या पत्रावर उपाध्यक्षांना एकनाथ शिंदेंच्या विरोधात निर्णय घेणे नियमानुसार घेता येणे कठीण आहे. आणि तसा निर्णय घेतल्यास तो न्यायालयात टिकेल याची शक्यता कमी. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या गटातल्या भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर नियुक्ती केली. त्यामुळे आता पक्षाचा प्रतोद नक्की कोण? ठाकरे गटातील सुनील प्रभू की शिंदे गटातील भारत गोगावले? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण विधानसभेत होणार्‍या कोणत्याही मतदानात जो पक्षादेश (व्हिप) काढला जातो तो या प्रतोदाकडून काढला जातो आणि तसा पक्षादेश काढायचा अधिकार प्रतोदालाच असतो. तसेच अमुक अमुक आमदार हा आमच्या विधीमंडळ पक्षाचा प्रतोद असेल हे विधीमंडळ पक्षाच्या नेत्याने पत्र लिहून विधानसभा अध्यक्षांना कळवायचे असते. तेव्हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा की प्रतोद नक्की कोण? सुनील प्रभू की भारत गोगावले? जर अजूनही एकनाथ शिंदेच गटनेते असतील आणि त्यांनी भारत गोगावलेंची नियुक्ती प्रतोद पदावर केली असेल तर गोगावले हेच प्रतोद असायला हवेत असे मला वाटते. अर्थात हे प्रकरणही न्यायालयात जाऊ शकेल. त्यापुढचा मुद्दा म्हणजे समजा एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिलेच नाही तर विधानसभा उपाध्यक्षांनाही पक्षांतरबंदी कायद्याखाली कोणालाही अपात्र ठरवता येणार नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत राहून एकनाथ शिंदे आपल्या प्रतोदाकरवी विधानसभेत होणार्‍या मतदानात सरकारविरोधात मत द्यायचा पक्षादेश काढू शकतील. अशा परिस्थितीत समजा फडणवीसांनी सरकारवर अविश्वास ठराव आणला तर मग ठाकरे सरकारविरोधात मत न देणार्‍या शिवसेना आमदारांचे विधानसभा सदस्यत्व पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे रद्द होऊ शकेल का? समजा एकनाथ शिंदे गटाचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षाकडे ठाकरेंना करायची असेल तर ती करावी लागेल विधीमंडळ पक्षाच्या गटनेत्याकरवी- म्हणजे परत एकनाथ शिंदेंकरवीच. अर्थातच ते शक्य नाही. त्याउलट तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदेच गटनेते असतील तर ते ठाकरेंच्या बाजूने मतदान करणार्‍या आमदारांचे सदस्यत्व रद्द करायचे पत्र ते देऊ शकतील. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांना काही चावटपणा करायचा असेल तर त्यावरही एकनाथ शिंदे पूर्णपणे नियमात बसून मार्ग काढू शकतील. या तांत्रिकतेला आणि नियमांना खूप महत्व असते. याविषयीची एक आठवण लिहितो. १९९७ मध्ये उत्तर प्रदेशात कल्याणसिंग यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर (ज्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस आमदारांनी मारामारी केली आणि ध्वनीक्षेपकांची फेकाफेक केली होती तोच कुप्रसिध्द विश्वासदर्शक ठराव) बहुजन समाज पक्षाच्या ६७ पैकी २० च्या आसपास (१/३ पेक्षा कमी) आमदारांनी कल्याणसिंगांच्या सरकारच्या बाजूने मतदान केले होते. तेव्हा मायावतींनी विधानसभा अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठींना पत्र लिहून या आमदारांचे सदस्यत्व पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे रद्द करावे ही मागणी केली. त्यावेळी मायावतींनी आपल्या आमदारांना कल्याणसिंगांच्या सरकारविरोधात मत द्यावे असा पक्षादेश जारी केला होता. पण यात एक गोम अशी होती की मायावती विधीमंडळ पक्षाच्या नेत्या असतील हे पत्र राज्यपालांकडे गेले होते (जेव्हा मायावतींनी मार्च १९९७ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली) पण त्यानंतर मायावतींनी पत्र लिहून विधानसभा अध्यक्षांना आपल्या पक्षाचा कोण प्रतोद असेल हे कळवलेच नव्हते. त्यामुळे मायावतींनी तसा पक्षादेश जारी केला असला तरी त्यांना तो पक्षादेश जारी करायचा अधिकारच नव्हता (कारण तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवलेले नव्हते) त्यामुळे त्यांचा पक्षादेश अवैध असल्याने त्याचे उल्लंघन व्हायचा प्रश्नच उभा राहत नाही असा निवाडा विधानसभा अध्यक्षांनी केला होता. या सगळ्या तांत्रिकतेकडे ठाकरे-संजय राऊत यांचे लक्ष गेले आहे की नाही याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments

क्लिंटन साहेब ,, माझा दुसरा

चौकस२१२
Fri, 06/24/2022 - 05:21 नवीन
क्लिंटन साहेब ,, माझा दुसरा धागा नागरिक शास्त्र धडा वाचलात का ? तांत्रिक दृष्ट्या जरी या गटाकडे संसदीय शिवसेना गेली तरी मुख्य शिवसेना पक्ष त्यांच्या कडे अपपोआप कसा काय सुपूर्द होऊ शकतो? किंवा त्यांच्याकडे अगदी निवडणूक चिन्ह जे कि त्या पक्षाचं मालकीचे असणार जर अश्या कोणाला संपूर्ण पक्षावर ( संसदीय + मुख्य ) ताबा मिलव्ययाचा असेल तर त्यानं तो त्या पक्षाच्या अंतरंगात पद्धती नुसार मिळवावा लागतो ? बरोबर का ? मला तरी वाटते कि १) ताणतरिक दृष्ट्या ४० आणि १५ असे दोन भाग च राहतील विधानसभेत २) मग एकतर भाजपला संधी दिली जाईल ३) मध्यवर्दी निवडणूक ४) दूरची शक्यता ---- घरवापसी आणि बंडाळी विसर्जित ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

बंडाचं सोंग यशस्वी झालंय.

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/23/2022 - 20:18 नवीन
बंडाचं सोंग यशस्वी झालंय. ठाकरेंची पुढची चाल असेल की भाजपेयींच्या आॅफर ता वाट पाहणे. सत्तेसाठी हपापलेले भाजपेयी मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात अर्धे मंत्रीपदं, केंद्रात दोनेक मंत्रीपदं, मुंबई पालिकेत भरमसाठ जागा असं सर्व सेनेला सोडतील. कारण २.५ वर्ष सेनेन दिलेला दणका लक्षात असेलच. ठाकरे आता वेट ॲंड वाॅच च्या भुमीकेत जानार, १५ दिवस तरी. राज्यपाल चा कोरोना संपेपर्यंत ठाकरे राजिनामा देनार नाहीत. सेनेचे सर्व आमदार गुवाहाटीत सेफ आहेत. शिंदेंच्या निगराणीत ऊरले सुरलेलेही ठाकरेंना मुंबईत भेटायला आले होते त्यांनाही पटकन गुवाहाटीत कवाना करणेयात आलेय. भाजपला रक्षणाची जबाबदारी दिली असावी :) आता राष्ट्रपती निवडणूकीत सेना भाजप ऊमेदवाराला पाठींबा देईल नी मग लगेच युतीची चर्चा होईल. भाजप नेत्यांची मातोश्रावर रीघ लागेल. विनवन्या वर विनवन्या सुरू होतील मग ठाकरेंची कृपा झाली, त्यांना दया आली तर भाजपला राज्यात सत्ता मिळेल. पन ठाकरेंचा अंकूश सदा भाजपवर असेल. पहीले सारखा माजोरडे पणा भाजपला करता येनार नाही.
  • Log in or register to post comments

हाच बंडाचा अर्थ आहे

sunil kachure
गुरुवार, 06/23/2022 - 20:30 नवीन
Bjp sarkar राज्यात येणे हे राज्याच्या पण हिताचे नाही आणि राज्यातील लोकांच्या तर बिलकुल हिताचे नाही. युतीत bjp आली तरी नेहमी दबावात राहिली पाहिजत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

स्वतःचे ५६ आणि तुम्ही म्हणणार

चौकस२१२
Fri, 06/24/2022 - 06:28 नवीन
स्वतःचे ५६ आणि तुम्ही म्हणणार १०६ वर दबाव.. अरे बास कि नाटक ,,, घ्या निवडणूक आणि आना स्वतःचे १०५ + मग काय दबाव टाकायचा ते टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

१०५ सेनेमुळे आले. लढायचं होतं

अमरेंद्र बाहुबली
Fri, 06/24/2022 - 08:10 नवीन
१०५ सेनेमुळे आले. लढायचं होतं एकटं. का आले मातोश्रीवर युती करा म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

शिवसेनेची मागणी

क्लिंटन
गुरुवार, 06/23/2022 - 21:34 नवीन
शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांना अपात्र ठरवायची मागणी केली गेली आहे. एक गोष्ट समजत नाही. पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे पक्षादेशाचे उल्लंघन करणार्‍या आमदार/खासदारांचे सदस्यत्व रद्द करायची मागणी करता येऊ शकेल. आणि पक्षादेशाचे उल्लंघन केल्यावरही आधी संबंधित आमदारांना कारणे दाखवा नोटिस बजाविणे वगैरे प्रक्रीया असते. इथे विधानसभेत कसलेच मतदान झालेले नाही. मग नक्की कोणत्या आधारावर शिवसेना ही कारवाई करायची मागणी करत आहे? गुवाहाटीला जाऊन हॉटेलात राहणे यात काय आक्षेपार्ह आहे?
  • Log in or register to post comments

मी आधीच लिहिले आहे. नरहरी

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2022 - 21:50 नवीन
मी आधीच लिहिले आहे. नरहरी झिरवळ जास्तीत जास्त अडथळे आणणार. शेवटी शिंदे गटाला न्यायालयात जावेच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

विधानसभेत बाजी मारून न्यायला

शाम भागवत
Fri, 06/24/2022 - 00:08 नवीन
विधानसभेत बाजी मारून न्यायला व योग्य डावपेच आखायला देफ पुरेसे ठरावेत. निदान मागील प्रत्येक वेळेस तसं त्यांनी सिध्द केलंय. कदाचित त्यांचे डावपेच तयारही असतील व मनातल्या मनात त्यावर शेवटचा हात फिरवत असतील. मुद्दा एकच आहे की या आमदारांना अटक करून विधानसभेत पोहचूच द्यायचे नाही असं काही मविआ करू बघत असेल का? नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही जुनी केस काढून त्यांना अटक करायचा प्रयत्न झाला होता. खोट्या केसेस करून सगळ्यांना अडकवून टाकण्याचे पेन ड्राईव तर देफ यांनीच विधानसभेत सादर केले होते. आणि हे आमदार आहेत शिवसेनेचे. त्यामुळे कुठल्यातरी आंदोलनात वगैरे एकाद दुसरी पेंडिंग केस असणे अगदी सहज शक्य आहे. अर्थात हे मुद्दे माझ्या मनात येत असतील तर देफंच्या मनात येऊन त्यावर अटकपूर्व जामीन वगैरे सारख्या उपाय योजना पण तयार असतील म्हणा. :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काये की, मविआचे सगळे नेते

शाम भागवत
Fri, 06/24/2022 - 00:11 नवीन
काये की, मविआचे सगळे नेते प्रथम महाराष्ट्रात या असंच एकमुखाने सुचवत आहेत म्हणून शंका आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

या सर्व संभाव्यता लक्षात घेऊन

श्रीगुरुजी
Fri, 06/24/2022 - 00:15 नवीन
या सर्व संभाव्यता लक्षात घेऊन भाजपने नामवंत वकीलांची फौज तयार ठेवली असणार. विधानपरीषदेच्या मत देण्याच्या दिवशी सुद्धा आमदार रवी राणांना अटक करून त्यांना मत देता येऊ नये अशी योजना असल्याच्या बातम्या होत्या. पण तसे काही झाले नाही. विश्वासदर्शक ठरावावर तुरूंगातील आमदार/खासदारांना मत देण्याचा कायदेशीर हक्क आहे. मलिक व देशमुख सुद्धा तात्पुरते विधानसभेत येऊन मत देतील. १९९० मध्ये भाजपने वि. प्र. सिंह सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर झालेल्या विश्वासदर्शक ठरावालर मत देण्यासाठी रथयात्रा व श्रीरामजन्मभूमी आंदोलन या कारणावरून अटकेत असलेल्या अडवाणी व वाजपेयींना मत देण्यासाठी न्यायालयाने जामिनावर सोडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

हाणामारी

क्लिंटन
Fri, 06/24/2022 - 13:05 नवीन
उत्तर प्रदेश विधानसभेत २१ ऑक्टोबर १९९७ (*) या दिवशी अशी लाज आणणारी दृश्ये बघायला मिळाली होती. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्र विधानसभेत नाही झाली तरच ते शिवछत्रपती आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रावर अनंत उपकार असतील. *: व्हिडिओत २ ऑक्टोबर ही तारीख चुकून लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

एकनाथ शिंदेंचे ट्विट्स

क्लिंटन
Fri, 06/24/2022 - 10:26 नवीन
एकनाथ शिंदेंनी ट्विट करून शिवसेनेने त्यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवायची मागणी अप्रस्तुत आहे हे म्हटले आहे.

कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.

— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.#RealShivsainik

— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
यात नक्कीच तथ्य आहे असे वाटते. पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे २/३ पेक्षा कमी आमदारांनी पक्षांतर केले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. आणि त्यांनी पक्षांतर केले असे कधी म्हणायचे? तर त्यांनी पक्षादेशाचे (व्हीप) उल्लंघन केले तर. हा पक्षादेश नक्की कोण जारी करू शकतो या तांत्रिकतेवर आधी लिहिलेच आहे. पण त्याबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षादेश हा सभागृहातील कामकाजाशीच निगडीत असतो/असायला हवा. सभागृहाबाहेर संबंधित सदस्य काय करतात याचा पक्षांतरबंदी कायद्याशी काहीही संबंध नाही. पक्षाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहायलाच पाहिजे हा पक्षादेश कागदावर काढला तरी त्याची वैधता शून्य. उद्या 'मातोश्रीवर येऊन माझे पाय चेपलेच पाहिजेत' असा पक्षादेश काढाल आणि त्या पक्षादेशाचे पालन न करणार्‍या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरवावे अशी मागणी कराल. ते कसे चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

३९ दिवसांच्या तुरूंगवासानंतर

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2022 - 21:48 नवीन
३९ दिवसांच्या तुरूंगवासानंतर केतकी चितळ्यांची जामिनावर सुटका झाली. काल निखिल भामरेसुद्धा अंतरीम जामिनावर बाहेर आला. इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका करताना, आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments

आपल्यावर टीका करण्यांच्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/23/2022 - 22:54 नवीन
आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे. मोदींवर टिका केली म्हणून अनेकांना अटक झालीय. मग मोदी सरकार चांगले की नीच? मोदी सरकार राहीले पाहीजे की गेले पाहीजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मोदी सरकार चांगलेच आणि चांगले

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2022 - 22:59 नवीन
मोदी सरकार चांगलेच आणि चांगले सरकार राहिलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/23/2022 - 23:10 नवीन
इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका करताना, आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे. हे तुम्हीच म्हटलात ना? मोदींवर टिका केली म्हणून अनेकांना अटक झालीय. मग मोदी सरकार चांगले कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

राऊत, उद्धव, पटोले, मोदी

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2022 - 23:15 नवीन
राऊत, उद्धव, पटोले, मोदी कुत्तेकी मौत मरेगा म्हणणारा तो नागपूरचा कोणतरी, भास्कर जाधव, मोदी हिटलरकी मौत मरेगा म्हणणारा उत्तर प्रदेशातला कोणतरी, मोदींचे बोटाएवढे तुकडे करू म्हणणारा कोणतरी इ. ना कधी अटक झाली? म्हणूनच सांगतोय मोदी चांगलेच आहेत आणि चांगले सरकार टिकलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ठाकरे सरकारला नालायक,

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/23/2022 - 23:35 नवीन
ठाकरे सरकारला नालायक, ठाकरेंना तुसड्या स्वभावाचा, मातोश्राला पैशांच्या बॅगा. हे मिपावरील धाग्यात अनूक्रमे तुम्ही, क्लिंटन नी साहना ह्यांना लिहीलंय. तुमच्या आयड्यांवर तरा कारवाई झाली का?? (शशक विजेता काड्यासारू आयडी मात्र गुपचूप ब्लाॅक मारला गेला)
म्हणूनच सांगतोय मोदी चांगलेच आहेत आणि चांगले सरकार टिकलेच पाहिजे.
मोदांवर टिका करनार्या अनेकांनर कारवाई झालाय गुगल केलं तरी अनेक नावे सापडतील. करताय सर्त का स्पून फिडींग करू? मग मोदी सरकार चांगले कसे?? हे सरकार नाच तर मोदी सरकार चांगले कसे?? ते नीच कसे नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ठाकरे सरकारला नालायक,

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/23/2022 - 23:37 नवीन
ठाकरे सरकारला नालायक, ठाकरेंना तुसड्या स्वभावाचा, मातोश्राला पैशांच्या बॅगा. हे मिपावरील धाग्यात अनूक्रमे तुम्ही, क्लिंटन नी साहना ह्यांनी लिहीलंय. तुमच्या आयड्यांवर तरी कारवाई झाली का?? (शशक विजेता काड्यासारू आयडी मात्र गुपचूप ब्लाॅक मारला गेला) म्हणूनच सांगतोय मोदी चांगलेच आहेत आणि चांगले सरकार टिकलेच पाहिजे.>>>$ मोदांवर टिका करनार्या अनेकांनर कारवाई झालीय गुगल केलं तरी अनेक नावे सापडतील. करताय सर्च की स्पून फिडींग करू? मग मोदी सरकार चांगले कसे?? हे सरकार नीच तर मोदी सरकार चांगले कसे?? ते नीच कसे नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खिक्क . . . ख्या ख्या ख्या .

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2022 - 23:44 नवीन
खिक्क . . . ख्या ख्या ख्या . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गुरूजी तुम्ही रिटायरमेंट घ्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/23/2022 - 23:46 नवीन
गुरूजी तुम्ही रिटायरमेंट घ्या आता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी फार पूर्वीच

श्रीगुरुजी
Fri, 06/24/2022 - 00:04 नवीन
मी फार पूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतलीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी काहीबीही लिहीण्यापासून

अमरेंद्र बाहुबली
Fri, 06/24/2022 - 00:11 नवीन
मी काहीबीही लिहीण्यापासून म्हणतोय. एकेकाळी तुमचे प्रतिसाद वाचनीय असायचे. पण आता शेंडासबूडखा नसलेलं काहीही लिहीत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असे असेल तर माझे प्रतिसाद

श्रीगुरुजी
Fri, 06/24/2022 - 00:17 नवीन
असे असेल तर माझे प्रतिसाद वाचू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

राजकीय धोरणे आणि खेळी

कंजूस
गुरुवार, 06/23/2022 - 23:32 नवीन
यांवर आपण मते मांडत आहोत ना?
  • Log in or register to post comments

पॉपकॉर्न घेऊन बसले आहे

साहना
Fri, 06/24/2022 - 01:38 नवीन
पॉपकॉर्न घेऊन बसले आहे schadenfreude चा मस्त आनंद घेत आहे.
  • Log in or register to post comments

नवीन शब्द

डाम्बिस बोका
Fri, 06/24/2022 - 18:57 नवीन
साहना, schadenfreude हा नवीन शब्द दाखवला म्हाणून आभार. गूगल केल्यावर अर्थ कळला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

अर्थ इथे टंकायचा नाही का?

शाम भागवत
Fri, 06/24/2022 - 19:19 नवीन
अर्थ इथे टंकायचा नाही का? मलाही गुगलायला लागला. :) इतरांना हा त्रास होऊ नये यासाठी..... इतरांच्या दुर्दैवीपणाबद्दल आनंदित होण्याची वाईट वृत्ती; आता मला याचा विरूध्दार्थी शोधायची इच्छा होते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डाम्बिस बोका

याला शुद्ध मराठीत विघ्नसंतोषी

सुबोध खरे
Fri, 06/24/2022 - 19:49 नवीन
याला शुद्ध मराठीत विघ्नसंतोषी पणा म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

जर्मन राजकीय तत्त्वचिंतक हॅना

आग्या१९९०
Fri, 06/24/2022 - 08:41 नवीन
जर्मन राजकीय तत्त्वचिंतक हॅना अ‍ॅरेन्ड्ट यांनी खोटय़ाच्या या संस्थात्मकीकरणाचे परिणाम स्पष्ट केले आहेत. त्या म्हणतात, ‘‘प्रत्येक जण नेहमी तुमच्याशी खोटे बोलत असेल, तर त्याचा परिणाम असा होत नाही की तुम्ही खोटय़ा गोष्टींवर विश्वास ठेवता, परंतु त्यानंतर कोणीही कशावरही विश्वास ठेवत नाही.. आणि कशावरही विश्वास ठेवू न शकणारे लोक कशासाठीही उभे राहू शकत नाहीत. मग ते फक्त कृती करण्याची क्षमताच हरवून बसत नाहीत तर विचार करण्याची आणि बरे-वाईट ठरवण्याची क्षमताही हरवून बसतात. आणि मग अशा लोकांशी तुम्ही तुम्हाला हवे तसे वागू शकता. - लोकसत्ता, योगेंद्र यादव आपली वाटचाल त्याच मार्गाने जात आहे
  • Log in or register to post comments

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/24/2022 - 09:12 नवीन
केंद्रातील भाजपा सरकार हे सत्तापिपासू आहेत, म्हणजे सत्तेशिवाय आता राहूच शकत नाही, सत्तेसाठी वाट्टेल ते करायचे पण सत्ता मिळवायची केवळ इतक्याच हेतूने राजकीय उलथापालथ देशभर चालू असते. राजस्थान, कर्नाटक, आणि आता महाराष्ट्र. गेली अडीच वर्ष सत्तेसाठी भाजपाने जो हावरटपणा केला. केंद्रसरकारच्या मदतीने इडीच्या माध्यमातून सतत एक दबाव ठेवला. सत्ता नको पण हा त्रास आवरा ही अवस्था सरकारमधील लोकांची अवस्था करुन ठेवली. कालच्या व्हायरल व्हीडीयो मधे केंद्रसरकार आपल्याला पूर्ण मदत करेल असे म्हटलेले दिसत आहे, त्यामुळे हे सत्तांतराचे नाटकाच्या पाठीमागे कोण आहे हे काही लपून राहीलेलं नाही. आता ते अधिकच स्पष्ट झालं आहे. जनतेसमोर या गोष्टी येत गेल्या पाहिजेत. लोक योग्यवेळी त्याचा हिशेब पूर्ण करतात. महाराष्ट्रात शिवसेना गटनेता अजय चौधरी आहे आणि उपाध्यक्ष यांनी त्यांना तसे पत्र दिल्यामुळे ही लढाई भाजपासाठी सोपी राहीलेली नाही. काल बारा आमदारांची आमदारकी रद्द करा अशी मागणी नव्हे तर, पिटीशन उपाध्यक्षांकडे केल्यामुळे हे प्रकरण आता थेट न्यायालयातच जाणार आहे. सर्व प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. काल शिंदे यांनी कायदे आम्हाला कळतात व्हीप कोणी द्यायचा आणि कोणत्या प्रसंगी द्यायचा या मुद्द्याला आता अर्थ उरला नाही. कारण असे म्हटल्या जात आहे की, घटनेच्या भाग ६ मधील कलम १८० नुसार तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, आणि ते आमदारकी रद्द करु शकतील. सध्या महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आहे, असा दावा अजून कोणी केला नाही. त्याला ही सर्व कायद्याची लढाई अडथळा आहे, असे दिसते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

केंद्रातील भाजपा सरकार हे

सुबोध खरे
Fri, 06/24/2022 - 10:10 नवीन
केंद्रातील भाजपा सरकार हे सत्तापिपासू आहेत, हे मूळ विधानच भंपक आहे. सत्ता नको असेल तर राजकारणात यायचंच कशाला? केवळ विरोधी पक्ष हवा म्हणून? का घरी बसून वेळ जात नाही म्हणून? हे म्हणजे वाघ जंगलात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी जंगलात फिरतो आणि त्याने शिकार केली तर वाघ रक्तपिपासू आहे असे म्हणण्यासारखे आहे. आणि कुठेही सत्तेच्या बाहेर असेल तर सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणे यात काहीही गैर नाही. भाजप-- शिवसेना (किंवा कोणताही) पक्ष फोडून आपल्याकडे वळवून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणारच. त्यांनी काय विरोधातच बसायची शपथ घेतली आहे का? शेवटी दुधापार्यंत पोचता येत नसेल तर मांजर सुद्धा प्रामाणिकपणाची माळ गळ्यात घालून फिरते. तेंव्हा विरोधकांचा हा दावा कि आम्ही कसे धुतल्या तांदुळाचे आहोत ते साफ खोटे आहे. मुळात हि तिघाडी सरकार हेच जनतेचा विश्वासघात आहे. जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला निवडून आणलेले होते. त्यातून शिवसेनेस फोडून हे असंगत सरकार स्थापन केले त्याबद्दल त्यांची वाहवा करत होतात आणि आता हे सरकार फुटलं तर रडारड बिरुटे सर इ चोलबे ना ! हा शुद्ध दांभिकपणा आहे फक्त गैरमार्गांचा अवलंब करून सत्तेत आल्यास ते वाईट आहे. पण ७० वर्षांचा काँग्रेसचा इतिहास पहिला तर काँग्रेसने यापेक्षा दुसरे काहीही केलेलं नाही असेच लक्षात येईल. श्रीमती इन्दिरा गांधी यांनी तर याचा कळस गाठला होता. येनकेनप्रकारेण त्यांनी विऱोधी पक्षाच्या सत्ता कलम ३५६ वापरून बरखास्त केल्या होत्या. आता बाजी उलटली आहे म्हणून हि रडारड चालू आहे. मला लहानपणी वाचलेला एक विनोद आठवतो आहे. एक १० वर्षाचा मुलगा घाईघाईने पोलिसाला बोलावत होता "पोलीस पोलीस लवकर या, हा माणूस माझ्या बाबांशी गेला अर्धा तास मारामारी करतो आहे". पोलीस - मग इतका वेळ का गप्प होतास? मुलगा - इतका वेळ माझे बाबाच त्याला बुकलत होते आता आता तो वर आलाय गुलाम आणि चमच्यांची हि स्थिती आहे. इतके दिवस काँगेस जे करत होते ते चालत होते आणि आता भाजप वर आलाय तर साधनशुचिता पार्टी विथ डिफरंन्स सारखी पालूपदे घोळवताहेत
  • Log in or register to post comments

गाळलेली जागा भरा...

कानडाऊ योगेशु
Fri, 06/24/2022 - 12:30 नवीन
प्रश्न १: गाळलेली जागा भरा. ------------------- हे सत्तापिपासू आहेत, म्हणजे सत्तेशिवाय आता राहूच शकत नाही. प्रश्न २ : वरिल विधान संदर्भासहीत स्पष्ट करा. हिंटः स्वतःला जाणता राजा म्हणवुन घेणारा एक साधारण खासदार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आता बाजी उलटली आहे

डाम्बिस बोका
Fri, 06/24/2022 - 18:21 नवीन
आता बाजी उलटली आहे म्हणून रडारड नाही तर सत्ताधारी पक्ष आणि राजकारणी ७० खर्चात बदलले नाही ह्याचे दुःख होते. इंदिरा गांधी नी तेच केले. काँग्रेस काय बाकी चिंधी पक्ष काय तेच रडगाणे गायले. हे सगळं जाईल किंवा कमी होईल अशी अपेक्षा होती वा भक्तांनी तशी खोटी आशा दाखवली. BJP चा जर काँग्रेस झाला तर रडारड म्हणायची की अपेक्षाभंग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गुलाम किंवा चमचे लोकांनी

सुबोध खरे
Fri, 06/24/2022 - 19:55 नवीन
गुलाम किंवा चमचे लोकांनी अपेक्षाच कशाला करावी? म्हणजे मग अपेक्षा भंगच होत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डाम्बिस बोका

गिरीश

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 06/24/2022 - 11:44 नवीन
ट्रम्प्/पुतीन वर हिरीरीने पुढे बोलायला येणारी मंडळी-कुबेर्/निखिल वागळे/हेमंत देसाई अजून गप्प कशी? की जे घडतेय ते रूचत नाही आहे?
  • Log in or register to post comments

जर उद्धव ठाकरे स्वतः किंवा

श्रीगुरुजी
Fri, 06/24/2022 - 11:45 नवीन
जर उद्धव ठाकरे स्वतः किंवा आदित्य ठाकरे गुवाहाटीस जाऊन एकनाथ शिंदे व इतर बंडखोर आमदारांना प्रत्यक्ष भेटले, तर हे बंडोबा थंडोबा होतील, कारण ही बहुतांशी अहंकाराची लढाई आहे. पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना स्वत:चा अहंकार सोडावा लागेल. अर्थात वाचाळवीर राऊतला यात अजिबात न घेता त्याला तोड बंद ठेवायचा आदेश द्यावा लागेल.
  • Log in or register to post comments

मला वयक्तिक अस वाटत आहे की या

उपेक्षित
Fri, 06/24/2022 - 12:42 नवीन
मला वयक्तिक अस वाटत आहे की या शिंदे वगैरे मंडळींच्या नादी भाजप ने न लागता सरळ निवडणुका लावून स्वबळावर बहुमत मिळवावे (जे खरं तर आधीच करायला पाहिजे होत साला) 5 वर्ष कटकट नाय राहणार.
  • Log in or register to post comments

भाजपाकडून पाठिंबा मिळेल असं

शाम भागवत
Fri, 06/24/2022 - 13:00 नवीन
भाजपाकडून पाठिंबा मिळेल असं वाटल्यानेच शिंदे यांनी धाडस केले असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

सरळ निवडणुका लावून स्वबळावर

अमरेंद्र बाहुबली
Fri, 06/24/2022 - 13:18 नवीन
सरळ निवडणुका लावून स्वबळावर बहुमत मिळवावे भाजपला बहुमत मिळणे शक्य नाही आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

बाकी उद्धव ठाकरेंचे कालचे

उपेक्षित
Fri, 06/24/2022 - 12:44 नवीन
  • Log in or register to post comments

बाकी उद्धव ठाकरेंचे कालचे

उपेक्षित
Fri, 06/24/2022 - 12:44 नवीन
बाकी उद्धव ठाकरेंचे कालचे फेबु लाईव्ह पाहून मनोमन जाणवले की हा माणूस राजकारणा साठी आणि राजकारण यांच्यासाठी कधीच नव्हते आणि नसणारे
  • Log in or register to post comments

असं नव्हे तर इतकी वर्षे

सुबोध खरे
Fri, 06/24/2022 - 19:59 नवीन
असं नव्हे तर इतकी वर्षे राजकारणात राहून ते काहीच शिकले नाहीत असेच म्हणावे लागेल. ना राज्यशकट चालवायची कुवत ना नोकरशाहीवर यांची पकड म्हणून राष्ट्रवादीने त्यांचा वापर करून घेतला/ घेत आहेत. वारसा हक्काने गादी मिळू शकते, बुद्धी नाही हे त्यांनी परत एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा