✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

करोना : स्वलालधन्य जाहलो मी

ग
गामा पैलवान यांनी
गुरुवार, 05/05/2022 - 20:22  ·  लेख
लेख

महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. - मिपा व्यवस्थापन

लोकहो, करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-no-individual-can-be-forced-to-get-vaccinated-a732/ सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे : १.
रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.
हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ). २.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :
ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ). ३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.
हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 ) असो. तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे. आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया. १.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817
नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर. २.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945
हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं. ३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745
रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन. ४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413
आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे. असो. हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78134 वाचन

💬 प्रतिसाद (238)

प्रतिक्रिया

१०० % अचूक निदान अशक्य

गामा पैलवान
Wed, 07/20/2022 - 01:33 नवीन
आग्या१९९०, तुमच्या परिचितांच्या दुर्घात्नेबद्दल खेद आहे. १०० % अचूक निदान शक्य नाही. मला काय कोणालाही शक्य नाही. त्यांच्या परिस्थितीस विपरीत उपचारही कारणीभूत असू शकतात. जसे श्री. विवेक पटाईत यांच्या थोरल्या बंधूंवर झाले होते. प्रत्येक रक्तस्रावास प्रतिपिंड कारणीभूत असतात असंही नव्हे. मला स्वत:ला पोटात रक्तस्राव झाला होता, तो उलटीतनं बाहेर पडला. रुग्णालयात ताबडतोब दाखल झालो. तिथे दुसऱ्या दिवशी दुर्बिणीने तपासणी केल्यावर काहीच जखम वा व्रण ( ulcer or scar ) आढळला नाही. विष्ठा सर्वसामान्य ( normal ) व विनात्रास होत होती. म्हणजेच रक्तस्राव आतड्यांतला नसून जठरात झाला होता ( इति डॉक्टर ). रक्तस्रावाचं कारण कळू शकलं नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे रक्त पातळ करायची औषधं जास्ती मात्रेत दिल्याने तो झाला. सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक दुर्घटनेची कारणमीमांसा प्रतिपिंड नव्हे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ॲडमीट होईपर्यंत दोघांनीही

आग्या१९९०
Wed, 07/20/2022 - 16:18 नवीन
ॲडमीट होईपर्यंत दोघांनीही कुठलीच आधुनिक औषधे घेतली नव्हती तरी रक्तात गुठळ्या का झाल्या. लस घेतली नसल्याने अतिरीक्त प्रतिपिंड कुठून आली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

इतर कारण दिसतंय

गामा पैलवान
गुरुवार, 07/21/2022 - 19:36 नवीन
आग्या१९९०, मला नक्की कारण नाही सांगता येणार. पण इतर घटक कारणीभूत असू शकतात. किंबहुना ते लक्षांत न घेता उपचार केले गेलेले दिसताहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अतिशय चुकीच्या पध्दतीने आणि दिशाभुल करणारी

Trump
Mon, 07/18/2022 - 22:25 नवीन
श्री गामा पैलवान, तुमच्या चर्चेत मला जास्त लेखक / प्रतिसादक म्हणुन रस नाही. पण तुम्ही जी आकडेवारी सादर केलीत ती अतिशय चुकीच्या पध्दतीने आणि दिशाभुल करणारी आहे. तुम्ही मृत्युचे टक्केवारी न देता, एकुण मृत्युचे आकडे दिले आहेत. खरे तर एकुण बाधित लोकांची संख्या, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या, आणि मृत लोकांची टक्केवारे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लशीकरण व अतिरिक्त मृत्यू

गामा पैलवान
Tue, 07/19/2022 - 00:14 नवीन
Trump, ही सरकारी माहिती आहे. जितकी मिळाली तितकीच मी दिली आहे. मात्र तरीही तुमचा मुद्दा मान्य आहे. सदर विदालेखात बिगर करोना मृत्यूंची आकडेवारीही समाविष्ट आहे (तालिका क्रमांक १). तिच्याकडे ओझरता दृष्टीक्षेप टाकला. लस घेतलेले ( किमान १) व लस न घेतलेले यांच्या मृत्यूंचं प्रमाण जानेवारी २०२१ मध्ये ६९७० : २८०९५ होतं. विनालस मृत्यू जास्त होते कारण तेव्हा लशीकरण फारसं झालं नव्हतं. मग लशीकरण झालं आणि मे २०२२ मध्ये हेच गुणोत्तर २८१८६ : ९३५ ( म्हणजे सुमारे ३० : १ ) झालं. करोनामृत्यूंचं प्रमाण सुमारे १५ : १ आहे. आता प्रश्न असा आहे की लशीकरण ३० : १ वा १५ : १ या दरम्यान दिसतंय आहे का? ३० : १ म्हणजे ९६+ % तर १५ : १ म्हणजे ९३+% होतात. प्रत्यक्षात संयुक्त साम्राज्यातलं ( UK मधलं ) लशीकरण ५३ मिलियन ( ६७ मिलियन पैकी ) आहे. म्हणजेच ते ८० % हून खाली आहे. मग प्रश्न असा उद्भवतो की लशीकरण ८० % असतांना मृत्यूचं प्रमाण ९३+% ते ९६+% कसंकाय? उरलेले १३+% ते १६+% अतिरिक्त मृत्यू लशीतून आले का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

अच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/22/2022 - 20:41 नवीन
>>>>श्री गामा पैलवान, तुमच्या चर्चेत मला जास्त लेखक / प्रतिसादक म्हणुन रस नाही. गापै यांनी तुम्हाला व्य.नि. आणि खरड करुन धाग्यावर यायचं निमंत्रण दिलं असेल. नै तर, एखादा विचार पटत नसतांनाही कोण कोणाच्या धाग्यावर लिहायला येतं. ;) (ह. घ्या) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

श्री बिरुटेसर, काही लोकांना सांख्यिकीमध्ये रस असतो.

Trump
Fri, 07/22/2022 - 20:51 नवीन
नै तर, एखादा विचार पटत नसतांनाही कोण कोणाच्या धाग्यावर लिहायला येतं. ;)
श्री बिरुटेसर, काही लोकांना सांख्यिकीमध्ये रस असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

... राजमान्य, कायदेशीर उपाय, असे 'ह्यांचे म्हणणे.

चित्रगुप्त
Sun, 07/17/2022 - 22:20 नवीन
घ्या लस टोचून आणि व्हा परलोकी मार्गस्थ.
लच टोचवून घेणे हा आत्महत्या करवून घेण्याचा खात्रीचा, राजमान्य, कायदेशीर उपाय, असे 'ह्यांचे म्हणणे. ------- बाईसाहेब फुरसुंगीकर.
  • Log in or register to post comments

हो ना...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/18/2022 - 19:50 नवीन
होना....गा.पै. फार तान देऊ लागले सध्या...! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

प्रिय गामाजी

धर्मराजमुटके
Mon, 07/18/2022 - 22:16 नवीन
प्रिय गामाजी, अपेक्षा आहे की आपली पुरेसी लाल झालेली असेल. प्रमाणापेक्षा जास्त लाल झाला की तो रंग नंतर काळपट तपकिरी रंगाकडे झुकतो.
  • Log in or register to post comments

ताजा रंग

गामा पैलवान
Tue, 07/19/2022 - 00:26 नवीन
धर्मराजमुटके, अहो काय सांगायचं आता. सरकारने नुकतीच वर्धक मात्रा ( बूस्टर ढोस ) ७५ दिवसांसाठी फुकट केला. मग अशी ताजा रंग फासायची संधी दिसल्यावर मलाही राहवलं नाही. पण तुमच्या आस्थेबद्दल आभार. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

आकाशातील ग्रहांची शांती करता

सुबोध खरे
Tue, 07/19/2022 - 11:54 नवीन
आकाशातील ग्रहांची शांती करता येते पण दुराग्रहाची नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

माझी शांती

गामा पैलवान
Tue, 07/19/2022 - 19:13 नवीन
सुबोध खरे डॉक्टर, संयुक्त साम्राज्यातलं लशीकरण ८० % असतांना मृत्यूचं प्रमाण ९३+% ते ९६+% कसंकाय? उरलेले १३+% ते १६+% अतिरिक्त मृत्यू लशीतून आले का? की नाही आले? की अधिक विदा हवाय? याचं उत्तर दिलंत तर माझी या प्रश्नापुरती तरी शांती होईल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

:)

कॉमी
Tue, 07/19/2022 - 20:10 नवीन
गामाजींसाठी रोचक ट्विट

Never saw heatwaves like this before the vaccine. Makes you wonder.

— Phil (@pnm1979) July 18, 2022
  • Log in or register to post comments

घातक लसी.

कॉमी
Tue, 07/19/2022 - 20:59 नवीन
घातक लसींच्या दुष्परिणामाच्या अश्या केसेस आता दिवसेंदिवस बाहेर येतील. गामाजींच्या लस विरोधी डॉक्युमेंटेशन मध्ये आमचा खारीचा वाटा.
  • Log in or register to post comments

हे व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे

Trump
Wed, 07/20/2022 - 01:51 नवीन
“मी बूस्टर डोस घेतल्यापासून वेड्यासारखी झाली आहे. मी फक्त आदिलला शोधत आहे. आताही मी त्यालाच भेटायला जात आहे. यावरुन तुम्ही बुस्टर डोसने माझी अवस्था काय झाली असेल, याचा विचार करुच शकता. “मोदीजी, हे इंजेक्शन कसले आहे? यात कोणकोणते प्राणी आहेत हेच मला समजत नाही. मला झोप येत नाही. माझे डोळे सुजले आहेत. माझा चेहराही सूजला आहे. हे व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे”, असेही राखी म्हणाली. त्यासोबतच तिने हे इंजेक्शन न घेण्याचा सल्ला दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

https://www.loksatta.com

चेतन सुभाष गुगळे
Wed, 07/20/2022 - 00:42 नवीन
https://www.loksatta.com/manoranjan/rakhi-sawant-talks-on-booster-dose-side-effects-blamed-pm-modi-for-giving-her-sleepless-nights-nrp-97-3028432/?utm_source=ls&utm_medium=article2&utm_campaign=relatedstories
  • Log in or register to post comments

फालतू आणि महाभंपक बाई आहे हि

सुबोध खरे
गुरुवार, 07/21/2022 - 11:54 नवीन
फालतू आणि महाभंपक बाई आहे हि नटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

ती बाई कशी आहे हे तिचे नाव

चेतन सुभाष गुगळे
Fri, 07/22/2022 - 13:58 नवीन
ती बाई कशी आहे हे तिचे नाव ज्यांनी ऐकले / वाचले असेल त्यांना नक्कीच माहिती आहे. मुद्दा कोणी मांडला त्यापेक्षा काय मांडला हे महत्त्वाचे आहे. काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाने डझनभर वेळा कोरोनाची लस टोचून घेतली होती. जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्याला त्याने असे का केले या बद्दल विचारणा झाली असता त्याने दिलेले उत्तर हे राखीने मांडलेल्या मुद्द्यासोबत साम्य दर्शविणारे होते आणि तो एक सामान्य निम्नवर्गीय इसम होता आणि म्हणूनच पकडला गेला कारण त्याने फुकटची सरकारी लस घेतली होती. विकतची लस घेतली असती तर त्याला पकडण्याचा काही प्रश्नच नव्हता. असो. जर लशीचा असाही परिणाम / दुष्परिणाम होत असेल तर त्यावरही संशोधन होणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लशीचा उदोउदो ( overplay ) केल्याची कबुली

गामा पैलवान
Sun, 07/24/2022 - 14:24 नवीन
लोकहो, अमेरिकेतील अध्यक्षीय निवासस्थानाच्या ( व्हाईट हाऊस च्या ) माजी डॉक्टर डेबोरा बर्क्स यांनी लशीमुळे लागणीपासून संरक्षण मिळंत नसल्याची कबुली दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोव्हिड लस या बाबतीत बिनकामाची आहे हे त्यांना माहीत होतं. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.foxnews.com/media/dr-deborah-birx-knew-covid-vaccines-not-protect-against-infection करोनाची लस हे थोतांड असल्याचं सत्य थेट अश्वमुखातनं अवतीर्ण झालं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Overplayed असा शब्द त्यांनी

कॉमी
Sun, 07/24/2022 - 21:24 नवीन
Overplayed असा शब्द त्यांनी वापरला आहे. ह्या बाई खुद्द मान्य करतात की लसी मुळे गंभीर रोग आणि इस्पितळात भरती न करावी लागण्याइतपत मदत होते, ह्याचा अर्थ प्राण वाचतात असा आहे. तुम्हाला ते सुद्धा मान्य नाहीये. बाई म्हणतात की हॉस्पिटलायझेशन मध्ये लस घेतलेले जास्त आहेत. अर्थातच असणार.पूर्ण लसीकरण झालेले ६८% आहेत. किमान एक डॉस झालेले ७९% लोक आहेत. वारंवार विदा दाखवून देत आहे की लस न घेतलेल्या पूल मधून प्रोपोर्शनेटली जास्त मृत्यू आणि गंभीर रुग्ण आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लस घ्यायचीच कशाला ?

गामा पैलवान
Mon, 07/25/2022 - 02:03 नवीन
कॉमी,
लसी मुळे गंभीर रोग आणि इस्पितळात भरती न करावी लागण्याइतपत मदत होते, ह्याचा अर्थ प्राण वाचतात असा आहे. तुम्हाला ते सुद्धा मान्य नाहीये.
का म्हणून मी मान्य करू? बाई परस्परविरोधी विधानं करताहेत. गंभीर रोगांपासून बचाव वगैरे बाईंचा विश्वास आहे. तो विदा नव्हे. शिवाय बाईंचा सल्ला खासकरून ७०+ वय असलेल्यांसाठी आहे. मग तरुणांनी लस घ्यायचीच कशाला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

विदा नक्की आहे.तो तुम्हाला

कॉमी
Mon, 07/25/2022 - 08:24 नवीन
विदा नक्की आहे.तो तुम्हाला आणि बाईंना दोघांना माहिती आहे. पण तुम्ही अत्यंत चातुर्याने कानाडोळा करत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

शिवाय बाईंचा सल्ला खासकरून ७०

कॉमी
Mon, 07/25/2022 - 08:32 नवीन
शिवाय बाईंचा सल्ला खासकरून ७०+ वय असलेल्यांसाठी आहे.मग तरुणांनी लस घ्यायचीच कशाला?
बाईंनी थेट उलटे विधान केले आहे असे माझ्या अल्प आकलनास वाटते. लस घेतली असली तरी सत्तरी वरील लोकांना त्रास होऊ शकतो असे त्या म्हणत आहेत. आणि अबालवृद्धांनी सर्वांनीच लस घ्यावी अश्याच मताच्या त्या आहेत. खासकरून, तरुणांना लस घेतल्यावर त्रास होणार नाही असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ दिसतो, कारण त्या फक्त 70 वरील लोकांना त्रास होईल असे म्हणत आहेत. मुद्दा काय, तर लस घेतल्यावर सेव्हर आजार आणि हॉस्पिटलायझेशन पासून संरक्षण मिळते असे त्यांचे मत आहे. त्या केवळ आणि केवळ म्हणतायत कि लसीचे महत्व OVERPLAY केले आहे, आणि त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा समज पसरला कि लस आजार आणि इस्पितळात भरती होण्यापासून संरक्षण देऊ शकत नाही (जे संरक्षण नक्की मिळते- it will). तर हा त्यांचा विश्वास आहे, आणि तोच या पन्नास शब्दांच्या लेखात मांडला आहे. पण तुम्हाला लेखाची हेडलाईन सोडून बाकीचे सगळे अमान्य आहे असे दिसते. किंवा तुम्ही फक्त हेडलाईनच वाचलीये असे तरी दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

it will हा केवळ दावा आहे

गामा पैलवान
Mon, 07/25/2022 - 20:37 नवीन
कॉमी, it will हा केवळ बाईंचा दावा आहे. त्यास कसलाही आधार नाही. त्या म्हणतात way forward is testing and vaccination. हे टेस्टिंग कशासाठी करायचं? आणि जर लस घ्यायचीच असेल तर चाचणी करायची गरजच काय मुळातून? शिवाय RTPCR ही चाचणी नसून निव्वळ दिशाभूल आहे. अस्तित्वात नसलेल्या विषाणूपासून संरक्षण करायला लस कशाला पाहिजे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मी तेच म्हणतोय.

कॉमी
Tue, 07/26/2022 - 07:28 नवीन
तुम्हाला बातमीच्या हेडलाईन खेरीज इतर काहीही मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

विस्ताराने...

कॉमी
Tue, 07/26/2022 - 08:56 नवीन
"लसींपासून रोगलागण होण्यापासून संरक्षण मिळत नाही हे मला (she knew) आधीपासून माहित होतं. आपण लसींचे (लागण रोखण्याबाबतचे) गुण जास्त वाढवून सांगितले. त्यामुळे लोकांचा लसीबाबत चुकीचा समज झाला की लस गंभीर आजार, इस्पितळात भरती होण्याचा धोका (आणि त्याच तर्काने, मृत्यू) पासून संरक्षण देणार नाही- जे नक्की मिळते आहे." १. ह्या बाईंना व्यक्तिष: काय माहित होतं आणि नव्हतं हा मुद्दा पूर्णपणे गौण आहे. त्यावेळचे ओव्हरॉल मत आणि विदा लसींपासून इन्फेक्शन विरुद्ध संरक्षण मिळते असाच होता, आणि त्यानुसारच लसींबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचत असावी. अजूनही लसी इन्फेक्शन विरुद्ध पूर्ण पणे कुचकामी नाहीयेत, मात्र त्या बाबत उपयोगिता अंदाजापेक्षा कमी आहे, कारण नवे नवे व्हरायंट येत आहेत. २. बाई स्पष्टपणे आणि या धाग्यावर अनेकदा देऊन झालेल्या विदावर आधारित सांगतात की लसीमुळे आजार व मृत्यूपासून संरक्षण नक्की मिळते. हा विदा जालावर अत्यंत सहजगत्या सापडतो, आणि ठराविक अजेंडा असलेले लोकच त्याकडे वारंवार कानाडोळा करतात. बाईंचे पहिले आणि दुसरे मत दोन्ही उपलब्ध विदावर आधारित आहे. गामाजी तुम्ही दुटप्पीपणे केवळ पहिले मत विदेवर आधारित असल्याचे आणि दुसरे पोकळ आणि आधारविरहित असल्याचे नाटक करत आहात. बाईंच्या पूर्ण वक्तव्याचा विपर्यास करून चेरी पिकिंग करत तुम्हाला हवे तेव्हढे सांगत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

कॉमी साहेब

धर्मराजमुटके
Tue, 07/26/2022 - 09:07 नवीन
कॉमी साहेब, गामा पहिलवान करोनाची लस घेणे आवश्यक आहे हे कधीच मान्य करणार नाहित. त्यामुळे कितीही प्रतिवाद केला तरी त्याचा फायदा नाही. गामा पहिलवान आणि त्यांचा प्रतिवाद करणार्‍यांची चिकाटी पाहून मला खरोखरच नवल वाटते. माझ्यात एवढी चिकाटी नाही त्यामुळे समोरच्याचे पटत नसले तरी मी जास्त प्रतिवाद करत नाही. हे जालीय आणी प्रत्यक्ष जीवनात देखील असेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मी टाईमपास करण्यासाठी वेळ

कॉमी
Tue, 07/26/2022 - 10:01 नवीन
मी टाईमपास करण्यासाठी वेळ असेल तरच मिपावर येतो. आणि हे प्रतिवाद गामांसाठी नाहीत. ते ब्रेनवॉश झालेले आहेत, आणि हे वॉशिंग त्यांनी स्वतःहून केले आहे असेच मला वाटत आले आहे. पण मिपा वाचून कोणी गामाजींच्या "Do your own research" च्या नावाखाली फालतू निर्बुद्ध, मनाजोगते वाट्टेल ते आकलन केलेले आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख वाचून लस न घेण्याचा निर्णय घेत असेल तर ते थांबवणे हे मिपा या संस्थळाचे तसेच मिपावरील सदस्यांचे कर्तव्य आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

ह्युस्टनचं खुनी हॉस्पिटल

गामा पैलवान
Sun, 07/24/2022 - 15:26 नवीन
लोकहो, अमेरिकेतील ह्युस्टनचं दलित ( methodist ) हॉस्पिटल खुनी आहे. त्यांना रुग्णांचे व कर्मचाऱ्यांचे खून पाडण्यात अधिक रस आहे. संबंधित बातमी : https://fee.org/articles/massive-nurse-shortage-hits-houston-weeks-after-150-unvaccinated-nurses-and-hospital-workers-fired/ सदर वार्तेनुसार रुग्णालयाने लस न घेतलेल्या सुमारे १५० जणांना कामावरून डच्चू दिला. आता त्यास मनुष्यबळाची कमतरता भासते आहे. या अभावापायी काही रुग्णांचा जीवही गेला आहे. एकंदरीत रुग्णालयाच्या व्यवस्थापनास रुग्णांचे व कर्मचाऱ्यांचे खून पाडण्यात अधिक रस आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

कॉमी यांना प्रतिसाद : फालतू, निर्बुद्ध वगैरे

गामा पैलवान
Wed, 07/27/2022 - 03:26 नवीन
कॉमी, तुमचे दोन प्रतिसाद वाचले : https://www.misalpav.com/comment/1147985#comment-1147985 व https://www.misalpav.com/comment/1147995#comment-1147995 माझी मतं सांगतो. १.
त्यामुळे लोकांचा लसीबाबत चुकीचा समज झाला की लस गंभीर आजार, इस्पितळात भरती होण्याचा धोका (आणि त्याच तर्काने, मृत्यू) पासून संरक्षण देणार नाही- जे नक्की मिळते आहे."
लशीमुळे संरक्षण मिळते, हा केवळ दावा आहे. २.
अजूनही लसी इन्फेक्शन विरुद्ध पूर्ण पणे कुचकामी नाहीयेत, मात्र त्या बाबत उपयोगिता अंदाजापेक्षा कमी आहे, कारण नवे नवे व्हरायंट येत आहेत.
तुम्ही ज्याला नवनवे व्हरायंट म्हणता ना, त्यांच्याशी लढायला शरीराची प्रतिकारशक्ती सक्षम असते. पण लशीमुळे तिची मोडतोड होते. आणि शरीरास विषाणूच्या नव्या आवृत्तीची लागण होते. हे प्रकार पूर्वीही झाले आहेत. यांस Original Antigenic Sin असं म्हणतात. खरंतर हा प्रकार डॉक्टर लोकांनी उलगडून सांगायला हवा. पण ते करणार कोण ! ३.
लसीमुळे आजार व मृत्यूपासून संरक्षण नक्की मिळते. हा विदा जालावर अत्यंत सहजगत्या सापडतो,
तुमच्याकडे विदासंबंधी दुवा आहे का ? लशीमुळे रोग झाला नाही की इतर कारणामुळे, हे कसं कळणार ? शिवाय लस प्रायोगिक आहे ही बाब का लपवून ठेवलीये ? कुठल्याही लशीमुळे कसलीही साथ आजवर आटोक्यात आलेली नाहीये. या सत्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. ४.
बाईंचे पहिले आणि दुसरे मत दोन्ही उपलब्ध विदावर आधारित आहे.
या विदाचा दुवा मिळेल काय ? ५.
... ते ब्रेनवॉश झालेले आहेत, आणि हे वॉशिंग त्यांनी स्वतःहून केले आहे असेच मला वाटत आले आहे.
मी स्वत:हून ब्रेनवॉश्ड झालेलो आहे हे मान्य. आहेच मुळी मी स्वावलंबी. अहो लोकं कुठलीशी लस टोचवून घेतात आणि स्वत:ला करोनावॉश्ड समजतात. त्यापेक्षा माझा ब्रेनवॉश बराय. निदान जीव तरी जात नाही. ६.
.... फालतू निर्बुद्ध, मनाजोगते वाट्टेल ते आकलन केलेले आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख वाचून लस न घेण्याचा निर्णय घेत असेल तर ते थांबवणे ....
करोनाच्या लशीस मेकॉलेछाप क्लार्क लोकांनी मान्यता दिलेली आहे. भले त्यांच्या पदव्या व शिक्षणं काहीही असोत. ती तथाकथित लस टोचून कुणाचा जीव जाऊ नये या सद्हेतूने मी प्रेरित झालो आहे. आता तुम्ही लावलेल्या एकेक विशेषणांचा परामर्ष घेतो. फालतू : अत्यंत चुकीचं विशेषण. करोना हे थोतांड आहे. व त्याची लस फालतू आहे. त्यामुळे मला महाफालतू हे विशेषण लावायला पाहिजे. थोतांडाच्या पातळीवर उतरून मी महाफालतू पद्धतीने माझा मुदा पुढे रेटतोय. का ते पुढे वाचा .... निर्बुद्ध : .... कारण की मी निर्बुद्ध आहे. होय तर. मला मेडिकल अक्कल नाही. म्हणून मी माझ्यापेक्षा अधिक मेडिकल अक्कल असेलल्या तत्ज्ञांचं ऐकतो. त्यांचा दृष्टीकोन सरकारी नसून पर्यायी आहे. मनाजोगते : हे बरोबर बोललात. फक्त 'स्वत:च्या मनाजोगते' असं हवं होतं. कारण की मी मेकॉलेछाप कारकुंड्यांच्या ओंजळीने पाणी पीत नाही. वाट्टेल ते आकलन केलेले : करेक्ट. मी माझ्या मनाला वाट्टेल ते आणि तेव्हढंच आकलन करतो. मी निर्बुद्ध असल्याने माझ्यापेक्षा अधिक माहिती असलेल्या तत्ज्ञांचं मत बघतो. मग ते सरकारी प्रचाराच्या बाजूने असो वा विरोधात. मला त्याची पर्वा नाही. का ते पुढे वाचा .... आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख : .... कारण की माझा कॉन्टेक्स्ट इतरांसारखा मर्यादित नाही. माझा कॉन्टेक्स्ट 'जिवंत राहणे' हा आहे. करोनाचा विषाणू, त्याची चाचणी, त्याची लस, इत्यादि कॉन्टेक्स्ट उथळ व मर्यादित असून ते स्वतंत्रपणे अभ्यासल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. म्हणून 'जिवंत राहण्या'चा माझा विशालतम कॉन्टेक्स्ट माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. उथळ कॉन्टेक्स्ट मध्ये नसलेले मुद्दे विशाल कॉन्टेक्स्ट मध्ये चर्चेस येतात. म्हणून तुम्हांस ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटतात. असो. लशीची पर्यायी बाजू का चर्चेस येत नाही, असा माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे. पर्यायी दृष्टिकोनाचा इतका तिरस्कार का होतोय? इतका तिरस्कार तर मी लशीचाही करीत नाही. कारण की मी फ्ल्यूची लस घेतो प्रत्येक हिवाळ्यात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

तुमच्याकडे विदासंबंधी दुवा

कॉमी
Wed, 07/27/2022 - 07:18 नवीन
तुमच्याकडे विदासंबंधी दुवा आहे का ? लशीमुळे रोग झाला नाही की इतर कारणामुळे, हे कसं कळणार ?
लस आणि मृत्यू- अमेरिका. https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#rates-by-vaccine-status हॉस्पिटलायझेशन आणि लस- अमेरिका. https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#covidnet-hospitalizations-vaccination बाकी भारताचा मृत्यूसंदर्भात डेटा ऑलरेडी इथे दिलेला. त्यावर तुम्ही कोण निधी आयोगाचे पॉल आहेत त्यांच्या विधानाचा १००% चुकीचा अर्थ काढून काहीबाही टाकले आणि परत त्या आकड्यांकडे फिरकला नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी एका गुगल सर्च वरून मिळतात. माझ्या कडे इतका सहजसाध्य विदा मागणे ते सुद्धा स्वावलंबी माणसाने हे कसे ?
आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख : .... कारण की माझा कॉन्टेक्स्ट इतरांसारखा मर्यादित नाही. माझा कॉन्टेक्स्ट 'जिवंत राहणे' हा आहे. करोनाचा विषाणू, त्याची चाचणी, त्याची लस, इत्यादि कॉन्टेक्स्ट उथळ व मर्यादित असून ते स्वतंत्रपणे अभ्यासल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. म्हणून 'जिवंत राहण्या'चा माझा विशालतम कॉन्टेक्स्ट माझ्यासाठी सर्वोत्तम आहे
माझे मत वेगळे झाले आहे. . तुम्ही काहीतरी वाचता, आणि लेखात जो तज्ञ व्यक्ती बोलत असतो त्याचे म्हणणे नक्की काय आहे ह्याची तुम्हाला फारसे देणे घेणे नसते इतकेच. तुम्हाला हवा तो संदेश तुम्ही त्यातून घेता, भले तो संदेश तज्ञाला आजिबात पटत का नसो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

एज स्टॅण्डर्ड केलेला मृत्यू आलेख.

कॉमी
Wed, 07/27/2022 - 07:32 नवीन
एज स्टॅण्डर्ड केलेला मृत्यू आलेख. निळी रेषा लस घेतल्याचे मृत्यू दर्शवत आणि काळी रेषा लस न घेतलेल्यांची. Image removed.
  • Log in or register to post comments

हम्म.

कॉमी
Wed, 07/27/2022 - 07:33 नवीन
एज स्टॅण्डर्ड नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

सीडीसी चा डाटा आजिबात

सुक्या
Wed, 07/27/2022 - 21:43 नवीन
<गामा मोड ऑन> सीडीसी चा डाटा आजिबात स्टँडर्ड नाहीये / विश्वसनीय नाहिये . कुठल्यातरी कारकुंड्यांनी बनवलेला डेटा आहे. लस न घेतलेल्या लोकांचे जे मृत्यू झालेले दाखवले आहेत ते नक्की कोरोना ने झाले आहेत का? की कुठल्या सहव्याधी ने झाले आहेत? <कुठ्लीतरी लिंक> या दुव्यावर आकडेवारी उलट दाखवत आहेत. मग नक्की कोणती आकडेवारी खरी? जानेवारी मधे लस घेतलेल्या लोकांचे मृत्यू हेच दर्शवतात की लस घेतल्याने कुठलेही संरक्षण मिळत नाही. सबब कोरोना हे थोतांड आहे. <गामा मोड ऑफ>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

धाग्याच्या निमित्ताने

धर्मराजमुटके
Wed, 07/27/2022 - 22:18 नवीन
धाग्याच्या निमित्ताने 'हो लाल मेरी' हे गाणे आज ऐकून घेतले.
  • Log in or register to post comments

संशयास्पद विदा

गामा पैलवान
गुरुवार, 07/28/2022 - 02:59 नवीन
कॉमी, १.
https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#rates-by-vaccine-status
positive specimen असलेले म्हणजे करोनाने पीडित नव्हे. तसंच मृताच्या अंगात करोना सापडणे म्हणजे करोनामुळे मृत्यू झाला असेही नव्हे. हा करोना संगे मृत्यू आहे. death from corona virus हा शुद्ध दिशाभूलजनक अपप्रचार आहे. कारण की खाली छोट्या अक्षरांत associated deaths असं लिहिलंय. म्हणजे हे मृत्यू करोनासंगे झालेले आहेत. साहजिकंच 'लसविहिनांची करोनामुळे मरण्याची शक्यता ९ पट आहे' वगैरे विधानं निव्वळ धूळफेक आहेत. मी जो संयुक्त साम्राज्याचा ( UK चा ) विदा दिला त्यत कुठेही करोनामुळे मृत्यू असा स्तंभ नाही. सत्याशी अपलाप करणारा विदा नसेल तरंच मी तो ग्राह्य धरेन. २.
https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#covidnet-hospitalizations-vaccination
हे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे आकडे आहेत. त्यांतही अपूर्ण लशीकृत ( partially vaccinated ) लोकांची संख्या जमेस धरलेली नाहीये. ती धरली की मगंच खरं चित्रं कळून येईल. ३.
निधी आयोगाचे पॉल आहेत त्यांच्या विधानाचा १००% चुकीचा अर्थ काढून काहीबाही टाकले आणि परत त्या आकड्यांकडे फिरकला नाहीत.
मी त्या आकड्यांकडे फिरकलो नाही आणि फिरकणारही नाही. कारण की त्यांनी कसलीही आकडेवारी सादर केली नाही. केवळ ४,८९,००० करोनामृत्यू झालेत इतकंच बोललेत. यावर काय कप्पाळ चर्चा करणार? ( हा आकडाही फुगवलेला असू शकतो. पण ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे अतिरिक्त विदा नाही. ) बाकी, माझा रोख श्री. पॉल यांच्या या विधानाकडे आहे :
VK Paul on Tuesday said that the increase in death registrations in India in 2020 compared to 2019 is not only due to death from Corona.
४.
माझ्या कडे इतका सहजसाध्य विदा मागणे ते सुद्धा स्वावलंबी माणसाने हे कसे ?
समान विदावर चर्चा करण्यासाठी. ५.
तुम्ही काहीतरी वाचता, आणि लेखात जो तज्ञ व्यक्ती बोलत असतो त्याचे म्हणणे नक्की काय आहे ह्याची तुम्हाला फारसे देणे घेणे नसते इतकेच. तुम्हाला हवा तो संदेश तुम्ही त्यातून घेता, भले तो संदेश तज्ञाला आजिबात पटत का नसो.
अगदी बरोबर. या असल्या पोपटपंची तत्ज्ञांना मी फारशी किंमत देत नाही. ( म्हणूनंच मी जिवंत आहे. ) पण काये की हे तथाकथित तत्ज्ञ बर्क्सबाईंसारखं कधीकधी चुकून खरं बोलून जातात. अशा वेळेस त्यांच्यावर झडप घालून थोतांड उघडं पाडायला मजा येते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

ओके.

कॉमी
गुरुवार, 07/28/2022 - 08:28 नवीन
म्हणजे हे तद्न्य इतर वेळेस खोटं बोलत असतात पण पब्लिक मध्ये चुकून त्यांच्या तोंडातून बावळटपणे खरं बोलतात असा बालिश कन्स्पायरसी समज आहे तुमचा.
सत्याशी अपलाप करणारा विदा नसेल तरंच मी तो ग्राह्य धरेन.
होय, तुमच्या मताविरोधात जाणारा विदा हा सत्याशी अपलाप करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

फ्रॉईडची कॉन्स्पिरसी थियरी ....

गामा पैलवान
गुरुवार, 07/28/2022 - 21:07 नवीन
कॉमी, १.
म्हणजे हे तद्न्य इतर वेळेस खोटं बोलत असतात पण पब्लिक मध्ये चुकून त्यांच्या तोंडातून बावळटपणे खरं बोलतात असा बालिश कन्स्पायरसी समज आहे तुमचा.
यांस फ्रॉईडियन स्लिप म्हणतात. ही सिगमंड फ्रॉईड याची थियरी आहे. ती कॉन्स्पिरसी थियरी असू शकते. मला माहित नाही. २.
तुमच्या मताविरोधात जाणारा विदा हा सत्याशी अपलाप करतो.
होय तर. शंकाच नाही मुळी. विदा पुरेसा व सुसंगत ( sufficient and consistent ) असावा इतकंच माझं मत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

विदा पुरेसा आणि सुसंगतच आहे.

कॉमी
Fri, 07/29/2022 - 09:58 नवीन
विदा पुरेसा आणि सुसंगतच आहे. तुम्ही तर एक काडीचाही विदा तुमच्या मुद्द्यांच्या समर्थनात आणू शकला नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

अपूर्ण विदा

गामा पैलवान
Fri, 07/29/2022 - 19:28 नवीन
कॉमी, अपूर्ण लशीकृत ( partially vaccinated ) लोकांची संख्या जमेस धरली की मग आपण या विदावर चर्चा करूया. बाकी, माझ्या मुद्द्याच्या समर्थनार्थ इथे विदा प्रस्तुत केला आहे : https://www.misalpav.com/comment/1147005#comment-1147005 आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

अपूर्ण लशीकृत ( partially

कॉमी
Fri, 07/29/2022 - 22:32 नवीन
अपूर्ण लशीकृत ( partially vaccinated ) लोकांची संख्या जमेस धरली की मग आपण या विदावर चर्चा करूया.
Image removed.
बाकी, माझ्या मुद्द्याच्या समर्थनार्थ इथे विदा प्रस्तुत केला आहे : https://www.misalpav.com/comment/1147005#comment-1147005
हाहाहा म्हणजे असे रॉ आकडे बघून काय होणारे ? 80% लोकांच्या पूल मधून जास्त मृत्यू होणार हे कोणी सुद्धा सांगेल. त्यासाठीच आपण मॉर्टलिटी रेट वैगेरे बघत असतो. उद्या तुम्ही म्हणाल (उदाहरणार्थ) जगात उजवे लोक जास्त मरतात आणि डावरे खूप कमी मरतात, उजवे रहा आणि व्हा परलोकी मार्गस्थ. इथे बघा इंग्लंडचा मोर्तलिटी रेट- लस घेतलेले आणि न घेतलेले. https://ourworldindata.org/grapher/england-covid-19-mortality-rate-by-vaccination-status?country=~All+ages Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

कुणाचा पायपोस कुणाच्या पायात ?

गामा पैलवान
Sat, 07/30/2022 - 01:47 नवीन
कॉमी, तुम्ही दिलेल्या दुव्यात ही माहिती सापडली :
In May 2022, among people ages 50 yrs and older, unvaccinated people had : 29X Risk of dying from COVID-19 compared to people vaccinated with a primary series and two or more booster doses *.
यानंतर * म्हणजे एक तळटीप आहे. काय आहे बरं ती? वाचूया बरं :
* Because data on immune status of cases and associated deaths are unavailable, an additional dose in an immunocompromised person cannot be distinguished from a booster dose.This is a relevent consideration because vaccines can be less effective in this group.
यातनं काही प्रश्न उपस्थित होतात. १. कोणी व्यक्ती immunocompromised असल्यास लशीचा विपरीत परिणाम होणार नाही हे कशावरनं? २. लशीचा विपरीत परिणाम करोनावर ढकलून मोकळं व्हायचं का? आणि वाढत्या वयामुळे लशीचा प्रभाव उणावला म्हणून चालूबाजी करायची? ३. dying from COVID-19 हे नेमकं काय आहे? associated deaths म्हणजे dying from COVID-19 नव्हे. CDC ने आधी धडपणे रिपोर्टिंग करायला शिकावं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हा तुमचा संपूर्ण दिशा

कॉमी
Sat, 07/30/2022 - 13:35 नवीन
हा तुमचा संपूर्ण दिशा बदलण्याचा प्रयत्न आहे. त्याचे उत्तर मुद्दाम खाली वेगळ्या प्रतिसादात देईन. उगाच चार रँडम प्रश्न विचारून मूळ विदाकडे दुर्लक्ष करण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

वकिली थाट

गामा पैलवान
Sat, 07/30/2022 - 13:41 नवीन
कॉमी, चार आडवेतिडवे प्रश्न विचारले की लबाडी उघडी पडते. बाकी, मी कुठलाही विदा सादर करणार नाही. कारण की मला कुठलाही दावा सिद्ध करायचा नाहीये. माझा एकंच प्रश्न आहे : लस घ्यायची कशाला? मात्र सरकारी विदावर माझी भाष्यं जरूर करेन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

कोणी व्यक्ती

कॉमी
Sat, 07/30/2022 - 14:20 नवीन
कोणी व्यक्ती immunocompromised असल्यास लशीचा विपरीत परिणाम होणार नाही हे कशावरनं?
कशावरून म्हणजे काय ? हा काय प्रश्न झाला ? हे तर राळ उडवणे झाले. तुम्ही श्वास घेतल्यावर तुमच्या शरीरात स्फोट होणार नाही कशावरून ?
लशीचा विपरीत परिणाम करोनावर ढकलून मोकळं व्हायचं का? आणि वाढत्या वयामुळे लशीचा प्रभाव उणावला म्हणून चालूबाजी करायची?
लसी पासून जे काही धोके आहेत ते अत्यंत अत्यंत अत्यंत कमी प्रमाणात दिसले आहेत. आणि मुख्यत्वे ते सर्व धोके तेच आहेत जे कोरोना झाल्यावर त्यापेक्षा तीव्र प्रमाणात दिसतात (उदा- मायोकरडायटीस. लहान मुलांमध्ये लसीमुळे मायो. दिसत होता, पण कोरोना झाल्यामुळे होणार मायो. जास्त तीव्र असतो असे दिसले आहे.) लसीचा परिणाम हि बहुतांशी तुमच्या डोक्यातली फॅन्टसी आहे. लस न घेता पहिल्या दुसऱ्या वेव्ह मध्ये लाखोंनी लोक मेले ते कसे, हे तुम्ही सांगू शकत नाही. इतकी एक्सेस मोरटालिटी कुठून आली हे तुम्ही सांगू शकत नाही.
dying from COVID-19 हे नेमकं काय आहे? associated deaths म्हणजे dying from COVID-19 नव्हे.
ह्याचे उत्तर दिले आहे. कोव्हिड मृत्यू गणले जाण्याचे निकष मी दिले आहेत. कोव्हिड हे मृत्यूच्या एकापेक्षा जास्त कारणांपैकी एक आहे असे attending physician ने सर्टिफाय केले असेल तरच कोव्हिड मृत्यू गणला जातो.
  • Log in or register to post comments

आशावाद, चिकाटी कौतुकास्पद.

गवि
Sat, 07/30/2022 - 14:39 नवीन
आशावाद, चिकाटी कौतुकास्पद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

साप स्वतःचीच शेपटी खातोय असे

आग्या१९९०
Sat, 07/30/2022 - 15:23 नवीन
साप स्वतःचीच शेपटी खातोय असे स्वप्न बघून कोणा शास्त्रज्ञाला बेंझेन रिंगची कल्पना सुचली होती ह्याची आठवण येथील काही शेपटी खाणारे प्रतिसाद वाचून झाली.
  • Log in or register to post comments

थोतांड ते थोतांडच

गामा पैलवान
Sun, 07/31/2022 - 02:07 नवीन
कॉमी, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो. १.
मायोकरडायटीस. लहान मुलांमध्ये लसीमुळे मायो. दिसत होता, पण कोरोना झाल्यामुळे होणार मायो. जास्त तीव्र असतो असे दिसले आहे.
माझ्या मते करोनामुळे मायोकार्डीटिस होत नसतो. हा केवळ लाशीचाच दुष्परिणाम आहे. २.
लसीचा परिणाम हि बहुतांशी तुमच्या डोक्यातली फॅन्टसी आहे.
VAERS विदागारात लक्षावधी प्रकरणं दाखल होताहेत ती माझ्या डोक्यातल्या फॅन्टसी मुळेच. माझ्या डोक्यातली फॅन्टसी आहेच मुळी जबरदस्त ! माझ्यापासून सावधान !! ३.
कोव्हिड हे मृत्यूच्या एकापेक्षा जास्त कारणांपैकी एक आहे असे attending physician ने सर्टिफाय केले असेल तरच कोव्हिड मृत्यू गणला जातो.
मग बाकीच्या कारणांचं काय करायचं? कोव्हिड मृत्यूच्या विद्यातून बाकीची कारणं कशी वजा करायची? काही निकष? की सरसकट सगळे मृत्यू कोव्हिड म्हणून धरायचे? ४.
कशावरून म्हणजे काय ? हा काय प्रश्न झाला ? हे तर राळ उडवणे झाले.
लशीची सुरक्षा नावाचा प्रकार कशाशी खातात याचा तुम्हाला पत्ता नाही. immunocompromisation झालेल्या व्यक्तीत करोनाची लस नेमका काय परिणाम घडवून आणेल हे कुणालाही ज्ञात नाही. आणि वारेमाप दावे कसले तर म्हणे करोनापासून संरक्षण होतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

माझ्या मते करोनामुळे

कॉमी
Sun, 07/31/2022 - 03:53 नवीन
माझ्या मते करोनामुळे मायोकार्डीटिस होत नसतो.
साफ चुकीचे मत. वाचन वाढवा
कोव्हिड मृत्यूच्या विद्यातून बाकीची कारणं कशी वजा करायची? काही निकष? की सरसकट सगळे मृत्यू कोव्हिड म्हणून धरायचे?
मृत्यूच तात्कालिक कारण वेगळं असूनही, जर कोव्हिड रोग झाला नसता तर मृत्यू झाला नसता असे असल्यास कोव्हिड मृत्यू म्हणून गणना होते.
immunocompromisation झालेल्या व्यक्तीत करोनाची लस नेमका काय परिणाम घडवून आणेल हे कुणालाही ज्ञात नाही.
हेच ते राळ उडवणे. इम्युनोकॉम्प्रो लोकांना प्रयोरिटीने लशी दिल्या.त्यांच्यावर लसींचा दुष्परिणाम होतो असा अजिबात विदा नाही. उगा तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारत सुटला आहात. ज्ञात नाही म्हणे. लॉल. उद्या ज्ञात नाही म्हणत आणखी काहीही बंद करा म्हणाल. तुमच्याकडे विदा उपलब्ध नसल्यास विधान करण्याआधी ज्ञात करून घ्या मग लसीसारख्या महत्वाच्या गोष्टीवर शंका घ्या.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा