मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पंचमीतले रंग सांडले........

कर्नलतपस्वी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पंचमीतले रंग सांडले झाडांनी ते बघा झेलले डोक्यावरती तुरे गुलाबी धुंद होऊनी फाग नाचले लुसलुशीत ही कवळी पाने मोहरून गेली सर्वच राने आंबोळ्या निंबोळ्या सवे खेळती ओढून नुतन वस्त्रे गर्द पोपटी कोण चितारी चित्र काढतो रंगांची रागदारी मांडतो कोकीळ मंजुळ कुजन करते मन मुदित हिंदोळ्यावर झुलते कसरत २९-३-२०२२

वाचने 5124 वाचनखूण प्रतिक्रिया 8

कर्नलतपस्वी Wed, 03/30/2022 - 22:33
"फाग ", होळी च्या वेळी गायचा एक उपशास्त्रीय लोकगीताचा प्रकार आहे. फाल्गुन महिन्यांत उत्तर भारतात प्रभू रामचंद्र,राधाकृष्ण, निसर्ग यावर रचलेली गीतांवर लोक नाचतात. अवधी, बुंदेलखंडी,छत्तीसगढी आसे प्रदेशानुसार वेगवेगळे प्रकार.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti गुरुवार, 03/31/2022 - 10:03
होय,मी नुकतीच एका गायिकेची मुलाखत ऐकली.त्यात उत्तर भारतात होळी आणि भारतीय क्लासिकल होळी गीतांच महत्त्व खुप आहे,हे सांगितलं होतं.जवळपास तीन महिने या गीतांचा बहर असतो. छान माहिती!