पंचमीतले रंग सांडले
झाडांनी ते बघा झेलले
डोक्यावरती तुरे गुलाबी
धुंद होऊनी फाग नाचले
लुसलुशीत ही कवळी पाने
मोहरून गेली सर्वच राने
आंबोळ्या निंबोळ्या सवे खेळती
ओढून नुतन वस्त्रे गर्द पोपटी
कोण चितारी चित्र काढतो
रंगांची रागदारी मांडतो
कोकीळ मंजुळ कुजन करते
मन मुदित हिंदोळ्यावर झुलते
कसरत
२९-३-२०२२
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5133
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा,
+१
सुरेख! फाग म्हणजे फाल्गुन का?
सर्वांचे मनापासून आभार
होय,मी नुकतीच एका गायिकेची
In reply to सर्वांचे मनापासून आभार by कर्नलतपस्वी
रंगात नहाले
व्वा, भारी !
🌈
धन्यवाद