शान्तिपुर्ण अपमृत्यु

शेर भाई's picture
शेर भाई in जनातलं, मनातलं
12 Mar 2022 - 4:13 pm

ये उन दिनो कि बात है, जेव्हा नुकतच मिसरूड फुटायला लागली होती. विद्यालयातून महाविद्यालयात जाण्याचे दिवस सुरु झाले होते. सक्काळी उठून पहिले लेक्चर गाठणे आणि मग इतर महाविद्यालयिन कर्तव्ये आटपून जेव्हा मी आमच्या स्थानिक गोतावाळ्यासह स्टेशनच्या बस डेपोला यायचो तेव्हा दुपारच्या अधिवेशानातल्या मैना - बकुळांची हि भलीमोठी गर्दी आमच्या सोबतीला असे. (आमच्याकडे त्या काळापासून फक्त महिलांचे असे एक महाविद्यालय आहे.) त्या भर गर्दीत देखील आपली आवडती खिडकी मिळत नाही तो पर्यंत येणारी बस सोडायची चंगळ आम्ही करत असू. कोणालाही खर वाटणार नाही पण बेस्टची “झिरो वेटिंग बस सेवा” हा प्रकार आमची मदत करायचा. कारण त्या काळात बेस्ट बहुधा आपल्या नावाप्रमाणे वागायचा प्रयत्न करायची. नंतर अचानक बेस्टला बहुधा रिक्षावाल्यांचे भले करायचा विचार आला असावा. कारण मी तृतीय वर्षात पदार्पण करे पर्यंत सुरुवातीचे झिरो वेटिंग नंतर मिनिट वेटिंगमध्ये आणि नंतर तास वेटिंग कधी झाले ते कोणालाच काय खुद्द बेस्टला पण कळलेच नसावं, एव्हाना शेयर रिक्षा धो धो वाहू लागल्या. ती बहुधा बेस्टची वेस्टला जाण्याची सुरुवात होती. आता फार फार तर दोन वर्षापूर्वी करोनाच्या सुमारास आमच्या बेस्ट स्थानकात एस. टी.च्या बसेस दिसू लागल्या, नंतर अचानक एसी बसेस येऊ आल्या. मला वाटले चला बर झाल! आता आपली बेस्ट पुन्हा कात टाकते आहे. पण नंतर जेव्हा कळले कि या एसी बसेस भाड्यावर आहेत आणि बेस्टमध्ये (गुपचूप) खाजगीकरण सुरु झाले आहे, तेव्हा बेस्टची वेळ भरली हे समजून आले. हा माझ्या पाहण्यातला दुसरा शांत अपमृत्यु.

पहिला शांत अपमृत्यु फार पूर्वी झाला होता आणि तो इतका शांत होता कि तो झाला आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या अजून ध्यानी नसेल. माझ्या लहानपणी आमच्या चेंबूरच्या आजोळी जाताना अमर महालचा पूल व्हायच्या आधी आम्ही कुर्ला मार्गे जात असू. परत येताना तिथे कुर्ला सिग्नलपासून पार पुढचा पूल सुरु होई पर्यंत एक लांबलचक पाणथळीची जागा होती, गरमीच्या दिवसात देखील तिथे एक प्रकारचा गारवा असे. अशीच अजून एक पाणथळीची जागा रमाबाई नगर समोर होती. आता ती तळी तिथे नाहीत. ह्या तळ्यांच्या जागी आता बऱ्याच टोलेजंग इमारती उभ्या आहेत. तळ्याचे कोणतेही नामोनिशाण आता तिथे नाही. त्यामुळे हि तळी कुठे गायब झाली ते कधी कळलेच नाही आणि त्यामुळे त्याची तोशिष नाही.

दहा वर्षांपूर्वी संध्याकाळी साधारण ६ – ७ वाजता बाईकने मुलुंडवरून घाटकोपरला जाताना भांडूप पंपिंग पासून कांजूर गाव पर्यंत मस्त गारठा जाणवायचा. आता तो जाणवत नाही, तिसरा नंबर बहुतेक खारफुटीचा!!!!

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Mar 2022 - 4:15 pm | रावसाहेब चिंगभूतकर

करून दाखवलं!

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 7:52 pm | मुक्त विहारि

एक रूपयाची झुणकाभाकर देखील अशीच मृत्यु पावली ...

बाय द वे,

अम्मा इडली मात्र बरीच वर्षे चालू होती, कदाचित अजूनही चालू असेल

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 7:04 pm | मुक्त विहारि

ST चे खाजगीकरण ....

सामान्यनागरिक's picture

16 Mar 2022 - 11:36 am | सामान्यनागरिक

खासगीकरण करतांना योग्य ती खबरदारी घेतली जात नाही तसेच त्यावर अंकुश ठेवला जात नाही. त्यामुळे खासगी सेवेची अरेरावी चालु होते. म्हणुन लोकांणा खासगी करण वाइट वाटते.

जर नीट विचार करुन व्यवस्थीत केले तर खासगीकर्णाचा फायद होऊ शकेल.

आज एस टी सरकारी नियंत्रणात आहे म्हणुन त्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्यातुन राजकारणी लोकंच पैसे कमावत आहेत. म्हणुन वाईट अवस्था आहे. एकुणच सरकारने हे नसते उद्योग करु नयेत. सरकारला ते फायदेशीर पणे करणे जमणार नाहीच.

आता एस टी कर्मचारयांना विलीनीकरण का हवे ? तर फायदा होवो वा तोटा, आंम्हाला विवक्षीत पगार / भत्ते/ सोयी मिळणारच.
मग फायद्याचा कोणी विचारच करणार नाही. आणि परत भ्रष्टाचार वाढेल. सुटे भाग, टायर ई. पुरवण्ञाची कंत्राटं राजकारणी आपल्या नातेवाईकांना देतील. एकदा का विलीनीकरण झाले की कोणाला काहीच बोलता / टीका करता येणार नाही. जे आहे तसे सहन करावे लागेल.

एस टी कर्मचारी यांना सुखसोयी मिळायलाच पाहिजेत . पगार पण चांगले हवे. पण विलीनीकरण आणि नंतरच्या खर्चाची जबाबदारी शेवटी करदात्यांनाच उचलावी लागेल.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2022 - 7:46 pm | मुक्त विहारि

जर नीट विचार करुन व्यवस्थीत केले तर खासगीकर्णाचा फायद होऊ शकेल....

कमी प्रवाशी असल्याने, तोट्यात जाणारे मार्ग.... खाजगीकरणा नंतर अशा प्रवाशांची लुबाडणूकच होण्याची शक्यता जास्त आहे...

शिवाय, खाजगीकरणा नंतर, तिकीटांच्या दरावर, सरकारचे काहीच नियंत्रण राहणार नाही.

खाजगीकरणाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही, फक्त ते उघडपणे राजरोसपणे व्हावे इतकच. बेस्ट जेव्हा नवीन बसेस परवडत नाही म्हणून CNG चा पर्याय निवडत होती तीच आज नवीन बसेस भाडयाने घेत आहे, आणि पाणथळ जागा; त्यांचे महत्व फक्त पुस्तकांपुरतेच आहे. मागे कंजूसजींच्या सल्ल्याने एक दिवसीय सहलीला ऐरोलीला (Flamingo) रोहित पक्ष्यांच्या अभयारण्यात गेलो होतो, तेव्हा तिथे कळले कि शिवडीला आजकाल हे पक्षी जात नाही कारण तिथे त्यांना जाण्यासारखे काहीच उरले नाही (खर – खोट ते रोहित पक्षीच जाणोत) , याचा कुठेही उल्लेख नाही. हे सगळ पाहिलं की त्या कुप्रसिद्ध “मोरचूद पुडी” कथेची का कुणास ठाऊक उगाच आठवण आली.

सर टोबी's picture

12 Mar 2022 - 9:27 pm | सर टोबी

सरकार आणि जनता बरोबरीने जबाबदार आहेत. सरकारची जबाबदारी जास्त आहे एवढच.

काही दशकापूर्वी सातारा शहराचा पुण्याच्या धर्तीवर विकास होईल अशी वंदता होती. तसे काही झाले नाही. नागपूरला आयटी चा विकास होईल असे वाटले होते पण तसे होताना दिसत नाही.

नव्याने विकास होताना तो प्रस्थापित शहरांच्या जवळच करायचा अशी प्रवृत्ती असल्यामुळे मुळ शहरावर भारंभार बोजा वाढतच राहतो. आता पुण्याचेच बघा. औंध, रेंजहिल्स, खडकी, गणेशखिंड ही अतिशय घनदाट वृक्षराजीने संपन्न असे परिसर होते. पाणथळ जागा आणि दाट झाडी यामुळे काही ठिकाणाहून जा ये करताना विशेष थंडी जाणवायची. आता त्यातील काही जागा उष्णतेची बेटं बनली आहेत.

मुंबईचं देखील म्हणाल तर आता त्या शहरात गचपन खूपच झालंय असं वाटते. गडकरी चौकात कोहिनूर मिलची शोरुम किती रुबाबदार वाटायची. रात्रीच्या वेळेस आस्वाद मध्ये जेवण करायचे आणि चारकोपला जाणाऱ्या बसमध्ये डाव्या बाजूच्या खिडकीशी बसायचे. अणि मग स्वामी विवेकानंद रोडने मागे पडत जाणारा परिसर बघत, मस्त गार हवा अंगावर घेत प्रवास करायला मजा वाटत होती. आता तसे राहिले नाही.

कंजूस's picture

12 Mar 2022 - 9:29 pm | कंजूस

वडाळा भक्तिपार्कच्या जागीही पाणथळ जागा होती. तिथे शाळेत असताना भटकलो आहे. काही वेगळ्याच वनस्पती असायच्या.
ठाणे घोडबंदर रोडवर चैना क्रिक रम्य जागा। दुसरी वाघबिळ. मागच्या खाडीपर्यंत जांभळाई होती. मोठ्या जांभळांच्या झाडांना पार बांधलेले. तिथे वनभोजन करताना मालक आला. " आम्ही पावसाळा संपला की खते देतो. एप्रिलमध्ये काढणी करून बोरिवली मार्केटला पाठवतो. गुजराती गिऱ्हाइक. पण आता यावर्षी खत नाही दिले. झाडं आणि जमीन बिल्डर लोकांनी घेतली आहेत."
खाडीकडे फार मोठे केवड्याचे बन होते.

शेर भाई's picture

12 Mar 2022 - 11:47 pm | शेर भाई

हा अपमृत्यु आहेच पण तो राजरोस उघडपणे होत आहे. आपल्या आजूबाजूच्या काही गोष्टी इतक्या सराईतपणे गायब झाल्या आहेत कि आता त्यांचे अस्तित्व होते काय किंवा नव्हते आपल्याला काही जाणवतच नाही किंवा फरक पडत नाही, म्हणूनच कोणाच्याही लक्षात न येता केलेल्या या Silent Kill आहेत.

हा अपमृत्यु आहेच पण तो राजरोस उघडपणे होत आहे. आपल्या आजूबाजूच्या काही गोष्टी इतक्या सराईतपणे गायब झाल्या आहेत कि आता त्यांचे अस्तित्व होते काय किंवा नव्हते आपल्याला काही जाणवतच नाही किंवा फरक पडत नाही, म्हणूनच कोणाच्याही लक्षात न येता केलेल्या या Silent Kill आहेत.

निनाद's picture

13 Mar 2022 - 4:35 am | निनाद

शांतीपूर्ण नाहीत हे अपमृत्यु!
तोंड दाबून, घुसमटून केलेले खून आहेत हे. बेस्ट बंद पाडली जाते आहे.
एस्टी ही इतकी चांगली सेवा - पण ती ही बरबाद केली आहे.

एस्टीडी आयएसडी पीसीओ, सायबर कॅफेज.

गेले ते.. उरल्या त्या.. आमच्यावेळी.. इ इ .

उत्तम धागाविषय. अनेक गोष्टी काळानुसार अप्रस्तुत होत गेल्यानेही नाहीशा होतात. "आरे सरिता"ची खोकेवजा दुकाने गायब होत चालली अशी कुशंका एके काळी येऊ लागली होती. पण नंतर कुठे कुठे दिसली. विरळ झाली संख्या. पण आहेत. आणि एनर्जी बाटल्याही अजून जिवंत आहेत असे वाटते. चुभूद्याघ्या. पूर्वी आरे बटरही मिळे. ते अमूलपेक्षा आवडायचं. आता मात्र नसतं कुठे. पंचवीसेक वर्षे झाली.

गवि's picture

18 Mar 2022 - 1:21 pm | गवि

ता.क.

(आरेचे ताक नव्हे).. कुठेतरी झुणका भाकर केन्द्राचा उल्लेख आलाय. या आरे केन्द्रांपैकी अनेक पुढे झुणका भाकर केन्द्रे झाली. मग वर नाव आरे, त्याखाली झुणका भाकर केन्द्र अशी पाटी.. आणि काही वर्षांनी झुणका भाकर गायब, त्याऐवजी मिसळ, सामोसे, वडे, इडली. झु.भा.केन्द्र नावापुरते उरले.

अगदी सुरुवातीला ही झुणका भाकर केन्द्रे निघाली तेव्हा उत्सुकतेने एक रुपयात काय देतात ते बघायला गेलो. एक गिल्ट होता की गरजूंसाठी असलेली सवलत आपण घ्यावी का? पण कुतूहल होतंच. प्रत्यक्षात तिथे वेगळंच चित्र दिसलं. मागणी कमी होती. केन्द्रचालक आम्हाला विनंती करत होता की या रजिस्टरमधे किमान पाच सात नावे (खोटी) लिहा. म्हणजे त्याला अनुदान मिळत असावे. :-(

शेर भाई's picture

18 Mar 2022 - 8:49 pm | शेर भाई

The change is only constant, मानव निर्मित गोष्टींनी नेहमी बदलतच राहिले पाहिजे, (निसर्ग स्वतःच्या बाबतीत समर्थ आहे.) कारण ते आपल्याला घडविण्याचे (बिघडविण्याचे) व्यवछेदक लक्षण आहे. मानव निर्मित संस्था आणि व्यवस्था बदलत राहतात, राहाव्यात.

आजकाल होत जाणारी तापमान वाढ आणि पूर्वी जाणूनबुजून गायब केलेल्या पाणथळ जागा, आणि सध्या नष्ट होणारी खारफुटी पाहता तापमान आपल्याला जणू सांगतय, “हे तर कायच नाय!!!!” या विचाराने अंगाची काहिली अंमळ जास्तच होते.

ता.क.
“हे तर कायच नाय!!!!” (झी मराठी) बंद झाली का??

sunil kachure's picture

18 Mar 2022 - 1:20 pm | sunil kachure

निसर्ग चक्र तसेच चालते कोणती संस्कृती हळू हळू प्रगत होते उच्च पातळीवर पोचते आणि परत विनाश च्या दिशेने त्या संस्कृती ची वाटचाल चालू होते.
अगदी life span सारखेच आहे हे.
आज विज्ञान इतके प्रगत झाले ,लोक इतकी शिक्षित झाली आहेत,सर्व त्यांना माहीत आहे.
खरे तर माणसा पुढे कोणत्याच अडचणी असायला नाही पाहिजे होत्या.
पण ज्या पूर्वी समस्या नव्हत्या त्या पेक्षा पण खूप मोठ्या आणि भयंकर समस्या आज मानव जाती पुढे आहेत
म्हणजे आता उतरती कळा लागली आहे काहीच वर्षात मानवी सभ्यता नष्ट होईल.
पुराण कथे मध्ये जी वर्णन आहेत .
मग विविध अस्त्र असतील,100 कौरव हे तर gentical अभियांत्रिकी चे उदाहरण च आहे.
पिरामिड आहेत ,mummy आहेत.
ह्या सर्व घटना तोच इशारा करतात.
पाहिले पण मानवी सभ्यता उच्च पातळीवर पोचलो होती नंतर हळू हळू अधोगती होवून विनाश पावली. सर्कल पूर्ण.

sunil kachure's picture

18 Mar 2022 - 9:47 pm | sunil kachure

जगाला सर्व घटने चा परिणाम होतील हे माहीत असले तरी जगाचा प्रवास विनाश कडेच होणार तो निसर्गाचा नियम आहे.
शांती पूर्ण मृत्यू मानव सहित पूर्ण जीवसृष्टी च होणारच.
हे अंतिम सत्य आहे.