शान्तिपुर्ण अपमृत्यु
ये उन दिनो कि बात है, जेव्हा नुकतच मिसरूड फुटायला लागली होती. विद्यालयातून महाविद्यालयात जाण्याचे दिवस सुरु झाले होते. सक्काळी उठून पहिले लेक्चर गाठणे आणि मग इतर महाविद्यालयिन कर्तव्ये आटपून जेव्हा मी आमच्या स्थानिक गोतावाळ्यासह स्टेशनच्या बस डेपोला यायचो तेव्हा दुपारच्या अधिवेशानातल्या मैना - बकुळांची हि भलीमोठी गर्दी आमच्या सोबतीला असे. (आमच्याकडे त्या काळापासून फक्त महिलांचे असे एक महाविद्यालय आहे.) त्या भर गर्दीत देखील आपली आवडती खिडकी मिळत नाही तो पर्यंत येणारी बस सोडायची चंगळ आम्ही करत असू. कोणालाही खर वाटणार नाही पण बेस्टची “झिरो वेटिंग बस सेवा” हा प्रकार आमची मदत करायचा. कारण त्या काळात बेस्ट बहुधा आपल्या नावाप्रमाणे वागायचा प्रयत्न करायची. नंतर अचानक बेस्टला बहुधा रिक्षावाल्यांचे भले करायचा विचार आला असावा. कारण मी तृतीय वर्षात पदार्पण करे पर्यंत सुरुवातीचे झिरो वेटिंग नंतर मिनिट वेटिंगमध्ये आणि नंतर तास वेटिंग कधी झाले ते कोणालाच काय खुद्द बेस्टला पण कळलेच नसावं, एव्हाना शेयर रिक्षा धो धो वाहू लागल्या. ती बहुधा बेस्टची वेस्टला जाण्याची सुरुवात होती. आता फार फार तर दोन वर्षापूर्वी करोनाच्या सुमारास आमच्या बेस्ट स्थानकात एस. टी.च्या बसेस दिसू लागल्या, नंतर अचानक एसी बसेस येऊ आल्या. मला वाटले चला बर झाल! आता आपली बेस्ट पुन्हा कात टाकते आहे. पण नंतर जेव्हा कळले कि या एसी बसेस भाड्यावर आहेत आणि बेस्टमध्ये (गुपचूप) खाजगीकरण सुरु झाले आहे, तेव्हा बेस्टची वेळ भरली हे समजून आले. हा माझ्या पाहण्यातला दुसरा शांत अपमृत्यु.
पहिला शांत अपमृत्यु फार पूर्वी झाला होता आणि तो इतका शांत होता कि तो झाला आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या अजून ध्यानी नसेल. माझ्या लहानपणी आमच्या चेंबूरच्या आजोळी जाताना अमर महालचा पूल व्हायच्या आधी आम्ही कुर्ला मार्गे जात असू. परत येताना तिथे कुर्ला सिग्नलपासून पार पुढचा पूल सुरु होई पर्यंत एक लांबलचक पाणथळीची जागा होती, गरमीच्या दिवसात देखील तिथे एक प्रकारचा गारवा असे. अशीच अजून एक पाणथळीची जागा रमाबाई नगर समोर होती. आता ती तळी तिथे नाहीत. ह्या तळ्यांच्या जागी आता बऱ्याच टोलेजंग इमारती उभ्या आहेत. तळ्याचे कोणतेही नामोनिशाण आता तिथे नाही. त्यामुळे हि तळी कुठे गायब झाली ते कधी कळलेच नाही आणि त्यामुळे त्याची तोशिष नाही.
दहा वर्षांपूर्वी संध्याकाळी साधारण ६ – ७ वाजता बाईकने मुलुंडवरून घाटकोपरला जाताना भांडूप पंपिंग पासून कांजूर गाव पर्यंत मस्त गारठा जाणवायचा. आता तो जाणवत नाही, तिसरा नंबर बहुतेक खारफुटीचा!!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
करून दाखवलं!
ते करूनच दाखवतात ...
असाच एक अपमृत्यू होऊ घातला आहे ...
खासगीकरण सगळेच वाईट नसते.
काही अंशी सहमत ....
खाजगीकरणाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही
शहरांची एकांगी वाढीला
छेडा नगर वसलं ती जागा?
राजरोस उघडपणे होत आहे
ST चा अपमृत्यु आहेच पण तो राजरोस उघडपणे होत आहे.
कारण
एस्टीडी आयएसडी पीसीओ, सायबर
ता.क.
The change is only constant
निसर्ग चक्र
कोणी काही ही करा