✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उतरत्या संध्याकाळी....

प — प्राची अश्विनी, Mon, 11/15/2021 - 08:53
उतरत्या संध्याकाळी खिडकीत बसू नये. हरवल्या नजरेला काही काही दिसू नये. चुलीपाशी दुधावर साय दाटे आठवांची, धुरकट कंदिलाची काच तेव्हा पुसू नये. उतरत्या संध्याकाळी नको ओवी गुणगुणू, उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू. सरेलही सांज बघ, नको भिजवूस वाणी. हूरहूर अंतरीची नको बघायला कुणी. उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती. जपताना धागा धागा धर थोडी राख हाती. मिटुनिया डोळे हळू लाव दिवा अंगणात, इडा पिडा टळो सारी समईच्या प्रकाशात..

प्रतिक्रिया द्या
3121 वाचन

💬 प्रतिसाद (9)

वा क्या बात है...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 11/15/2021 - 09:58 नवीन
उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती. जपताना धागा धागा धर थोडी राख हाती. अचुक भावना पकडली आहे. किनखापी आभाळाच्या पार्श्वभूमीवर ही कविता एकदम चटका लावून गेली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

धन्यवाद पैजारबुवा!

प्राची अश्विनी
Mon, 11/15/2021 - 16:44 नवीन
धन्यवाद पैजारबुवा!
  • Log in or register to post comments

कविता अतिशय भावली.

चित्रगुप्त
Tue, 11/16/2021 - 00:22 नवीन
कविता अतिशय भावली. 'उतरती संध्याकाळ' एवढ्याच दोनच शब्दात भावनांच्या अनेक छटा, अनेक आंदोलने, व्याकुळता, उदासी वगैरे निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. माझ्या आवडीची अनेक अप्रतिम निसर्गचित्रेही 'उतरत्या संध्याकाळ'चीच आहेत. उदाहरणार्थ खालील चित्रे: Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

क्या बात! किती समर्पक चित्रं

प्राची अश्विनी
Wed, 12/29/2021 - 12:34 नवीन
क्या बात! किती समर्पक चित्रं आहेत. धन्यवाद. ( खूप उशिराने दिलेल्या प्रतिसादाबद्दल माफी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अप्रतीम चित्रे! खूप आवडलीत. :

राघव
Wed, 12/29/2021 - 13:37 नवीन
अप्रतीम चित्रे! खूप आवडलीत. :-) अवांतरः आपली इ-गॅलरी वगैरे काही नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

छान

प्रज्ञादीप
Fri, 11/19/2021 - 14:01 नवीन
उतरती संध्याकाळ म्हणजे कातरवेळ ... छान वर्णन केलयं
  • Log in or register to post comments

प्रज्ञादीप, धन्यवाद.

प्राची अश्विनी
Wed, 12/29/2021 - 12:36 नवीन
प्रज्ञादीप, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रज्ञादीप

छान कविता

चांदणे संदीप
Fri, 11/19/2021 - 15:44 नवीन
आवडली.
उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू.
इथे 'काळजाचा' ऐवजी चुकून 'काजळाचा अस वाचलं मी. तेही चालेल असं वाटून गेल. बाकी कविता उत्तमच आहे. सं - दी - प
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्राची अश्विनी
Wed, 12/29/2021 - 12:35 नवीन
धन्यवाद. आधी काजळाचा असंच लिहिलं होतं. नंतर बदललं. कारण काही नाही .:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा